
होय डोळे बोलतात..
मनात काय चाललयं ते हे सांगतात.
राग आला तर ते मोठे होतात.
हासताना त्या कोमल छटाही दाखवितात.
समोरच्या माणसाचे असणे योग्य की नकोसा तेही सांगतात हे डोळे.
डोळ्यात पाहिले तर बाहेर न येणारे अश्रुदेखील दिसतात.
मनातल्या वेदनाही डोळ्यावाटे एकही शब्द न बोलता बाहेर येतात.
डोळे अनुभवतात हे प्रत्यक्ष चराचर जग.
आणि मिटल्या डोळ्यांनी दिसते ते भासमय मोहक जग देखील.
डोळे आहे म्हणून हे सारे पाहू शकतो.
डोळ्यांना सृष्टी दिसते म्हणून तर त्याचा म्हणजे निसर्गाचा मोह वाढतो.
आर्तता ही डोळे दाखवतात.
विस्फारुन भावना तिथेही प्रकटतात.
डोळ्यांनी जग पाहताना त्याची वरवरची कृत्रीमताही डोळ्यातून बाहेर येते.
म्हणूनच डोळ्यांनी उघडतात मनाची सताड दारे...
डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे...
डोळे हे जुल्मी गडे रोखून मज पाहू नको..
कितीतरी गाणी मराठी कवी-गीतांच्या रुपाने लोकांच्या डोळ्यावर आली आहेत.
डोळे माणसाला घडवितात
हवे तेही पहायला लावतात
नको तेही वाचायला शिकवतात.
लडीवाळपणे प्रेमही करायला लावतात
आणि त्यातली प्रखरताही तेच व्यक्त करतात.
क्षणात ते रुपे बदलू पाहतात
भारावलेल जडपण सहजपणे दाखवितात.
रस्ता लांबचाही ते दाखवितात..
तर जवळच्या वस्तुही नेमक्या दर्शवितात.
डोळ्यांची भाषा वाचण्य़ासाठी..ती बोलण्यासाठी
आधी ती ओळखावी लागते..उमजून ,समजून घ्यावी लागते.
त्यासाठी डोळे म्हणजेच सृष्टी ज्ञान हवे
माणसाला असणारे हे चक्षु जेव्हा बिघडतात
तेव्हा डोळ्याममोर येतो तो चष्मा,,
मग तो चारडोळ्यांनी भावविश्व अनुभवतो...
जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलू पाहतो.....
सुभाष इनामदार, पुणे.
subhashiandmar@gmail.com
9552596276
No comments:
Post a Comment