Tuesday, March 1, 2011
यंदा कर्तव्य आहे
जे भावते ते लिहिले ....माला वाटते इथे ..केवल मलाच व्यक्त करन्यापेक्शाही हे असे मनमोकले लेखन वाचनात आले ते लेखिकेच्या वतीने तुमच्यापर्यंत पोचवित आहे.. सुभाष इनामदार,pune
लग्न हे तसं प्रत्येकाच्याच पाचवीला पुजलेलं असतं. लग्न हे अपघातानं कधी होत नाहीत,अपघातानं मुलं होतात. लग्न जर ठरवुन करत असाल तर चॉईस असते आणि जेव्हा चॉईस असते तेव्हा थोडासा संभ्रम निंर्माण होतो. त्यात ज्याला लग्न करायच असतं त्याच्या आजुबाजुचे लोक त्याला उपदेशाचे डोस पाजत असतात,ते पण अगदी फु़कट. आतापर्यंत मी कसा दिसतो/दिसते याचा कधीही विचार न केलेले लोकही मग आरशासमोर तास न तास उभे राहुन स्वत:ला न्याहाळु लागतात. त्यांची रंगाची आवड, चॉईस सुधारते. त्यांच्या आयुष्यात मग रंगीबेरंगी फुलपाखरं उडायला लागतात. 'आभास हा...छळतो तुला, छळतो मला..." सारखी गाणी ओठांवर रेंगाळु लागतात.
आपला जोडीदार कसा असावा याचं एक हलकंस चित्र त्यांच्या डोळ्यांसमोर असतं पण ते पुर्ण दिसत नसतं. आणि शेवटी मग तो दिवस उजाडतो, त्याला सारेजण 'पाहण्याचा दिवस' म्हणतात. मनात नाना शंका, नाना प्रश्न उभे असतात. अशाच काही प्रश्नांचा, शंकांचा केलेला हा , तो पण अगदी रोखठोकपणे. या जगात परफेक्ट असं कुणीही नाही. प्रत्येकाच्यात काही ना काही उणीवा आहेत. लग्न म्हणजे थोडीफार तडजोड आलीच. आपल्याला हवा तसाच व्यक्ती कधीच कुणाला मिळत नाही. त्याला तसा बनवावा लागतो.
आपल्या मनासारखीच समोरची व्यक्ती हवी असा अट्टहास कशाला? थोडे इकडे थोडे तिकडे होतच असतं. त्यात विशेष काही नाही. आपल्याला समोरच्यात नेमकं काय हवंय हे नीट ठरविल्याशिवाय पुढे जाउ नये. आपल्याला झेपेल असाच आपला जोडीदार असावा नाकापेक्षा मोती जड असं काही करु नका. लग्न म्हणजे खेळ नाही तो दोन जीवांचा मेळ आहे. लग्न म्हणजे एक नवीन नात्याची सुरुवात, आपल्या आयुष्यात एक नवीन माणसाची ती असते एंन्ट्री. अशी सुरुवात खोटं बोलुन कधीही करु नये असं मला वाटत. जे काही असेल ते अगदी खरंखरं. "खोटं बोलुन लग्न जमेलही पण टिकणार नाही "
मुलीनी मुलाचं कर्तुत्व पहावं, प्रॉपर्टी गौण असते. कर्तुत्व असेन तर अशा कित्येक प्रॉपेर्टीज कमावतात येतात.
मुलाने मुलीच्या सौंदर्याबरोबरच ती तुम्हाला, तुमच्या घराला किती सुट होते ते पहाव. समंजसपणा हा दोघांनी एकमेकांत पहाणे गरजेचं. तो एक गुण असा आहे जो नेहमीच तुम्हाला एकत्र ठेवायला मदत करतो. मुलाच्या किंवा मुलीच्या फोटोवरुन ती व्यक्ती दिसायला तशीच असेन असा ग्रह करुन घेऊ नये. आयुष्यभर पॅराशुटचं तेल लावणारी मुलगी सुद्धा लग्नासाठीच्या फोटोमध्ये केस मोकळे सोडतेच. त्यामुळे मोकळे केस दिसले की हुरळुन स्वप्नांचे मनोरे बांधू नये. फोटोवरुन अंदाज बांधावा किंवा कल ओळखावा. खरा चेहरा हा पहाण्याच्या कार्यक्रमातच दिसतो.
मुलींना नाहक अवघड प्रश्न विचारु नका. ती जर सॉफ्टवेअर इंजीनिअर असेन तर ती सी++ की जावा यापेक्षा ती तुम्हाला दोन वेळ जेवण करुन घालु शकेल काय हा प्रश्न जास्त समर्पक आणि महत्त्वाचा. स्त्री ही आतापर्यंत घरातच रहात असे त्यामुळे स्त्रीला बाहेरच्या जगातलं ज्ञान हे तसं पुरुषाच्या तुलनेत मर्यादित असतं. ( समस्त स्त्री वर्गाची माफी अगोदरच मागत आहे ) त्यामुळे तुम्हाला अगदी हवेत तशीच उत्तरांची अपेक्षा मुलींकडुन करु नका. मुलींनी मात्र ही अपेक्षा करावी. मुलगा हा बोलण्या चालण्यात स्मार्ट असलाच पाहिजे.
हिच्यापेक्षा ही जास्त चांगली वाटते किंवा ह्याच्यापेक्षा हा चांगला, असा प्रकार शक्यतो करु नये. एकदा का तुम्हाला वाटला की मला समोरची व्यक्ती जोडीदार म्हणुन पसंद आहे तेव्हा तिथेच थांबाव. एकदाच निर्णय घ्या पण विचार करु घ्या. आवडीनिवडी झाल्यानंतर ही तुम्ही तुलना करायला गेलात की हाती दु:ख आलंच म्हणुन समजा.
असं म्हणतात की मुलीच्या आई वरुन मुलगी कशी असेन हे ओळखावं. त्यामुळे आईच्या बोलण्याकडे लक्ष राहुद्यात. ( म्हणजे तिच्याकडेच पहातच रहा असं मी सांगत नाही ! )
पाहण्याच्या कार्यक्रमात आपल्या बरोबर जे लोक असतात त्यांची जबाबदारी असते ती वातावरणनिर्मिती करण्याची. एक हलकफुलक वातावरण करुन देणे आणि निर्णय घेण्यासाठी मदत करणे एवढंच. निर्णय शेवटी तुम्हाला घ्यायचा असतो. मित्राला उगाचच विचारु नका की मुलगी तुला कशी वाटली. लग्न तुला करायचं असतं. त्याच्याशी आवडलेले आणि खटकलेले मुद्द्यांबाबत जरुर चर्चा करा, निर्णय सर्वस्वी तुमचा असतो.
लग्नाला उभ्या राहिलेल्या सगळ्यांच्या मनातला एक खदखदता प्रश्न - मी १ तासाच्याभेटीत आयुष्यभराचा जोडीदार कसा निवडु ? तो त्या एका तासात चांगलाच वागणार ! प्रश्न बरोबर आहे. त्यामुळे लग्न ठरवायच्या अगोदर किमान एकदा तरी बाहेर भेटुन गप्पा माराव्यात. आपल्या अपेक्षा आणि समोरच्या व्यक्ती च्या अपेक्षा मॅच होणे महत्वाचं. याला मी स्वत: फ्रिक्वेन्सी मॅच होणं अस म्हणते. माणुस स्वत:चा स्वभाव बदलु शकत नाही त्यामुळे अशा भेटीतुनच समोरच्याचा स्वभाव जाणुन घेण्याचा प्रयत्न करायचा असतो. तुम्हीसुद्धा अशा भेटीत तुम्ही जसे आहात तसेच स्वत:ला प्रेझेंट करा, उगाचच ढोंगीपणा काय कामाचा ?
मुली पहायला जाताना अगदी आपल्याला सुट होईन असाच फॉर्मल ड्रेस घालावा. लेंस नसलेले शुज,पायाची तिरकी घडी जरी घातली तरी उघडे पाय दिसणार नाहीत एवढे मोजे, आपल्याला सुट होईन अशा रंगाचा शर्ट आणि परफेक्ट फिटींग ची पँन्ट घालावी. पाहण्याच्या अगदी थोडावेळ अगोदर शेव्हींग करु नये. मनावर दडपण असल्यामुळे कापण्याचा संभव जास्त.
मुलींनीसुद्धा आपल्याला चांगली दिसेन अशाच रंगाची साडी, शक्यतो त्या दिवशी दुसरया कुणातरी अनुभवी बाई कडुन नेसवुन घ्यावी. बा़की मुलींच्या बाबतीत मी जास्त खोलात जात नाही. त्या सुज्ञ आहेतच.
जोपर्यंत 'दिल की तार' वाजत नाही तोपर्यंत कुणालाही हो म्हणु नका. एकदा का तुमच्या मनाने तुम्हाला सांगितल की हीच माझी किंवा हाच माझा भावी जोडीदार तेव्हा मग पुढे जा. तार वाजणं महत्वाच, त्याचबरोबर तार तुटेपर्यंत ही नाही म्हणु नका. मला याच मुलाशी किंवा याच मुलीशी लग्न करायचं असं जेव्हा मनापासुन वाटतं तेव्हा समजावं की आपली तार वाजली म्हणुन.
स्वत: बॅचलर असतानाही लग्नासंबंधीचे उपदेश करणं मला जड जात होतं पण मी नको नको म्हणत शेवटी आज पोस्ट केलच. पण लग्न करण्यासाठी थोडंच लग्नाचा अनुभव असण गरजेच असतं, नाही का ????
मी अशी आशा ठेवते की हे वाचताना कोणी दुखावणार नाही... कृपया काही खटकल्यास मनमोकळेपणानी सांगाव!!! काही चुकल्यास क्षमस्व....
लेखिका-
मनमोकळी
अनुराधा अभय गोरे
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
ok
Post a Comment