आजच्या सा-याच वृत्तपत्रात प्रभात..चित्रपटगृहाचा अखेरचा पडदा पडला..असे ठळकपणे प्रसिध्द झाले..आणि पुण्याच्या सास्कृतील क्षेत्रातले हे महत्वाचे केंद्रही नामशेष होणार याची खात्री पटली..आज यावर कितीही तोडगे दिसत असले तरी प्रभात ची परंपरा खंडीत झाली हा वस्तुस्थिती मानय करावी लागले.
आप्पा बळवंत चौक म्हटले की प्रभात..हे समिकरण होऊन बसले होते..मराठी चित्रपटसॉष्टीचा इतिहास रचणारी चित्रपट कंपनी प्रभात आणि एकेकाळी महाराष्ट्रातील यच्चयावत निर्माते प्रभातमध्ये आपला चित्रपट प्रथम प्रदर्शित व्हावा यासाठी धडपजत असत.
आज तो रुपेरी पडदा काळाने हिरावून घेतला आहे..
एखाद्या माणसासारखे या प्रभातचे अस्तित्व हेच मोलाचे होते..आजही हमखास मराठी चित्रपटांना इथे अग्रक्रम होता..इथे रौप्यमहोस्तव केलेले अनेक चित्रपट आपले भागय् घेऊन आले होते..आज काही प्रमाणात अनेक माध्यमातून चित्रपट घरोघर पाहिले जातात..तेव्हा थिएटरकडे ओढा कमी झाला आसला तरी..पूर्वा थिएटर हा एकच पर्य़ाय होता...
सारे दिग्गज निर्माते आपला चित्रपट या रुपेरी पडद्यावर दिसावा यासाठी आग्रही असत...आज जसे मुंबईत आणि एकाचे वेळी सा-या महाराष्ट्रात चित्रपट एकाचवेळी दिसतात.तेस तेव्हा नव्हते..
केवळ महाराष्ट्रातील पुण्या आमि तेही प्रभातमध्ये चित्रपट झळकत होते..
आता हे सारे इतिहास जमा झाले...आता उरल्या केवळ आठवणी..
किती कलावंतांना प्रभात आपले माहेरघर वाटायचे..आता माहेरपण संपले..आता उरली आहगे ती केवळ वास्तु..त्यातल्या स्मृती आणि आठवणीत रहाती तिथे अनुभवलेले प्रसंग...
प्रभात थिएटर यापुढे डोळ्यांना दिसणार का, मराठी सिनेमे तिथे लागणार का, प्रभातचे काय होणार, असे असंख्य प्रश्न घेऊन रसिकांनी गुरुवारी प्रभातमध्ये पाऊल ठेवले. दामले यांच्या व्यवस्थापनाच्या प्रभातमधील शेवटचा 'शो' पाहण्यापूर्वी अनेकांनी सेल्फी आणि प्रभातच्या छबी टिपत मराठी सिनेमाच्या या पंढरीला सलाम ठोकला.
प्रभात थिएटरचा दामले कंपनीशी असणारा करार संपल्याने हे थिएटर मूळ मालकांकडे परत जाणार आहे. नव्या वर्षातल्या दहा तारखेपर्यंत टप्प्याटप्प्याने त्याचा ताबा किबे यांच्याकडे दिला जाणार आहे.
दोन्हीही सिनेमांचे शो हाऊसफुल नव्हते, पण थिएटरच्या आवारात चर्चा होती ती प्रभात असेच सुरू राहावे, याचीच. अनेकांनी साशंक मनाने प्रभात थिएटरचे, त्यासमोर स्वतःचे फोटो काढून घेण्यात धन्यता मानली.
No comments:
Post a Comment