Wednesday, August 22, 2012

वेळ भरत आली आहे...


राज्य सरकारचे लेचेपेचे धोरण
नशीबी आहे महाराष्ट्राच्या
म्हणून वाढतीय गुन्हेगारी
होताहेत आंदोलने आणि निघताहेत मोर्चा
जनता रडती आहे..



पावसाने बेजान झालीय
महागाईने जर्जर
आहे का त्यांना त्याची काही पडली..
ते आपल्या आरामदायी महालात पहूडलेत
पण एक दिवस त्यांचीही वेळ येईल
मग पळता भुई थोडी होईल..
मग कितीही धावा केला
तरी कुणीही ढुंकूनही पाहणार नाही..
सावधान..वेळ भरत आली आहे...



-subhash inamdar,Pune


Monday, August 20, 2012

कीर्ति शिलेदार


बालगंधर्व रंगमंदिरी मंगळवारी एक खास समारंभ साजरा होत आहे..त्यानिमित्त...

संगीत सौभद्रचा प्रयोग विमलाबाई गरवारे हायस्कुलच्या संमेलनात त्यांनी प्रथम केला आणि मराठी रंगभूमिची पताका आपल्या खांद्यावर घेतल्याचे तेव्हा जाणविले..तो झेंडा घेऊन आज पन्नास वर्षे झाली...संगीत नाटकांची आणि स्वतःची कीर्ति एकांड्या शिलेदारासारखी मिरवत आजही त्या डौलाने मिरवत आहेत...

त्यांच्या उमेदीच्या काळातल्या भूमिकांनी संगीत रसिक वन्स मोअरची दाद देत...
दादा ते आले ना...हे वाक्य अशा काही थाटात उच्चारत की आठवण यावी ती बालगंधर्वांची .आठवण व्हावी आपली आई आणि मार्गदर्शक जयमालाबाईंची.....

जयराम आणि जयमाला शिलेदार या संगीत नाटकतल्या नामवंत कलावंतांच्या घरी दोन कन्या रत्ने जन्माला आली ती म्हणजे लता आणि कीर्ती.....त्या दोघींनी आपल्या कलासेवेचा वारसा केवळ जपलाच नव्हे तर वाढविला..सजविला आणि नटविलाही...



आज कीर्ती शिलेदार त्या कारकीर्दीच्या पन्नाशीच्या प्रवासात अखंड मिरवित आहेत. जयमाला शिलेदार यांच्या मार्गदर्शनासारखा दुसरा गुरु नाही हे त्या जाणतात..मानतात..म्हणूनच संगीत नाटकांची पताका आपल्या शिरावर घेऊन त्या आजही रसिकांच्या तृप्त जेह-यावर समाधान सहजपणे आणण्यात यशस्वी होत आहेत...



मायबाप प्रेक्षक हेच आपले सारे काही हे मानून ही संगीत सेवा करत अनेक शिष्यांना त्या तयार करीत आहेत..पण आज संगीत नाटकांचा वर्गच कमी होत आहे...इच्छा असूनही प्रयोग कमीत कमी कालावधीत सादर केले जात आहेत...आजूनही ती धग रसिकांच्या मनात आहे..तिचे जतन करत कीर्ती शिलेदार आणि त्यांची संगीत संस्था करीत आहे..
http://www.blogger.com/img/blank.gif


त्यांच्या यशामागे कष्टाची परंपरा आहे...गुरुंचे मार्गदर्शन आहे...रसिकांची पावती आहे आणि आई-वडिलांची पुण्याई आहे..
स्वयंवर, मानापमान, संशयकल्लोळ, शाकुंतल, एकच प्याला, विद्याहरण, स्वरसम्राज्ञी, सौभद्र किती नावे घ्यावीत तेवढया नाटकात त्यांच्या भूमिका आहेत...शिवाय नाट्यसंगीत ऐकणारा चाहता वर्गही निर्माण झाला आहे...
परंपरेची जोपासना यापुढेही उत्तम घडावी हिच नटेश्वरापाशी इच्छा..




सुभाष इनामदार ,पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276


http://www.esakal.com/esakal/20120725/4971840578510423152.htm

Tuesday, August 14, 2012

मनात गाता गाणे..


मनात गाता गाणे
जग दिसे दिवाणे
मनात गाण्यातला आनंद काही निराळाच आहे..जो स्वतःपुरता मर्यादित आहे..जे गाणे केवळ स्वतःलाच ऐकू येते..इतरांना त्याचा त्रास नाही, की वेदना नाहीत.
स्वांतः सुखाय
मात्र तेच गाणे जनात म्हणायचे असले तर मात्र कठीण आहे....गवया शेजारी बसलो तर त्यांच्या ताना सहज उचलता येतात..पण त्याच पुन्हा आळवायचा प्रयत्न केला तर मात्र ...सोडा हो राव...
गाणे गात जगावे..
आमचा हा छंद आमच्यापुरताच राहू दिलाय..तो इतरांना सांगण्यासारखाही नाही...म्हणूनच
गाना आये या ना आये...गाना चाहिए...
आमचे हे गाणे...तसे गाणे नाही..मन प्रसन्न असले की सारे काही सुचते तसे...
आपण जो चष्मा घालू तसे जग दिसते....त्या रंगाचे..म्हणून गाणे म्हणत राहिलो...जग सुंदर दिसते


...


जग दिसे दिवाणे

subhash inamdar, Pune
9552596276

स्वातंत्र्य आपल्याला सांभाळता आले काय ?


स्वातंत्र्य मिळाले खरे पण ते आपल्याला सांभाळता आले काय ?
जय स्वातंत्र्य...

प्रत्येक घरात वीज येणार...पंतप्रधानांनी आज लाल किल्ल्यावरुन जाहिर केले...पण...वीज जोड येईल हो..पण वीजेची टंचाई..शेतात पंप आहेत..पण ते सुरु होण्यसाठी वीज नको काय....सारेच घोषणाबाजीचे दिवस...फक्त टाळ्या वाजवत ऐकायचे एवढेच आपल्या हाती आहे...

हा प्रश्न पडतो आजचे भ्रष्ट्र आणि त्रस्त लोकांचे जीवनमान पाहून...आपल्याला जे मिळविले त्याची किंमत आहे..ती पुढे पेलता आली नाही...हातात सत्ता दिली म्हणजे सामान्यांच्या जीवनाकडे दुर्लक्ष करुन राजकीय मंडळींनी हा देश..लाचार आणि महागार्इने त्रस्त अशा नागरिकांचा तयार केला..त्यांना आतुन कितीही वाटले तरी आता त्यांना रोडच्या जगण्याची लढाई करावी लागते..ती रोजच्या जीवनातील प्रसंगांना आणि घरी असलेल्या भुकेल्यांसाठी कमावण्यासाठी...तो जगतो.. जीवनात कमावतो...पण सारेच व्यर्थ्य खर्ची पडते...

बेसुमार महागाईचा वरवंटा त्याला घेऱून तो आपल्याच विश्वात फिरत असतो...क्रांतीचा जयजयकार करण्याची इच्छा त्याला आहे..पण तसे बळ पायात किंवा अंगात संचारत नाही...

मिळेल मोकळा वेळ तेव्हा तो कांही प्रमाणात स्वातंत्र्यात..स्वतःच्या आनंदात जगत असतो....

कधीतीरी हे सारे बदलेल...असे कुठेतरी वाटते म्हणून स्वातंत्र्यदिनही पाळतो...सांभाळतो....पण ज्यांनी देशातल्या जनतेची सेवा करण्याची प्रतिज्ञा घेतलेल्या लोकांना आपण खरच या शपथेशी प्रामाणिक आहोत काय..हा स्वतःला प्रश्न विचारायवला हवा...


चिरायू स्वातंत्र्याच्या गप्पा मारणा-या राजकीय आणि तथाकथीत नोकरशाहीला जनतेकडे पहाण्याचे बळ मिळो..हिच इच्छा...


सुभाष इनामदार,पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276

Thursday, August 9, 2012

अवघे पाउणशे वयमान ...! अण्णा हस्मे

गेल्याच रविवारी..५ ऑगस्ट २०१२ला आमच्या मेहुण्यांची अण्णा हस्मे यांची पंच्च्याहत्तरी बोरीवलीच्या डॉन बॉस्को शाळेच्या सभागृहात साजरी झाली..त्यांच्या कुटंबीयांची तर हजरी होतीच पण मंत्रालयात कामकरणारे त्यांचे अनेक सहकारीही त्यांच्यावरच्या प्रेमाखातर या कार्यक्रमाला हजर होते..यात आर. व्ही. कुलकर्णी, बापुराव वैद्य, मोरेश्वर उगावकर,अरविंद जोग यांचा समावेश होता..ते सारे १९५८ पासुनचे कर्यालयातले सहकारी...



माझे मेहुणे अत्यंत साधे.लाघवी आणि प्रेमळ ..त्यांनाही माझ्या मामेबहिणीबरोबर अगत्य होते सा-यांचे..
आज बहिणाच्या नसण्याची हूहहूर होती पण तरीही..
`ठेविले अनंते ...`
या न्यायाने त्यांच्या मुलाने आणि मुलीनी हा पंच्च्याहत्तरीचा सोहळा साजरा करुन त्यांच्या आयुष्यात अधिक आनंद देण्याचा प्रयत्न केला...



मोठ्या परिवाराचे आपण एक घटक आहोत..याचा आनंद जमलेल्या सा-यांना झाला..हा जरी कौटुंबिक सोहळा असला तरी आजच्या काळात...असे एकत्र येण्याचे प्रसंग फार दुर्मिळ होतात... सारे विखुरलेले नातेमंडळी आवर्जुन त्यांच्यासाठी हजर होती...



त्यांच्यासाठी एक मानपत्र तयार केले ते या प्रसंगी त्यांचेच ज्येष्ठ सहकारी बापुराव वैद्य यांच्या हस्ते रंगमंचावर दिले...त्याचेच हे दर्शन..




अवघे पाउणशे वयमान ...!

आनंदाच्या, उत्साहाच्या, हसतमुख व्यक्तिमत्वाचे ति. अण्णा हस्मे...तुम्हाला आम्हा सर्वांचा सन्मानाचा मुजरा!
अण्णा, तुम्ही आमचे स्फूर्तिस्थान. पिढ्या घडविणा-या सा-यांचे श्रध्दास्थान. आयुष्याच्या लढाईत कित्येक हादरे तुम्ही पचविलेत, परतवून लावलेत, त्यांच्याशी दोन हात केलेत. कष्टाने तुम्ही जीवन आनंदात फुलविलेत! आशेच्या प्रत्येक किरणांना तुम्ही कुटुंबियात साठविलेत!

बांद्र्याच्या दोन खोल्यातला तुमचा संसार आणि त्यात तुम्ही निर्माण केलेले सुखाचे मळे आजही आमच्या मनात कोरलेल्या आठवणीसारखे ताजे आहेत! तुम्ही घरातल्या वातावरणात स्वतःचे `तेजोमंदिर` निर्माण केलेत...रुजविलेत..वाढविलेत...आम्ही सारे त्याचे साक्षीदार आहोत...!



मंत्रालयात नोकरी करुन दीर्घकाळ तुम्ही घरात पहाट जागती ठेवलीत. म्हणून तर चारकोपच्या चार खोल्यातल्या भिंतीत तुमच्या आनंदाचा सुवास कायम दरवळत राहिलेला आहे..छंदाची जोपासना केलीत. पत्नीचे गुण हेरलेत..मुलांची उत्तम उभारी केलीत. सारे घर कसे स्वागतासाठी नटवून, सजवून ठेवलेत! पण...असो...!

अण्णा, तुमचे येणे म्हणजे आमच्या सर्वांच्या घरातला आनंदाचा उत्सव असतो..तुम्ही सतत येत रहा...सारी आमची घरे आणि मनेही तुमच्या स्वगतासाठी उत्सुक आहेत !

तुम्ही दुःखाचा लवलेशही कपाळावर न ठेवता.. आनंद घराघरात पसरवित आहात ! हाच आनंद पंच्चाहत्तरीनंतरही तुम्ही ठिकठिकाणी ऊजळवून आणाल..अण्णा, तुमचे हे उत्साहाचे झाड पहाणे..त्याखाली सावलीसारखे बसणे यातच आम्हाला धन्यता वाटते..

तुमचा आशिर्वाद..तुमचा भक्कम आधार असाच आम्हाला कायम मिळत राहो...उत्तम आरोग्याचे संपन्न जीवन यापुढेही शताब्दीपर्यंत अखंडीत राहो,,हिच आम्हा सर्वांची इच्छा...आणि त्या परमेश्वराकडे मागणे !


ति. अण्णा हस्मे....
तुमच्या पंच्च्याहत्तरीच्यानिमित्ताने आम्हा सर्वांच्या वतीने तुमचा मान राखायचा आहे..पण ते या शब्दांच्या कांही ओळीतून...आमच्या भावना त्यातून व्यक्त होतील..आणि त्या तुम्ही समजून घ्याल ही आशा आहे...





या निमित्ताने कुटंबियांनी केलेल्या विविध कार्यक्रमाचा आस्वाद घेताना स्वतः अण्णा हस्मे आणि इतर उपस्थित
(All Photos by Pankaj Joshi)




५ ऑगस्ट, २०१२



-Subhash Indmdar, Pune
subhashinamdar@gmail.com
9552596276

Wednesday, August 1, 2012

शब्द कधी कधी धोका देतात..


शब्द कधी कधी धोका देतात..
सांगायचे ते उमटवितच नाहीत..
नको तेच सांगत सुटतात..
गैरसमजायला कारण शब्द हेच असतात..

शब्द जसे सांधतात तसेच ते तोडतातही
शब्दांना स्वतःची धार नसते..
पण धग नक्कीच असते..
ती नेमकी पोहोचते..त्या मनी
म्हणून जरा जपूनच वापरा
हे शब्दाचे शस्त्र..


सुभाष इनामदार,पुणे

Monday, July 23, 2012

आधाराचे प्रेम आणि सहवासाचे प्रेम..


विशेषतः स्त्रीच्या आयुष्यात प्रेमाची दोन प्रकारे विभागणी होत असावी...एक पतीकडून मिळालेले आधाराचे प्रेम ..आणि दुसरे तिला हवे असते ते मिळत नाही..ते सहवासाचे प्रेम..

कदाचित काहींना हे दोनही एकाच व्यक्तिकडून मिळतात..तर काही दुस-या प्रेमाला पारख्या होतात.



बहुधा काळाच्या ओघात जे हवे असते..ते फारले लाभत नाही..पण जे लाभते तेच प्रमे समजून जपले जाते..आयुष्यभर टिकविले जाते...



मात्र ज्यांना सहवासाचे प्रेम लाभते..त्यांना एकीकडे घराचा आधार असतो..तरीही मानसीक आणि बौध्दीक दृष्टीने त्या समाधानी नसतात...त्यांना हवे असते त्यांच्या पातळीवर राहून त्यांना समजून घेणारे... सहवासाची भुकेली स्त्री ते हे प्रेम आयुष्यात शोधत असते...जे ती कायमचे मनात साठवून ठेवते...त्याच्य़ाशी प्रतारणा करत नाही...
कारण ते तिचे अंतरीक भान असते....




subhash inamdar, pune
subhashinamdar@gmail.com
9552596276

जमेल तेवढे पाळा..


काळाचे बदल मान्य करुन स्विकारायला हवेच. पुरातन परंपरांना नाहक जतन करुन त्या अंधश्रध्देने पाळून त्यावर उगाचच धर्माचे भाकड कथानक ऐकवून समाजाला गुंतून ठेवणांचे दिवस गेलेत. आज काळ वेगळा आहे. सारे व्यवहार वेगळे झालेत. नाती, मैत्र, शेजारी, वाडे सारेच निसरडे झालेत. तुम्ही मान्य करा वा नका करू.. सारे जग कुणासाठी थांबत नाही..ते धावतेच आहे...बदलत्या परिस्थिशी सामना करायला घरातले प्रत्येक जण कमावते होण्याचा हट्ट् करतयं.. ती काळाची गरज आहे...
शेतात पिके घेणारे शेतकरी आता...तसे गावाकडचे राहिले नाहीत. शैताचा कस बदलला. रासायनिक शेतीचे प्रमाण वाढलय...




पटेल तेवढे करा..
आवश्यक तसे वागा..
जमेल तेवढे पाळा..
फक्त इतरांकडे पहा...



subhash inamdar,pune
subhashinamdar@gmail.com
9552596276

Sunday, July 22, 2012

वाट पहाणारा..आणि वाट दाखविणाराही..



आपली वाट शोधत कुणी आला तर त्याला आसरा द्यावा
जमल्यास थोडा संवादही करावा...
मात्र सल्ला देण्याच्या फंदात पडू नये...

जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर कुणीतरी ऊभा असतो...वाट पहाणारा..आणि वाट दाखविणाराही..



केवळ आपण त्याची मदत घ्यावी..पण स्वतःच स्वतःची वाट शोधावी तरच यश नक्की असते...



इति- सुभाष इनामदार, पुणे

Subhash Inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com
9552596276

Wednesday, July 18, 2012

बहारदार अभिनयाचा अस्सल कलावंत हरपला





हिंदी चित्रपटसृष्टीतला खरा सुपर स्टार आज काळाच्या पडद्याआड झाला. त्यांच्या चित्रपटांनी आनंद तर दिलाच पण एक बहारदार अभिनयाचा अस्सल कलावंत हरपला.

आजच्या तरुण पिढीलाही त्या नावाचे आकर्षण होते. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीत आपल्या कर्तृत्वाने बॉक्स ऑफिसवर हाउस्फुल्ल चा बोर्ड झळकवणारा खरा कलाकार हरपला..

त्यांच्या अभिनयाचे कधी कधी चेष्टा व्हायची..पण त्यांची ती तीरकी हसरी मुद्राच आजही आठवणीत राहिली.



अंदाज मधली त्यांची आदाकारी..अमिताभ बच्चन आणि त्यांची चित्रपटातली दृष्य़े आजही डोळ्यात पाणी आणतात.

भाउकपणा आणि आणि हळवी नजाकत ही त्यांचे वेगळेपण होते...त्यांच्या जाण्याने `जिंदगी एक सफर है सुहाना ..यहॉं कल क्या होगा किसने जाना..`हेच खरं... त्यांच्या स्मृती साठवतच हिंदी चित्रपटसृष्टी हळहळत राहिल..तसेच त्यांचे कोट्वधी चाहते...



त्यांचे व्यसन त्यांना अखेरपर्य़त साथ देत गेले....दारु...य़श पचवून स्वतःला सिध्द करण्याची ताकद होती..पण..

त्यांना श्रध्दांजली!



subhash inamdar,pune
subhashinamdar@gmail.com
9552596276