आज आठ महिन्यांनी त्याची आठवण पुन्हा आली..कारण आज सकाळीच यातले दमदार आणि खणखणतीत आवाजात अभंगातून रसिकांना तृप्त करणारे गायक श्रीपाद भावे यांच्या निधनाची बातमी आली..त्यांचा तो जाहिरपणे झालेला कार्यक्रम पुन्हा मनात ताजा होऊन मनात ते स्वर आळवू लागला..
जयश्री कुलकर्णी यांच्या पुढाकाराने ही संतवाणी सादर झाली होती..
निष्ठापूर्वक गाणारा आणि सहजपणे आपल्या गायनात तन्मय होणारा श्रीपाद भावे..अभंग, नाट्यसंगीत..आणि भकतीगीते आपल्या जात्याच तयार असलेल्या
आवाजात सादर करीत असे.
आपली महाराष्ट्र बॅंकेतली नोकरी निवृत्तीपर्यत प्रामाणिकपणे करून श्रीपाद भावे आपले गायनातील सौंदर्य रसिकांच्या पदरात आपल्यापरीने टाकत होते.
भक्तीभावाने आणि तल्लीनतेने गाणे सादर करण्याचे कसब संतदर्शन मंडळाचे संस्थापक श्रीराम साठे यांनी तेव्हांच ओळखून त्यांना दरवर्षी होणा-या संतवाणीच्या संचात हमखास स्थान देत असत.
छोटे माठे कार्यक्रमातून भावे यांचे दर्शन आणि त्यांची गायनातली तल्लीनता महाराष्ट्रातल्या रसिकांना आता कळून येत होती..
नोकरीच्या मर्यादा ओळखून ते गायनसेवा रुजू करीत असत..
नोकरीत असताना त्यांनी ज्या एकमेव संगीत नाटकात भूमिका केली त्या भरत नाट्य संशोधन मंदिराच्या कट्यार काळजात घुसली.. यात.. मीही त्यात एक कलाकार म्हणून सामिल झालो होतो. पंच्च्याहत्तर सालापासून श्रीपाद भावे यांच्याशी संबंध आला.. गाण्यासोबत अभिनयाचे अंगही त्यांच्यात होते..पण ते पुढे नाटचकाकडे अधिक वळलेच नाहीत.
कट्यारमध्ये त्यांची खांसाहेबांचे शिष्य असलेल्या चांदची भूमिका छान होत असे. . आम्ही त्याचे पंचवीस तरी प्रयोग केले असावेत.
सगळ्याशी मनमोकळे वावरणारे भावे..कलावंत आणि सहभागी तंत्रज्ञात लाडके होते..
निगर्वी स्वभाव ..मिळून मिसऴून वागण्याने भावे सर्वांना आपलेसे करत.. कसदारपणे तान घेणे आणि त्यातील स्वरात आपला ठसा उमटविणे हे त्यांचे विशेष गुण होते. अभंगातला ताल आणि स्वरातील भाव ते सहजपणे व्यक्त करत..
श्रीपाद भावे यांच्या जाण्याने एक दिलदार मनाचा..मित्र गमावला यांचा निषाद वाटतो..
वडीलांच्या वाहतूक व्यवसाला मदत करून प्रसंगी त्यांनी गाडीही चालविली आहे.कष्टाची तयारी आणि संघर्षमय आयुष्यातून वर येऊन ते आपल्या बंगल्यात उत्तम वास्तव्य करीत होते..
त्यांच्या या चटका लावून जाणा-या वृत्ताने संतवाणीतला खणखणीत आवाजाचा गायक हरपला आहे..
त्यांच्या स्मृतीस आदरांजली..
- सुभाष इनामदार, पुणे..
subhashinamdar@gmail.com
No comments:
Post a Comment