Monday, December 19, 2016

सुपारीवाले भावे आणि प्रसाद भावे




सातारा कन्याशाळेत नोकरी करणारे..आई निमर्लाताई भावे ..यांनी चालू केलेला भावे सुपारीचा कारखाना पुढे नावारुपाला आणणारा हा सातारचा उद्योजक..एक प्रसन्न व्यक्तिमत्वाचा माणूस..अदरातिथ्य जपणारा..अतिशय सह्दय ज्येष्ठ मित्र..समाजाकडे तटस्थपणे पाहणारा सामाजिक बांधिलकी जपणारे दिसखूलास व्यक्तिमत्व ..आणि अलीकडे अधिक प्रकर्षाने जाणविणारा गुण म्हणजे राजकारणत्या विविध विषयांनर आपली परखड मते प्रांजलपणे मांडणारा उत्तम विचारवंत पत्रलेखक..

असे हा सातारचे भूषण असणारे व्यक्तिमत्व म्हणजे..प्रसाद जगन्नाथ भावे सर..  हरपले याचे दुःख होते..

मी शाळेत असताना त्यांच्याकडे सुपारीच्या पुड्या करायला जाऊन..शाळेचा खर्च भागवित होतो..माझी आई त्यांच्याकडे सुपारी करायला.. भावीणबाईेना त्यांच्या आईला  मदत करायला जायची..तेव्हापासून ते अगदी माझ्या मुलाच्या लग्नाची पत्रिका द्यायला सातारच्या शनिवार पेठच्या घरात गेल्यानंतर भाऊने केलेले स्वागत..आज सारे चित्र डोळ्यासमोर येते..खरं तर हा प्रवास सुमारे ५० वर्षांचा..तो कसा या अपु-या शब्दात सांगू..पण त्याची नोंद प्रसाद भावे गेले त्यांनिमित्ताने व्हायलाच हवी..

दोन वर्षापूर्वी त्यांची पत्नी गेली तेव्हा भेटायला गेलो..तसे त्यांनी सारे शांतपणे सांगितले..पण त्यांनीही भावे सुपारीचा व्यवसाय करण्यात किती मदत केली..नव्हे त्यांनी तो व्यवसाय अधिक वाढविण्यात पुरेपूर मदत केल्याचे दिसत होते..पण त्या गेल्या आणि प्रसाद एकटा पडला.(.खरं तर मी त्याला भाऊत म्हणत आलो..म्हणून एकेरी.). तोही आघात सोसला..आता वयपरत्वे आपल्याला हे सारे झेपणार नाही म्हणून आपल्या पुण्यातल्य़ा नातवाला सोबत घेऊन हा व्यवसाय पुढे नेत होता.. नवी उप्तादने ..लोकांच्या पसंतीला उतरवीत होता.. खरे म्हटले..तर बाहेर कुठेच जायचे नाही ..प्रवास करायचा नाही..असे ठरविले असले तरी ते पाचगणीला कुठे गेले..शेवटी तिथेच अखेर व्हावा ..ही दुर्देवाची गोष्ट.
आपल्या आईने सुरु केलेला हा घरगुती सुपारीचा व्यवसाय नोकरी असतानाही आणि निवृत्तीनंतरही विकसीत केला..फक्त फार व्याप वाढवायचा नाही..मागणी वाढली तर आपण पुरे पडणार नाही याची जाणीव ठेवत कुवतीनुसार ..काळानुसार बदल करत प्रसाद भावे यांनी हा व्याप आपल्यापुरता मर्यादित ठेवला..
पूर्वी मला आठवते..ती भावे सुपारी पुण्यात हेजीब यांचे दुकानात मिळायची..आता तर तर ग्राहक पेठे पासून मुंबईतल्या काही दुकानातही भावे सुपारी मिळते..

सुपारी खरेदी करण्यासापून त्याचे पॅकेींग पर्य़त सारे ते जातीने पहात असत..पूर्वी पाच पैशाचे सुपारी पॅकेटच जे लग्नात पेढ्याबरोबर देता येईल असे असायचे..
पुढे पुढे शरीर साथ देत नाही..बाहेर जाणे कमी करत रोजच्या जीवनात शिस्त आणली..रोज नियमित फिरायला जाणे..आवश्यक तेवढाच आहार घेणे..वेळेवर विश्रांती घेणे आणि वैद्कीय पथ्य पाळणे..सारे प्रसाद भावे यांनी केले.
बाहेरून आपल्याला काही होत असल्याचे किंचितही त्यांच्या चेह-यावर दिसून येत नव्हते..
माझ्या आईने सुपारी कारख्यान्यात केलेले कष्ट आठवून त्यांनी आम्हाला शेवटपर्य़त मदतीचा हात आणि आधार दिला..प्रसंगी मायची उबही पांघरली..

प्रसाद भावे यांचे कॉमर्सचे वर्ग काही वर्ष माझ्या शनिवार पेठेतल्या घरीही चालत..काही काळ मीही त्यांच्या वर्गाचा लाभ घेतला..
मी सातारा सोडल्यावरही हा लोभ कमी झाला नाही.. तसाच कायम राहिला.अगदी भावा प्रमाणे...आता त्याला ४२ वर्षे् उलटून गेली..प्रसाद भावे यांचे नाते अतुट राहीले..
आता मात्र ते गेल्याने त्यात अडथळा आला..मी पोरका झालो..

सातारला गेले की भावेंकडे जावून भाऊला भेटायचे हे नक्की असे..त्यांची विचारपूस मनाला दिलासा देणारी असे..अगत्यही तेवढेच असायचे..
कधी काळी प्रसाद भावे, अरूण गोडबोले आणि अरविंद भावे यांनी टाईम्स ऑफ इंडियाची एजन्सी घेतली होती..या  ट्रीओ एजन्सीत पेपर टाकण्याची माझी लाईनही असायची..अर्थात तीही मला भाऊ मुळे मिळाली..
पण आमचे संबंधही असेच वैयक्तिकच होते..प्रसाद भावे यांचे मित्र..नंदकिशोर नावंधर यांचे मुळे नावंधर यांनी बांधलेल्या राधिका चित्रपटगृहात बुकींग क्लार्कची नोकरी मिळाली होती..

एकूणच माझ्या व्यक्तिगत जीवनात प्रसाद भावे आणि त्यांचे आई-वडील आणि त्यांची पत्नी..तसेच आताची त्याची पुढची पिढी यांचे स्थान मोलाचै आहे. ते पुढेही राहणार आहे..


अलीकडे त्यांची पत्रे वाचकांच्या पत्र्यव्यवहारमध्ये वारंवार प्रसिध्द होत होती..तेव्हा त्यांची सामाजीक. राजकीय जाणीव किती होती याची प्रचितीही येत होती..
अभ्यासोनी प्रकटावे असे त्यांचे हे पत्रातले शेरे खरंच खूप मोलाचे असत.
त्यांना सातारा आणि हा सारा परिसर मित्र मंडळी..त्यांचे डॉ. बाबा उर्फ अनंत साठे यांच्यावर फार जीव..अखेरीस मात्र ते सातारापासून थोडे दूर गेले होते..
पण मनी मानसी सातारा हेच कायम होते..
असा या वृत्तीने उदार..मनाने श्रीमंत..पेशाने शिक्षक..आणि व्यवसायाने उप्तादक असे प्रसाद भावे आपल्यातून दूर निघून गेले..अनंताच्या प्रवासासाठी..
त्यांना आमच्या सारख्या असंख्य मदतीचा हात देणा-यांकडून हिच शब्दांजली वाहतो..त्यांच्या कु़टुंबीयांना हे दुःख सोसण्याचे बळ मिळो आणि भावे यांनी भावे सुपारीचा वाढलेल्या रोपाची वृध्दी होत राहो.हिच त्यांना श्रध्दांजली ठरेल.




- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

No comments: