Saturday, October 8, 2016

कारकालाचा गोमटेश्वर Karkala Bahubali



 भाग तिसरा....
कारकालाचा ४२ फूट वाहुबली..एका दगडात कोरलेली भव्य मूर्ती


मुडबीद्रीपासून पासून ३० कि.मी. अंतरावरच्या कारकाला डोंगरावरची बाहुवलीची ४२ फूट उंच एका दगडात कोरलेली भव्य मूर्ती पाहण्यासाठी निघालो..


चढत्या मार्गाने डोंगराकडे जाणारा निमूळता रस्ता गाडी आम्हाला घाटातून वर घेऊन जात होती.आधीच हिरवाई त्यातच पावसाने सर्वत्र तयार केलेली सुंदर हिरवळ..रस्त्याच्या दोन्ही बादुला केवळ झाडी..एका बाजुला पहावे तर खाली वसलेले सुंदर गाव दिसत होते.
वर जाऊन पोहोचलो तर खरोखरच..तिथला परिसर आणि तिथले पावसाचे ओझरते दर्शनच आमचे स्वागत करीत होते.. 

पोहोचल्यावर सगळ्यांनीच डोंगरावरून दिसणारे ते नयनसनोहारी दृष्य टिपून घेतले लांबूनच दिसणारी ती गोमटेश्वराची भव्य मूर्ती आमच्यासमोर मोठी होत होत आता आमच्या समवेत भव्य होत जात होती..
भव्य अशा सुंदर साकारलेल्या पटांगणातून जातानाही तिथल्या शांततेत काय ती आमची बोलाचाल त्या निरव शांततेला तडा देत होती.

समोरच्या त्या भव्य पताकाने आमचे मन प्रसन्न आणि भारावून  सोडले. 
 




आत जातानाही  तिथल्या मंदिरातली तिर्थकारांची भव्य प्रतिमा आणि त्यासमोर उभारला गेलेला भव्य ध्वज-पताका वातावरणात भारून राहिला होता.





 तिथल्या उंचावरच्या मंदिराभोवतालच्या वातावरणातून शांततेचा संदेशच  सा-यांना देत  होता..
कारकला येथील डोंगरावर स्थापित केलेली बाहुबली श्री गोमटेश्वराची ४२ फुट उंचीची अखंड दगडात कोरलेली मूर्ती हि दुसऱ्या क्रमांकाची उंच मूर्ती आहे. राजा वीरवर्माने आपले गुरु कारकाला जैन मठाधिपती ललितकीर्ती यांचे आज्ञेवरून ह्या अतिभव्य आणि शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असणाऱ्या मूर्तीची  १३ फेब्रु.१४३२ रोजी प्रतिष्टापणा केल्याचा संदर्भ आढळतो. या मुर्तीपुढील ब्रह्मदेव स्तंभ आणि त्यावरील यक्षगणाची कोरीव मूर्ती आवर्जून पाहण्यासारखी आहे.

 आम्ही सारे तिथला इतिहास जाणून घेण्यास तप्तर होतो..म्हणूनच की काय तिथल्या त्या मंदिराच्या आचार्याने अगदी आपुलकीने सारे वर्णन आपल्या शब्दातून करविले.


मंदिराच्या भोवतीने एकेका कोप-यात असलेल्या त्या भव्यतेचे दृष्य टिपण्यासाठी डोळे आणि मोबाईल सरसावले गेले..असा ठिकाणावर आपले सारे शरीर तिथलेच एक होऊन त्या परिसराचा आनंद साठविण्यासाठी सज्ज झालेले असते.

 आम्ही आलो ते थेट वरच्या गाडीच्या रस्त्याने..पण डोंगराच्या एका बाजुला या गावातून वर येण्यासाठी पाय-यांची उत्तम सोय आहे..अर्थात तिथे आम्हाला दिसली ती पाय-ायंवर चढून चरायला येणारी गुरे..पण त्यामुळे त्य़ा गावाचे दर्शन तरी घेता आले.


 कुंद अशा वातावरणातच आम्ही तिथून पुढच्या टपप्यावर जाण्यासाठी त्या सा-या स्मृती बरोवर घेऊन निघलो.


 
 
सभोवर अवतरलेले हिरवेगार भूतल आणि त्यामध्ये नक्षीकाम  केल्यासारखी ती सुंदरशी घरे..





अनुभवच्या या सहलीचा आनंद घेताना बरोबरचे व्यवस्थापनातले सारे जण पर्यटकांना पुरेसा वेळ देऊन त्यांच्या तहान-भुकेची सारी पथ्ये सतत पाळत होती..


म्हणून तर लहान वसमधूनही प्रवास होऊनही ते सारे आरामदायी वाटत होते. 








तर मंडळी चला निघूया पुढच्या टप्प्यावर...बाय 


- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

No comments: