Thursday, July 14, 2016

श्री संत दर्शन मंडळ..श्रीराम साठे यांच्याविना...


गुरूवारी सकाळी मला पुण्यातल्या संगीत मार्गदर्शीका आणि गायक कलावंत जयश्री कुलकर्णी यांचा फोन आला..संत दर्शन मंडळांचे श्रीराम साठे कर्करोगाने आजारी आहेत..त्यांच्या मदतीसाठी आम्ही एक कार्यक्रम उद्या भारतीय विद्या भवन मध्ये करीत आहोत..तुम्ही नक्की या..
आम्ही त्यांच्या उपचारासाठी आमच्याकडून आर्थिक मदत केली आहे.पण त्यांच्यासाठी अधिक मदत मिळावी ही इच्छा आहे..म्हणून  हा कार्यक्रम.

हा फोन सकाळी ८ चा..आठ वाजून ५४ मिनिटांना पुन्हा एक त्यांचा मिस कॉल आला..पण मी कामात असल्याने उचलू शकलो नाही..नंतर कळाले त्यांचे निधन झाले..

आषाढी एकादशीला संतदर्शन मंडळाचा कार्यक्रम झाला नाही असे होत नसे .यंदाही होईल..पण तिथे श्रीराम साठे नसतील...त्यांचे स्मरण होईल इतकेच.

आता भारतीय विद्या भवनातला कार्यक्रम  शुक्रवारी  संध्याकाळी त्यांना  श्रध्दांजली म्हणून केला जाईल. पण त्यात राम..रामभाऊ..नसतील..

आपल्या दक्षिणमुखी मारूतीपाशी असलेल्या बाजीराव रस्त्यावरच्या जुन्या पुणेरी पध्दतीच्या घरी त्यांचे शास्त्रीय संगीत विद्यालय...गेली अनेक वर्षी ते शास्त्रीय संगाताचे शिक्षण देण्याचे काम करत आहेत..काही वर्ष  तर ते एकटेच रहातात.. गेली कित्येक वर्षे पुण्यातल्या नवोदित..पण आता चांगल्या रितीने ओळखल्या जाणा-या कलावंताकडून  संतांचे अभंग..आषाढी..कार्तिकीच्या दिवशी करून आपल्या श्री संत दर्शन मंडळाच्या वतीने महाराष्ट्रात  करीत होते..
गेली तीन एक वर्ष त्यांना पकृतीच्या कारणास्तव..वय ८१ . सारे झेपेनासे झाले. .म्हणून झेपेल तसे त्याकडे पहायचे..विद्यार्थीवर्गही अल्पसा..पण जेवढे शक्य झाले तेवढे ते मार्गदर्शन करायचे..

काही महिन्यांपूर्वी त्यांनी आपल्या कारर्किर्दीचा धावता आढावा घेणारे  पुस्तक लिहले..प्रसिध्दही केले..
अतिशय साधे रहाणे..प्रत्येक संगीताचा कार्यक्रम आर्वजून पहायाचे..गप्पा अघळ-पघळ..पण रुची शास्त्रीय संगीताली..
लेंगा, वर पांढरा नेहरू शर्ट आणि वर काळे जॅकेट ..डोळ्यावर चष्मा अशा वेशात ते संत दर्शन मंडळाच्या कार्यक्रमासाठी जातीने फिरत..अगदी आपल्या कार्यक्रमाचे स्थानीक  देण्यासाठी ते स्वतः  ते सकाळमध्य़े जातीने आलेले मी पाहिले आहे..
आता आपल्या हातून फारसे होत नाही याची खंत बाळगून त्यांनी आपल्या संस्थेची जबाबदारी तरुण तढफदार गायक राजेश दातार यांच्यावर सोपविली होती..स्वतः निवृत्तीधारकाच्या वेशात सामावून गेले होते..
त्यांना कर्करोगाने ग्रासले होते..काही दिवस ते आजारीही होते..

स्वतःसाठी काहीही न मागता संगीताची सेवा करण्यासाटी    काही मदत करा असे सांगणारा हा हाडाचा कलावंत माणूस विरळा..
त्यांच्या साधेपणात जी माणूसकी दडलेली आहे..ती पुढे संपलेल्या अवस्थेत असेल.
संस्थेचे..पर्य़ायाने संगीताची परंपरा जी आपली भारतीय आहे खास तीचे जतन आणि संवर्धन व्हावे ही आयुष्यभर तळमळ केली..त्यासाठी खरच स्वतःचे जीवन दिले..
त्यांच्या निधनाची मोठी बातमी होणार नाही ..पण एका छोट्या प्रमाणात त्यांच्या निधनाची..पर्यायाने त्यांच्या कार्याची  दखल सारेच जण घेतील..

स्वतः पं.. भिमसेन जोशी यांचे शिष्यत्व   मानणारे ते एक साधक..अनेक वर्ष त्यांच्या अनेक कार्यक्रमात ते तंबोरा वादन करायचे.. कधी तरी मंडळाच्या कार्यक्रमात गायची संधी घेतली तर ते एखादी बंदिश पंडीतजींचे स्मरण करून हमखास आपल्या थोड्याश्या घेग-या आवाजात ते ती सादर करीत असत.

त्यांच्यासारख्या जिद्दीच्या. ध्येय्याने प्रेरित झालेली माणसे पाहिली की मन भरून येते..डोळ्यात कणव येते..त्यांच्या कार्याला वाकून सलाम करावासा वाटतो..

श्रीराम साठे यांची आठवण आमच्या मनात नेहमीच असेल..त्यांना माझी ही भावपूर्ण शब्दांजली..



- सुभाष इनामदार, पुणे
सांस्कृतिक पुणे
subashinamdar@gmail.com
9552596276

No comments: