का कळेना कळीला
पाकळीच्या वेदना
आधी बिलगलेली देठावरी
मग दूर जाई कुठवरी....
सा-याच का भावना
शब्दातून प्रकटतात
जेव्हा डोळे बोलू लागतात
ते शब्द कुठे बरे लपतात...
तोड़ायला धाग्याला
क्षणही पुरेसा असतो
गुंफायला एक धागा
ऊभा जन्मही लागतो..
एका हातातून जाते
फूल सहजी पलिकडे
भावना का सहजी
बिलगुनी उमलती.....
सुभाष इनामदार, पुणे
No comments:
Post a Comment