Monday, January 25, 2016

संगीत नाटकात गद्यातून येणारे पद्य प्रवाही असावे...

-निर्मला गोगटे

संगीत नाटकात येणारे पद्य हे नाटकाचे कथानक पुढे नेणारे असते..
शास्त्रीय संगीताचा अतिवापर न करता भावना आणि प्रसंगाला साजेसे गायन केले तर नाटकातले संगीतही तेवढेच नाटकाला पुढे नेते...
खरी संगीत नाटके म्हणजे सौभद्र आणि शारदा असे मी मानते..ज्यात नाटकातली पदेही कथानकाला पुढे नेणारी आहेत..अर्थवाही पदांना चालीही तशाच सहजसुंदर दिल्या गेल्या आहेत..
नाट्यसंगीता गाताना शास्त्रीय संगीताचे ज्ञान हवेच..पण भावनांचा विचार करून तसे राग निवडून पदांना रसिकांच्या मनापर्य़त पोहचविणेही आवश्यक असते..
बालगंधर्वांनी आपल्या नाटकांनी रसिकांनाभारावून टाकले..
तर पुढे मानापमान, स्वयंवर..पुढे पंडीतराज जगन्नाथ, सुवर्णतुला..ते बावणखणी या विद्याधर  गोखले आण्णांच्या नाटकांनी ..
आणि नंतर मत्स्यगंधा ..वसंतरांव देशपांडे यांच्या कट्यारनी एक विक्रम घडविला..
आज संगीत नाटक काही प्रमाणीत टिकून आहे..मात्र ज्यांना कुणाला संगीत नाटके लिहावयाची असतील त्यांनी शारदा नाटकातल्या प्रवाही आणि सहज सोप्या भाषेचा अभ्यास करावा...



असे कितीतरी संवाद पुण्यात जमलेल्या दर्दी रसिकांच्या कानावर अडिच तास पडत होते..निमित्त होते..संगीत नाटकात आपली कारकीर्द गाजविणा-या निर्मलाताई गोगटे आणि मधुवंती दांडेकर या दोन संगीत अभिनेत्रींच्या ओघवत्या ..प्रवाही सप्रयोग वक्तव्यातून..त्यांच्याबरोबर ज्येष्ठ समीक्षक डॉ. वि.. भा. देशपांडेही सामिल होवून संगीत नाटकांचा १८४३ सालापूसूनचा इतिहास  बोलता करीत होते..ते भारती निवासच्या सभागृहात..साथिला विद्यानंद देशपांडे तबल्यावर तर  संजय गोगटे ऑर्गनच्या साथीला..



 सोबत  नांदीत गायल्या होत्या  त्या  अंजली दाणी आणि नांदीबरोबर भैरवीतही आपला सहभाग दिला त्या होत्या प्रसिध्द गायिका अंजली मालकर...









संगीत नाटकांची मर्मस्थाने आणि त्यातल्या विविधतेची..नाटककारांची, लेखकांची आणि परंपरांची चर्चा इथे रंगत होती..
अनेक नटांची नावे कानावर पडत होती..अनेक संगीत दिग्दर्शक पुन्हा पुन्हा ऐकिवात येत होते..तो काळ पुन्हा आठवावा..सम्रणात रहावा असाच होता.

नांदी ते भैरवी ..आणि मधुनच पदांनी आपल्या आवाजातून साकार करणा-या दोन गायक अभिनेत्री..आपल्या अनुभवातून संगीत नाटकांवरची आपली ठाम मते मांडत रसिकांच्या पसंतीला उतरत होत्या..



असा कार्यक्रम म्हणजे रसिकांना मिळालेली नाट्यपरंपरा ऐकण्याची पर्वणीच होती..संगीत विकास परिषदेच्या वतीने डॉ. विकास कशाळकर यांनी तो आयोजित केला होता..त्यांचेही आभार..

पुन्हा पुन्हा ऐकत रहावी आणि असे कांही काळाला अनुरूप संगीत नाटक यांवे अशी मनोमन इच्छा होत होती..



- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

No comments: