Friday, October 4, 2013
आसरा शोधताना
मनाची अवस्था विचित्र होती
उभे होते सारे पण हात रितेच होते
कवाडं सारी बंद वाटत होती
अंधारून आल्यासारखं झालं
मिळेल त्या कोप-यात मिटून पडावसं वाटलं....
नवी स्वप्ने पहाण्याचं धाडस होईना
मनही बिथरून विश्वास हरवून बसलं
कोडंवाड्यातल्या जनावरासारखा
सुटकेचा किरण शोधत राहिलो
कुणास ठाऊक बपर्वा बनलो
झालं ते पान मिटवून टाकलं.
नवं कोरं सारं असावं तसं..
अचानक क्षण हाती आला
कोप-यात किरण उमटले
शरीराचं सोनं झालं
आकाशातला कोळोख मिटून गेला
लख्ख प्रकाश दिसू लागला
बदल माझ्यात की मी बदललो
उमजेनासे झालं ..
स्थिरतेला पहिला कंदील मिळाला
किरणांना पंख फुटले
आयुष्य आनंदून गेले..
-subhash inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com
9552596276
Wednesday, October 2, 2013
पुन्हा एकदा माडगूळकर..‘अजून गदिमा’ मध्ये
गदिमांच्या ९४ व्या जयंतीनिमित्ताने पुन्हा एकदा त्यांच्या थोरवीची गाथा ऐकण्याचे भाग्य..
आम्हा पुणेकरांना लाभले ते त्यांच्या अप्रकाशित कवीतांचे पुस्तक ‘अजून गदिमा’त्यांचे सुपूत्र श्रीधर माडगूळकर यांनी लिहले आणि ते प्रकाशित केलेल कॉन्टिनेंटलच्या देवयानी अभंय्कर यांच्या वतीने... या पुस्तकाच्या निमित्तानि पुन्हा एकदा गदिमांची थोरवी रसिकांच्या कानी घातली गेली..खरे पाहता पुन्हा एकदा माडगूळकर पुन्हा जीवंत झाल्यासारखे वाटले..
तरुण पिढिचे लोकमान्य कवी..संदीप खरे ..यांनी माडगूळकरांच्या सहवासात यानिमित्ताने आपल्याला रहाता आले..याचा अधिक आनंद झाल्याचे सांगून आमची पिढी त्यांच्या कवीतांवर आणि गीतांचा आजही किती चाहती आहे हे स्पष्ट केले.
कॉन्टिनेन्टल प्रकाशनतर्फे ग. दि. माडगूळकर यांच्या अप्रकाशित कवितांचा समावेश असलेल्या ‘अजून गदिमा’ आणि गजलकार प्रदीप निफाडकर यांच्या ‘मैं शायर’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. कोत्तापल्ले यांच्या हस्ते झाले.
गदिमा कुठे नव्हते. ते स्वातंत्र्य चळवळीत होते. काँग्रेसमध्ये होते. सामाजिक चळवळीत होते. लेखक रस्त्यावर उतरला पाहिजे ही त्यांची धारणा होती, असे सांगून कोत्तापल्ले म्हणाले, चित्रपटासाठी गाणी लिहिणे म्हणजे गीतकार असे नव्हे. तर, संगीतकाराला चाल सुचावी असे लिहिणारा तो खरा गीतकार. असे गीतलेखन करणाऱ्या गदिमांनी मराठी आणि हिंदूी चित्रपटांसाठी कथा-पटकथा लेखन केले. चित्रपटामधील धंदेवाईक लोकांनी मोठय़ा लेखकांना दूर केल्यामुळे मराठी चित्रपट रसिकांपासून दूर गेले.
बांगला देशाच्या निर्मितीनंतर पुण्याच्या रेसकोर्सवर इंदिरा गांधी यांच्या झालेल्या सभेसाठी स्वागतगीत लिहिणारे गदिमा आणि या गीताच्या तालमी गदिमांसमवेत पाहण्याचे भाग्य लाभले हीच माझी श्रीमंती, अशी भावना उल्हास पवार यांनी व्यक्त केली.
आपले जीवन प्रकाशमय करण्यासाठी भाषांमधील भिंती दूर केल्या पाहिजेत, असे सांगून अनिस चिश्ती यांनी निफाडकर यांच्या पुस्तकाने मराठी आणि उर्दू साहित्यामध्ये भर घातली असल्याचे मत व्यक्त केले.
श्रीधर माडगूळकरांनी जयंतीच्या दिवशीच गदिमांच्या जन्माची कथी जी ऐकविली..तेव्हा ड़ोळ्यातून पाणी आले..मृतसमान असलेल्या मांसाच्या गोळ्याला जेव्हा विस्तवाचा स्पर्श झाला आणि जेव्हा पहिला कौहमचा उद्गार आला तेव्हाच हा मोठा होणार याची कल्पना आली...पुरण्याची तयारी असताना सुईणीने केलेल्या या प्रयत्नातून हा महातवी उदयाला आल्याची भावना..फार निराळी आणि चटकालावून जाणारी होती..
आपल्या आईेने बबनराव नावडीकरांच्या १०८ वेळा गीतरामायणाच्या कार्यक्रमाला बेलबागेत आपल्याला नेले..तिथेच गदिमांची महती लक्षात आली..मात्र ती गेली त्यानंतर चारच दिवसांनी गदिमा गेले..ह्या दोन्ही घटना आयुष्यात चटका लावणा-या होत्या असेही निफाडकरांनी सांगितले. ३५ उर्दु शायरांचा परिचय करुन देणारे मै शायर हेपुस्तक आज प्रकाशित होते याबद्दल समाधान व्यक्त करुन माडगूळकरांच्या पुस्तकाशेजारी बसणायचे भाग्य म्हणजे त्यांच्या तरणाजवळ बसण्याचा हा मान आहे..असे समजतो अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
देवयानी अभ्येकरांच्या निवडीचेही अनेकांनी कौतूक केले. ७५ वर्षीची परंपरा असलेल्या प्रकाशन संस्थेचे आजोबा.अनंतराव, वडील. अनिरुध्द आणि आता काका.रत्नाकर कोणीही नाहित.याची वेदनाही देवयानी यांनी बोलून आपल्या भावना वाचकांसमोर उघड्या केल्या..
-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
Thursday, September 26, 2013
'संहिता - The Script' - येत्या ११ ऑक्टोबरला
दोन राष्ट्रीय पुरस्कारांसह तब्बल २० पुरस्कारांवर नाव कोरलेला आणि सहा विविध चित्रपट महोत्सवांमध्ये सहभागी झालेला चाकोरी बाहेरचे विषय हाताळणाऱ्या सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर दिग्दर्शित 'संहिता - The Script' हा चित्रपट येत्या ११ ऑक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होतोय. 'अशोक मूव्हीज प्रा. लि.' यांच्या सहकार्याने निर्माण झालेल्या या चित्रपटाची निर्मिती सुभाष घई यांच्या 'मुक्ता आर्टस लि.' ने केली असून, प्रस्तूती सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्या 'विचित्र निर्मिती' या संस्थेची आहे.
साठाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये
चित्रपटाच्या सर्वोत्तम संगीतासाठी असलेला पुरस्कार शैलेंद्र बर्वे यांना
तर सर्वोत्तम पार्श्वगायनासाठी असलेला पुरस्कार आरती अंकलीकर यांनी
गायिलेल्या 'पलके ना मोडो… ' या गीतासाठी मिळाला असून हे दोनही पुरस्कार
सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर दिग्दर्शित 'संहिता - The Script' या
चित्रपटासाठी मिळाले आहेत.
ही कथा आहे एका चित्रपट दिग्दर्शिकेची. ब्रिटीश राजवटीच्या काळातल्या म्हणजे देश स्वतंत्र होण्याच्या आधी एका शाही संस्थानाच्या काळात या चित्रपटातल्या घटना घडतात, अशी कल्पना ती करते. त्यामुळे हा चित्रपट म्हणजे एक राजा, एक राणी आणि एक राजगायक यांची गोष्ट होऊन बसते. त्याचबरोबर त्यात प्रेम, दुरावा, अगतिकता आणि ध्यास याही ओघानेच येतात. गंमत म्हणजे अश्या या सगळ्या कथानकाची कल्पना करता-करता त्या चित्रपट दिग्दर्शिकेच्या खाजगी आयुष्यातल्या घटनांचेही बेमालूम मिश्रण त्यात होऊन जाते. चित्रपटाचा निर्माता, लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शिकेसमवेत इतर तिघीजणी असे सगळेजण मिळून त्या चित्रपटाचा आणि व्याक्तिगत जीवनाचा शेवट देखील समाधानाचा आणि गोड कसा होईल याचा शोध घेतात. थोडक्यात सांगायचे झाले तर संहिताची गोष्ट ही स्वतः त्या चित्रपट दिग्दर्शिकेचीच आहे.
'संहिता - The Script' चे दिग्दर्शन करणारे
सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी आजवर बारा चित्रपट, चाळीसांहून अधिक
लघुपट, पाच टेलिफिल्म्स आणि एक मालिका यांची निर्मिती केली असून
आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय पातळीवरील असंख्य पुरस्कार मिळवले आहेत.
'संहिता - The Script' चे कथा, पटकथा आणि संवाद लेखन सुमित्रा भावे यांचे आहे तर गीतलेखन सुनील सुकथनकर यांनी केले आहे. संगीत शैलेंद्र बर्वे यांचे असून पार्श्वगायन आरती अंकलीकर यांचे आहे.
सिनेमेटोग्राफी संजय मेमाणे यांची असून संकलक आहेत मोहित टाकळकर. कला दिग्दर्शन सुमित्रा भावे आणि संतोष संखद यांचे आहे तर वेशभूषा गीता गोडबोले आणि सुमित्रा भावे यांनी केली आहे. 'संहिता - The Script' मध्ये देविका दफ्तरदार, मिलिंद सोमण, राजेश्वरी सचदेव, उत्तरा बावकर, ज्योती सुभाष, डॉ. शरद भुताडिया, डॉ. शेखर कुलकर्णी, सारंग साठये, नेहा महाजन असे प्रमुख कलाकार आहेत.
Monday, September 23, 2013
प्रत्येकाच्या मनात ...
शोध घेत आहे..कुठे स्वतःला रमवावं..काय नव करावं ज्यामुळे मनही मानेल आणि काही काम केल्याचा अनुभव येईल..एके काळी काम इतकं असायचं की पडल्यापडल्या कधी डोळा लागला ते कळायचंही नाही..आज मात्र उलटं आहे..आज काय काम काय याचा विचार करावा लागतो. खरं विचार करायचा झाला तर अनुभव असा आहे...कुठलेही काम कमी नाही हे मनात ठरवून काय केलं तर..त्याचा आनंद अधिक घेता येतो.. घरातलीही खूप कामे असतात..ती सहजपणे आपण करुन घरातल्या वातावरणात स्वतःला रमवून घेऊ शकता..
प्रत्येकाचा एक दिवस असतो
प्रत्येकाच्या मनात असा दिवस येतो
प्रत्येकाचा एक दिवस असतो
तेव्हा कुणी कुणाचा नसतो
उरतो तो स्वतः असतो
विचार न करताही तो दिसतो
मनताही त्याचा विचार पक्का असतो
तिथे कुठलाही अविचार नसतो
फक्त निग्रह कायम असतो
माणसावरचे प्रेम आतप्रोत असते
सारे काही त्या शब्दात सांधते
कितीही झाले तरी त्याचा एक काळ असतो
त्याचा आग्रह मग निग्रह असतो
कुणाचे राज्य त्याच्यावर नसते
तो स्वतंत्रपणे भासत असतो
प्रत्येकाच्या मनात असा दिवस येतो
काहीना काही सांगून जातो
नकळत सारे घडत असते
त्याचेसाठी सारे काही असते
त्याला विचारत सारे काही सुरु असते
त्याचे मत मग महत्वाचे असते
- सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
Tuesday, September 17, 2013
आपण हे पाळू या...
आपण हे पाळू या...
आयुष्यात दुस-याच्या दुःखात
आणि सुखात
सहभाग घ्या..
...समाधान सहज मिळेल.
दुस-याला मदत करता आली नाही तरी चालेल...
पण विनाकारण डिवचणे चांगले नाही.
घरात आपल्यापासून इतरांना त्रास होईल
असे वागण्यापेक्षा
त्यांच्या आवडी-निवडी जपायचा प्रयत्न करा..
समाज कार्यात
स्वतःचा स्वाभिमान सोडून तन,मन
आणि जमेल त्या धनाने सामिल व्हा..
मन तृप्त होईल..
आनंदाच्या प्रसंगी आणि
दुःखाच्या वेळी
मित्र , नातेवाईक आणि शेजारी यांच्याकडे जा...
माणूसपण जपले जाईल...
वेदना, विरह यापासून विरक्ति घेऊन
समाधानात सुख मानून..
मनशांत ठेवा
सुभाष इनामदार, पुणे
आयुष्यात दुस-याच्या दुःखात
आणि सुखात
सहभाग घ्या..
...समाधान सहज मिळेल.
दुस-याला मदत करता आली नाही तरी चालेल...
पण विनाकारण डिवचणे चांगले नाही.
घरात आपल्यापासून इतरांना त्रास होईल
असे वागण्यापेक्षा
त्यांच्या आवडी-निवडी जपायचा प्रयत्न करा..
समाज कार्यात
स्वतःचा स्वाभिमान सोडून तन,मन
आणि जमेल त्या धनाने सामिल व्हा..
मन तृप्त होईल..
आनंदाच्या प्रसंगी आणि
दुःखाच्या वेळी
मित्र , नातेवाईक आणि शेजारी यांच्याकडे जा...
माणूसपण जपले जाईल...
वेदना, विरह यापासून विरक्ति घेऊन
समाधानात सुख मानून..
मनशांत ठेवा
सुभाष इनामदार, पुणे
Saturday, August 24, 2013
'वंदे मातरम' हे राष्ट्रीय गीत नव्या स्वरुपात
बकिंमचंद्र चटर्जी लिखित 'वंदे मातरम' हे राष्ट्रीय गीत पुन्हा एकदा
नव्या स्वरुपात स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भारतीय देश बांधवांच्या
भेटीला आले आहे.. गायक - संगीतकार ऋग्वेद देशपांडे व 'युनिव्हर्सल म्युझिक
ग्रुप'ची प्रस्तूती असलेल्या या राष्ट्रभक्ती जागविणाऱ्या गीताचे प्रकाशन
भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत
वांद्रे पश्चिम येथील युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपच्या कार्यालयात प्रकाशित
करण्यात आले.
या नव्या गीतांचे संगीत ऋग्वेद देशपांडे यांनी केले असून संगीत
संयोजन वरद खरे यांनी केले आहे. आघाडीचे गायक मंगेश बोरगावकर, अनघा ढोमसे
आणि ऋग्वेद देशपांडे यांनी या गीतात आपला स्वर
मिसळला असून सतारवादक शेखर राजे आणि प्रसाद रहाणे यांच्याबरोबर बासरीवादक डॉ. हिमांशू गींडे यांनी सातसंगत केली आहे.
या गाण्याचे रेकॉर्डींग ठाण्या त ऋग्वेद देशपांडे यांच्याच 'आरडी म्युझिक' या स्टुडिओत झाले असून
व्हिडिओ स्वरुपातील गीत 'युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप' ने तयार केले
आहे. या व्हिडिओ गीताचे दिग्दर्शन सुमेध समर्थ यांनी केले आहे. `वंदे
मातरम` हे संपूर्ण काव्य आजच्या तरुणाईच्या विस्मरणात जाऊ नये आणि आपल्याला कलात्मकतेने आपल्या भारत माते ला वंदन करता यावे असा दुहेरी हेतू या गाण्याच्या निर्मिती मागे आहे असे संगीतकार ऋग्वेद देशपांडे यांनी सांगितले. तर आजचे कलावंत आणि तरुणाई देशा विषयी खूपच सजग आहे आणि म्हणू नच हे देशाभिमान उंचावणारे
रा ष्ट्रीय गीत आम्ही देशबांधवासा ठी
विनामूल्य बहाल करीत आहोत असे 'युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप'च्या वतीने मंदार गुप्ते यांनी सांगितले. Friday, August 23, 2013
श्रावणात असायचे कहाणीचे पठण.
आजही आठवते ते जुने दिवस...
श्रावणात असायचे कहाणीचे पठण.
सोमवारी उपवास असायचा संध्याकाळी लवकर भोजन
दुपारी शालेला सुट्टी यवतेश्वरला जाण्यासाठी
सातारच्या बोगद्याजवळ असलेल्या शंकरांच्या मंदिरात ही तोबा गर्दी चालत निघालो की तासाभरात यवतेश्वरी.
किती भावीकता होती मनात स्वच्छ विचार होते. शंकराच्या पिंडीवर बेल वाहिली की मनालाही शांती मिळायची ...
गरजा कमी होत्या ..पैसाही हाती कुठे होता ...साध्याभोळ्या स्वभावाची माणसे प्रत्येकाच्या घरी असत आई-वडील, आजी-आजोबा, बहीण-भाऊ, सुखाने नांदत
एकमेकांत असूनही खासगीपणाची गरजच नव्हती भाकरी-आमटीची चव पुरणपोळीच्या वरताण होती.
कारण होते एक मनी होते समाधान..माणसात होती तेवढी जाण..
आजही मनात ते दिवस अधिक रुंजी घालतात.
श्रावणातल्या मंगळागोरीने घरे बहरुन जायची..
खेळ खेळणा-या मुलींचा ग्रुप पैसे देऊन बोलवावा लागायचा नाही..सारे कांही मनापासून उस्फूर्तपणे होत असायचे..
वाड्यातले वातावरणही तेवढेच खेळीमेळीचे असायचे.
एकाच्या घरचे कार्य म्हणजे सर्वांच्या घरातला तो आनंद असायचा...
काळाप्रमाणे आनंदही संकुचित झाला..ती घरे नाहीशी झाली..याबरोबरच ती मनेही..
मग विरंगुळा शोधला जाऊ लागला..
सारे कांही वेळेत...फार गाजावाजा न करता...
श्रावणात असायचे कहाणीचे पठण.
सोमवारी उपवास असायचा संध्याकाळी लवकर भोजन
दुपारी शालेला सुट्टी यवतेश्वरला जाण्यासाठी
सातारच्या बोगद्याजवळ असलेल्या शंकरांच्या मंदिरात ही तोबा गर्दी चालत निघालो की तासाभरात यवतेश्वरी.
किती भावीकता होती मनात स्वच्छ विचार होते. शंकराच्या पिंडीवर बेल वाहिली की मनालाही शांती मिळायची ...
गरजा कमी होत्या ..पैसाही हाती कुठे होता ...साध्याभोळ्या स्वभावाची माणसे प्रत्येकाच्या घरी असत आई-वडील, आजी-आजोबा, बहीण-भाऊ, सुखाने नांदत
एकमेकांत असूनही खासगीपणाची गरजच नव्हती भाकरी-आमटीची चव पुरणपोळीच्या वरताण होती.
कारण होते एक मनी होते समाधान..माणसात होती तेवढी जाण..
आजही मनात ते दिवस अधिक रुंजी घालतात.
श्रावणातल्या मंगळागोरीने घरे बहरुन जायची..
खेळ खेळणा-या मुलींचा ग्रुप पैसे देऊन बोलवावा लागायचा नाही..सारे कांही मनापासून उस्फूर्तपणे होत असायचे..
वाड्यातले वातावरणही तेवढेच खेळीमेळीचे असायचे.
एकाच्या घरचे कार्य म्हणजे सर्वांच्या घरातला तो आनंद असायचा...
काळाप्रमाणे आनंदही संकुचित झाला..ती घरे नाहीशी झाली..याबरोबरच ती मनेही..
मग विरंगुळा शोधला जाऊ लागला..
सारे कांही वेळेत...फार गाजावाजा न करता...
Wednesday, August 7, 2013
जयमालाबाइंच्या जाण्याने .संगीत रंगभूमी पोरकी
वय वर्षे ८७ चालू असताना किडनी काम करेनासे झाल्याने जयमालाबाई शिलेदार यांचे बुधवारी उशिरा रात्री २ च्या सुमारास निधन झाले..त्यांच्या दोन्ही कन्या कीर्ती आणि लता दोघीही त्यांच्याजवळ होत्या..त्यांच्यावर गुरूवारी दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी वौकुंठ स्मशानभूमीतल्या विद्युत दाहिनीत अंतीम संस्कार करण्यात
आले..
गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास त्यांचे पार्थीव शरीर दर्शनासाठी..घरुन निघून बालगंधर्व रंगमंदिर, भरत नाट्य मंदिर आणि टिळकस्मारक मंदिरात ठेवण्यात आले. संगीत, नाटक आणि कला क्षेत्रातल्या कलावंतांनी अंतीम दर्शन घेऊन झाल्यावर दुपारी पुण्यातल्या वैकुंठात अंतीम क्रियाकर्म करण्यातक आले. तिथे ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांनी त्यांच्याविषयीचे आज गाणे संपले यां शब्दात त्यांच्याविषयीचे वर्णन एका शब्दात केले.
गंधर्वयुगाची परंपरा जपणा-या ..ती परंपरा स्वतः अऩुभवून ती आपल्या नाटकातून प्रज्वलीत करून ..पुढच्या पिढीपर्यंत पोचविणा-या मराठी रंगभूमीवर स्वतःची छाप पसविणा-या श्रेष्ठ ..अभिनय आणि गान कुशल अशा जयमालाबाई शिलेदार यांच्या निधनाने आज खरच मराठी संगीत रंगभूमी आईविना पोरकी झाली.
गेली काही वर्षे त्या सारे काही पाहू शकत होत्या पण बोलू आणि गाऊही शकत नव्हत्या..कीर्ती शिलेदार एका समारंभात मागे म्हणाल्या प्रमाणे ...`तिची आता मी आई झाले आहे.`..इतक्यापध्दतीने जपता जपता आज अखेरीस त्यांच्यावर नियतीने घाला घातला आणि त्यांचे निधन झाले..चेतनेतून त्यांचा देह अचानक अचेतन झाला..
संगीत रंगभूमीवर स्वतःची परंपरा सांगणारी आणि बालगंधर्वांच्या बरोबरीने काम केलेल्या कांही हयात असलेल्या मोजक्याच नव्हे तर अखेरच्या या शिलेदाराची आज अखेर झाली असे लिहले तरी ते योग्य होईल.
आपला सारा संसारच त्यांनी मराठी संगीत रंभूमीला बहाल केला..त्यातून दोन रत्ने मराठी रंगभूमीला अर्पण केली कीर्ती आणि लता... स्वतःची मराठी रंगभूमी ही संस्था स्थापन केली. जयराम शिलेदारांच्या खांद्याला खांदा लावून ती संस्था त्यांनी जपली, टिकविली, वाढविली...त्यांच्या भूमिकांचे गारूड आजही संगीत रसिक विसरु शकत नाहीत.
रंगभूमीवर कसे दिसावे..गाताने गालावर प्रेक्षकांना आनंद कसा दाखवावा..गाण्यात सहजता कशी अशावी..उत्तम वेशभूषा कशी करावी..अभिनयाचा भाग कितपत आणि किती असावा..इतर पात्रे गात असताना स्वतः कशी दाद द्यावी..सारे काही प्रत्यक्ष करुन दाखविणारी ही कर्तृत्ववान श्रेष्ठ कलाकार आज काळाच्या ओघात स्वतःचा ठसा मागे ठेवत आठवणीतच जगत राहिल्या आहेत.
थोडे मागे वळून पाहताना.. संगीत रंगभूमीच्या क्षेत्रात शिलेदार कुटुंबाची घराणेशाही अशीच लोकांनी स्वीकारलेली ,. ‘मराठी रंगभूमी’ ही शिलेदार कुटुंबाची नाटय़संस्था यांनी जयराम आणि जयमालाबाई शिलेदार यांनी संगीत रंगभूमीवर अनेक उत्तमोत्तम नाटके सादर केली. विवाहापूर्वी जयमालाबाई या प्रमिला जाधव या नावाने रंगभूमीवर सक्रीय होत्याच. १९४२ ते १९६७ हा त्यांच्या नाटय़कीर्दीतील बहराचा काळ. ‘देशांतर’ या नाटकाद्वारे त्यांनी रंगमंचावर पहिले पाऊल टाकले. गोविंदराव टेंबे त्यांचे मार्गदर्शक होते. साहित्य संघाच्या नाटय़महोत्सवात त्यांनी बालगंधर्वाबरोबर प्रथम ‘सं. शारदा’मध्ये काम केले. पुढे त्यांनी गंधर्व नाटक मंडळीत प्रवेश केला. बालगंधर्व जेव्हा केव्हा काही कारणांनी नाटकात काम करू शकत नसत तेव्हा त्या त्यांच्या भूमिकेत उभ्या राहत. त्यांची उणीव सहज भरून काढत. गायनात बालगंधर्व त्यांचे आदर्श होते. त्यांचे अनमोल मार्गदर्शन जयमालाबाईंना जयमालाबाईंना लाभले.
सुरेल, लयीबरोबर जाणारे, भावस्पर्शी, लडिवाळ गाणे हे बालगंधर्वाच्या गाण्याचे वैशिष्टय़ जयमालाबाईंच्या गायनातही आढळते. अभिनयाचे धडे तर त्यांनी गणपतराव बोडस व चिंतामणराव कोल्हटकरांसारख्या दिग्गजांकडून घेतले. हसरा चेहरा व सहज, लाघवी संवादोच्चार हे त्यांच्या अभिनयाचे विशेष.
‘सौभद्र’, ‘सुवर्णतुला’, ‘संशयकल्लोळ’, ‘स्वयंवर’, ‘एकच प्याला’, ‘शाकुंतल’, ‘मृच्छकटिक’, ‘मानापमान’ आदी नाटकांतील त्यांच्या भूमिका वाखाणल्या गेल्या. ‘शाकुंतल’मध्ये त्यांनी जयराम शिलेदारांबरोबर प्रथम एकत्र काम केले आणि पुढे त्या त्यांच्या सहचारिणीच झाल्या. उभयतांनी ‘मराठी रंगभूमी’ या संस्थेची स्थापना केली आणि प्रारंभी बाळ कोल्हटकरांच्या ‘मुंबईची माणसे’, ‘एखाद्याचं नशीब’, ‘मला निवडून द्या’ इ. नाटकांची तसेच ‘बाजीराव मस्तानी’, ‘राम जोशी’ यांसारख्या नाटकांची निर्मिती केली. जुन्या संगीत नाटकांचे प्रयोगही संस्थेतर्फे करण्यात येऊ लागले. आपल्या संस्थेशिवाय इतर संस्थांतूनही त्या कामे करत. छोटा गंधर्वाबरोबरची त्यांची अनेक नाटके गाजली. .
त्यांनी नाटकात काम करण्याबरोवरच नवी पिढी जी नाट्यसंगीत शिकू इच्छीत आहेत त्यांना नाट्यसंगीताचे धडे देण्याचे काम केले..म्हणूनच आज संगीता नाटके जरी कमी होत असली तरी नाट्यसंगीता्च्या मैफली बहारदार होताहेत...याचे क्षेय जयमालाबाईंसारख्या काळाच्या पुढे पहाणा-या कलावंताना द्यायाला हवे.
अनेक पुरस्कारांनी सन्मानीत अशा या जयमालाबाईंनी वयपरत्वे काम करणे बंद केले.तरीही संगीत नाटकाची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती..त्यांचे याही स्थितीत मार्गदर्शन सुरुच असायचे...खरे सांगायचे म्हणजे त्यांनी संगीत नाटके जगविली..त्यांना नवे घुमारे दिले. नवी पिढी तयार केली..आजही कीर्ती शिलेदारांच्या रुपाने संगीत नाटकांचा हा प्रवास एकांडे ध्येयपथीकाच्या रुपात पुढे सुरु ठेवला आहे..
आजही त्यांची ती संगीत नाटकातली मानापनातील `भामिनी`,स्वयंवरीतली `रूक्मीणी`,सौभदातली `सुभद्रा`..एवढेच नव्हे शारदेतली `सिंधू` समोर उभी राहून रसिकांना मनमोहक अशा संगीताभिनयाने मोहवित असल्याचा भास होत आहे...अशा श्रेष्ठ आणि पिढी घडविणा-या ज्येष्ठ आणि सर्वांच्या मनात भरून राहिलेल्या जयमालाबाईंच्या स्मृतीत राहणेच मराठी रसिक अधिक पसंत करतील..
त्यांच्या गाण्यांची मोहिनी काळानुरुप कमी झाली असली तरी त्यांची ती स्नेहल मुद्रा आजही रसिकांच्या मनात तेवढीच जिवंत आहे..त्यांच्या स्मृतीला विनम्र आदरांजली..
या रुपाने हिच आमची शब्दांजली....
सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
Sunday, August 4, 2013
मैत्री म्हणजे ...
आज मैत्री दिवस साजरा केला जातो..खरे मित्र कोण जो संकटाच्या वेळी उपयोगी पडतो...असे वस्तुतः म्हटले जाते..पण या मैत्री दिवसाचे वर्णन करणारी ही रचना ...
मैत्री म्हणजे नाही केवळ गाणे फक्त क्षणांचे
मैत्री म्हणजे दो -हदयातील नाते युगायुगांचे..
मैत्री म्हणजे तरल मुलायम मोरपिस हळुवार
मैत्री म्हणजे दोन मनांचे पंख मनांच्या पार..
मैत्री म्हणजे रंगवनातील झुळझुळणारे वारे
सुख-दुःखाच्या पलिकडे ती जाणून घेते सारे ..
मैत्री असते नाजुक सुंदर भाषा डोळ्यांची
शब्दाविणही पटते ओळख हळव्या प्रेमाची..
मैत्री हसते ,मैत्री रडते ,मैत्री जपते मित्र
अशा मैत्रीचे चल रेखू या गोड गुलाबी चित्र...
-संगीता बर्वे, पुणे
मैत्री म्हणजे नाही केवळ गाणे फक्त क्षणांचे
मैत्री म्हणजे दो -हदयातील नाते युगायुगांचे..
मैत्री म्हणजे तरल मुलायम मोरपिस हळुवार
मैत्री म्हणजे दोन मनांचे पंख मनांच्या पार..
मैत्री म्हणजे रंगवनातील झुळझुळणारे वारे
सुख-दुःखाच्या पलिकडे ती जाणून घेते सारे ..
मैत्री असते नाजुक सुंदर भाषा डोळ्यांची
शब्दाविणही पटते ओळख हळव्या प्रेमाची..
मैत्री हसते ,मैत्री रडते ,मैत्री जपते मित्र
अशा मैत्रीचे चल रेखू या गोड गुलाबी चित्र...
-संगीता बर्वे, पुणे
Subscribe to:
Posts (Atom)











