दुर्गेच्या रुपांचे आम्ही सारे भक्त तिजसाठी मांडला नवदिवसांचा जागर मनोमनी प्रकटावी तुझीच मूर्ती आस अशी ती करीतो पूर्ती उदे उदे मुखी गर्जतो जागरण .गोंधळ नवसाला पावतो..
तुझ्या उपासने वाढते ती शक्ती माणसात येती चेतना चित्ती आसूर. दानव यांची दाटी इथे मोठी भ्रष्ट्राचारी, लाचखोरी चाले इथे सस्ती कुणालाही नाही वाटे इथे लाज जो तो मिरवे बिनाघोर
महागाईच्या खाईत पुरते लोटलो खड्ड्यात भारी दलदल
चित्त स्थिर नाही तुझ्या चरणी आई मागतो हे दान कृपा करी छत्र देई वरदान
No comments:
Post a Comment