आता आयुष्याच्या वळणार नवी वाट येत आहे
जी जुन्या स्मृतींना मागे टाकत नवा मार्ग शोधत आहे
रिकामे मन..रिकामा वेळ..रिकाम्या आयुष्याची रिकामी पोकळी भरून काढणार आहे
एका ठिकाणी उभे राहून मागे वळून पहाताना पुढे नवे घडणार याची जाणीव होत आहे
आपण नव्या आयुष्यातल्या नव्या जाणीवांना सामोरे जाणार आहोत
आपल्यातूव उणीवांना जाणून त्या दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत
सारे मन शुध्द करण्यासाठी आलेले मळभ दूर केले जाणार आहे
नव्या दिशांना सामोरे जाण्यासाठी वातावरणही पोषक होत जाणार आहे
तुमच्या चष्म्याची फ्रेम नवी करण्यापेक्षा नंबर बदलून पहा
जगाकडे नव्या दृष्टीने पहायला लागा
सारेच तुमच्याकडे पहात आहेत..हे मुळात डोक्यातून काढून टाका
तुमच्याकडे तुम्हीच पहात आहात..कुणाचे फारसे लक्षच नाही
जे मिळाले ते तुमचे होते..
जे मिळणार नव्हते ते तुमचे नव्हतेच
इतरांसाठी तुम्ही केले ते तुमचे कर्चव्य होते
इतरांनी तुमच्यासाठी केले ते ते करणारच होते
आता नवा मार्ग चालण्यात नवी शक्ती मिळवा
जगाकडे पहाण्याचा तुमचा दृष्टिकोनच बदला
सूर्य तोच आहे..प्रकाशकिरणही रोजचेच आहेत
तुमच्या जिवनात आज प्रकाशाचे महत्व वेगळे असणार आहे...
-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
No comments:
Post a Comment