अहमदनगरच्या
क्षीरसागर महाराजांच्या मठातल्या श्री दत्त देवस्थान ट्रस्टच्या दत्तमंदिरातल्या
भव्य मंडपात काल रविवारी पुण्याच्या राजेंद्र दिक्षित आणि सौ. जयश्री कुलकर्णी
यांच्या भक्तिस्वरांनी भाविकांच्या मनात संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ ,
संत भानुदास महारांच्या रचना सादर झाल्या. काल तिथे होता रात्री १२
वाजता..श्रीकृष्ण जन्मोत्सव..त्यानिमित्त ही सेवा दत्तात्रयांच्या मूर्तिसमोर सादर
करताना वेगळ्याच वातावरणाने सारेच भारून गेलो होतो..
नगरच्या त्या सुमारे
चार एकराच्या परिसरात विस्तारलेल्या मठात क्षिरसागर महाराजांच्या पावन स्पर्शामुळे
मनात एक वेगळीच चेतना जाणवते. पुण्यातले आम्ही कलाकार तिथे अभंग, गवळण सादर करीत
वातावरणात आनंद निर्माण करीत होतो.
भारतरत्न पं. भीमसेन
जोशी यांच्याकडे गाण्याची रितसर रियाज केल्यानंतर राजेंद्र दीक्षित आपले स्वतंत्र
अभंगवाणीचे आणि भक्तिगीतांचे कार्यक्रम सादर करतात.राम कृष्ण हरी च्या सुरवातीच्या
गजरा पासून कान्होबा तुझी घोंगडी पर्य़त मोजके पण नेमके अभंगरचना सादर करून त्यांनी आपले कसब सिध्दज करुन भक्तांकडून
शाबासकी मिळविली..
बार्शीच्या व्यंकटेश बुरली यांचेकडे शास्त्रीय संगीताचे धडे
घेतलेल्या जयश्री कुलकर्णी यांनी काही गवळणी गाऊन आपली सेवा सादर केली.
संगीताला योग्य असा
भक्तिरसाची आवड असणारा भाविक मिळाला की गाणा-या कलावंताला उत्साह येतो..काल तसेच
झाले होते. या रचनातून देवाला शोधण्याचे,त्याच्याशी संवाद साधायचे माध्यम उपलब्ध
झाले.. काल सारेच जण त्या मोहमयी सामाधानी वातावरणात भावभक्तिची उपासना करत होते.
श्री दत्त
देवस्थानचे शिस्तशीर कार्य आणि तिथल्या पदाधिका-यांची वागणूक यामुळे पहिल्यांदाच
मठात गेलेले आम्ही सारे समाधानी होऊन परतलो. मुख्य असलेले प्रधान काकांनी सर्वांचा
प्रसाद देऊन सत्कारही केला..
सुयश बलकवडे (पखवाज), विनित तिकोनकर (तबला), मंदार
गोडसे (हार्मोनियम), आनंद टाकळकर (टाळ) आणि सौ. चारुशीला गोसावी (व्हायोलीन)
याच्या सुविद्य साथीने गाण्याला ताल.लय आणि नादमयता लाभली..ती इतकी की सारे तन्मय
होऊन..अभंगरचनेला टाळ्यांनी दाद देत आस्वाद घेत राहिले. कार्यक्रमाच्या निवेदनाची
बाजू यावेळी सुभाष इनामदार यांनी सांभाळली..
अशा वातावरणात
अभंगवाणीचे संस्कार त्यापरिसरात वेगळीच भावीकता निर्माण करत होते हे नक्की.
No comments:
Post a Comment