""संगीत नाटकांची परंपरा कायम राखण्यासाठी नव्या पिढीची आवड लक्षात घेऊन ही नाटके नव्या स्वरुपात सादर करावीत,'' अशी सूचना प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी पुणे मराठी ग्रंथालयातर्फे देण्यात येणारा (कै.) कृष्णराव गोखले पुरस्कार ज्येष्ठ गायक आणि अभिनेते अरविंद पिळगावकर यांना प्रदान करताना केली. याच कार्यक्रमात अभय जबडे, विश्वास पांगारकर, श्याम शिंदे आणि नेहा बेडेकर या रंगभूमीशी संबंधित असलेल्या व्यक्तींना (कै.) नरहरबुवा पाटणकर आणि हरी गणेश फडके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
No comments:
Post a Comment