"तालवाद्य कचेरी' अर्थात विविध तालवाद्यांची ओळख करून देणाऱ्या वेगळ्या सीडीचे प्रकाशन
सोंमवारी टिळक स्मारक मंदिरात करण्यात आले.
कार्यक्रमाचे नाव दिले ते नादरंग- सीडीचे प्रकाशन
तबलानवाज पं. सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यावेळी टाळ, घंगरू, शंख, चकवा, मोठ्या झांजा, खंजिरी, डफ, चिपळ्या,
एकतारी, दिमडी, बगलबच्चा, डौर, चोंडकं, बंगाली एकतारी, पखावाज,
तबला, ढोलकी, ढोलक, मटका, चंडा, ढोल, हलगी, कबाश, बंगाली खोळ
अशी नानाविध वाद्यांचा खेळ करून रसिकांची मने जिंकली
ती या कार्यक्रमाचे प्रेरक आणि सादरकर्ते डॉ. राजेंद्र दुरकर यांनी.
त्यांना विविध तालवाद्यांची साथ केली ती पद्माकर गुजर,केदार मोरे,नितिन शिंदे,
गोविंद भिलारे आमि रांजेंद्र साळुंके यांनी.
दोन्ही कार्यक्रमाचे एकत्रित निवेदन केले ते दयानंद घोटकर यांनी.
कॅमेरा व स्टोरी - सुभाष इनामदार
No comments:
Post a Comment