अनेकदा कलाकारांच्या
सत्कार समारंभानंतर त्यांचे कलेतील स्थान आणि त्यांनी केलेले कर्तुत्व दाखविण्यासाठी
रंगमंचीय आविष्करण केले जाते..पण मिडीयामध्ये सत्कार समारंभाची दखल घेतली जाते..पण
ज्या कलावंतांनी मेहनत घेऊन नंतर केलेले सादरीकरणाचा फक्त एका वाक्यात उल्लेख होतो..ते
त्या कलावंताच्या कलागुणांना काही प्रमाणात मारक ठरते..तारक नाही..
रविवारी टिळक स्मारक
मंदिरात गानवर्धनच्या वतीने ख्यातनाम कथ्थक
गुरू शमा भाटे
यांना डॉ. विजया
भालेराव पुरस्कार नृत्यगुरू सुचेता
नातू यांच्या हस्ते
दिला गेला..सन्मान
समारंभानंतर `नादरूप
`,या शमा भाटे
यांच्या नृत्यालयामार्फत त्यांच्या शिष्यवर्गाने जो
अविस्मरणीय आनंद दिला
त्याची नोंद एक
रसिक म्हणून घ्यावीशी
वाटली..हाच याचा
मुख्य उद्देश..
पंडिता रोहिणी भाटे यांच्या
शमा भाटे ह्या
नात्याने सून. पण
मला रोहिणी भाटे
य़ांच्या पहिल्यापासूनच्या शिष्यात गणल्या जातात.
डेक्कनवर पूर्वीच्या कॉफि हाऊसच्या
मागे रोहिणी भाटे
यांचा नृत्यवर्ग.तर
टिळक रोडवर शमा
भाटे यांची `नादरूप
`ही संस्था कथ्थक
थडे देणारी संस्था..काळओघाप्रमाणे रोहिणीताई गेल्या आणि
त्यांचे अस्तत्व नादरूपने मनोमन
जपले..ते आपल्या
शिष्यवर्गाच्या उत्तम सादरीकरणाने काल
पुन्हा एकदा सिध्द
झाले.
त्या बोलतात त्या आपल्या
कलेतून आणि विद्यार्थ्यांच्या
कलेतून..
काल प्रेक्षागृहात दर पाच मिनिटांनी टाळ्यांचा नाद घुमत होता..याचे सारे श्रेय जाते ते शमा भाटे यांना आणि त्यांच्या उत्तम तयारीने सादर केलेल्या शिष्यवर्गाला.
नादरूपच्या
वतीने अर्पिता पाटणकर
यांनी सुजाता नातू,
शमा भाटे आणि
उपस्थित सर्व रसिकांचे
स्वागत करताना जी मने
जिंकली..ती पुढच्या
सर्व कार्यक्रमाची नांदीच
होती. नृत्यकार्यक्रमाची सुरवात
भगवान शंकरांचे वर्णन
असणारा शिववंदना सादर करून..
रंगमंचावर उत्तम रित्या दर्शन
घडवून खिळवून ठेवणारी
हालचाल करत रसिकांची
मने जिंकली. सादर
केलेल्या सगळ्याच मोहक रचना..त्याचा सामूहिक आविष्कार
आणि आपल्या उत्तम
आणि प्रसन्न आविष्काराने
रसिकांची पावती मिळविली.
पुढे ताल रुपक..नंतर केदार
चतरंग...कालिया थाडे आवे
मोहन..अर्थात कालिया
मर्दन सर्व नर्तकांचा
सुंदर आविष्कार पहाणे
एक मन प्रसन्न
करणारी गोष्ट होती.
द्रुत तिनतालात काही शिष्यांनी आपल्या तरल अशा नृत्याविष्कारातून केलेली नृत्य आराधना किती प्रगल्भ होत गेली आहे याचे प्रतिक देत होती. हाताची मोहक हालचाल..गिरक्या, पदन्यास आणि केवळ पायातल्या घुंगरातून साधलेली तपळाई.. सारचे कौशल्य दाखवित होती.
समुद्रमंथन करणारा
सर्व कलावंताचा आविष्कार
केवळ अनुभवणे महत्वाचे
होते. एकमेकांच्या उत्तम
संगतीने तो सादर
होताना..त्याला लाभलेली संगीत
आणि गायनाची
साथ अंगावर रोमांच
ऊभे करीत होती.
शेवटच्या भैरवीतून साकार केलेले निरंकर,
निराकार,निरामय असे भजन..त्यातील लालित्य,संथ पण
सतत धावणारा संगीताचा
प्रवाह आणि त्यात
नादरूपच्या शिष्यवर्गाने रंगमचावर केलेली कमाल..
सारेच मोहक होते.
अमिरा पाटणकर, अवनी गद्रे, शिवानी करमरकर, कृपा तेंडूलकर, भार्गवी सरदेसाई, इषा नानल, निखिल परमार, निकिती कराळे, गिरीश मनोहर या नृत्यनिपुण कलाकारांचा सहभाग होता. यात प्रत्येक कलाकाराचे योगदान तेवढेच मोलाचे होते.
त्यांच्या उत्तम गुणग्राहक कालाविष्काला प्रत्यक्षात आणणारे शमा भाटे यांच्या सारखे गुरू हे आपल्या सांस्कृतिक परंपरेचे खरे पाईक..त्यांनी आपली सांस्कृतिक परंपरेची विरासत आपल्या खांद्यावर मोठ्या हुकमतीने पेलली आहे..हा कार्यक्रम याचेच ठळक उदाहरण होता.
शेवटच्या भैरवीतून साकार केलेले निरंकर, निराकार,निरामय असे भजन..त्यातील सासित्य..संथ पण सतत धावणारा संगीताचा प्रवाह आणि त्यात नादरूपच्या शिष्यवर्गाने रंगमचावर केलेली कमाल.. सारेच मोहक होते
.
गानवर्धन संगीत , संगीतावरची चर्चा आणि नृत्यकलेलाही किती महत्व देते ते अशा कार्यक्रमातून ठळकपणे सिध्द होते.
- सुभाष इनामदार, पुणे
9552596276
2 comments:
उत्कृष्ट रसग्रहण.
Dhanywad,
asech prem rahu dyat.
subhash inamdar, puen
subhashinamdar@gmail.com
9552596276
Post a Comment