Friday, August 1, 2025
स्वरयात्री बाबूजी.. तपपूर्ती सोहळा..
Friday, July 18, 2025
अतिशय मेहनतीने लीना राजवाडे यांनी माणिकबाईंची गाणी फुलविली..
Sunday, July 13, 2025
गुरुपौर्णिमेनिमित गुरुभावयुक्त नवे गीत..साधना धर्म..साधना मर्म
साधना धर्म..साधना मर्म
सांगे तो कर्म गुरू माझा...!
करोनी ध्यान .. जाणतसे मर्म
तेची आहे साधन.. सदा ..!
घेई मुखी नाम..तोची माझा नेम
नित्य आहे काम ..सदा वाचे..!
करोनी एकाग्र.. साधना ती हवी
तेंव्हाच कधीतरी..साध्य होई..!
परिपूर्ण नाही..जगी असे कोणी
साधना अवीट.. जाणोनिया..!
गरू सांगे मज..नको पळवाट
साधना अनमोल.. जाण असे..!
आता करू निश्चय..निर्णय थोर
तपस्या माझी..कायमची..!
हाच माझा निर्धारु..दृढ असे भाव
गुरूच्या प्रती.. आदर असे..!
नमती मस्तके ..गुरूच्या पायी
आनंद होतसे..मजठायी..!
_ subhash inamdar, Pune
Wednesday, July 9, 2025
साधना धर्म..साधना मर्म
साधना धर्म..साधना मर्म
सांगे तो कर्म गुरू माझा...!
करोनी ध्यान .. जाणतसे मर्म
तेची आहे साधन.. सदा ..!
घेई मुखी नाम..तोची माझा नेम
नित्य आहे काम ..सदा वाचे..!
करोनी एकाग्र.. साधना ती हवी
तेंव्हाच कधीतरी..साध्य होई..!
परिपूर्ण नाही..जगी असे कोणी
साधना अवीट.. जाणोनिया..!
गरू सांगे मज..नको पळवाट
साधना अनमोल.. जाण असे..!
आता करू निश्चय..निर्णय थोर
तपस्या माझी..कायमची..!
हाच माझा निर्धारु..दृढ असे भाव
गुरूच्या प्रती.. आदर असे..!
नमती मस्तके ..गुरूच्या पायी
आनंद होतसे..मजठायी..!
- सुभाष इनामदार, पुणे
https://youtu.be/8qTpvGNfjAw?si=TNuan1DFwhmMuA1S
Tuesday, July 8, 2025
भक्तिरसात चिंब भिजविणारा. लय विठ्ठल..सूर विठ्ठल कार्यक्रम ..!
Sunday, June 29, 2025
ताल सौंदर्य अधोरेखित करणारा नवा आविष्कार.. तालबंधातील ठेव ही..
संगीतातून गायन वादन नृत्य हे तिन्ही प्रकार तालाशिवाय अपुरे आहेत. ताल संगीतातील सुरांना निर्धारीत कालखंडात बंदिस्त करतो. यात तालाचे महत्व आहे..त्याच ताल सौंदर्यावर आधारित कार्यक्रम ज्येष्ठ तबलावादक विद्यानंद देशपांडे यांच्या संकल्पनेतून रविवारी २९ जून २०२५ रोजी कलाद्वयी यांचे वतीने सादर झाला..
Thursday, June 26, 2025
युनिव्हर्सल स्टुडिओज सिंगापूर
Sunday, June 1, 2025
आवाज और अल्फाज... एक जादूभरा संगीतानुभव..!
तरुण वादक साथीदारांना घेऊन नवा कार्यक्रम सादर करण्याची प्रेरणा ..स्वतःशी प्रामाणिक राहून ए आर रहेमान..गुलजार..रेखा भारद्वाज..कैलास खेर आणि ९० चे हिंदी संगीत क्षेत्रातला सिलसिला . आवाज और अल्फाज..ह्या कार्यक्रमाची सुरूवात अंजली मराठे आणि अजित विसपुते या अतिशय कमालीच्या तयार असलेल्या गायकांनी पुण्यात शनिवारी प्रथमच केली.
हा तुम्ही नेहमी अनुभवता तसा ऑर्केस्ट्रा नाही..तर उत्तम ध्वनिव्यवस्था..परिणामकारक प्रकाशयोजना.. आणि स्वरातील परिणामकारकता जपत मराठी कलावंतांनी रसिकांवर केलेली उत्तम जादू.. जी रसिक टाळ्या..आणि दाद देत अनुभवू शकतात...असा आतला..पण फारसा बाहेर न येणारा आनंदोत्सव होता.
ओरिजनल गाण्याला धक्का न लावता ही हिंदी चित्रपटसंगीतात आपले स्थान निर्माण करणारी गाणी घेऊन त्यात आपला स्वतंत्र तरीही वेगळा सांगीतिक विचार देणारा हा प्रयोग अजित विसपुते आजी अंजली मराठे यांनी इथे अतिशय मेहनतीने आणि तळमळीने तयारी करून तो सादर केला.. नेहमीच्या पेक्षा वेगळा आणि रसिकांना आवडेल असा कार्यक्रम सादर करण्याची त्यांची इच्छा आहे..
यापुढेही..एक गीतकार..एक गायक..एकेक शतकातील वेगळी..पण संगीतकारांनी..
आणि गायक ..गायकांची गाणी..आणि त्यापेक्षाही नवीन प्रयोग करण्यासाठी अभिव्यक्त एंटरटेनमेंट.. सिद्ध झाली आहे..
उत्तम हिंदी..आणि उर्दू अल्फाज आपल्या निवेदनात आणून त्यांना योग्य तो न्याय..मग त्यात मराठी असल्याचा भास न ठेवता ते वजन प्राप्त करत प्राजक्ता मांडके यांनी जुन्या गोष्टींनी कास जशी धरून ठेवली आहे तशी नवीन गोष्टींची आस पकडून ..म्हणजे नव्या जुन्याचा संगम साधत ती गाणी आवाज और अल्फाज या कार्यक्रमातून सादर केली..निवेदन हेही इथे परिणाम करते...तुम्हाला पकडून ठेवते..दाद द्यायला भाग पाडते.
एक अतिशय वेगळा..दर्जेदार..परिणामकारक तरीही वेगळा सांगीतिक विचार देणारा कार्यक्रम शनिवारी ,३१ मे २०२५ रोजी भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात सादर केला..
अलबेला सजन आये..यापासून कार्यक्रम सुरू होऊन
रोज रोज आखों तले
झुकी झुकी सी नजर
उदास..
तेरे बीना जिंदगीसे शिकवा
गम और खुशी.
पानी पानी रे. खारे पानी रे
अंजली..आणि अजित यांनी सादर केलेले मराठी चित्रपट गीत ...मला वेड लागले प्रेमाचे..
उपस्थितांनी डोक्यावर घेतले.
सिलसिला...
या कहा आ गये हम पर्यंत चाललेल्या उत्तम गाण्यांचा आणि किती वेगळ्या स्वरावलीतून सादर होणारी मनावर आरूढ होत जाणारी गाणी...ज्या स्वरांच्या सौंदर्यातून सादर होताना अनुभवताना गायक आणि साथीदारांच्या एकरूपतेचे दर्शन घडले..
एक वो दीन. साथी रे..कमालीची स्वरातील दर्द आणि भावनेतील मिठास बाहेर आणणारी गाणी..
आपके आखोमे कुछ महक
Sanorita..सारखे पाश्चिमात्य धूनवर सादर झाल्याने ते सादर करताना दोन्ही गायकांनी मंचाचा केलेला वापर..सारेच फिल्मी स्टाईलने..तरीही भपकेबाज न आणता..
९० च्या दशकातील..बाजीगर ..सिलसिला.. दिल से ..सारख्या चित्रपटातली गाण्यांची झलक...
आठवण
चुराके दिल मेरा.
सुफियाना अंदाज मध्ये अंजलीने ..रेखा भारद्वाज यांच्या अजवजातील ती जादू.. विलक्षण भावते..रसिक टाळ्यांनी प्रतिसाद देतात.
चलो छैय्या छैय्या.. सादर करताना रसिकांचा मिळालेला प्रतिसाद ..सारेच लक्षात राहील.
गुलजार
लुका छुपी बहोत हुई ..सामने आ जाना..
या रंग दे बसंती मधील रचनेने अजित आणि अंजली यांनी कार्यक्रमाचा समारोप केला..
त्यातल्या भावना.. त्यातली स्वरांची उधळण..सारेच त्यांनी असे काही बेमालूम प्र्कशस्त उतरविले की ..जबाब नही..!
प्रामाणिक आणि अस्सल..असलेल्या आवाज और अल्फाज..या कार्यक्रमात सारेच अतिशय एकरूप होऊन गाणी सादर करीत होते..
चांगले..आणि ..उत्तम असे दोन शब्द त्यासाठी बोलके आहेत..
अंजली मराठे यांचा एक उत्तम गायिका म्हणून आणि अजित विसपुते यांचा संगीत क्षेत्रातला अनुभवी प्रवास..त्यामुळेच त्यांचा आवाज..आणि प्राजक्ता मांडके यांचा अल्फाज यांचे उत्तम एकाग्रतेने साजरे केलेले दर्शन यातून घडले.
त्याच्या एकूणच सादरीकरणात स्वप्नील भावे.. हार्मोनियम..इलेट्रिक सिंथ
कौन्तेय जांबोटकर... गिटार
तबला..आणि पर्कशन..ओंकार सूर्यवंशी
प्रकाश.सुजय भडकमकर
ध्वनी..अयान मोमिन
यांचा मोलाचा सहभाग होता..
खरे तर अशा कार्यक्रमावर लिहिणे ..शक्य नसते..कारण कित्येक वर्ष करियर करून ते कलावंत ही कला सादर करतात..आणि आम्ही काही शब्दात त्याविषयी आपले मत प्रदर्शित करतो..
नवे काही करावे ही प्रेरणा त्यांना सतत मिळावी यासाठी प्रेक्षक..आणि रसिकांची वाहवा हवी असते..ती काल होती..आणि असे उत्तम सादरीकरण होत असेल तर ती यापुढेही नक्की मिळेल..
ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे.. झलक संस्थेचे अविनाश वैजापूरकर तसेच अभिनेते गजानन परांजपे..यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला..
इथे मी काही क्षण आणि काही व्हिडिओ मधून तुम्हाला कार्यक्रमाचा फील देत आहे.
- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
Tuesday, May 27, 2025
नाफाचा चित्रपट महोत्सव..होणार जुलैमध्ये..!
अमेरिकेत हॉलिवूडच्या धर्तीवर मराठी चित्रपटसृष्टी निर्माण करण्याचे उद्दिष्ट - अभिजित घोलप
देऊळ' आणि 'भारतीय' या चित्रपटांचे निर्माते, सुवर्ण-कमळ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित अभिजीत घोलप यांच्या संकल्पनेतून 'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोशिएशन'ची (नाफा) स्थापना गेल्यावर्षी करण्यात आली होती. मराठी चित्रपट, कला संस्कृतीच्या माध्यमातून दर वर्षी अमेरिकेत मराठी चित्रपटांचा भव्य सोहळा सॅन होजे येथे आयोजित करण्यात येतो. गेल्यावर्षी प्रथम म्हणजे २०२४ च्या २७ आणि २८ जुलै रोजी हा सोहळा कॅलिफोर्नियामध्ये अमेरिका, कॅनडा मध्ये स्थायिक असलेल्या भारतीयांच्या उपस्थितीत पहिला भव्यदिव्य महोत्सव संपन्न झाला होता. यावर्षी २५, २६ आणि २७ जुलै २०२५ ला दुसरा नाफा महोत्सव हॉलिवूडच्या धर्तीवर सॅन होजे येथे संपन्न होणार असल्याची घोषणा नाफाचे संस्थापक अध्यक्ष अभिजित घोलप यांनी नुकतीच प्रसिद्धीपत्रकाद्वारे मुंबईत केली.
उत्तर अमेरिकेत आणि कॅनडामध्ये वास्तव्यास असणाऱ्या जवळपास साडेपाच लाख मराठी, भारतीयांपर्यंत मराठी चित्रपट पोहचविण्याची धडपड अभिजित घोलप 'नाफा'च्या माध्यमातून करीत आहेत. दर महिन्याला १ मराठी चित्रपट 'उत्तर अमेरिका - कॅनडा'मध्ये २०२४ पासून प्रदर्शित होत आहेत. ‘गुलकंद’, ‘सुजित सुशीला’, ‘संगीत मानापमान’, ‘चिकीचीकी बुबुम्बुम’, ‘पाणी’, ‘गुलाबी’, ‘नवरा माझा नवसाचा २’, ‘अशी ही जमवा जमावी’, ‘स्थळ’, ‘सलतात रेशीम गाठी’ इत्यादी चित्रपट आतापर्यंत अमेरिकेत आणि कॅनडामध्ये नाफाद्वारे रितसर चित्रपटगृहांमध्ये महाराष्ट्रातील प्रदर्शनाच्याच दिवशी तिथे प्रदर्शित झाले असून अमेरिकेत या सर्व चित्रपटांना वाढता प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातील मातब्बर निर्मिती व वितरण संस्थांसोबत नाफाने करार केले आहेत.
अमेरिकेत हॉलिवूडच्या धर्तीवर मराठी चित्रपटसृष्टी निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवून अभिजित घोलप नाफाची कार्यप्रणाली विकसित करीत असून तेथील अनेक तरुण कलावंत, प्रेक्षक जोडले जात असल्याचे घोलप सांगतात. ते म्हणाले. “‘देऊळ’ या माझ्या चित्रपटाला राष्ट्रीय सुवर्ण-कमळ पुरस्कार मिळाल्यानंतर नॉर्थ अमेरिकेत मराठी चित्रपटसृष्टी स्थापन करावी असा विचार मनात होता. माझ्या या विचाराशी सहमत असलेले ५००हून अधिक सदस्य अल्पावधीतच या कामाशी जोडले गेले. वर्षाअखेरीस दोन लघुपटाची निर्मिती करण्याचं ध्येय ठेवून ‘फिल्म क्लब’च्या तयारीला लागलो. अनेक कलावंत, दिग्दर्शक, नृत्यदिग्दर्शक, गायक, कवी, सिनेमॅटोग्राफर्स, संकलक यांनी फिल्म क्लबमध्ये नोंदणी केली. त्यासाठी दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांची कार्यशाळा आयोजित केली. याशिवाय टॉक शोज, डॉ. मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, डॉ. सलील कुलकर्णी, सचिन खेडेकर, समीर चौघुले, अभिजीत देशपांडे यांच्या कार्यशाळा, चर्चासत्रांच्या माध्यमातून कार्यविस्तार होत आहे., विविध क्षेत्रात आघाडी घेतल्यानंतर अमेरिकेतल्या भारतीयांना मनोरंजनक्षेत्रात आपली कला दाखवण्याची संधी मिळणार आहे. गेल्यावर्षीच नाफाने या दिशेने पहिले पाऊल टाकले असून,अमेरिकेत सातासमुद्रापार मराठी चित्रपटसृष्टी उभारणीचं स्वप्न सत्यात उतरण्यास सुरुवात झाली आहे. आपल्या सर्व कलावंत आणि तंत्रज्ञाच्या साथीने लवकरच ते पूर्णत्वास जाईल.”
यावर्षी NAFA फिल्म फेस्टिव्हल २५, २६, २७ जुलै २०२५ रोजी, कॅलिफोर्नियातील सॅन होजे येथे संपन्न होणार आहे. या महोत्सवात डॉ. मोहन आगाशे, अमोल पालेकर, सचिन खेडेकर, महेश कोठारे, अश्विनी भावे, सोनाली कुलकर्णी (ज्येष्ठ), अवधूत गुप्ते, आदिनाथ कोठारे, वैदेही परशुरामी आणि मधुर भांडारकर या प्रमुख सेलिब्रिटींची उपस्थिती असणार आहे. नाफा महोत्सवासाठी अमेरिकेतील ‘बीएमएम’च्या ५७ महाराष्ट्र मंडळांचे सहकार्य लाभले आहे.