Tuesday, November 1, 2011

शिवराज गोर्ले- जिवनात आनंद फुलवू



ज्ञानप्रबोधनीत यातून देशाला काय मिळेल..असा विचार करायला लावणारे शिक्षण नाकारून नाटक केल्याने देशाला यातून काय मिळेल? हा प्रश्न विचारला गेला... तेव्हाच मला नाटक करायचं आहे.. यातून देशाचा काय तोटा हेईल? हा विचार करतच..ती ज्ञानप्रबोधीनीची कास सोडली. मग ज्यातून स्वतःला आनंद मिळेल तेच करीत राहिलो.

पूर्वी नाटकात स्वगत जशी असायची तशा पध्दतीने त्यांनीच बोललेल्या शब्दांमधून हे लिहायचा विचार केलाय..म्हणून तसे वाचताना वेगळे वाटत
असेल...


पुढे एमबीए उत्तम गुणवत्तेत पास झाल्यावर त्यावेळी एके काळी नावलौकिक असलेल्या फिलिफ्स कंपनीत पर्सोनेल मॅनेजरची नोकरी स्विकारली...पण तिथेही कामगारांनी एका गुरुवारी पुन्हा वडाच कॅंटींनने दिल्याने ...आणि चहासाठी दूध पुण्यातून येईपर्यंत कामगारांना ओव्हरटाईमचे पैसे मिळावेत ही कामगार युनियनने मागणी केल्यावर न पटल्याने राजीनामा दिलेल्या शिवराज गोर्ले यांनी नेकरी न करण्याचा संकल्प केला.

नाटके लिहली, चित्रपट संवाद लिहेले...मात्र इतरांना सांगताना त्यांचे जिवनात आनंद फुलवू शकतो हे सहका-याच्या अनुभवातून समजले...पुढे तेच लेखन करण्याचा निर्णय घेतला. मजेत कसं जगावं? हे स्वतः इतरांना सांगत गेलो...पुढे् तेच पुस्तकातून लिहित गेलो. वाचकांशी संवाद साधत लेखन केलं. वाचकांनी भरघोस प्रतिसाद दिला...आज इतरांची दुःखे कमी करण्यासाठी आपले लेखन उपयोगी पडल्याची उदाहरणे जेव्हा समोर आली..तेव्हा ठरविले इतरांच्या जीवनात आनंद देण्यासाठी लिहायचे... माझ्या पुस्तकाने आठ-दहा तरुणांच्या आत्महत्त्या रोखू शकलो....

आपल्या षष्ठ्यब्दीपूर्ती समारंभात शिवराज गोर्ले बोलत होते. त्यांच्या दहा पुस्तकांचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्त्यिक ह.मो.मराठे यांच्या हस्ते झाले. बालगंधर्वात झालेल्या या कार्यक्रमात विकोचे अध्यक्ष पेंढरकर यांच्या हस्ते सत्कार केला गेला. राहूल सोलापूरकरांनी गोर्ले यांना बोलते केले. महेश कोठारी यांनी शिवराज यांच्या लेखनाचे कौतुक केले.

आज त्यांची साठी पूर्ण झाली...आयुष्याला कलाटणी देणा-या घटना आळवत ....आपल्याला जे सांगायचे आहे त्यासाठी लेखनाचा मार्ग स्विकारुन आज ते साठीतही मजेत तर आहेतच पण ते इतरांनाही आनंदी बनविण्यासाठी लेखन करताहेत....इंग्रजीतील पुस्तकांसारखी त्यांची जीवनात आनंद देणारी..जगताना येणा-या अडचणींना तोंड देण्यासाठी बळ देणारी अनेक पुस्तके विचकप्रिय झाली आहेत.

आज त्यांच्या लेखी लग्न न केल्याने अनेक मैत्रींणींना ते आपले वाटते वाटतात. तीन जणींनी नकार दिल्याचे सांगताना एकीने मित्र म्हणून मैत्री केली. मात्र स्त्रीयांच्या अनेक दुःखांना त्यांनी पुस्तकातून बोलते केले आहे.
बालगंधर्वात रंगलेल्या कार्यक्रमाला चित्रपट, नाटक, साहित्य आणि प्रकाशन क्षेत्रातल्या मंडळींबरोबरच शिवराज गोर्ले यांचे मित्रमंडळींचा भरणा अधिक होता.


सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552586276

No comments: