जुन्या संगीत नाटकांचे जतन करण्याच्या उद्देशाने भरत नाट्य मंदिर मे महिन्यात वासंतिक संगीत महोत्सव साजरा करते. गेली १८ वर्षे सातत्याने तो प्रेक्षकाभिमुख होतो आहे. सोहळ्याची सुरवातीचा दिवस असा साजरा झाला.त्याची ही ध्वनीचित्रफित..
संस्थेची शारदा,संशयकल्लोळ,मानापमान आणि कट्यार काळजात घुसली ही नाटके तर पुण्याबाहेरचे कलापिनी ,तळेगावचे संगीत चैती अशा पाच नाटकांना महोत्सवात रसिकांना पाहायला मिळाली.
भरत नाट्य संशोधन मंदिराच्या महोत्वसाच्या पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमाचे आणि नाटकाचे हे चित्रीकरण
संगीत शारदाच्या वेळी ५५ वर्षापूर्वी काम केलेल्या कलावंताचा सत्कार करून त्या जुन्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.
सवाई गंधर्व महोत्सवाइतके या वासंतिक संगीत महोत्सवाला सातत्याने यश मिळत असून पुण्याबाहेरची रसिक मंडळी दरवर्षी या महोत्सवाला आवर्जून येतात असे निरिक्षण संस्थेचे दिग्दर्शक रविंद्र खरे यांनी व्यक्त केले.
नवी पिढी या पारंपारिक नाटकाकडे दुर्लक्ष करित असली तरी ती नाटके पाहणारा एक वर्ग आहे. त्यांना या नाटकाची मोहिनी आजही पडत असल्याचे चित्र प्रत्यक्षात दिसत आहे.
No comments:
Post a Comment