अस्तित्व किती मोलाचे
असण्याचे आणि नसण्यातला फरक
किती सहज ते संपते
उरतात नुसत्या आठवणी.
आज आपण आहोत..शरीराने
उद्या असलो तर राहणार नुसत्या आठवणीत
जन्म-जन्माचे नाते वगैरे..
सारे आहे मान्य
कमाई तुमची केवढी
तुमच्या सोबत आहेत सारेच
धुंदी अस्तित्वाची
धुंद त्या क्षणांची
अवतिच एखाद्या क्षणी
सारे मिटवून टाकण्याची
आपला असा कोणी नसतो..
जो तो स्वतः असतो
अस्तित्वाच्या नावाखाली
शरीराच्या पोतडीत भरलेला आसतो...
-सुभाष इनामदार, पुणे
9552596276
subhashinamdar@gmail.com
No comments:
Post a Comment