Monday, December 6, 2010

पंचवीशीची पाने


पंचवीशीची पाने

संसाराची पाने उलगडताना
पंचवीशीची आठवण करताना
भानावर आलो
मागे पहात गेलो....

साथीचा हात दिलास
दिलासाही दिलास
सारे अनुभवले
थोडा स्थिरावलो....

उलगडली पाने, विरली
जाळीदार बनली
प्रत्येक झरोक्यातून
आठवणींच्या नजरेतून.....

वेलीवर उमटली दोन फुले
पेमाचा ओलावा, भरली मने
सुखाच्या क्षणांनी
भारावल्या मनांनी...

स्वप्न अशी फार नव्हतीच
तिही साकार झाली
दुखाःचा आभास
सुखाचा सहवास.....

आठवतात ते दिवस
कुशीत असतानाचे
ओलाव्याचे
आनंदाचे.....

स्वप्ने नव्हतीच, तो भास होता
जाणीवेचा स्पर्श होता
एका भावभावनांचा
तो प्रतिसाद होता.....

स्थैर्य आले की ठाउक नसे
वागलो वेडावलो
खरेही असे...

सावलीत हरवताना माझीच बनलीस
घरे बदलताना स्वामीनी ठरलीस
भिंती भारवल्या
मोहरून गेल्या
बोबडे बोल, वाचू लागले
घेउ लागले बळ
त्यांच्या पंखात
वा-याच्या वेगात.....

चूकलो असेल, नाही चूकलोच आहे
तरीही तुझ्याच स्पर्शाने गहिवरलो आहे
त्या क्षणांना वेचताना
आज मात्र भारावलो आहे....

पंचवीशीत प्रवेशताना भान जागेच आहे
आजही मोहरताना जागाच आहे
भास होतानाही
जागाच आहे......

जरा विश्वास ठेव, सावध आहे
दुःखाला दूर सारुन सुखावणार आहे
भावनेतही भान आहे
जाणावाही जागृत आहेत

प्रवास असाच सुरू राहणार
अज्ञाताकडे वाट सरकत जाणार
सुरात सूर मिसळून एकसूर झालाय
संसार वेलीवरचा तराणा बनलाय

सुभाष इनामदार, पुणेsubhashinamdar@gmail.com
www.subhashinamdar.blogspot.com
Mob_ 9552596276

1 comment:

आशिष देशपांडे said...

Kaka, Sundar Zaliye Post!!

Tumachya itarahi posts vachlya. Maja aali vachtana.