Monday, March 20, 2017

अनुराधा कुबेर आणि अतुल खांडेकरांचे गाणे आता परिपक्वतेकडे ...



 

ज्योत्स्ना भोळे स्मृती निमित्ताने स्वरांचे वंदन...


रविवारी स्वरवंदना प्रतिष्ठानच्या वतीने अनुराधा कुबेर आणि अतुल खांडेकर या दोन आश्वासक युवा कलाकारांच्या मैफलीचा आनंद  पुणेकर संगीत रसिकांनी अनुभवला.

मनोहर मंगल कार्यालयात झालेल्या या  दोन गायक कलावंतात उद्याची बहारदार आणि आश्वासक मैफल रंगविण्याची ताकद पहायला मिळाली

 



ज्योत्स्ना भोळे आणि संगीतकार केशवराव भोळे यांची स्मृती पुढच्या पिढीपर्यत पोहचविण्यासाठी स्वरवंदना प्रतिष्ठान काम करते..त्याविषयीची माहिती प्रतिष्ठानच्या वंदना खांडेकर यांनी रविवारी 19 मार्च, 17 ला या कार्यक्रमाच्या आरंभी उपस्थितांना करून दिली .





आरंभीच्या दीडतासांच्या आपल्या गायनाची सुरवात अनुराधा कुबेर यांनी मधुवंती रागाने केली..स्वरांचा उत्तम लगाव आणि आवाजातली फिरत आणि सहज वाटावे असे ऐकत रहावे असे सूर आळवत त्यांनी रागावरची हुकमत रसिकांच्या मनापर्यत पोहोचवली.



विनय़चंद्र मौदगल्य यांची एक बंदिश सादर करून त्यांनी देस रागातली श्रीकृष्ण नारायण रातांजणकर यांची होली खेलनके चले कन्हेय्या... ही रचना आपल्या सुंदर स्वराविष्कारात ताल धरावी अशी एकावर एक स्वर आळवत सादर केली.

मी पुन्हा वनांतरी फिरेन हरिणीवानी.हे भूमिकन्या सिता या नाटकासाठी ज्योत्स्ना भोळे यांनी गायलेले नाट्यपद आपल्या सुरेल आणि फिरत्या आवाजात सादर करून त्यांना ही स्वरांजलीच अर्पण केली.





आपल्या दमदार गायनाची सुरवातच वाचस्पती रागाने करून अतुल खांडेकर यांनी आपल्या वेगळापणाची जाणीव करून दिली. `साचो तेरो नाम` - ही विलंबित बंदिश त्यानंतर चतुर सुघर बलमा- ही मध्यलय बंदिश  आणि रागाच्या शवटी द्रुत तराणा गाऊन त्यांने आपल्या कमावलेल्या आवाजात रसिकांना डोलावू लागेल असे तन्मयतेने सादर केले.. थोडी आक्रमक तरीही स्वरांचे हिंदोळे सजवत त्याने आपले गाणे मांडले.




त्यानंतर मला मदन भासे हा..हे मानापमान नाटकातले पद सजविले.आणि शेवट केला तो बोला अमृत बोला..या ज्योत्स्ना भोळे यांनी अजरामर केलेल्या भैरवीने..






अतुल खांडेकर यांचा गाण्यातला बोलका स्वर आणि तालावरची हुकमत..स्वरातला थेट पोहोचणारा आर्त सूर सारेच भारावल्यासारखे होते..


या दोनही युवा कलावंताची ही छोटेखानी मैफल आश्वासक तर होतीच..पण त्यांची गायनातली तयारी ऐकून समाधान वाटले.

दोनही कलाकालारांनी तेवढीच उत्तम साथ संगत होती..हार्मेनियमवर सौमित्र क्षीरसागर आणि तबला साथ करणारे गायन शिकणारे तरूण तडफदार वादर करणारे ऋग्वेद देशपांडे.

या मैफलीत रंगलेल्या कलावंतांचे स्वागत केले ते अविनाश भोळे यांनी..तर कार्यक्रमाची सारी पडद्यामागून सूत्रे सांभाळली ती प्रकाश भोंडे यांनी..

 या युवा कलाकारांचे गायन पुन्हा ऐकावे अशी रसिकांची फर्माईश होती..यातच त्याचे यश आहे.




-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

No comments: