Sunday, May 13, 2018

शिवशाहिचे होणार `कल्याण`






पुन्हा शिवशाहितून जाण्याचा निर्धार…..
 
डोंबिलवीत तातडीने जाण्याची गरज होती पण रेल्वेचे आरक्षण मिळाल्याने एसटीच्या नविन सुरु झालेल्या शिवशाहिने जाण्यासाठी ११ आणि १२ मे ला आरक्षण करून घेतले. पण दोनही दिवसांच्या गाड्या आयत्यावेळी रद्द झाल्या आणि लाल डब्बाने प्रवास करून पुन्हा नको रे बाबा शिवशाही हाच मंत्र अनेक आरक्षित प्रवाश्यांनी घेतला..त्याची ही कहाणी..

यावद्दलची दखल कुठे घ्यायची . कोणास दाद मागायची..सारेच अवघड आणि त्रासदायक..म्हणून सोशल मिडीयाच्या माध्यमातून ह्या शिवशाहीचे झालेले कल्याण आपणापर्यंत पोपचविण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे..

राज्य सरकारचे महामंडळाच्या परिवाहन मंत्री आणि त्यांचे खाते याची दखल घेतील याची तिळमात्रही मनी साशंकता नाही. पण आपण घेतलेला अनुभव इतरांना उपयोगी पडावा हिच सदिच्छा.. आम्ही भोगले ..ते तुम्हाला भोगायला लागू नये हिच कळकळ.



स्वारगेट कल्याण  ११ मेच्या गाडीसाठी तासभर आधी साडेपाचला स्वारगेटच्या त्या गर्दीत दाखल झालो. गाडी साडे सहाला अपेक्षित होती..पण सात वाजून गेले तरी स्वारगेटवरून जाणारी कल्याणला जाणारी शिवशाही गाडी आल्याने अनेकदा विचारणा करून कळले की गाडीचे टायर बर्स्ट झाल्याने गाडी येणार नाही.. या गाडीचे पूर्ण आरक्षण झालेले असल्याने अनेकांची गैरसोय होत होती.. स्वारगेटच्या  नियंत्रकाकडून उत्तर समाधानकारक मिळत नसल्याने  प्रवासी वैतागले होते.  बर ते म्हणत ती कल्याण डेपोची गाडी आहे. आम्ही काही सांगू शकत नाही.
शेवटी डेपो व्यवस्थापक कुठे आहेत ते शोधून काढले. ते स्वारगेट गाड्या जिथून सुटतात. तिथे सापडले. ते ही थोडे वैतागले होतेच. अहो सकाळपासून १० गाड्या सोडल्या..आता आमच्याजवळ गाडी नाही. याचे पैसेही आम्ही देऊ शकत नाही..कारण हेी कल्याण डेपोची गाडी आहे. मी सांगितले ..मला तातडीने जाणे गरजेचे आहे.. गाडी रद्द होणे ही आमची चूक नाही..पर्य़ायी व्यवस्था  म्हणून आम्हास ठाणे शिवनेरीत जागा द्या.. जास्तीचे पैसे लागले तर भरू. ..त्यांनी एका सहायकाकरवी हा निरोप तिथे दिला..पण ती गाडी भरलेली. मग मी एशियाड ठाणे गाडीत आता तिला हिरकणी म्हणतात वसविण्याची विनंती केली..ती त्यांनी मान्य केली..तिथे सिट दिली..पण पैसे काही परत मिळता..जायचे होते डोंबिवलीला पण ठाण्यातून जाऊ हा विचार करून हा मार्ग निवडला.. आणि दीड तासाच्या फरकाने आठ वाजता स्वारगेट आम्ही उभयतांनी सोडले.. गाडी रात्री बाराला ठाण्यात गेली..
सांगायचे दुसरे म्हणजे सव्वाआठला एका कंडक्टरचा फोन आला.. कल्याणसाठी साठी गाडी सोडली आहे..तुम्ही कुठे आहात..तेव्हा मला एशियाडला जागा मिळाल्याचे सांगितले.. ही शिवशाहिचे बुकींग केलेले  सारे  कल्याण डोंबिवली प्रवासी पाऊण एक वाजता पोहोचल्याचे कळाले..
एका शिवशाहिची ही कथा..पण पुढे मजा दुसरीच आहे.


येतानाची दुसरीच व्यथा..



मे १२ चे संध्याकाळी साडेपाचला कल्याण सुटणारी कल्याण शिवशाही आरक्षित करून परतिच्या प्रवासासाठी अगदी बकाल अशा डोंबिवली स्थानकात पाचला येऊन बसलो. स्थानकात नियंक्षकाचे कार्यालय बंद..केवळ प्रवासी आणि तिथे फेरणारे आणि खेळणारी मुले.. .आज तरी कालची निराशा पदरी येणार नाही अशी अपेक्षा करत..पण हाय.. दैव वेगळेच फासे टाकत होते. काल ज्या साध्या गाडीत बसलेले सहप्रवाशी म्हणाले बरे झाले तुम्ही ठाण्यात गेला वेळेत. आम्ही साडेआठला निघून काल पाऊणला डोंबिवलीत लाल डब्यातून आलो. आता पु्न्हा या शिवशाहीचे आरक्षण करणार नाही..त्यापेक्षा गर्दीतून रेल्वेने ठाण्यात जाईन..पण या गाडीचे नाव काढणार नाही.

बरे पाच पंचेचाळीसची वेळ असणारी शिवशाही  सव्वासहा वाजले तरी येत नाही म्हणून कल्याण स्थानकात फोन केला, तर कळाले गाडी आणायला चालक गेला आहे.. चला गाडी येणार हे नक्की झाले. पुन्हा काही वेळाने दुसरा प्रवासी डोंबिवली स्थानकातून कल्याणला संपर्क करून सांगता झाला की .. कल्याण स्वारगेट शिवशाही रद्द झाली आहे..पर्य़ायी लाल डब्याची साधी गाडी काही वेळात सोडू
हाय रे दैवा.. आजही शिवशाहीने घात केला..नव्याने सुरु झालेली ही दिमाखदार वातानुकुलीत गाडी आमच्यासाठी घात करणारी ठरली.


अखेरीस सव्वासातला ही लाल परि डोंबिवली स्थानकात दाखल झाली.. `चला, शिवशाहिच्या आरक्षित प्रवाश्यांनो या गाडीत बसा.`. त्यातही गंमत म्हणजे वाहकाकडे  आरक्षित आसनांचा चार्ट असुनही त्याजागी इतर प्रवासी बसलेले होते. त्यांना  उठविण्याची पाळी आमच्यावर होती.. ही गाडीही पूर्ण आरक्षित होती..पण आयत्यावेळी आपले केविलवाणेपण लपवित  सरकारी महामंडळाच्या दप्तरी नोंदलेल्या लाल परीत विसावा घेत..उकाड्याच्या दिवसात हवेशिऱ खिडक्यातून वारं घेत आम्ही प्रवासी साडेअकराला पोहोचलो..
एक मात्र बरे झाले आम्हाला काही रक्कम रोख स्वरूपात  गाडीत परत करण्यात आली.


 मनात एकच निर्धार केला पुन्हा या शिवशाहिचे नाव घ्यायला नको. कुठुन आपल्य़ाला बुध्दी झाली आणि कल्याण डेपोची शिवशाही आधी आरक्षित केली.

थोडी चौकशी केली तेव्हा समजते की या शिवशाही गाड्य़ा करारावर महामंडळ घेते. त्याचे चालकही करारावरचे फक्त त्याचे तिकिट व्यवस्थापन महामंडळ करते.
गर्दीच्या दिवसात असे काही झाले तर बायका-मुलांसह प्रवास करणारी मंडळी केवळ हातात हात घालून..आपल्याच नशीबी हे कसे असे म्हणत बसणार ..दुसरे काय.
३० एप्रिलला याच शिवशाहीने डोंबिवलीत जाता येता प्रवास केला..
पुन्हा कोल्हापूरलाही याच गाडीतून आलो..पण तो अनुभव बरा होता..ती शिवशाही योग्य वाटली..म्हणून हे आरक्षित केले..पण कल्याण डेपोच्या शिवशाहिने असेा कल्याण दरवाजा दाखविला.. जो कायम स्मरणात राहिल..
यावर अनेक प्रवासी मंत्र्यापर्यंत आपली व्यथा सादरही करतील..पण आमचा काही वट नाही आणि आम्हाला हे सारे तुम्हाला सांगणे अधिक योग्य वाटले..म्हणून हा प्रपंच..
इति...



-सुभाष इनामदार, पुणे



No comments: