Thursday, September 27, 2012

मनात साठलेला संजय सूरकर...







दिग्दर्शक संजय सुरकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज पुण्यात निधन ..बातमी वाचली आणि छातीत धस्स झाले..त्याचे माणूसपण आणि त्याचे कलाजीवन जवळून अनुभले..पण हे असे काहीतरी अघटित घडेल असे...खोटी ठरावी वाटणारी घटना खरी होती..त्याची स्मृती जागविताना शब्दातून घेतलेला हे संक्षिप्त शब्दपट...


महाराष्ट्र शासनाच्या वतीने काही वर्षापूर्वी राज्य नाट्य स्पर्धेंत सादर होणा-या अंतिम स्पर्धतील पहिल्या दोन संघातील नाटकातल्या कलावंतांसाठी नाट्य प्रशिक्षणाचे एक महिन्याचे निवासी शिबीर घेतले जाते होते. १९८० च्या सुमरास त्यापूर्वी ख्यातनाम दिग्दर्शिका श्रीमती विजया मेहता मुंबईतल्या रविंद्र नाट्य मंदिरात हे शिबीर घेत असत..पण १९८० सालापासून त्यांनी नकार दिल्याने शासनाने त्या वर्षी प्रथमच मुंबई बाहेर म्हणजे पुण्यात भरत नाट्य संशोधन मंदिराच्या ग्रंथालयाच्या जागेत घेतले होते...त्याचा समन्वयक म्हणून माझी नेमणूक झाली होती...यात आमचा हा मित्र नागपुरच्या रसिक रंजन या संस्थेमार्फत शिबीरात दाखल झाला होता..तेव्हा पासून त्याने माझ्याशी गट्टी केली..ती अखेरपर्यंत...

नाटकातून तो चित्रपट क्षेत्राकडे वळला..त्याला स्मिता तळवलकरांनी `चौकट राजा`चे दिग्दर्शक संजय सूरकरला बनविले आणि तो पुढे तिथेच आपले करियर सुरु केले आणि सिध्दही करुन दाखविले..नंतर तो नागपूरकर न राहता महाराष्ट्राचा दिग्दर्शक बनला.

मितभाषी. सतत आपल्या विचारात आणि प्रसंगी हसत खेळत असणारा हा मित्र आज गेल्याची बातमी ऐकली आणि धसका बसला...

काही वर्षापूर्वी त्याची बायपास झाली तीही पुण्यातच पण त्यानंतर तो तब्येत सांभाळून. नव्हे एक झपाटलेल्या कलावंताप्रमाणे दिग्दर्शक म्हणून चित्रपट करणे सुरुचे ठेवले..अगदी अलिकडेच लोकमान्य टिळकांवर केला जाणारा चित्रपटही त्याने स्विकारला होता...आजही अखेरच्या दिवशीही तो पुण्यात चित्रिकरण करत होता...

तसे त्याचे वय फार नव्हते..पण कलावंत आणि त्यातही दिग्दर्शक म्हणून वावरताना असणारी व्यवधाने.. एकूणच तो जबाबदारीने सांभाळत होता..पण त्याचाही ताण असतोच की...यशस्वी झाल्याचा आनंदही पण चित्र व्यवहारात अडकले तर त्याचा ताणही तेवढाच येतो...



मुळात नागपुरची दिलदार वृत्ती घेऊन त्याने मुंबईच्या महानगरीत कलासक्त दिग्दर्शक म्हणून उत्तम स्थान कमावले होते.. अनेक पुरस्कारच्या बाहुल्या सांभाळूनही त्याच्यातली पटकथेकडे पहाण्याची तरल दृष्टी आणि कल्पकता कधीही संपुष्टात आली नाही...त्याच्यातला माणूसही तेवढाच सहृदयी होता...कलावंताची निवड करताना त्यांचे कलागुण माहित करुन त्यांना नवा चेहरा देण्याचे काम त्याने केले..

तो शरीरीने या सृष्टीतून गेला असला तरी आपल्या रसिकांच्य़ा मनावर त्याच्या चित्रपटांनी..वेगळ्या विषयांनी आणि सामान्य माणसांच्या असामान्य प्रश्नांनी घर केले आहे...त्याला तुमच्या सर्वांच्या वतीने ही शब्दांजली वाहतो..त्याच्या कलाजीवनाचा असा अचानक अंत व्हावा हे मात्र नियतीने योग्य केले नाही...त्याच्या स्मृती माझ्या आयुष्य़ात आणि आपल्या मनातही कायम राहतील..

संजय ..तुझे रुप आमच्या मनात भरुन आहे..तुझ्या यशस्वी कारकार्दीबद्दल आम्ही तुला कायमचे स्मरणाच ठेवणार आहोत..


सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276 


मूळ बातमी...
पुण्यात दिग्दर्शक संजय सुरकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज पुण्यात निधन झाले. चित्रीकरणाच्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने सेनापती बापट मार्गावरील रत्ना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मावळली.

चौकट राजा, सातच्या आत घरात, आनंदाचे झाड, सुखान्त, मास्तर एके मास्तर, सखी, तू तिथं मी हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत.

शिवाय छोट्या पडद्यावरील अवंतिका, सुकन्या, ऊन पाऊस या गाजलेल्या मालिकांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. शेवटच्या क्षणी त्यांच्यासोबत अभिनेते सचिन खेडेकर होते. एका चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने संजय सुरकर पुण्यात होते.

Sanjay Surkar
Filmography

Marathi Movies as Director:
Sukhant (upccoming)
Master Eke Master (2009)
Tandala (2008)
Ek Daav Sansaracha (2008)
Sakhi (2007)
Aawhan (2007)
Anandache Zaad (2006)
Aaishappat(2006)
Saatchya Aat Gharat (2004)
Tu Tithe Mi (1995)
Rawraheb (1996)
Yadna (1994)
Aapali Manas (1993)
Chaukat Raja (1991)

TV Serials
Awantika (1998)
Sukanya (1998)
Un Paus (1998)

Monday, September 24, 2012

केवळ पहाणे तुमच्या हातात




सारं गप्प राहून पहायचे दिवस
न बोलता तोंडावर बोट ठेवा..
केवळ पहाणे तुमच्या हातात
कानानेही ऐका काही हरकत नाही..
पण वाच्यता नका करु...



घायाळ व्हा..अगदी रक्तबंबाळ व्हा...
पण सांगणार कुणाला..
तुमचा कुणी वाली आहे काय...

ममता निदान थाडकन् बोलून माकळ्या तरी होतात..
केंद्रातला पाठिंबा काढून धाडस तरी दाखवितात..

आपण काय मत दिले काय किंवा न दिले काय..
मोल मिळाले मत देणा-याला
न देणा-याच्या पगारात होतात कपाती
कर, सेवाकर शिवाय आहेच इन्कमटॅक्स..

शिवाय गाडी वापरतो ना..
मग पेट्रोल भाव खिशातली पुंजी उडवतातच..
टिव्हीसाठी सेट टॉप बॉक्स घेतलाच पाहिजे
स्वतःचे घर घेतले हप्ते आहेतच...

आता विचार करु नका...
असेच जगा..
ते मात्र उडवित आहेत गाड्या
तुमच्या करांच्या पैशात..
दौरे करताहेत..
मंजूर करताहेत नवी धोरणे..
आणि मंजुरी देताहेत नव्या कामांना..

तुम्ही-आम्ही बघत रहायचे
डोळे असून..मात्र बालायचे नाही...


इति- सुभाष इनामदार,पुणे
 subhashinamdar@gmail.com
9552596276

Thursday, September 20, 2012

हे गणेशा गौरीनंदना वंदन तुज करितो



 हे गणेशा गौरीनंदना वंदन तुज करितो
दे आम्हाला अभय उद्याचे हेच एक मागतो

आज भुवरी सकल दिशांनी तांडव ते सारे
काय करावे कुठे पहावे आम्हा नच ठावे..
तुझा आसरा म्हणून सर्वथा हेच नित्य सावे..11

 
 हे गणेशा गौरीनंदना वंदन तुज करितो
दे आम्हाला अभय उद्याचे हेच एक मागतो


तूच विधात्या सांग ईश्वरा शरण कुणाशी जावे
त्याच राऊळा उभा राहूनी नतमस्तक आहे..
तुझ्या दर्शनातून उमले आयुष्याचे धागे..11

  
 हे गणेशा गौरीनंदना वंदन तुज करितो
दे आम्हाला अभय उद्याचे हेच एक मागतो

आजपासूनी तुझी प्रार्थना मनात मी करतो
जनात आहे तुझीच मूर्ती मनात ती स्मरतो..
हे गजवदना तुझ्यापुढे मी उभय हस्त जोडतो..11

हे गणेशा गौरीनंदना वंदन तुज करितो
दे आम्हाला अभय उद्याचे हेच एक मागतो







सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Wednesday, September 19, 2012

जय गणेशा...




गणपती तुझी कीर्ति महान
आम्ही सारेच मागतो शांतता आणि समृध्दीचे वरदान
हे एकदंता गजानना स्वकरुप सुंदर विनायका
तुच त्राता या जिवांचा
आम्हास दे बुध्दी
दुःख क्लेष अन् विघातक सारे
विरुन जावे ..पुन्हा न यावे
दे आम्ही शक्ति...
तुझ्याच रुपे तुझ्याच नामी एकमुखाने आता मारु ललकारी...

भयकारी ती नको उराया
सारे व्हावे तुप्त
आजपासूनी दहा दिवसांचे
दर्शन तुझेच मात्र...

तुझ्या रुपाचा एकमुखाने करीतो आम्ही पुकार
हे विघ्ननाशना विनायका
स्विकारतो तुझा अधिकार
प्राप्त व्हावया.. आशिश तुझा मग
वाहतो शब्दातून ...
तो आता स्विकार....


-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Monday, September 17, 2012

चला जीवन आनंदी करुया....


आनंदीपणा कधीही एकट्याचा नसतो
सभोवतालची सारी त्याची हक्कदार असतात
वातावरण आणि त्यात राहणारे सारे जण तो ते देत असतात
आनंद हा उमलून येत नाही..
तो असतोच
पण तुम्हाला भासतो
तेव्हा तो तुमच्या आय़ुष्यात सामिल झालेला असतो..
हाच आनंद इतरांना देऊन
त्यांचेही जीवन आनंदी करण्याचा यत्न करुया...
चला आजच त्याची सुरवात करुया....


इति- सुभाष इनामदार,पुणे

subhashinamdar@gmail.com
95525926726