Wednesday, June 4, 2014

वसंत देसाई..युग पुन्हा पुणेकर अनुभवणार




संगीतकार वसंत देसाई यांच्या  १०२ व्या जयंती निमित्ताने पुण्यात त्यांनी हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीत  त्यांनी अजरामर केलेल्या विविध गीतांची आठवण ताजी होणार ती रविवारी ८ जूनला. पुण्यातल्या एस एम जोशी सभागृहात संध्य़ाकाळी पाच वाजता पुन्हा एकदा वसंत देसाई यांच्या सुरावटींची जादू पुणेकर रसिकांना अनुभवायला मिळणार आहे...

विशषतः ही सारी गीते दृक-श्राव्य माध्यमातून ऐकविली जाणार आहे. वसंत देसाई कुटुंबीय पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या या महान संगीतकाराला ...त्यांच्या सूरातून आपल्यासमोर काहीकाळ ..तो काळ आणि ती स्पंदने ...पुन्हा एकदा जागी करण्याचा प्रयत्न करणार आहेत. आणि सारी गीते निवडली आहेत ती रागांवर आधारीत आणि त्याला शब्दांनी सजविणार आहेत. संगीत समीक्षख अमरेन्द्र नंदू धनेश्वर..

वसंत देसाईंच्या संपूर्ण कारकीर्दीची झलक दाखविणारं आणि त्यांच्या प्रकाशित आणि अप्रकाशित चित्रपटगीतांच्या खजिना मोकळा करणारं संकेतस्थळ  http://www.vasantdesai.com/ ह्याचे प्रकाशनही या दिवशी पुणेकरांच्या साक्षीने होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे..रसिकांना इथे मुक्त प्रवेश आहे.



त्यातल्या काही रागदारीवर गीतांबद्दलची ही माहिती..

जुन्या जमान्यातले दिग्गज गायक रामकृष्णबुवा वझे यांच्याकडे 'मियाँ की मल्हार' हा राग लोकप्रिय करण्याचे श्रेय जाते. ज्या काळात तबकडय़ा नुकत्याच बाजारात येऊ लागल्या होत्या. त्या काळात वझेबुवांनी 'बोले रे पपीहरा' ही 'मियाँमल्हार' रागातली रचना ध्वनिमुद्रिकेच्या रूपाने प्रसृत केली. वझेबुवांच्या या ध्वनिमुद्रिकेत खटका, गमक आणि मीड हे रागदारी संगीतात अत्यावश्यक समजले गेलेले आवाजाचे लगाव आहेत आणि त्यातूनच 'मियाँमल्हार' रागाचं रूप अधिकाधिक खुलत जातं. ही रचना चित्रपटगीताच्या रूपाने जनप्रिय करण्याचं श्रेय मात्र वसंत देसाईंना द्यायला हवं. 'गुड्डी' या चित्रपटासाठी वाणी जयराम यांच्या आवाजात देसाईंनी ती स्वरबद्ध केली. नाही म्हटलं तरी वझेबुवांची रचना आणि तिची लोकप्रियता रागदारी संगीताच्या श्रोतृवर्गापर्यंतच मर्यादित होती. वसंत देसाईंमुळे 'बोले रे पपीहरा' ही बंदिश तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचली.
 वसंत देसाईंनी मराठी चित्रपटांना संगीत तर दिलंच पण ते तिथे अडकून राहिले नाहीत. सी. रामचंद्रानी ज्याप्रमाणे हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळात आपल्या वैशिष्टय़पूर्ण कर्तृत्वाच्या ठसा उमटविला, तसाच वसंत देसाईंनीही 'झनक झनक पायल बाजे', 'गूंज उठी शहनाई' किंवा 'दो आँखे बारह हाथ' आणि 'गुड्डी' यासारख्या चित्रपटांच्या घवघवीत यशात आपल्या सुरेल संगीताद्वारे मोठीच भर घातली.
'पंडितराज जगन्नाथ' या नाटकाला वसंत देसाईंनी संगीत दिलं त्यातून 'कलावती' हा कर्नाटक संगीतातला राग महाराष्ट्राला परिचित झाला. प्रसाद सावकारांच्या खडय़ा आवाजातील 'जय गंगे भागीरथी' हे पद वास्तविक 'कलावती' आणि 'बसंत' या दोन रागांच्या मिश्रणातून वसंतरावांनी निर्माण केले आहे. त्यातला अधिक लक्षात रहातो तो राग 'कलावती'. त्यानंतर हा राग महाराष्ट्राच्या मातीत रुळला आणि भावगीतांमधूनही तो प्रकट होऊ लागला. 'स्वयंवर झाले सीतेचे' या चित्रपटासाठी त्यांनी भीमसेन जोशींच्या आवाजात 'रम्य ही स्वर्गाहून लंका' हे गीत गाऊन घेतले होते. हे गाणे अत्यंत लोकप्रिय झाले आणि रागदारीचा गंधही नसणारा श्रोता ते आपुलकीने गुणगुणत असे. वास्तविक हे गाणे 'हिंडोल बहार' या रागावर आधारित आहे. 'हिंडोल' हा मुळात कठीण मानण्यात येणारा राग आहे. कारण त्यात फक्त चार स्वर लागतात. त्यात 'बहार' मिसळून हा राग जुन्या काळात उस्तादांनी बनवला. भीमसेन जोशी हे सिद्ध रागांचे बादशहा होते. त्यांच्या उमेदीच्या काळात तर ते सहसा 'मिश्र' अथवा 'अछोप' रागांच्या वाटेला जात नसत. पण वसंत दसाईंनी हे गाणं त्यांच्याकडून गाऊन घेतले आणि ते जनमानसात थेट जाऊन बसले.

'देव दीनाघरी धावला' या नाटकासाठी वसंत देसाईंनी कुमार गंधर्वाकडून 'उठी उठी गोपाळा' ही भूपाळी गाऊन घेतली.

'अमरभूपाळी' या मराठी चित्रपटातली 'घनश्याम सुंदरा' ही भूपाळी पंडितराव नगरकर आणि लता मंगेशकर यांनी गायली होती. सुमारे साठ वर्षांपूर्वी ध्वनिमुद्रित झालेली ही भूपाळी आजही तितक्याच भक्तिभावाने आणि चवीने ऐकली जाते. 'भूपाळी' म्हणजे 'घनश्याम सुंदरा' असे जणू समीकरणच बनले आहे. तरीही याच संगीत दिग्दर्शकाने रचलेल्या 'उठी उठी गोपाळा' या भूपाळीची लज्जत काही औरच म्हटली पाहिजे.

वसंत दसाईंनी भीमसेन जोशी आणि कुमार गंधर्वाप्रमाणेच अमीर खान या रागदारी संगीताच्या क्षेत्रातल्या महान कलाकाराच्या आवाजाचा उपयोग आपल्या संगीताची शान वाढविण्यासाठी केला. 'झनक झनक पायल बाजे'चे बहुचर्चित शीर्षक गीत अमीर खान खाँसाहेबांनी गायले आहे. मुळात हे गाणे अमीर खान खाँसाहेबांच्या मंद्र सप्तकात चनीत विहार करणार्या आवाजाला अनुरूप अशा 'दरबारी' रागात ध्वनिमुद्रित झाले होते. व्ही. शांताराम वगळता सर्वाना ते अतिशय पसंत पडले होते. पण शांतारामांचे मत लक्षात घेऊन वसंतरावांनी ते पुन्हा ध्वनिमुद्रित करायचे ठरविले. मात्र यावेळी 'दरबारी' मंद्रप्रधान रागाऐवजी 'अडाणा' हा उत्तरांगप्रधान राग निवडला आणि अमीर खान खाँसाहेबांनी जलद तानांची बरसात करून या गीताचे सोने केले.
'गूंज उठी शहनाई'मधून बिस्मिल्ला खान खाँसाहेबांची शहनाई अक्षरश घराघरात पोचली. त्यांचे वादन समारोहामधून होत असे तेव्हा सामान्य श्रोते 'गूंज उठी'ची फर्माईश करीत आणि खाँसाहेबही ती मान्य करीत असत.  मात्र या चित्रपटात खरी करामत केली ती रामलाल यांनी ती कशी ते प्रत्यक्ष कार्यक्रमात ऐकता येईल.

सतारनवाझ अब्दुल हलीम जाफर खान यांनीही 'झनक झनक' च्या पाश्र्वसंगीतातला संपन्न करण्यात मोठी भूमिका बजावली. या चित्रपटाने गर्दीचे सर्व उच्चांक मोडले होते. त्यामुळे सुवर्ण महोत्सवी खेळानिमित्ताने 'लिबर्टी' चित्रपटागृहात हलीम जाफर खान यांचे सतारवादन अहमदजान थिरकवाखाँसाहेबांच्या तबला संगतीसह आयोजित करण्यात आले होते असे जाणकार सांगतात. शिवकुमार शर्मा आणि सामताप्रसाद हे वादकही 'झनक'मुळे प्रथम चमकले. रागावर आधारित रचना आणि तीही समूहगानाच्या रूपाने साकार करणे हा वसंत देसाईंचा हातखंडा होता. 'केदार' रागातली 'हमको मन की शक्ती देना' ही रचना ('गुड्डी' :  वाणी जयराम आणि इतर) इतकी लोकप्रिय झाली की शाळाशाळांमधून प्रार्थना म्हणून ती गायली जाऊ लागली.

'दो आँखे बारह हाथ' मधले 'ऐ मालिक तेरे बंदे हम' या प्रार्थना गीताला 'मालकंस' रागाचा आधार आहे. या गीताने तर सीमेपलीकडच्या पाकिस्तानातही लोकप्रियता मिळविली. भारतातीलच नव्हे तर पाकिस्तानातील तुरुंगांमध्येही प्रार्थना गीत म्हणून गाणं गायले जाऊ लागले.

रागदारी संगीताला लोकाभिमुख करण्याबाबत वसंत देसाईंनी जे योगदान दिले आहे त्याची उचित गांभीर्याने दखल घ्यायला हवी.



संदर्भातील लेखनासाठी http://komalrishabh.blogspot.in/2013/07/blog-post.html चा आभारी आहे.




- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Monday, May 26, 2014

नवा अध्याय लिहला जातोय...



भारतीय लोकशाहीच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला जाणारा असा हा नवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने दिल्लीच्या तख्तावर विरजमान झाला आहे.
भारतासारख्या मोठ्या लोकशाही नांदत असलेल्या देशात विरोधात राहून सुमारे साठ वर्षांनंतर पहिल्यांदाच हिंदुत्वाची कास धरणारा..धर्म, संस्कृती आणि संस्कार यांना मानणारा पक्ष भारतीय जनता पक्षाच्या रुपाने सरकारात आला आहे,,हे फार मोठे महत्वाचे पाऊल देशातली जनता उचलत आहे.
गेली काही वर्ष घराणेशाहीचा शाप लागलेला राजकीय पक्ष देशावर आपली मालकी सांगत होता..आपल्याशिवाय देशाला तरणोपाय नाही असे दाखवित होता..पण भारताच्या विविध जातींच्या लोकांनी पहिल्यांदाचा त्यांचे हे आशावादी भविष्य साफ बदलून टाकले आणि गुजरातचे मुख्यमंत्री असलेले आणि विकासातून राज्याला आघाडीवर नेणारे नरेंद्र मोदी यांच्यावर पूर्ण विश्वास ठेऊन त्यांच्या भारतीय जनता पक्षाला पुर्ण बहुमत मतदानाच्या पेटितून दिले.

आता आज तुम्ही शेजारी निवडू शकत नाहीत  पण त्यांच्याशी सलोखा निर्माण करु शकता...हे कृत्तीतून दाखवून सार्क देशांच्या राष्ट्राध्यक्ष, पंतप्रदान यांना नरेंद्र मोदी सरकारने निमंत्रण दिले हिच मोठी घटना आहे.
सुमारे साडेचारहजार निमंत्रितांच्या समवेत मोदींचा शपथविधी पार पडणार आहे. कमीत कमी मंत्री आणि अधिकाधिक मंत्रालये एकत्र करण्याचा हा मानस घेऊन अवघे ४५ मंत्र्यांचा शपथविधी राष्ट्रपती भवनाच्या या सोहळ्यात ते पार पडला..

देशाचे १५ वे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी आज ऐतिहासिक राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात शाही सोहळ्यात शपथ घेतली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. 
 'टीम मोदी'मधील २३ कॅबिनेट, १० राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) आणि १२ राज्यमंत्र्यांनीही शपथ घेतली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी – कर्मचारी, सार्वजनिक तक्रारी आणि पेंशन, अणु ऊर्जा विभाग, अंतराळ विभाग, इतर महत्त्वाची धोरणे आणि प्रकरणे तसेच वाटप न झालेल्या खात्यांचा प्रभार
केंद्रीय मंत्री 
1.     राजनाथ सिंग – गृह व्यवहार
2.     सुषमा स्वराज – विदेशी व्यवहार, परदेशस्थ भारतीय व्यवहार
3.     अरुण जेटली – वित्त, कॉर्पोरेट अफेअर, संरक्षण
4.     एम. व्यंकय्या नायडू – शहरी विकास, गृह आणि शहरी दारिद्रय निर्मूलन, संसदीय व्यवहार
5.     नितीन गडकरी – रस्ते दळणवळण आणि महामार्ग, नौकावहन
6.     सदानंद गौडा – रेल्वे
7.     उमा भारती – जलस्रोत, नदी विकास आणि गंगा पुनर्जिवीकरण
8.     नजमा हेपतूल्ला – अल्पसंख्यक व्यवहार
9.     गोपीनाथ मुंडे – ग्रामीण विकास, पंचायत राज, पेयजल आणि सॅनिटेशन
10. रामविलास पासवान – ग्राहक व्यवहार, खाद्य आणि सार्वजनिक वितरण
11. कालराज मिश्र – सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम
12. मनेका गांधी – महिला आणि बालविकास
13. अनंत कुमार – रसायन आणि खते
14. रवी शंकर प्रसाद – संदेशवहन आणि माहिती तंत्रज्ञान, कायदा आणि न्याय.
15. अशोक गजापती राजू पुसापती – नागरी उड्डाण
16. अनंत गीते – जड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम
17. श्रीमती हरसिम्रत कौर –खाद्य प्रक्रिया उद्योग
18. नरेंद्र सिंग तोमर – खाण, पोलाद, कामगार आणि रोजगार
19. ज्यूएल ओरम – आदिवासी कल्याण
20. राधा मोहन सिंग – कृषी
21. थावरचंद गहलोत – सामाजिक न्याय आणि प्रोत्साहन
22. स्मृती झुबीन इराणी – मानव संसाधन विकास
23. डॉ. हर्ष वर्धन – आरोग्य आणि कुटुंब कल्याण
केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)
1.     जनरल व्ही. के. सिंग – उत्तर-पूर्व भागाचा विकास, विदेशी व्यवहार, परदेशस्थ भारतीय व्यवहार
2.     राव इंद्रजित सिंग – योजना, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी, संरक्षण
3.     संतोष गंगवार-वस्त्रोद्योग, संसदीय व्यवहार, जलस्रोत, नद्या विकास आणि गंगा पुनर्जिवीकरण
4.     श्रीपाद नाईक –सांस्कृतिक, पर्यटन
5.     धर्मेंद्र प्रधान – पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू
6.     सर्बानंद सोनोवाल – कौशल्य विकास, उपक्रमशीलता, युवक कल्याण आणि क्रीडा
7.     प्रकाश जावडेकर – माहिती आणि प्रसारण, पर्यावरण, वन आणि वातावरण बदल तसेच संसदीय व्यवहार
8.     पीयूष गोयल – ऊर्जा, कोळसा, नवीन आणि नवीनतम ऊर्जा
9.     डॉ. जितेंद्र सिंग – विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान, पंतप्रधान कार्यालय, कर्मचारी, सार्वजनिक तक्रार आणि पेंशन, अणु ऊर्जा विभाग, अंतराळ 
10. निर्मला सितारामन् – वाणिज्य उद्योग, वित्त, कॉर्पोरेट अफेअर
राज्यमंत्री
1.     जी. एम. सिध्देश्वरा – नागरी उड्डाण
2.     मनोज सिन्हा – रेल्वे
3.     निहाल चंद – रसायने आणि खते
4.     उपेंद्र कुशवहा – ग्रामीण विकास, पंचायती राज, पेयजल, सॅनिटेशन
5.     राधाकृष्णन पी. – जड उद्योग आणि सार्वजनिक उद्योग
6.     किरेन रिजीजू – गृह व्यवहार
7.     कृष्णन पाल – रस्ते वाहतूक, महामार्ग, नौकावहन
8.     डॉ. संजीव बालियन – कृषी आणि खाद्य प्रक्रिया उद्योग
9.     मनसुखभाई वसावा – आदिवासी कल्याण
10. रावसाहेब दानवे – ग्राहक व्यवहार, खाद्य आणि सार्वजनिक वितरण
11. विष्णू देव साई – खाण, पोलाद, कामगार आणि रोजगार
12. सुदर्शन भगत – सामाजिक न्याय आणि सबलीकरण


जनतेच्या आकांक्षा आणि अपेक्षांची पूर्ती हे मोदी सरकार करेल यावर विश्वास ठेऊया.
आपण सारे जागरुक नागरिक या दिवशी मोदींच्या मागे उभे राहून त्यांच्या कार्य़ाला शुभशकूनाचा टिळा लावू या...वंदे मातरम्...
जय हिंद..



सुभाष इनामदार ,पुणे

9552596276

Tuesday, May 20, 2014

तेवढेच हळवे व्यक्तिमत्व - नरेंद्र मोदी

एका प्रखर देशभक्तिने भारलेल्या आणि देशातल्या जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्याची इच्छा शक्ति असलेल्या..प्रसंगी तेवढ्याच हळव्या व्यक्तिमत्वाचा परिचय देशाचे नवे पंतप्रधान भाजपाचे नरेंद्र मोदी यांच्या व्दारे जनतेला मिळाले आहेत.
आज संसदीय पक्षाच्या बोठकीत नेता निवडीच्या वेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी नरेंद्रभाई मोदी यांनी आमच्यावर कृपा करावी असे वक्तव्य केले..
त्यावरून मोदी एका क्षमी अतीशय भाऊक झाले..डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या..
भाजप देखील माझी आईच आहे, मुलगा आईवर कृपा करू शकत नाही तो केवळ सेवा करू शकतो. कृपा तर पक्षाने केली आहे की त्यांनी मला देशसेवा आणि पक्षाची सेवा करण्याची संधी दिली आहे.
देशासाठी मरता आले नाही..पण देशासाठी जीवन देण्याचे वचन त्यांनी दिले..


एक कणखऱ आणि कोमल व्यक्तमत्वाचे दर्शन तर घडलेच पण त्याबरोबरच इतरांच्या मनात सकारात्मक भूमिकेचे बीज आकाराला आणणारे एक जबरदस्त व्यक्तिमत्व देशाने आज पाहिले..
त्यांचा निर्धार तगडा..त्यांचे विचार तेजस्वी..आणि देशातील जनतेचा विश्वासही त्यांच्यावरचा गाढा...त्यांच्या खांद्यावर जबाबदारीचे ओझे असले तरी आपल्या सा-या सहकारी..मग ते पक्षातले असो वा घटक पक्षातले..यातून देशाला पुढे नेण्याचे स्वप्न पाहणारे आणि ते पुढे नेणारे देशाला लाभलेले उत्तम नेतृत्व आहे यात तिळमात्रही शंका वाटत नाही..
वंदे मातरम..



-सुभाष इनामदार,पुणे

Wednesday, May 14, 2014

कन्याकुमारीच्या स्मृती कोरल्या गेल्या..



पुणे ते कन्याकुमारी या ४१ तासाच्या प्रवासाला सुरवात झाली आणि मन पुन्हा एकदा वीस वर्षांने मागे गेले. त्यावेळी मुलगा साडेचार वर्षांचा होता...पण ते दिवस थंडीचे होते. आता मात्र उन्हाळ्याच्या दिवसात मुलीच्या इच्छेनुसार रेल्वेतून प्रवास सुरु झाला.. यावेळी गाडीत तुमचा सबपर्वासी कसा असेल..जागा व्यवस्थित असेल नाही..अनेक प्रश्न आधी मनात येतात...पण गाडी सुरु झाली..
आणि केरळाचे मुळचे..पण सध्या  मुंबईंच्या मालाडला गेली चाळीस वर्षं वास्तव्य असलेले वेणुगापाल आपल्या पत्नीसह केरळात लग्नासाठी निघाल्याचे संवादातून उमगले आणि मग काय...मरीठी, हिंदी आणि प्रसंगी इंग्रजीच्या सहाय्याने कन्य़ाकुमारीचा प्रवास सुखावह होणार याची जाणीव झाली आणि मुलीचा आणि पत्नीचा उत्साह वाढला.
रेल्वेच्या प्रवासात रेल्वेतले काही खाऊ नका...असा सल्ला ऐकल्याने घरुन निघताना घेतलेल्या विविध खाण्याच्या पदार्थांचा यथेच्छ पण पोटाला त्रास होणार नाही असा आस्वाद घेत..
गाडी धावत होती..आमची खाऊगिरी सुरु होती..सोबत केरळवासिय मुंबईंच्या रेल्वेत नोकरी करणा-या सौ. सुषमा यांनी आणलेल्या इडली चटणीचा नमुना घेता घेता...सुसंवादातून त्यांना मराठी चांगले येते हे ही उमजल्याने आनंदाचे वेगळे दालनच उगडले गेले.

खरचं कुणाच्या चेह-यावरुन जाऊ नये...त्यांच्याशी बोलताना सारे उलगडत जाते..तसेच काहीसे या प्रवासाच्या सुरवातीला वाटले.
वेगाने धावणारी रेल्वे..मधुनच एखादे ठिकाणी उगीचच लुडबुडणा-या मुलासारखी थांबत होती..आपल्याला हे सारे नवे..पण त्या चालकाला हे सारे नित्याचेच..नाही काय...आपण तरी काय करु शकतो..चिडण्याशिवाय..मग होतो मनस्ताप...पण तरीही गाडी धावत असते..आपले मुक्कामाचे थांबे घेत..आणि थांबे तरी किती  पुणे ते कन्याकुमारीच्या प्रवासात अवघे ५६ ..होय..

ही गाडी  जयंती एक्प्रेस  इवढ्या ठिकाणी थांबून आपला शेवटाचा थांबा घेणार..किती कंटाळवाणा..पण तरीही वाटेत येणारे उतरणारे प्रवासी..त्यांची भाषा..मुलांची गंमत..फेरीवाले.पाणीवाले..आणि नाष्टा देणारे..सा-यांच्या नादात गाडी धावत असते..आपण मात्र एका जागी खिळल्याजागी बसून असतो..
आता हे पहा ना..हे भट..ठाण्याचे सेवाव्रती म्हणून आपली सहा महिन्याची सेवा करण्यासाठी विवेकानंद केंद्राच्या कन्याकुमारीच्या पसा-यात आपला सहभाग सेवेतून देण्यासाठी निघाले आहेत..गाडीत..सकाळी आसन करुन थोडी ध्यान धारणाही ते करताहेत..
यांनी वयाच्या ७० व्या वर्षी आपला सारा व्यवसाय सोडून कन्याकुमारीच्या या केंद्रात सेवाव्रती बनून काम करायचा निश्चय केला..ते तिकडेच चाललेत  जिक़ेडे आम्ही निघालो होतो...


एक तरी सहप्रवाशी शेवटपर्यंत आमच्या सोबत असणार आहे..आणि खरचं अगदी केंद्रातही एकाच गाडीत शेअर करुन निघालो.. सहप्रवासाचा आनंद घेतला.
आंध्र, कर्नाटक,तामिळनाडू आणि केरळ हे महाराष्ट्रासह सारे प्रांत ओलांडून भाषेचे रंग मिसळत ही गाडी धावतअसते..मात्र जेव्हा केरळ येतो..
तेव्हा मात्र बाजुच्या वातावणातले बदल 

अगदी उन्हाळा असुनही मनात भरत रहातात..    
इथली ही गर्दी नसलेली पण अगदी लवकर येणारी स्थानक अनुभवली की मनात वाटते...किती छान...आपल्याकडे हे सारे का नाही..



अशी विविध रुपे पहात..विविध धर्माचे लोक..त्यांची धार्मिक स्थळे पहातच सारा प्रवास खिडकिच्या त्या काचेतून अनुभवत गाडीचा वेग..सुरुच असतो..

वाटेत कित्येक प्रकाशचित्रे टिपली  तेही मोबाईलमधूनच..अगदी उन्हाळ्यात आपण चाललो आहोत..हे एकतर जाणवले नाही ते वातानुकूलीत डब्यामुळे आणि भोवतालच्या हिरवाईन नटलेल्या निसर्गामुळे..



अखेरीस शिणलेल्या शरीराला दिलास मिळतो..त्रिवेंद्रम गेल्यानंतर आता कन्याकुमारीत काही तासात पोहोचणार याचा..केवळ तिन प्लॅटफॉर्म असलेल्य़ा स्थानकात तसे काही वेगळे नाही..ही सारी बाहेरची भव्यता आहे..


जेव्हा बाहेर येतो..तेव्हा हे कन्याकुमारी स्थानकाचे दृष्य मनात भरते..जाणिव होते की वेगळ्या अशा भव्यतेच्या मंदीराच्या साक्षीदाराच्या रुपाचे दर्शन इथे होणार..

बरोबर असलेल्या प्रकाशजींच्या अनुभवी रुपाने हक्काचा हा माणूस आणि खास शिबीरासाठी आलेला औरंगाबादचा प्रा. हसे..

आम्ही सारेच विवेकानंदपुरमच्या त्या १०० एकरावर उभारलेल्या परिसरात दाखल होतो..आणि हेच ते च्यासाठी गेले काही दिवस सतत हाच विषय मनात घोळवित..स्वप्ने पहात होतो..तेच हे ठिकाण.


मातृमंदिरातल्या खोलीत आमची सोय झाली..आता आम्ही सहा दिवस कन्याकुमारीच्या या केंद्रातल्या याच ठिकाणी रहाणार..मग विश्रांती घेऊन..पुन्हा एकदा तिच स्मृती मनात वावरत फिरायला बाहेर पडलो.


आता नव्याने काही वर्षापूर्वी उभारलेली ही ज्यांनी विवेकानंद स्मारक उभे केले त्या एकनाथजी रानडे यांच्या समाधीचे हे चित्र..मागे विवेकानंदाचा पूर्णाकृती पुतळा..आणि मागे समुद्राचा विस्तिर्ण अवतार
परिसरात फिरताना जागोजागी मोर दिसतात..मनसोक्त फिरताना..तुम्हीही त्यांना सहजी पाहू शकतो..कुठलाही पिंजरा नाही..आडकाठी नाही..

त्यांना दाणा-पाणी मिळावे यासाठी एक जीवनव्रती संन्यासी व्यक्ति त्यांच्यासाठी ही सारी कामे करतात..अगदी आनंदाने..मोरही इतके तयार झाले आहेत की ,


त्यांनी अन्न दिल्यानंतर एखाद्याला मिळाले नाही तर तो त्यांच्या मागे धावतो..तेही त्यांच्या त्या झोळीवजा पिशवीतून ज्वारी-तांदूळ टाकतात... आपण या परिसरात कुठेही असा मोरांचे आवाज तुमच्यापर्य़त सहजपणे पडतात..ते धावत असतात..इथे ११० मोर आहे. या प्रचंड अशा परिसरावर ..या निसर्गरम्य वातावरणातला तेही एक मगत्वाचा हिस्सा बनले आहेत.




इथे एका वेळी १००० लोक वास्तव्य करु शकतील अशी सोय आहे..त्यासाठी केंद्राचे काम वेगळे आणि यासाठी व्यावसायिक सारखे काम करणारे कार्यालय वेगळे..त्यांचेसाठी स्वतंत्र जेवणाची सोय़ उपलब्ध आहे...


दिवसा तर प्रवासी येतातच  पण केव्हाही रात्री इथे गाड्या घेऊन पर्यटक येत असाता..त्यांचेसाठी चाविस तास सेवा देण्याची सोय आहे.




कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्रात अनेक लोक स्वेच्छेने काम करतात..काही कायमचे तिथल्या कामात आपले योगदान देतात..तर काही काही महिने...तुम्हीही तुमचा वेळ देऊन विवेकानंद यांच्या कार्याचा मंत्र पोहचविण्याचे काम करतात..





जीवनव्रती, सेवाव्रती....अशा काही कामाचे स्वरुप असते..सेवा भाव..हवा..मनात स्नेहभाव..
यातले पहिले आहेत ते मामाजी म्हणून तिथे ओळखले जातात..
त्यांच्या सोबत आहेत..ते प्रकाशजी भट..ते मुंबईतले..सारा व्यवसाय सोडून वयाच्या ७३ व्या वर्षी ते सेवा करण्यासाठी सहा महिने , तिन महिने तिथल्या कामाची जबाबदारी सांभाळतात.
दुसरे आहेत...देशात पसरलेल्या सुमारे २०० केंद्रांचे हिशेब पहाणारे नाशिकचे नंदन कुलकर्णी..ते २००८ पासून इथे जीवनव्रती बनून कारभार पाहतात..

जीवनव्रती, सेवाव्रती....अशा काही कामाचे स्वरुप असते..सेवा भाव..हवा..मनात स्नेहभाव..
यातले पहिले आहेत ते मामाजी म्हणून तिथे ओळखले जातात

कोवल्लमचे...ते गंगोत्री या एकनाथजी रानडे यांच्या प्रदर्शनाचा कार्यभार सांभाळतात..
सेवा..त्याग आणि समर्पण..हेच आयुष्याचे धेय्य् बनून रहाणारे अनेक जण आहेत.

दोन दिवस पावसाचे वातावरण..मधुनच असा कताही धो धो पाऊस कोसळायचा की विचारु नका..मग सारे शांत व्हायचे.. पण त्याआधी मोरांचे ओऱडणे एकू यायचे..हवेत उकाडा तीव्र वाढायचा आमि अचानक ढग काळे होऊन पावसाचे थैमान सुरु व्हायचे..उन्हाळ्यातली धग आणि उकाडा सारेच एकदम भासू लागले..


तशातही तिथल्या कन्याकुमारी मंदीराच्या परिसरातल्य़ा प्रदर्शनाला भेट दिली..स्वामी विवेकानंदांनी भारतभ्रमण करताना कुठे भेट दिली याचा इतिहासतच इथे दाखविला 
आहे..अगदी सचित्र.
परिसरातल्या ठराविक इमारती साध्या आमि सहजपणे सर्वांच्या खिशाला परवडणा-या आहेत मात्र पंचमहाभूतांचे नावे टाकून 

बांधलेल्या मोठ्या बंगलीत वातानुकुलित सेवा देऊन..त्यांचे भाडेही जादा आहे..
मात्र तो परिसरही तेवढाच सुशोभित केला आहे..


त्याभोवतालीचे वातावरणही तसेच सुरेख तयार केले आहे..जल, वायू, आकाश,पृथ्वी...अशी त्यांची नावे आहेत.



खरेच सारा परिसरही भुरळ घालणारा आहे..याचे सारे बुकींग अॉनलाईन होते..अगदी मेलवर देखील..स्वामी विवेकांनंदांच्या नावाने उभारलेल्या परिसरात राहून कन्याकुमारी मातेचे दर्शन घ्यायलाच हवे..तसा तिथला शंख, नारळ आणि शिंपल्यापासून तयार केलेल्या वस्तुचा बाजार सर्वांनाच मोह घालतो.
पावसाच्या वातावरणात असून समुद्राच्या एका दग़डावर उभारलेल्या भव्य स्मारकावर पोहोचतानाही पावसाची धास्ती वाटत होती..पण केंद्रातून सतत तिकडे जाणारी विनामूल्य फिरती सेवा..असल्याने आता स्मारकाचे ते दिव्यत्व पहायला सारेच आतूर झालो होतो..त्याचा हा प्रकाशचित्रमय आविष्कार..

ओंकाराच्या समोर बसून ध्यान करण्यात जो आनंद मनाला मिळतो तो काही सागंता येत नाही. स्वामि विवेकानंदानी केलेल्या त्या महान कार्याची आठवण झाल्याशिवाय नक्कीच रहात नाही.


 एक दिवस मोकळा वेळ मिळाला तेवढ्यात त्रिवेंद्रमला जाऊन आलो..तिथे पदमनाभ मंदिरातल्या देवाचे दर्शन घेतले..तिथेही पावसाने आमचा पिच्छा सोडला नाही..वस मोकळा वेळ मिळाला तेवढ्यात त्रिवेंद्रमला जाऊन आलो..तिथे पदमनाभ मंदिरातल्या देवाचे दर्शन घेतले..तिथेही पावसाने आमचा पिच्छा सोडला नाही..

तेवढ्या वेळात कोवल्लम बीचवर गेलो..निळ्या शांत सागरातल्या लाटांच्या सहवासात काही काळ निसर्गाचा अनुभव घेतला पावसाने मधुमच आम्हीला भिजविले..पण त्याची पर्वा न करता..त्रिंवेद्रमच्या त्या वातानुकूलित सिटीमध्ये बसून बीचवरुन मंदिराजवळच्या मध्यवर्ती परिसरात येऊन पोहोचलो..तिथून रेल्वेने  पुन्हा कन्याकुमारीत मुक्कामाला हजर.







याच वातावरणात मुलीने सांगितले मी काही मंदीर पहाण्यासाठी आले नाही...तुम्हाला जायचे तर जा..म्हणून आम्ही उभयता चक्क तामिळनाडू सरकारच्या बसने सुचिंद्रमला गेलो..
मारुतीची मूर्ती..आणि ते भव्य मंदिर पाहिले..


त्याच दिवशी तिथे रथाचे आयोजन केले होते..ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांच्या मूर्तींच्या प्रतिमा त्यात ठेऊन..गावातून मिरविणार होते..तेही दृष्य पाहाण्यासारखे होते.













पुढे नागरकोविल शहरातल्या नागराज मंदिरात गेलो..तिथे सारीकडे नागांची प्रतिके..


मंदिर पुरातन आणि त्यागावाचे नाव सार्थ करणारे आहे..तिथे बाहेरच एका मोठ्या चबुत-यावर नागांच्या प्रतिमांचे दगडांचे कोरीव काम दिसते..

सारीकडे भक्तांचा उल्हास प्रत्येक क्षणि भासत होता..

त्यातच पावसाने जबरदस्त हजेरी लावली..
मंदिराच्या बाहेरच्या पडवीत बसून कोसळणारा तो पाऊस पाहताना वेगळाच आनंद मनातून ओसंडत होता.   
उद्या उभारल्या जाणा-या स्वतंत्रतेदेवतेच्या आणि २७ फूटी ग्रनाईटच्या हनुमान मंदिराचे आणि त्यात तयार होणा-या रामायणातल्या प्रसंगाचे दर्शन घडविणारे काम सुरू आहे..
                                                                                                  
पुन्हा पुण्याकडे परत निघायचे याची जाणीव आता झाली पुन्हा तो ४१ तासांचा प्रवास पुन्हा कन्याकुमारीचे दर्शन होणार नाही..पुन्हा तो परिसर..केव्हा येणार..एकदा नजरेत साठवून घेतला ..
                                     










या रंगमंचावर पुन्हा कधी येणार ठाऊक नाही..पण आता वेळ झाली आहे..इथून पुन्हा आपल्या कामाकडे जायची..कन्याकुमारीच्या या प्रवासात अनेक अनुभव गाठीशी आले.नवी नाती जोडली गेली..नवे बंध मिळाले.मन थोडे हलके झाले..


पुन्हा पुन्हा जाता घरापासूनी दूर
मग लागे मजला पुन्हा परतण्याची हूरहूर
पाहिले कुणाला ..किती वेळा..किती वेगळे
सारे अनुभवले ..तरी रिती झाली झोळी..
ओंजळीत माझ्या..आता उरले नाही फार

जे आहे ते तिधले..वाटले अपरंपार...




-सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276



( यातली सारी प्रकाशचित्रे सुभाष इनामदार आणि सुरभि इनामदार यांनी काढली आहेत..ती परवानगीशिवाय वापरू नयेत)

-