"गो नी दांडेकर यांच्या नावाचा पुरस्कार मी घेतोय. एक अत्यंत मराठी साहित्यातला महत्वाचा मानदंड म्हणावा अशी व्यक्ति. यापलिकडे एक व्यक्तिगत अनुबंध या दोनही अंगाने या पुरस्काराची मला अपूर्वाई नक्कीच आहे, असे मृण्ययी पुरस्कार जाहिर झाल्यानंतर कवी, गीतकार, संगीतकार आणि याशिवाय नव्याने ओळख व्हावी असे चित्रकार सुधीर मोघे यांनी आपल्या भावना ई-सकाळसाठी विशेष मुलाखतीत त्यांनी व्यक्त केली. गेली दोन-अडीच दशके कलेच्या प्रांतात आपले नाव झळकविणाऱ्या या कलावंतांची ई-सकाळच्या सुभाष इनामदारांनी मुलाखत घेतली . गेली दोन तीन वर्षे हा मनस्वी कलावंत चित्रकाराच्या रूपात स्वतःला व्यक्त करतोय. या आपल्या रूपाची ओळख बाहेर फारशी आलेली नाही असे सांगत याप्रवासाची सुरवात मोघे स्वतःच सांगताना म्हणतात," लहानपणापासून आपल्याला इतर कलांबरोबर चित्रकलेची गोडी होती. काव्य, संगीत, गीते, मीडीयातली वेंगवेगळी आव्हाने स्वीकारत होतो. पण कांही दिवसात त्यातही साचेबध्दपणा आल्यासारखे जाणवत होते. माझ्या कवीतेत , शापीत मधल्या "दिस येतील, दिस जातील' अशा गीतातही चित्रालाच आपण शब्दात साठवत होतो. दोन वर्षोपूर्वी ठरवले. मनाशी नक्की केले. चित्रे रेखाटायची. गेलो बाजारात. चित्राचा बोर्ड, कागद आणि रंगांचे साहित्य आणले आणि माझ्यातल्या चित्रकाराच्या रूपाचा मलाच साक्षात्कार झाला.' आपल्या कलाप्रवासाचा पटच त्यांनी या मुलाखती दरम्यान उलघडून दाखविला. "जे जे अत्तापर्यंत मी करायची धडपड केली ता कुठलीही माझा अधिकार नसताना केली नाही. मला नेहमी नवे अंगण नवे आकाश शोधायल्या शिवाय बरे वाटत नाही.' चित्राच्या प्रातांत चाललेल्या धडपडीची पार्श्वभूमीच ते यातून व्यक्त करत होते. सुधीर मोघे या व्यक्तिमत्वाची ओळख मराठी माणसाला पुन्हा एकदा व्हावी. आणि त्यांच्या काही कवीता ऐकण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे. त्यासाठी त्यांना सोमवार ७ जुलैपासून कांही दिवस www.esakal.com या साईटवर यावे लागेल.
No comments:
Post a Comment