ती परंपरा
कायम
कर्नाटकातल्या
सागरी किनारीची सफर
म्हणजे कोस्टल
कर्नाटक करून पुण्यात
आम्ही दहाजण परतलो..पण खरंच
आजही त्या सहलीत
लुटलेल्या आनंदी क्षणांची पुर्नभेट
सतत व्हावी. त्यातले
काही तुमच्यापर्य़त सांगावेत
असे मनापासून वाटते.
याची कराणे अनेक. एकतर अनुभवचे
यश ज्यांच्या मुळे
गेली बारा वर्ष
वाढत गेले..त्याचा
मूऴ पाया रचला
तो अरूण भट
यांनी..खरच अवलिया
माणूस. निसर्गवेडा. पुन्हा गावाकडे
चला सांगतात , बोलतात
अनेक जण..पण
भटांनी मुंबईतल्या अनेकांना कर्नाटकातल्या
सिरसीत निसर्ग उभा करून
कर्नाटकातली इतरांना न दिसलेली
स्थळे शोधली..
त्या
रस्त्यावरून जेव्हा अनुभवच्या मंडळींना
डोळे उघडून निसर्गातल्या
आनंदाकडे पहायला शिकविले..निसर्ग
वाचायला शिकविला. बरोबर स्वदिष्ट
महाराष्ट्रीयन आणि कर्नाटकीय
पदार्थांचा आस्वाद दिला. आणि
पुन्हा येवो अशी
हाक दिली..
आज त्यांच्यामागे ती परंपरा
कायम राखत त्यांच्या
सुविद्य पत्नी, जावई, मुलगी
आणि सारा अनुभवचा
सहकारी वर्ग. तिच वाट
त्याच जिद्दीने आणि
चिकाटीने पुढे नेली
आहे..त्यांचे स्वागत
करून त्यांच्या या
यशाचे साक्षिदार बनण्याचे
ठरवून ते अनुभवून
परत येताना त्यावर
काही शब्दात सांगावे
यासाठी हा प्रपंच
केला..
चार वर्षापूर्वी आम्ही बारा
जण अनुभवच्या पुण्यातल्या
कार्यालयात मुकुंद चौगुले यांना
भेटून कर्नाटकातल्या नविन
पर्यटन स्थळांची सफर करण्यासाठी
नावे नोंदली..तेव्हा
अरूण भट कोण..त्यांची व्यवस्था काय
काहिच माहित नव्हती..मात्र इतरांचे अनुभव
ऐकून त्यांच्या डिस्कव्हर
कर्नाटक सहलीसाठी तयार झालो..
त्याचा अनुभव
http://subhashinamdar.blogspot.in/2014/01/blog-post_22.html
या ब्लॉगवर आहेच..
यांच्या सहलीचे वैशिष्ठ आणखी
एक..त्या शनिवारी
सुरू होतात आणि
पुढच्या रविवारीच संपतात..आठवड्याच्या
कालावधीत पहिले दोन दिवस
ओळखीत जातात..पुढचे
दिवस भटकण्यात आनंद
घेत कधी निघून
जातात..आणि आपण
त्या परिवारात कधी
एकरूप होऊन जाता..ते कळत
नाही .तोपर्य़तच हा
सुखद अनुभव संपतो..
पुन्हा जाण्याच्या ओढीने..
कोस्टल कर्नाटका या सहलीला
तयार झालो याचे
अधिक मोठे कारण
अरूण भट यांनी
उभारलेल्या पाच एकरावरच्या
सिरसितल्या जंगलातल्या जागेवर उभे
केलेले `ग्रीन वर्ल्ड` मध्ये
चार रात्र मुक्काम..
तिथे राहून आलेल्या
कुणालाही विचारा की तुम्ही
निसर्गात राहूनही या राहिणीमानात किती
छान रमता ते.
दोन दिवस रहातो ते..मुर्डेश्वरच्या
अतिभव्य अशा शंकराच्या शिल्पाच्या परिसरात आर एन शेट्टी यांनी उभारलेल्या समुद्राच्या
काठावरच्या गेस्ट हाउस मध्ये..म्हणायला ते गेस्ट हाऊस पण ते रहाण्यासाठी खूपच सुरेख
आहे.. इथल्या प्रत्येक खोलीतून समुद्राचा नजारा दिसतो..आणि दुसरीकडे मुर्डेश्वर मंदिराचे
धार्मिक दर्शन घडते.
https://www.ghumakkar.com/murudeshwar-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0/
आम्ही काही पुणेकर
मंडळी पुण्याहून पनवेलला
गेलो तिथून मत्स्यगंधा
ने कुमठाला उतरलो..तिथून अनुभवचे जगदिश
पाटील आणि सहकारी सिरसितल्या
ग्रीन वर्ल्ड कडे
मुक्कासाठी घेऊन गेले..
अदरातिथ्यात
लपेटलेल्या तिथल्या अनिरुध्द शेट्ये
आणि प्राची भट
यांच्या अनुभवाचे साक्षिदार बनलो..
तोच आपलेपणा..तोच
आग्रह.. आणि जातिने
विचारपूस..
आमच्याबरोबरच्या
काही महिलांना अगदी
माहेरपणाचा आनंद देणारा..हा विसावा..मायेचा आणि ममत्वाचा वाटला..
मग काय दोन
बावीस आणि
दोन बारा सिटच्या
मोटांरींतून बनवासीचे मधुकेश्वर मंदिर..ज्याला कर्नाटकातले दक्षिण
काशी म्हणून ओळखले
जाते..
तिथे जाताना पाहिलेली लसणाची
लागवड, काही प्रमाणात
उस आणि सुपारी,
नारळाची शेती..
भव्य प्राचिन अशा मधुकेश्वर
मंदिराच्या प्रवेशव्दारी उभा असलेला
भव्य रथ..
मंदिरातला
नंदी..जो ऐका
डोळ्याने शंकारकडे एका डोल्याने
पार्वतीकडे पहातो..
जोग फॉल..
जो
गिरसप्पाचा धबधवा म्हणून पुस्तकातून
वाचलेला आहे..सिरसीपासून
एकशेवीस कि.मि.
दूर.. कारवार जिल्यातला
हा जोग फॉल..शरावती नदीचे उगमस्थान
शिमोगातल्या तिर्थहळ्ळे आहे. चार
धारांमधून पाणी खाली
कोसळते..राजा, रोरर, रॉकेट
आणी राणी अशी
त्यांची नावे ठेवली
आहेत..देशातला दुसरा
नंबराचा हा धबधबा
आहे.. हवा चांगली
होती..प्रवासही सुखकर..आणि वातावरणही
उत्तम.
उंचेलीचा धबधवा
जो.
80 कि.मि.वर सिरसीपासून आहे..
तिथे वाटेत..सहस्त्रलिंगम
दिसते..शाल्मला नदिच्या पात्रात
हजार शिवलिंगे कोरलेले
हे ठिकाण सोंडा
गावात आहे.
तिथून पुढचा प्रवास होतो
तो..खाली खोल
खोल जात उंचेलीकडे.
खळाळणारे पाणी सभोवताल्या
डोंगरावरून खाली कोसळते..ते पहाण्यासाठी
आधी अर्धा कि.मि.. उतरत
जाणे..मग सुमारे
पाचशे पायरी खाली
उतरणे..मग दिसतो..तो कोसणारा
पाण्याचा प्रवाह.. आम्ही गेलो..तेव्हा पावासाचा शिडकावा..मध्येच उन.. अशातच
दिसते..ते इंदर्धनुष्य..मन प्रसन्नतेने
भरते..पण वर
चढताना होणारी दमणुकही सहन
करावी लागते.
याणाचा भस्माचा डोंगर.
जो
सिरसीपासून साठ कि.मि. वर
आहे. .अतिप्राचिन ..पुराणकालिन..
भस्मासूराचा वध करून
शंकराने पार्वतीला तिथे पाठविले..म्हणून तिथे भस्मासूराची
राख होते..म्हणून
त्याला भस्माचा डोंगरही म्हणता..
तिथे.भव्य अशी
प्रदिक्षणा गुफा आहे.
खाली.शंकराचे भैरवेश्वर
मंदिरही आहे..
सिरशीतल्या
मनकर्णिका मंदिरातल्या मुकांबिका देविचे
दर्शन आणि थोडी
खरेदी करून..सिरसीतून
मुक्काम हलवून निसर्गाचे वारे
खाते आपण कुमठा
मार्गे होनावरला येतो.
.सुखद
गारवा अंगावर घेत..आता शरावती
नदीच्या पात्रातले बोटिंग करतो..
आणि पुढे गाकर्ण
महाबलेश्वरच्या दर्शनासाठी उतरतो..
शंकराचे आत्मलिंग तिथे आहे
असे मानले जाते.
रावणाने शंकराला प्रसन्न करून शिवलिंग
लंकेला नेताना वाटेत
गणपतीच्या हातून ते कसे
इते स्थापन झाले
याची आख्यायिका आपणाला
माहित आहेच.
तिथल्या महावलेश्वराचे दर्शन घेऊ..श्री
गणपतीच्याही भाविकतेने पाया पडून
पुढे मुर्डश्वराकडे मुक्कामाला
निघतो..
पनवेल कन्याकुमारी महामार्गावर
धावणारी आमची गाडी
जेव्हा मुर्डेश्वराच्या जवळ येऊन
पोहोचते..तेव्हा दिसणारी भव्य
शंकराचे शिल्प मनात साठून
रहाते..
समुद्राकाठच्या
गेस्ट हाउसवर विश्राम
करून भगवान शंकराच्या
मंदिरात संध्याकाळच्या आरतीला आणि नंतरच्या
प्रदिक्षेणाला हजर राहण्याचे
भाग्य लाभते.
एकशे
तेवीस फूट शंकराचे
भव्य शिल्प आणि दोनशे
सदतीस फूट उंच
सोळा मजली असेलेले
मंदिराचे गोपूर अरबी महासागराच्या
विशाल पाण्यावरही आपली
सत्ता कायम कोरले
गेले आहे..
काही प्रकाशचित्रातून तेच रूप
साकारताना पाहण्याचा मनस्वी आनंद
आम्ही घेतला..
शंकराच्या शिल्पाखालील गुहेत
साकारलेले गाकर्ण महाबलेश्वराचे..म्हणजे
शंकराची हु पुराणकाथाही
चित्रमय स्वरूपात अनुभवणे हाही
आनंद घेतला..
मुर्डेश्वरच्या
मुक्कामात एडगुंजीचा महागणपती..बेंदूरचा सूर्यास्तचा
देखावा..
पण आम्हाला
ढगाळ हवामानामुळे तो दिसला
नाही.पण नदीचे
सागरातले समर्पित होणे..या
उंचावरच्या परिसरामुळे शक्य झाले..वाटेवर मोरांचेही दर्शन
घडले..
आणि उपुंदा नदी अरबी समुद्रात मिळते तो देखावा मात्र अगदी स्पष्ट
दिसू शकाला..
मग अखेरीस झाले ते
सोमेश्वर सागर तिरावरचे समुद्र दर्शन..कांहींनी त्यात स्नाहनही केले..तर काहींनी सागर
लाटांचा आनंद घेतला.
शिरालीचा गणेश आणि
महामाया मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यावर आमच्या गाड्यांचा ताफा चालला चित्रापूरच्या सारस्वत मठाकडे..
मठातली धार्मिकता
मुलांचे वेदपठण आणि श्री शंकराच्या पिंडींचे होम हवन पाहतान मन प्रसन्न होते.. मठाशेजारच्या
तलावाकडेही आमची नजर गेली..
तिथली निरव शांतता आणि स्वच्छता पाहून मनाचा मुक्काम इतेच
कायमचा असावा असे वाटत राहिले.. मठा शेजारी.
साकरलेले प्राचिन मूर्ति आणि शिल्प कलेचे नमुने पहातच राहिलो.तिथला भव्य रथ..जा केवळ
हनुमान जयंतीला बाहेर काढला जातो..त्याची कालकुसर केवळ अप्रतिम होती..पण केवळ पाहण्यापुरते..त्याची
प्रतिमा साठनूव ठेऊ शकत नव्हतो..ते एका स्वांमिंचे एकट्याचे संग्रहालय होते..
सगळ्या प्रवासाच्या
आठवणी काढत सारेजण...मुर्डेश्वराच्या शंकराच्या प्रतिमेला मनोमन नमस्कार करून पुन्हा
कोकण रेल्वेच्या मंगलोर ते कुर्ला..मस्त्यगंधाने पनवेलकडे निघालो..
प्रत्येकाची एकमेकांशी ओळख होणेही महत्वाचे होते..तेही झाले..आणि सगळ्यांसाठी अनिरूध्द शेट्ये यांनी सादर केलेला जुन्या हिंदी गाण्यांंचा चित्रमय कार्यक्रमही सर्वांना आवडला..
विशेष करून सिरसिचे गायक श्रीधर हेगडे यांचे अभंग आणि संतरचनाही सगळ्यांनाच आनंद देत होत्या
प्रत्येकाची एकमेकांशी ओळख होणेही महत्वाचे होते..तेही झाले..आणि सगळ्यांसाठी अनिरूध्द शेट्ये यांनी सादर केलेला जुन्या हिंदी गाण्यांंचा चित्रमय कार्यक्रमही सर्वांना आवडला..
विशेष करून सिरसिचे गायक श्रीधर हेगडे यांचे अभंग आणि संतरचनाही सगळ्यांनाच आनंद देत होत्या
विशेष करून अनिरुध्द
शेट्ये, प्राची भट..जगदीश पाटील, राम पटकुरे, अभिषेक जमादार, सागरसह सारे रथाचे सारथी..जे
केवळ सारथी नसतात..तेच पुढे सामानाची नेआण करून तुम्हाला सुंदर भोजनही आग्रहाने वाढतात..
गाडीतून उतरपल्यापासून ते गाडीत सामान चढवेपर्य़त..त्यांच्यामुळेच ही सफर सगळ्यांचा
मनात कायमची कोरली गेली.
पुन्हा एकदा कर्नाटकात
लपलेल्या नयनरम्य निसर्गाचे रुप अनुभवण्यासाठी
तिथले प्राचिन जीवन आणि परंपरा पाहण्याचे वचन मनोमन घेऊन.
-सुभाष इनामदार, पुणे
9552596276
No comments:
Post a Comment