आनंदाच्या गावी जावे
आयुष्य सारे वेचून
घ्यावे
कणा कणाने रिते
व्हावे
देता येईल देत
फिरावे
धन संचया न रमावे
मनात सा-या उतरून
जावे
कधी कुणाला सल्ला
द्यावा
पैशापेक्षा नाती
जपावी
होता होईल हसत रहावे
चिंतन आपुले करीत
जावे
संस्काराचे बीज
पेरावे
धन शब्दातून मांडावे
रिक्त मनाने जनी
असावे
चिंता सोडून मस्त
जगावे
जगणे सारे मोती
व्हावे
शुभ्र चांदण्यासम
झिरपावे
तृप्त मनाने वास
करावा
आनंदाचा ध्यास
घ्यावा
-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
1 comment:
apartim.....
Post a Comment