फोटो संग्रहातला घेतला आहे.. |
घरातले सगळे मिळून
फराळ करायचे, छोट्यापासून
मोठ्यान पर्यंत प्रत्येक जणांचा
हातभार लागायचा.
मी तर नायगाव
च्या अहमद सेलर
या चाळीत वाढले.
तिथे सगळेच ब्राम्हण
…नाही म्हणजे तसे
ग्राउंड फ्लोअर ला सगळ्या
जातीधर्माचे लोक होते
. पण अहमद सेलर
म्हंटलं की आठ
ही बिल्डिंग ब्राम्हणांच्या
..असो..त्यामुळे सगळे संस्कार
पण तसेच झाले..
आणि आमचं कुटूंब
तस छोटच होतं
पण माझ्या आई
आणि आज्जीला सणवार साजरे करायची
खूप हौस..त्यात
दिवाळी असली म्हणजे
विचारायला नको ..त्यात माझी
मामी पण सामील
व्हायची.
माझा मामा
, पप्पा सगळे मिळून
आम्ही फराळ करायचो..माझ्या मामी ने
केलेल्या बुंदीच्या लाडवांची चव
अजून आहे जिभेवर..
चाळीत एकमेकांना मदत करायल
ही आम्ही जायचो
कधी शेजारच्या काकुमावश्या
ही घरी मदत
करायला यायच्या.
खूप आठवतात
ते दिवस. फार
काही श्रीमंत नव्हतो
पण त्या दोन
खोल्यात पण समाधानी
होतो.आपल्या माणसांची
तोंडं तरी दिसायची...
आता शरीरं आणि मन
सगळंच लांब गेलेत..नाही म्हणायला
माझी मामी मात्र
दर दिवाळीला माझ्या
साठी बुंदीचे लाडु
आवर्जुन पाठवते...
आज मी अशी
अनेक कुटुंब बघते
की एकत्र असून
त्यांच्यात संवाद नाहीत..फराळ
एकत्र करणं तर
लांबच राहिलं..
.बाहेर सगळं मिळत
मग कशाला आणायचं?
कोण करणार एवढा
आटापिटा?त्यात डाएट च
प्रस्थ असतं.
हौस च दिसत
नाही... कदाचित नोकरदार बायका
असतात त्यामुळे सगळं
सांभाळून जमत नसेलही
पण दिवाळी रोज थोडीच
येते...
मी तर जाम
हळवी आहे दिवाळी
बद्दल.
No compromise ...
आज माझे आईवडील,
आजी हयात नाहीत
पण
त्यांनी दिलेले संस्कार मी
विसरू नाही शकत...
-प्रिया बेर्डे, मुंबई
No comments:
Post a Comment