राम मंदिराचा प्रक्ष आज तरी निकाली लागला. आणि धुसर असलेल्या वातावरणात थोडी चैतन्याची जाग आली.
काही काळाचे तणावाचे वातावरण पुण्यात होते .
शाळा, महाविद्यालये अर्ध्यावर बंदच होती. दुपारी दोन पासूनच सारे वातावरण तंग होऊ पहात होते.
रस्त्यात सगळीकडेच शुकशकाट होता. मंडई, आप्पा बळवंत चौक, बाजीराव रस्ता, डेक्कन सारीकडे दुकान दारांनी दुकाने अर्ध्यावर उघडलेली तर काहींनी ती कुलूपबंद करून ठेवली होती. शहरात पोलिसांनी जमावबंदीचा आदेश लागू केल्याने त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांच्या गाड्या फिरत होत्या.
गुरूवारी दुपारपासूनच सारे रस्ते थंड पडले होते. गि-हाईकेच नाहीत त्यामुळे तुळशीबागेतले विक्रेत्यांनी आपापला माल बांधून बंदचे वातावरण निर्माण केले होते.
नेहमी वर्दळीची असणारी भोरी आळी ठप्प दिसत होती.
सोन्यामारूती चौकात वाहनांची संख्या नगण्य होती.
एकूणच. वातावरणाने प्रश्राची गंभीरता आपल्याला सांगितली होती.
आता ह्या वादाची मर्यादा सर्वांनीच ओळखली आहे. राष्ट्रीय स्वरूपात रामाची ओळख दर्शविणारे मंदिर आणि मुस्लीमांची मशीद दोनही स्वतंत्र जागेत उभे राहून राष्ट्रीय एकतेचे प्रतिक.. विश्र्वबंधुत्वाचे नाते जगासमोर आदर्श म्हणून ठेवता येईल.
No comments:
Post a Comment