काही सवयी स्वतःहून शिरतात
तसेच काहीसे...
रोज नवे विषय
नवा संवाद...
आडवळणाने होत होता..
खरं सांगू आता ती सवय झाली होती..

काही दिवस दूर जाऊन
सवयीचा भाग आता अघिक आठवणीत येतो.
हूरहूर लागते..
भिजलेल्या थेंबातून पाणी अलगद पडावे
तसे शब्द होते.
आता सवयीचा तो शब्द
दूर गेलाय..
हळूवार वाटेने
तो परत येणार
हे नक्की...
पण आता ती सवय झालीय
रुखरुख तर त्याचीच आहे..
.
सुभाष इनामदार ,पुणे
No comments:
Post a Comment