Saturday, July 9, 2016

साधे आणि थेट काळजाला भिडणारे लिहणे हे गोनिदांचे वैशिष्ठ्य


वयाच्या १५ व्या सोळाव्या वर्षापर्यंत आई-वडील तुमच्याबरोबर असतात.. ते संस्कार घडवितात.  पुढे तुमचे तुम्हाला पुढे जायचे असते.. तसेच साहित्य क्षेत्रात मला भाषेची समज आली ती आप्पांच्या शितू मुळे.. त्यांनी मला सजग केलं.इतर साहित्यीकांची भाषा ही तशी जड होती.. पण आप्पांची कादंबरी वाचताना.. हा माणूस साहित्य लिहतोय अस वाटतच नव्हतं.. पण तशी भाषा लिहणं किती कठीण आहे..ते स्वतः लिहायला बसंलं.. की किती कठीण आहे हे आजही कळंतं. 
अल्पाक्षरी संवाद म्हणजे कीती..असावेत..१९५५ साली त्यांच्या या लेखनाने झपाटलो गेलो.. माझ्यावर ते संस्कार नकळत कुठेतरी झाले असणार.  मी जेव्हा लिहायला लागलो तेव्हा ते सारे हळुहळु शिकत गेलो..अल्पाक्षरी संवाद कसे असावेत..ते हळुहळु येत गेले.. भाषेचा संस्कार प्रत्यक्ष दिसत नाही पण होत असतो.. 
पारंपारिक भाषेचे सौंदर्य आप्पांच्या भाषेत दिसणार नाही..मला स्वतःला ती अतिव सुंदर वाटते कारण अशा प्रकारे मराठी साहित्यात यापूर्वी कुणी लिहले नाही.. ती अतिशय साधी आहे..साधे लिहणे हे तितके सोपे नाही..तसे साधे लिहायला फार मोठी तपश्चर्या लागते. ती थेट तुमच्या काळजापर्यत थेट पोहोचते.   त्यांच्या भाषेची भुरळ माझ्या मनावर खूप काळ होती.. जसे सगळे लेखक सतत तुमच्याबरोबर नसतात.. पण जर आप्पा नसते. विंदा नसते..दुर्गाबाई नसत्या तर आज मी जसं लिहू शकतोय तसं लिहू शकलो नसतो...फक्त ते घेण्यासाठी तुमचे मन सक्षम हवे..तसे संस्कारक्षम नसेल..तर विंदा..काय आप्पा काय दुर्गाबाई काय लिहत होत्या ते कळणेही दुरापास्त झाले असते.. 
आप्पा ज्या अनुभवला भिडले तो अनुभव मराठी वाचकाला पेलण्यासारखा नाही. शितू आणि पडघवलीतल्या नायिकांकडे पाहताना  त्यांचं भावविश्व इतके खोल आणि तरल आहे की तशा प्रकारे कधी कुणी आधी लिहले होते असं कधी वाटतं नाही.  त्यांच्या  भाषेच्या साधेपणाचे एक सामर्थ्य आहे.. ते इतकं अवघड आणि फसवं आहे की लक्षातच येत नाही.


असे जेव्हा ज्येष्ठ नाटकाकर..साहित्यिक महेश एलकुंचवार थेट रसिकांच्या भावनेला साद घालून सांगतात..तेव्हा खरचं गोपाळ निळकंठ दांडेकर..साहित्यक्षेत्रातल्या आप्पांच्या साहित्याबद्दलचा मराठी अभिमान जागा होतो..गोनिदांच्या नावाने दिला जाणारा मृण्मयी पुरस्कार जेव्हा ते विजया मेहता यांच्या स्विकारतात..तेव्हा तर मान ताठ मानेने उंच होत जाते.








शुक्रवारी ८ जुलैला..पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरातल्या उपस्थितांचे हात टाळ्यांसाठी  सतत सिध्द होत होते..त्यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याची सांगता या निमित्ताने झाली..पुरस्काराचे हे २६ वे वर्ष..





निरा-गोपाळ पुरस्कार दिला गेला तो जळगावच्या मॅगसेसे  पुरस्कार विजेत्या निलिमा मिश्रा यांना..तर यंदा प्रथमच आप्पांच्या नावे प्रोत्साहन पुरस्कार दिला गेला तो बबन गिंडे या तरुण कादंबरीकाराला..







गोनिदांच्या कन्या आणि जावई डॉ. विणा आणि विजय देव यांच्या पुढाकारने मृण्मयी पुरस्कार दरवर्षी ८ जुलैला दिला जातो..गो. नि. दांच्या साहित्यावर प्रेम करणारे रसिक..वाचक यांचा हा स्नेहमेळाच इथे भरलेला असतो..यंदा..ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू, दिपा श्रीराम, नाटककार गो.पु. देशपांडे यांचे सारखे मान्यवर रसिकांमध्ये  उपस्थित असताना असा सोहळा अनुभवणे हे ही भाग्याचेच होय..

अतिशय भावनापूर्ण पुरस्काराचे भाषण करून गो नि दांच्या साहित्याचे श्रेष्ठत्व सिध्द करणारे विचार महेश एलकुंचवारांच्या कडून ऐकायला मिळाले..यावेळी माचीवरचा बुधा या चित्रपटाचे धावता ट्रेलरही उपस्थितांना दाखविण्यात आला..जुलै ते जुलै असे किल्ल्यांवरचे अनुभव सांगणारी दीनदर्शीकाही इथे प्रकाशित केली गेली
तर आपल्या अध्यक्षिय भाषणात ज्येष्ठ दिग्दर्शिका आणि श्रेष्ठ कलावंत विजया मेहता यांनी जो मनस्वी संवाद केला त्याला तोड नाही.. केवळ गोनिदांच्या परिवाराकडून मदत स्विकारून हा सोहळा २५ वर्षे सातत्याने करणा-या सर्वांना आपण जे काम करीत आहात ते खूप महत्वाचे असल्याचे सांगून..आपले आणि आप्पांचे मैत्र कसे होते याविषयी विजयाबाईंनी त्यांच्या उत्तम शैलीत रंगमंचावरून जे वक्तव्य केले ते ऐकण्यासारखे होते.



आप्पांचे व्यक्तिमत्व हे अतिशय विरळा आणि अनोखे असल्याचे  त्या सांगतात.. मी त्यांना एक मुक्त फिरस्ता म्हणत असे. ते मुक्त शोधक होते..ते कधी काय शोधत असतील हे कधीही कळायचे नाही.. गो नि दांच्या शितू कादंबरीवरून जे नाटक लिहले त्याची मी दिग्दर्शीका आणि त्यातली शीतूची भुमिकाही मी केली..पण ती भूमिका मला आप्पांनी समजून दिली..मी शहरी..मला खेडयातल्या जीवनाचा अनुभव नाही..जोपर्यंत कलावंताला त्या भुमिकेचा गाभा सापडत नाही तोपर्यत चाचपडत असतो..तमे माझे झाले..पण शितू करताना मला त्या भुमिकेचा स्पर्शअनुभव करून दिला तो आप्पांना..कोकणातल्या खेड्यात नेले..तिथला निसर्ग वाचून दाखविला..तिथल्या स्त्रीयांचा अनुभव दिला..त्या मातीत शेणाने सारविल्या जमीनीचा तो ओलावा दिला..माझ्या लेखी आप्पांसारखा नाटककार मला भेटला नसता तर कलावंत आणि दिग्दर्शिका म्हणून कमी पडले असते... पहिल्यांदाच कोकणी बोली भाषा ..त्यांच्यातली देवाणघेवाण आमच्यापर्यंत पोहोचली .  केवळ नाटकच नाही तर मला माझे पती हरी खोटे गेल्यानंतरचा ओलावा दिला तो आप्पांनी.. त्यावेळी मी तूला भेटायला आलो हे जाणवूच दिलं नाही.. मला तेव्हा त्यांनी जो आधार दिला तो शेवटपर्यत रहाणार...

असाच काहीसा भावनोक्तट अनुभव महेश एलकुंचवारांच्या वाडा चिरेबंदी नाटक दिग्दर्शीत करताना कसा येत गेला ते विजया मेहता यांनी अतिशय खुलवून सांगितले..

सा-या कार्यक्रमाची सूत्रे हाताळली ती गो नि दांची नात अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांनी.. महेश एलकुंचवारांचा परिचय करून दिला तो वीणा देव यांनी तर निलिमा मिश्रा हिच्या कार्याची ओळख करून दिली ती विजय देव यांनी..
यानिमित्ताने गोनिदांच्या साहित्याची आजही वाचकांना भूरळ पडल्य़ाचे पुस्तकांच्या विक्रीवरून तर दिसतेच..पण त्यांच्या अनेक पुस्तकांचे पुनःप्रकाशनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यानिमित्ताने गा नि दां सारख्या ज्येष्ठ लेखकाची आठवण वाचकांच्या दारी कायम रहावी असाच हा सोहळा रंगत गेला..हे सांगायला नको.



- सुभाष इनामदार, पुणे
- subhashinamdar@gmsil.com
- 9552596276

No comments: