कुर्ग सहल
भाग दुसरा..
मुडबीद्री हे गाव तसे मंगलोर पासून ३५ कि. मि. अंतरावर. जैन धर्मियांची काशी म्हणून ते परिचित आहे. निसर्गाने वेढलेला हा सारा परिसर ऐन पावसाळ्यात आपल्या समृध्द सौंदर्यीने नटलेला दिसला.. पावसाने तिथे आपले रूप थोडे दाखविल्याने हिरवाई अगदी दाडून आलेली दिसली..
आम्ही ज्या चौकात थांबलो होतो..ते तीथल्या एस टीच्या स्थानकाचा परिसर होता..त्यामुळे आसपास सारी निवासाची ठिकाणे दिसत होती. वाहनांची गर्दी नव्हती पण सतत वाहनांची आणि माणसांची येजा दिसत होती.
पंचरत्नमधला आमचा पाहुणचार आटोपल्यावर दुपारी आम्ही सारे तीन अनुभवच्या गाड्या घेऊन निघालो ते थेट..शहाळ्याच्या मारूतीमंदिरावरून एकहजार खांबांच्या जैन मंदिराकडे
मुडवीद्रीचे एक हजार खांबाचे भव्य जैन मंदिर
दुपारी थोड्या विश्रांतीनंतर आमच्या अनुभवी दुर्गेश आणि आभिषेक यांनी आमची गाडी मुडबीद्रीच्या दुगंबर जैन मंदिराच्या समोर गाडी उभी केली. एका बोळातून समोर दिसणा-या या मंदिराच्या भव्यतेविषयी ऐकले होते..पण ऐकणे वेगळे आणि प्रत्यक्ष पाहणे निराळे..
भव्य वास्तुकलेचा नमुना असलेला असलेले तिन भागात उभे होते..मुख्य प्रवेश द्वार..
मधला भव्य स्तंभ
आणि मंदिराचा गाभारा.
एकहजार दगडी खांबावर चितारलेल्या भव्य प्राचिन मंदिराच्या गाभा-यात प्रवेश केला.. शांत वातावरणाची पुरेपूर साक्ष देणारी ती मूर्ती..तिथली शांतता.आणि त्यापरसरातले भारावलेले वातावरण मनाला खूप निराळे भासत होते.
केवळ दिसत असलेली वास्तू पाहणे आणि त्यामागे असलेली प्राचिन परंपरा याचे भान सतत डोक्यात येत होते.
ती अतिभव्य चित्रांतून साकारलेली मंदिराची पूरातन वास्तू आमच्या मनात भरून राहिली.
कोरीव काम केलेला प्रत्येक दगड या प्राचिन परंपरेचे दर्शन घडवित होता..
सारे जण तिथल्या मंदिरातल्या भव्य वास्तूशिल्पात आपापले चित्र काढण्यासाठी मोबाईल- कॅमेरे सज्ज होत होते..
त्रिभूवन तिलक चूडामणी असेही म्हटले जाते..मूडबूद्रीतले हे भव्य प्राचिन मंदिरात सहा फूट भव्य इसी चंद्रनाथां स्वामींची मूर्ती आपले मन प्रसन्न करते..पंधराव्या शतकातले हे मंदिर. समोर पंधरा मिटर उंच भव्य स्तंभ उभारलेला आहे.
मंदिरातल्या प्रत्येक खांबावरील कोरीव कामात विजयनगरच्या खूणा असलेले नक्षीकाम आढळते.
अगदी प्रवेश केल्यापासून मंदिरातला प्रत्येक खांब तुम्हाला आपल्या कलाकुसरीने आकर्षीत करतो.
मंदिराच्या छतावर कोरलेली ही भव्य कलाकुसर मन प्रसन्न करते |
असेच एकेक स्थळाचे दर्शन घेऊन पुढे जात राहू..
सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
mob. 9552596276
No comments:
Post a Comment