किती आनंद. केवळ
कुटुंबातच नाही. सा-या धरणीवर. जिथे नजर जाते तिथे. कोपरान् कोपरा उजळलेला. मनाला
आनंद देणारी तरी बोचणारी थंडी. उबदार हवा. सूर्यांची किरणे हवीहवीशी वाटणारी.
तरीही दुपारी थोडी तापविणारी. शरीरावर नाजूकपणे पसरणारी. पावसाळ्यात ओल्या
झालेल्या मातीला थंडावा देणारी. शेतीत लावलेल्या बीजाला अंकूर फुटविणारी.
दिवस पालटलेत. भावना
थिजल्यात. मने बधीर झाली आहेत. तरीही अजुन दिवाळी येतच आहे. येतच रहाणार.
वाडे संपलेत. संवाद
कमी झालेत. मने चार भिंतीत बंदिस्त झाली आहेत. बोळ गेले. रस्ते वाढलेत. जवळची खूणच
नाहीशी झाली आहे. गावाबाहेरचे विश्व आपलेसे झाले आहे. तिथेही सारे मिळते पण गावात
घ्यायचा अट्टाहास मात्र बदललेला नाही. दिवाळीची गर्दी आजही छायाचित्रातून प्रकटते.
वाटते खरे सारे तिथे आहे.
बोनस नाही.
एस्कग्रेशीया मिळायचा थांबलाय. पण खरेदी दिवाळीची घ्यायला झुंबड चालू आहे.
गॅस महागला नाही तर
तो सात सिलेंडरपुरता मर्यादित झाला आहे. पण सारे कसे काहीचत घडले नाही यादिमाखात
सुरु आहे.
मग दिवाळीत खरे काय?
रुप बदलून माणसं
जगताहेत
आनंद मानून आस्वाद
घेताहेत
परवडत नसले तरी पोशाखी
बनताहेत
उत्साह नसला तरी
अवसान आणताहेत
ऋण काढून सण साजरे
करताहेत
पाय पसरुन घरभर
पसारा करताहेत
जमत नसले तरी जमेल
तसे जगताहेत
चला तुम्ही का
थांबलाय .
उडवा फटाके..फुलवा
फलबाजा
लवंगी सोडून मोठा
बॉंब लावा
कुणी आजारी असो.की
कुणाचा अभ्यास
तुम्ही स्वतः,ठी जगत
रहा
आनंद घेत रहा..आनंद
पसरवीत रहा...
-सुभाष इनामदार,
पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596726
No comments:
Post a Comment