Wednesday, February 6, 2013

हास्य प्राजक्त..

खळाळणा-या प्रवाहातले पाणी जसे स्वच्छ
किमया तैसी असे
ओठातून फुटणारे हास्याचे फवारेही तेवढेच स्वच्छ



चिंता, काळजी दडपून ..ताण-तणावाला दूर भेदून
हास्य फुलविणारे मळे फुलवीत ..इतरांना प्रसन्न राखतात

नकळत वातावरणात निनाद तेवढे उमटतात..
बांध फुटतो..मन बोलू लागते..
एका विश्वासाच्या क्षणी मोकळी होते भावना..

ओथंबलेल्या शब्दातून अलगदपणे बिलगून
छेद घेतात, आपलेच मन समजून

अंतःकरण बोलून जाते ..विसातात शब्द
भारावलेल्या अवस्थेची मशाल
झुलू लागते, बोलू लागते खुशाल..

भानावर येते मन ...जडपणा दूर होतो
फुललेल्या पाकळीतही ...प्राजक्ताचा सडा पडतो

दारावर बेल वाजते ...मन ताळ्यावर येते
चेह-यावर हसू आणि स्वागता समोर होते...




सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

No comments: