Wednesday, February 6, 2013

उसंत...

सोड देवा सोड आता थोडी हवी उसंत
तुझ्या माझ्या सहनतेला थोडी कीहो खंत..

रटाळ हे जिणे जिवनात जगणे
सारे ते सुरच आहे ..
मोह-मायेचा लेप लावत दिवस कंठीत आहे

कधी उभारी, कधी किनारी 
थांबवतानाही नजर माघारी
सहन होत नाही..आता थांबायलाच हवे
वाटली काही खंत तरी गाणे गुणगुणायलाच  हवे..

थांब जरा; निवांतपणा तुझ्यातच नाही
म्हटले जरी गाणे तरी सूर उमटतच नाही

करु किती विवंचना दाटे दुःख भारी
उभा तिष्ठत पाहतो मी तुमचाच श्रीहरी

खंत काही थांबत नाही
रेंगाळायला होत नाही
जगण्यात सहनशक्ती वाढतच आहे
खंत नाही पण उसंत आता तरी घेत आहे..




- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276



No comments: