Wednesday, June 28, 2017

ललितकलादर्शचा आविष्कार.. वारसा संगीत नाटकाचा.




संगीत नाटकांची परंपरा सांगणारा सुरेख पट...

मराठी संगीत नाटकाची एकशे सत्तर वर्षांची परंपरा सांगणारा एक रंगमंचिय आविष्कार ललितकलादर्शची तिसरी पिढी म्हणजे बापुराव पेंढारकरांच्या नातवाने..ज्ञानेश पेंढारकर यांने नकताच भरत नाट्य मंदिरात खास पुणेकरांसाठी सादर केला.. जो वारसा त्याचे वडील भालचंद्र पेंढारकरांनी आपल्या सुविद्य पत्नीच्या साथीने पुढे नेला तो... वारसा संगीत नाटकाचा...हेच त्याचे शिर्षक होते..

भरत वाक्यापासून भैरवीपर्य़तचा हा संगीत वारसा चार तासाचा कालावधी घेऊन खास इथे केला गेल्या त्याचे कारण त्यांच्या निवेदनातूनच स्पष्ट होते..बालगंधर्व, भास्करबुवा बखले, वझे बुवा, खाडीलकर, गडकरी ...हे सारे दिग्गज या पुण्यातले..त्यांनी हे संगीत नाटक जागतिक क्षितिजावर फडकविले...त्यांना हा प्रयोग करून मानवंदना देण्याचा हा उद्देश होता..

नांदी, दिंडी, साकी..पासून नाट्यपदांच्या विविध छटा या बैठकीच्या पदातून इथे ऐकवित असताना..मागे पडद्यावर त्या काळचे चेहरे..पेहराव..ते नट यांचाही इतिहास दिसत होता..कांही ठिकाणी ते सारे पडद्यावर ऐकविले देखिल..



ज्ञानेश पेंढारकरने निलाक्षी पेंढारकर या आपल्य़ा सुविद्य पत्नीच्या सुरेल
आवाजातून ही संगीत नाटकांची परंपरा उलगडून दाखविली..

आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाला जसा रसिकांचा स्पर्श झाला तसा तो पुण्यातल्या आणि मुंबईतल्या कलावंतांनीही हा प्रयोग पाहिला..अगदी अखेरपर्यत..त्यात कीर्ती, लता शिलेदार,

मधुवंती दांडेकर, भास्करबुवा बखले यांंची नातसून लिखिका आणि गायिका शैला दातार, विद्याधर गोखले यांची कन्या शुभदा आणि जावई श्रीकांत दादरकर, गिरीजा काटदरे..असे कितीतरी..





रंगमंचावरही गायकात पं. राम मराठे यांची पणती आदिती मराठे यांनाही त्यात सामिल करून घेतले होते..












ज्ञानेश पेंढारकरांनी अनेक नाट्यपदे उत्तम गायलिही..पण दुरितांचे तिमिर जावो मधले..आई तुझी आठवण येते..या पदांनी रसिकांच्या मनात त्यांचे स्थान अढळ करून टाकले..
निलाक्षी पेंढारकरांनी स्वयंवर, मानापमान ते अखेरचा जोहार मायबाप..हा अभंग गाउन रसिकांना मोहात पाडले.



. धनंजय म्हसकर यांनी कट्यार..ते मत्स्यगंधा मधील पदांना रसिकांसमोर मांडले.












तर खास उल्लेख करावा लागेल तो निमिष कैकाडी यांचा.

त्यांने गायलेली सगळी पदे रसिकांनी टाळ्यांचा गजरात दाद देत ऐकली.. काहींना तर वन्समोअर घ्यावाच लागला. तयारीचा दमदार आवाज यामुळे पुणकरांना ऐकता आला.


संकेत म्हात्रे आणि ऋग्वेदी प्रधान यांनी संवादातातून रसिकांना संगीत नाटकाचा इतिहास सांगितला..
आणि अखेरीस. या कार्यक्रमाची रंगत वाढविली किंवा ता ऐकावीसी वाटली ती उतम साथिदारांच्या संगतीमुळे. यात तबल्या धनंजय पुराणीक, हार्मोनियम लिलाधर चक्रदेव आणि ऑर्गनवर साथ करणारे पं. गोविंदराव पटवर्धन यांचे शिष्य मकरंद कुंडले.

.त्यांनी ऑर्गवर आपला सुरेल स्पर्श एका उत्तम नाट्यसंगीताच्या पदातून करवून दिला..


आपली संगीत नाटकांची परंपरा आता अशा बैठकीच्या कार्यक्रमातून का होईना..काळानुरुप टिकविण्याचे आणि तो वारसा पुढच्या पिढीपर्य़त नेण्याचे कसब ज्ञानेश पेंढारकर आणि निलाक्षी पेंढारकर करताहेत... यासाठी त्यांनी खास शाबासकी.
आणि ही शाब्दिक दादही...




सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

No comments: