नाती रक्ताची ती चिकटतात
न मागताच
ठरवून मागीतली तरी न
मिळणारी
कधी हळवी.. तर कधी
आधाशी
सारे काही त्याच्या
हातात
तुम्ही फक्त
स्विकारत जायचे
काही दिसतात तशी
वागतात
काही दाखवतात आणि
वागतात मात्र वेगळेच
नातीबंधने झुगारून
देता येत नाहीत
ती अखेरपर्य़ंत तुमची
सावलीसारखी पाठराखण करतात
स्वतःसाठी न मागणारी
नाती सर्वांना मिळू देत
हिच प्रार्थना..त्या
अस्तित्वात नसणा-या ईश्वराकडे...
सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

No comments:
Post a Comment