अखिल भारतीय सांस्कृतिक संघाच्या अकरा दिवसांच्या महोत्सवाचे देखणे रूप आज पुणेकरांना अनुभवता आले. पंधरा राज्यांतील पथके आज मोठ्या मिरवणुकीने टिळक स्मारक मंदिरापासून निघून गणेश कला-क्रीडा केंद्रात दाखल झाली.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
विविध भाषांचे सुमारे सहाशे कलावंत वाजतगाजत टिळक रस्त्यावरून निघाले ते पाहणेही नयनरम्य होते. पुणेकरांची वाहनेही मग काही काळ थांबली.
झारखंड, आसाम, गुजरात, छत्तीसगड, चेन्नई, पश्चिम बंगाल, राजस्थान, ओरिसा आणि महाराष्ट्रातले क लावंत आपल्या पारंपरिक वेशभूषेत नाचत-गात पुणेकरांचे लक्ष वेधून घेत होते.
गेले काही दिवस पुण्यात विविध राज्यांच्या १५०० संघाचे ४५०० कलावंत बालगंधर्व रंगमंदिर, केसरी वाडा, टिळक स्मारक मंदिर आणि गणेश कला-क्रीडा केंद्रात भारतीय पारंपरिक संगीताची, नृत्याची आणि नाटकांची झलक दाखवत आहेत.
आज भव्य मिरवणुकीने गेलेल्या संघांनी गणेश कला-क्रीडा केंद्रात आपापल्या राज्यातल्या लोकसंगीताची झलक दाखविली.
No comments:
Post a Comment