Monday, February 26, 2018

केवळ ठेका पुरेसा आहे -संगीतकार राम कदम





संगीतकार राम कदम जन्मशताब्दी..

संगीतकार राम कदम हे आज असते तर शंभर वर्षांचे असते..आज ते आपल्यात नाहीत.पण त्यांची संगीत दिलेली असंख्य गाणी आणि त्यांच्या विषयीच्या आठवणीतून दादा आजही आपल्यात आहेत..हे दाखविणारा कार्यक्रम पुण्यात नुकताच म्हणजे १७ फैब्रुवारीला झाला..त्यांच्या स्मृती घेऊनच या कार्यक्रमाविषयी काही स्मरण इथे करून देत आहे..

आपण गेल्यानंतरही आपली गाणी वाजावीत हेच संगीतकाराल हवे असते.. आपण नसताना जर आपली वाजली..तर आपण जिंकलो..आज राम कदम जिंकले… ग साजणीचा ठेका रामभाऊंनी तयार केला..आम्ही रामभाऊंच्या ठेक्यावर ढिपाडी ढिपांग.. गाणे तयार केले.हा ठेका रामभाऊंनी पुढच्या पिढीला दिला..आजचा प्रतिथयश संगीतकार सलील कुलकर्णी यांना हेच आज मुख्य महत्वाचे वाटले.
विजय राम कदम यांनी ते आपल्या वडीलांचे स्वप्न साकार केले. याचा खूप आनंद झाला.



महाराष्ट्रात राहून जर आपल्या नावामागे जर संगीतकार म्हणून बिरूद लावायचे असेल तर सुधीर फडके , पं. जितेंद्र अभिषेकी बुवा, ह्दयनाथ मंगेशकर, श्रीनिवास खळे आणि रामभाऊ कदम या पाच संगीतकारांविषयी जर तुम्हाला उत्स्फूर्तपणे बोलता येत नसेल तर तुम्ही स्वतःच्या नावे संगीतकार म्हणून लावायच्या योग्यतेचे नाहीत.डॉ. सलील कुलकर्णी.

आपले स्वतःचे वेगळेपण सिध्द करत संगीतकार राम कदम हे नाव मराठी चित्रपट संगीतात त्यांनी कोरले ..लावणी,अभंग, लोकसंगीत, ग्रामीण ढंगातली आदाकारी, लोकनाट्याचा बाज, शास्त्रीय संगीताची भक्कम जाणकारी आणि आपल्यावरचा आत्मविश्वास यामुळे राम कदम हे नाव संगीतकार म्हणून मराठी रसिकांच्या मनात कायमचे कोरले गेले आहे. आजही जन्मशताब्दीच्या दिवशी ज्या अलोट संख्येने पुण्याच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिक उपस्थित होता..त्यावरून हे सिध्द होत आहे.


      बुगडी माझी सांडली गं..  हा कार्यक्रम ज्या आपुलकीने सादर केला यातच ती आत्मीयता स्पष्ट होते. आमदार माधुरी कुलकर्णी यांचीही उपस्थिती कदम परिवाला उत्साह देणारी होती.






 केवळ हा आठवणींचा कार्यक्रम न होता..राम कदम यांची संपूर्ण कारकीर्द त्यांच्यासोबत काम केलेल्या आणि त्यांना जवळून ओळखणारी अशी एकविस लेखक यांनी ज्या पुस्तकातून संगीतकार पुरेपुर उभा केला आहे..त्या पुस्तकाचे नाव आहे..बुगडी माझी सांडली ग..... पुस्तकाच्या लेखिका प्रा. नीला विजय कदम...



त्या पुस्तकाचे प्रकाशन हा या जन्मशताब्दीचा मुख्य कार्यक्रम होता..विश्वकर्मा प्रकाशनाच्या वतीने ते उपस्थित सगळ्या मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.. तेही  पालखीतून पुस्तक रंगमंचावर आणले गेले..तेही राम कदम यांचे दोन नातूच्या करवी.










ख्यातनाम नृत्यांगना लिला गांधी, संगीत नियोजक इनाॅक डॅनियल, ज्येष्ठ गायिका पुष्पा पागधरे, आनंद आणि शरद माडगूळकर, अंगाई खेबुडकर, प्रणीत कुलकर्णी, प्रवीण तरडे, विजय राम कदम इत्यादींच्या साक्षीने पुस्तकाचे रूप रसिक प्रक्षकांच्या नजरेस आणले गेले.





तुडुंब भरलेलं यशवंतराव चव्हाण नाट्यगृहज्येष्ठ गायिका पुष्पा पागधरे ,अनुराधा मराठे ,विजय कदम, उपेंद्र भट ,दयानंद घोटकर  जयश्री कुलकर्णी, मेधा चांदवडकर यांनी एकाहून एक सरस अशी राम कदम यांच्या संगीतातून बाहेर पडलेल्या बहारदार चाली तेवढ्याच ताकदीने रंगमंचावर इथे साकार झाल्या.



कुण्या गावाचं हे पाखरू..या लावणीच्या स्वरात भिजवून सोडले ते जयश्री कुलकर्णी यांनी..तर पायात आपाआप ताकद येऊन ज्येष्ठ अभिनेत्री लिला गांधी यांनी रंगमंचावर  आदाकारी करण्याची उर्मी याच ठिकाणी आली.
 

रंगत आणि कार्यक्रमाची उंची वाढविली ती उपेंद्र भट यांनी आपल्या दोन अभंगांच्या सादरीकरणाने.. छिन्नी हातोड्याचा घाव. त्यातला हात्तोड्याचा कसा उच्च्यारायचा याचे प्रात्यशिक करून दाखविले..आणि टाळ बोले चिपळीला..फारच सुरेख.





खास नोंद कराविशी वाटते..वयाच्या  पंच्च्यारत्तरीतही आपल्या टिपेच्या आवाजातील दोन गाणी सादर करून आपल्या भावना राम कदम यांच्या विषची ज्या आत्मियतेने सांगितल्या त्या अधिक मोलाच्या होत्या..



यात एक लावणी होती..राया मला पावसात नेऊ नका..दुसरे होते..इतनी शक्ति हमे दे ना दाता..
उपस्थित रसिकांची दादही तेवढीच मोलाची मिळत होती.


 राजेंद्र दूरकर ,विवेक परांजपे ,केदार परांजपे ,रमाकांत परांजपे , प्रसन्न बाम ,मिलिंद गुणे , केदार मोरे ,नितीन जाधव  अश्या दिगग्ज कलाकारांची संगीत साथ मिळालेली उत्तम साथ... कार्यक्रमाची रंगत अधिक वाढविणारी होती.





संपूर्ण कार्यक्रमाची शाब्दिक सजावट आणि सूत्रे हाती घेतली होती..ती मंगेश वाघमारे यांनी..आणि तो एका सूत्रात बांधण्याचे काम केले होते  ते प्रवीण कुलकर्णी यांनी.





राम कदम यांच्या पणतींनी केलेली आदाकारीही वाखाणण्यासारखी होती..




एकीने नृत्य केले तर














 दुसरीने गाणे सादर केले..








या कार्यक्रमाचे आयोजन करणारे विजय राम कदम आणि सौ. नीला  विजय कदम आणि सर्व कदम परिवार यांचे विशेष अभिनंदन करावे लागेल..


















त्यांनी हा सुरेल गितांचा नजराणा या रसिकांच्या साक्षिने बहाल केला..

  







कित्येक येतील..कित्येक उरतील..पण कायम रहातील हे राम कदम हे पाच अक्षरी नाव,,कोरिव लेण्यासारखे..



-सुभाष इनामदार, पुणे
 subhashinamdar@gmail.com

Saturday, February 3, 2018

आणि ..गंगाधर महाम्बरे हे नाव पुन्हा झळकू लागले






ज्येष्ठ कवीआणि साहित्यिक गंगाधर महाम्बरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने भरत नाट्य मंदिरातील रसिक कार्यक्रमाची आतुरतेने वाट पहात होते.. कारण इथे या कलावंतातला माणूस.. आणि त्या माणसातली प्रतिभेची साक्ष पटविणारे कार्यक्रम सादर होणार होते..अखेरिस पुणे विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. नितिन करमळकर आले आणि पदडा उघडला गेला. व्यासपिठावर होते प्रा.डॉ. शैलजा पाटील.ज्यांनी गंगाधर महाम्बरे यांच्या साहित्यातील जीवनदृष्टी व लेखन शैली या विषयीचे पुस्तक लिहले..स्नेहवर्दन प्रकाशनाच्या संचालिका प्रा. स्नेहल तावरे,  अरूंधती महाम्बरे , कुलगुरू, नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर तसेच मराठी रंगभूमिवरील मालवणी नाटकांची समीक्षा..हे पुस्तक लिहिणारे डॉ. बाळकृष्ण लळित.


मालवणीत आपले बालपण घालविलेले महाम्बरे यांनी आपल्या साध्या, सोप्या शेलीतून गीते लिहली..ती आजही तेवढीच लोकप्रिय आहेत..साहित्यविश्वातही त्यांचे योगदान मोलाचे आहे..त्यांची १०२ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांच्या शेलीवरही एक पुस्तक प्रकाशित होत आहे.

कुलगुरूंच्या हस्ते दोन्ही पुस्तके इथे प्रकाशित झाली


मुळातले कणकवलीचे असणारे डॉ. करमळकर यांनी मुळातले कोकणातले असणारे महाम्बरे साहित्याचा जो प्रवास आहे तो दिपविणारा आहे, असे सांगून  कोकणातला माणूस दिसायला काळा सावळा..पण तो आतून बाहेरून गोड असतो..तसे महाम्बरे होते..त्यांची भावगीतेही प्रसिध्द आहेत. खवचट माणूस हा विशेष करून रत्नागिरी भागातला आसतो. पु लं.चा अंतू बरवा..हे एक उदाहरण आहे. आपल्याला मिळालेल्या पुंजींवर महाम्बरे सुरवातील मुंबईत नंतर पुण्यात आले आणि आपले साहित्य निर्माण केले.याचा मला अभिमान आहे.


गंगाराम गवाणकर यांनी केवळ गीतकार म्हणून नव्हे, कलावंत म्हणून नव्हे..महाम्बरे यांच्यातला माणूस पुस्तकातून शैलजा पाटील यांनी कोरून काढलेला आहे, असे अभिमानाने व्यक्त केले.  कालवंत कितीही मोठा असू दे पण त्याच्यातला माणूस असायला हवा.. तसे महाम्बरे होते..ते या पुस्तकातून स्पष्ट होते. गवाणकरांनी त्या माणूसपणावर भर देऊन. मालवणातल्या या गवाणकराला या पुण्याने कसे मोठे केले ते आपल्या भाषणात छान रंगवून सांगितले.

संधीकाली या अशा..महाम्बरेंची गीते ऐकली

उत्तरार्धात किरणांच्या हळव्या तारा छे़डून  प्रतिभा इनामदार आणि संजीव मेहंदळे यांनी ग्रंथपाल म्हणून काम करताना पुण्याच्या सांस्कृतिक साहित्यिक भूमित आपला ठसा कसा उमटवित गेले ते  त्यांनी रचलेल्या अनेकविध भावगीतातून सूर, ताल आणि लयीच्या या महाजालातून रसिकांच्या मनात गंगाधर महाम्बरे  पुढचे दोन साठवून ठेवले.
गंगाधर मनमोहन महाम्बरे..३१ जानेवारी १९३१ ला म्हापशात जन्मलेले आणि मालवणच्या घरात मोठे झालेल्या या आतुन बाहेरून साधेपणा मिरविणारे साहित्यिक कसे होते..ते विनया देसाई यांच्या ओघवत्या आणि अभ्यासपूर्ण निवेदनातून गीतागणीत उमजत गेले.


पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव..या रामदास कामत यांनी गायलेल्या गीताने महाम्बरे हे नाव सर्वपरिचित झाले. आज प्रतिभा इनामदार यांच्या भावनामय स्वर आविष्कारातून आणि संजीव मेहेदळे यांच्या सुरेल खड्या आवाजातून एकेक गीत रसिकांच्या मनावर कशी अधिराज्य करत होते ते आजही टाळ्यांच्या प्रतिसादातून सिध्द होत गेले.

गंगाधर महांबरें यांच्या जयंती निमित्त त्यांच्याच गीतांची ही मैफल ऐकताना मन भारावून जाते. खरं तर गीत सुचणे..ते योग्य संगीतकाराच्या आणि गायकाच्या आवाजातून रसिकांच्या मनापर्यंत पोहोचणे ही सारी परमेश्वराची कृपा असते..ती त्यांना साध्य झाली होती..


त्यांच्या सुरेल अशी गीतांना श्रीनिवास खळे, य़शवंत देव, विणा चिटको, ह्दयनाथ मंगेशकर या संगीतकारांच्या चालीतून आशा भोसले, रामदास कामत, लता मंगेशकर यांच्या आवाजातून रसिकांपर्यंत पोहोचणारे महाम्बरे यांचे गीत जेव्हा गाणे म्हणून  ऐकण्याची वेळ येते तेव्हा या भरतच्या रंगमंचावर प्रतिभा इनामदार आणि संजीव मेहंदळे यांच्यावर  ती मोठी जबाबदारी येते..ते गीत प्रामाणिक मेहनतीमधून उतमत अशा मोजक्या साथीदारांच्या उत्तम मेळामधून ते आपले समजून गायचे.. 


पण या दोनही गायकांनी ही सुरेल गीते..तेवढ्याच सुंदर रितीने रसिकांच्या मनापर्यत भिडविली..
 मग ते निळा सावळा नाथ असूदे की कंठातच रूतल्या ताना , रसिका तुझ्याच साठा,संधीकाली या अशा , वायुसंगे येई श्रावणा यांसारखी अवीट गोडीची गाणी असूदेत.. प्रतिभा ताईंनी ते एकात्मतेने गायले.


वाटे भल्या पहाटे यावे तुझ्या महाली काय..किंवा देवा घरच्या फुलातले सुमधूर सूर असोत.. संजीवने ते तेवढ्याच तन्मयतेने सादर केले.


गाताना गायकांना दडपण येते पण उत्तम साथीदार संगत करायला असतील तर स्वर लयीतल्या चुका सहजपणे रसिकांच्यापर्यंत न पोहोचता ते गाणे तेवढ्याच सुरेलपणे    पोहोचते. अनय इनामदार (हार्मोनियम) , केदार परांजपे (सिंथेसायझर)  ,  राजेंद्र साळुंके (ताल वाद्य) आणि उत्तम तबला वादनाने ठेका धरायला लावणारे प्रसाद जोशी यांची साथ लाभल्याने एक तरल असा भावनामय कार्यक्रम १ फेब्रुवारीला पुण्यातल्या भरतच्या रंगमंचावरून आम्हा आस्वादकांना मोहवून गेला.

गंगाधर महाम्बरे हे गीतकार आणि साहित्यिक नाव या निमित्ताने पुन्हा झळकू लागले आणि पुढची येणारी पिढी ते नाव वारंवार घेत राहिल असा विश्वास दृढ झाला.



-सुभाष इनामदार, पुणे
9552596276