Monday, March 6, 2017

पाच व्हायोलीन वादकांचा सुरेल आविष्कार



पं. गजाननबुवा जोशी यांचे स्मरण



ज्येष्ठ व्हायोलीन वादक पं.गजाजननबुवा जोशी यांची स्मृती पुण्यातील पाच व्हायोलीन वादकांनी आपल्या वादनातून जागी ठेवली. स्वरांवरची कमाल तयारी आणि तालाच्या संगतीने वादनातले बारकावे पुणेकर रसिकांनी रविवारी अनुभवले.
`स्वरबहार` प्रस्तुत पं. भालचंद्र देव यांच्या पुढाकाराने गेली चौवीस वर्ष गजाननबुवांच्या शेलीचे स्मरण पुणेकरांच्या साक्षिने केले जाते.  

काल म्हणजे रविवारी 5 मार्च, 17 ..देवेन्द्र जोशी, अभय आगाशे्, सौ. चारूशीला गोसावी डॉ. सौ. निलिमा राडकर आणि पं.भालचंद्र देव या पाच व्हायौलिन वादकांची मैफल स्मरणात रहावी अशीच आनंद देऊन गेली..
 पं. भालचंद्र देव हे गजाननबुवांचे शिष्य..आपल्या गुरुच्या स्मरणार्थ दरवर्षी सादर होणा_या या मैफलीस पुढच्या वर्षी पंचवीस वर्षे होतील.


 नवोदित पण व्हायेलीन वादनात तरबेज असणारे वादक शोधून त्यांना ह्या व्यासपीठावर संधी देण्याची पं. देव यांची पध्दत आहे. यंदा  देवेंद्र जोशी हे त्यातलेच एक नाव.




 एस एम जोशी संभागृहातल्या छोटेखानी रंगमंचावर पं. गजाननबुवा जोशी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांच्या वादनाची ध्वनीफित ऐकवून कार्यक्रमाची सुरवात झाली..पुढे दौन अडिच तास हा व्हायोलीन वादनाचा स्वरयज्ञ सुरू झाला तोच मुळी देवेन्द्र जोशी यां व्हायोलीन वादकाच्या बागेश्री रागातल्या वादनाने.. गेली काही वर्षे वादवापासून दूर गेलेले जोशी इथे मात्र आपली नजाकत दाखवून रसिकांच्या पसंतीस उतरले


`व्हिओलीना` या व्हायोलीन दिनाच्या निमित्ताने लक्षात राहिलेले नाव म्हणजे अभय आगाशे..त्यांनी इथे हंसध्वनीचै सूर आळवून आपली वाद्यावरची हूकमत स्पष्ट सुरांतून मनात आपली प्रतिमा नि्र्माण केली.













सौ. चारूशीला गोसावी आणि डॉ. निलिमा राडकर या दोन तयार व्हायोलीन वादकांनी जुगलबंदीत सादर केलेला राग मधुकंस त्यांच्या साधनेची महती आपल्या वादनातून सिध्द केली. दोनही कलावंतांची स्वरतालावरची पकड ऐकताना भान हरपून जात होते.. सिध्दहस्त कलावंतांची सारी लक्षणे त्यांच्या वादनातून पुणेकर रसिकांना स्पष्ट जाणवत होती..  


सौ. गौसावी यांनी बालगर्धवांच्या गोड गळ्यातून टिपलेले स्वयंवर नाटकातले नरवर कृष्णा समान..हे पद व्हायोलिनच्या सुरातून ऐकताना श्रोते डुलत होते. तर डॉ. राडकर यांनी काफी रागातली धूनही तेवढ्याच मनस्वीपणे सादर केली. या दोन स्त्री कलावंतांचा आविष्कार या मैफलीतला सर्वात उत्तम सादरीकरणाचा नमुनाच होता.


 पं. गजाननबुवांचे शिष्य अवघे ब्याऐंशी वर्षाचे वयोमान असणारे पं. भालचंद्र देव यांची आपल्या छोट्या सादरीकरणाची सुरवात राग जनसंमोहिनीने केली. तुमची बैठक पक्की असली की कलेवरची निष्ठा वादनातून जाणवते..गुंतता ह्दय हे..हे नाट्यपद आणि शेवटी सादर झालेली भैरवी.


.पं. देव यांच्या वादनातले बारकावे दाखवत रसिकांच्या चरणी लीन होत वादन संपवतात तेव्हा टाळ्यांचा नाद होतो...पण खरा कलावंत त्यात बुडून जात नाही..तर ती रसिकतेची थाप गुरूप्रसाद म्हणून स्विकारत आपली पुढील वाटचाल करत रहातो..




सगळ्या मैफलीची तबला साथ त्या त्या कलावंतांच्या वैशीष्ठ्यानुसार रविराज गोसावी यांनी समर्पक केली.. स्वरबहारचे पडद्यामागचे सूत्रधार राजय गोसावी यांनी थोडक्या शब्दातून निवेदन करून कार्यक्रम सुविहित सादर केला..











-सुभाष इनामदार,
सांस्कृतिक पुणे
9552596276

No comments: