Sunday, July 10, 2016

Mahesh Elkunchwar speak about Go.Ni. Dandekar







जेव्हा
ज्येष्ठ नाटकाकर..साहित्यिक महेश एलकुंचवार थेट रसिकांच्या भावनेला साद घालून
सांगतात..तेव्हा खरचं गोपाळ निळकंठ दांडेकर..साहित्यक्षेत्रातल्या आप्पांच्या
साहित्याबद्दलचा मराठी अभिमान जागा होतो..गोनिदांच्या नावाने दिला जाणारा मृण्मयी
पुरस्कार जेव्हा ते विजया मेहता यांच्या स्विकारतात..तेव्हा तर मान ताठ मानेने उंच
होत जाते.
शुक्रवारी
८ जुलैला..पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरातल्या उपस्थितांचे हात टाळ्यांसाठी  सतत सिध्द होत होते..त्यांच्या जन्मशताब्दी
सोहळ्याची सांगता या निमित्ताने झाली..पुरस्काराचे हे २६ वे वर्ष..निरा-गोपाळ
पुरस्कार दिला गेला तो जळगावच्या मॅगसेसे  पुरस्कार विजेत्या निलिमा मिश्रा यांना..तर यंदा
प्रथमच आप्पांच्या नावे प्रोत्साहन पुरस्कार दिला गेला तो बबन गिंडे या तरुण
कादंबरीकाराला..
गोनिदांच्या
कन्या आणि जावई डॉ. विणा आणि विजय देव यांच्या पुढाकारने मृण्मयी पुरस्कार दरवर्षी
८ जुलैला दिला जातो..गो. नि. दांच्या साहित्यावर प्रेम करणारे रसिक..वाचक यांचा हा
स्नेहमेळाच इथे भरलेला असतो..यंदा..ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू, दिपा
श्रीराम, नाटककार गो.पु. देशपांडे यांचे सारखे मान्यवर रसिकांमध्ये  उपस्थित असताना असा सोहळा अनुभवणे हे ही
भाग्याचेच होय..
अतिशय
भावनापूर्ण पुरस्काराचे भाषण करून गो नि दांच्या साहित्याचे श्रेष्ठत्व सिध्द करणारे
विचार महेश एलकुंचवारांच्या कडून ऐकायला मिळाले..यावेळी माचीवरचा बुधा या
चित्रपटाचे धावता ट्रेलरही उपस्थितांना दाखविण्यात आला..जुलै ते जुलै असे
किल्ल्यांवरचे अनुभव सांगणारी दीनदर्शीकाही इथे प्रकाशित केली गेली.
तर
आपल्या अध्यक्षिय भाषणात ज्येष्ठ दिग्दर्शिका आणि श्रेष्ठ कलावंत विजया मेहता
यांनी जो मनस्वी संवाद केला त्याला तोड नाही.. केवळ गोनिदांच्या परिवाराकडून मदत
स्विकारून हा सोहळा २५ वर्षे सातत्याने करणा-या सर्वांना आपण जे काम करीत आहात ते
खूप महत्वाचे असल्याचे सांगून..आपले आणि आप्पांचे मैत्र कसे होते याविषयी
विजयाबाईंनी त्यांच्या उत्तम शैलीत रंगमंचावरून जे वक्तव्य केले ते ऐकण्यासारखे
होते. आप्पांचे व्यक्तिमत्व हे अतिशय विरळा आणि अनोखे असल्याचे  त्या सांगतात.. मी त्यांना एक मुक्त फिरस्ता
म्हणत असे. ते मुक्त शोधक होते..ते कधी काय शोधत असतील हे कधीही कळायचे नाही.. गो
नि दांच्या शितू कादंबरीवरून जे नाटक लिहले त्याची मी दिग्दर्शीका आणि त्यातली
शीतूची भुमिकाही मी केली..पण ती भूमिका मला आप्पांनी समजून दिली..मी शहरी..मला
खेडयातल्या जीवनाचा अनुभव नाही..जोपर्यंत कलावंताला त्या भुमिकेचा गाभा सापडत नाही
तोपर्यत चाचपडत असतो..तमे माझे झाले..पण शितू करताना मला त्या भुमिकेचा
स्पर्शअनुभव करून दिला तो आप्पांना..कोकणातल्या खेड्यात नेले..तिथला निसर्ग वाचून
दाखविला..तिथल्या स्त्रीयांचा अनुभव दिला..त्या मातीत शेणाने सारविल्या जमीनीचा तो
ओलावा दिला..माझ्या लेखी आप्पांसारखा नाटककार मला भेटला नसता तर कलावंत आणि
दिग्दर्शिका म्हणून कमी पडले असते... पहिल्यांदाच कोकणी बोली भाषा ..त्यांच्यातली
देवाणघेवाण आमच्यापर्यंत पोहोचली .  केवळ
नाटकच नाही तर मला माझे पती हरी खोटे गेल्यानंतरचा ओलावा दिला तो आप्पांनी..
त्यावेळी मी तूला भेटायला आलो हे जाणवूच दिलं नाही.. मला तेव्हा त्यांनी जो आधार
दिला तो शेवटपर्यत रहाणार...
असाच
काहीसा भावनोक्तट अनुभव महेश एलकुंचवारांच्या वाडा चिरेबंदी नाटक दिग्दर्शीत
करताना कसा येत गेला ते विजया मेहता यांनी अतिशय खुलवून सांगितले..


सा-या
कार्यक्रमाची सूत्रे हाताळली ती गो नि दांची नात अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृणाल
कुलकर्णी यांनी.. महेश एलकुंचवारांचा परिचय करून दिला तो वीणा देव यांनी तर निलिमा
मिश्रा हिच्या कार्याची ओळख करून दिली ती विजय देव यांनी..



- सुभाष इनामादर, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Saturday, July 9, 2016

साधे आणि थेट काळजाला भिडणारे लिहणे हे गोनिदांचे वैशिष्ठ्य


वयाच्या १५ व्या सोळाव्या वर्षापर्यंत आई-वडील तुमच्याबरोबर असतात.. ते संस्कार घडवितात.  पुढे तुमचे तुम्हाला पुढे जायचे असते.. तसेच साहित्य क्षेत्रात मला भाषेची समज आली ती आप्पांच्या शितू मुळे.. त्यांनी मला सजग केलं.इतर साहित्यीकांची भाषा ही तशी जड होती.. पण आप्पांची कादंबरी वाचताना.. हा माणूस साहित्य लिहतोय अस वाटतच नव्हतं.. पण तशी भाषा लिहणं किती कठीण आहे..ते स्वतः लिहायला बसंलं.. की किती कठीण आहे हे आजही कळंतं. 
अल्पाक्षरी संवाद म्हणजे कीती..असावेत..१९५५ साली त्यांच्या या लेखनाने झपाटलो गेलो.. माझ्यावर ते संस्कार नकळत कुठेतरी झाले असणार.  मी जेव्हा लिहायला लागलो तेव्हा ते सारे हळुहळु शिकत गेलो..अल्पाक्षरी संवाद कसे असावेत..ते हळुहळु येत गेले.. भाषेचा संस्कार प्रत्यक्ष दिसत नाही पण होत असतो.. 
पारंपारिक भाषेचे सौंदर्य आप्पांच्या भाषेत दिसणार नाही..मला स्वतःला ती अतिव सुंदर वाटते कारण अशा प्रकारे मराठी साहित्यात यापूर्वी कुणी लिहले नाही.. ती अतिशय साधी आहे..साधे लिहणे हे तितके सोपे नाही..तसे साधे लिहायला फार मोठी तपश्चर्या लागते. ती थेट तुमच्या काळजापर्यत थेट पोहोचते.   त्यांच्या भाषेची भुरळ माझ्या मनावर खूप काळ होती.. जसे सगळे लेखक सतत तुमच्याबरोबर नसतात.. पण जर आप्पा नसते. विंदा नसते..दुर्गाबाई नसत्या तर आज मी जसं लिहू शकतोय तसं लिहू शकलो नसतो...फक्त ते घेण्यासाठी तुमचे मन सक्षम हवे..तसे संस्कारक्षम नसेल..तर विंदा..काय आप्पा काय दुर्गाबाई काय लिहत होत्या ते कळणेही दुरापास्त झाले असते.. 
आप्पा ज्या अनुभवला भिडले तो अनुभव मराठी वाचकाला पेलण्यासारखा नाही. शितू आणि पडघवलीतल्या नायिकांकडे पाहताना  त्यांचं भावविश्व इतके खोल आणि तरल आहे की तशा प्रकारे कधी कुणी आधी लिहले होते असं कधी वाटतं नाही.  त्यांच्या  भाषेच्या साधेपणाचे एक सामर्थ्य आहे.. ते इतकं अवघड आणि फसवं आहे की लक्षातच येत नाही.


असे जेव्हा ज्येष्ठ नाटकाकर..साहित्यिक महेश एलकुंचवार थेट रसिकांच्या भावनेला साद घालून सांगतात..तेव्हा खरचं गोपाळ निळकंठ दांडेकर..साहित्यक्षेत्रातल्या आप्पांच्या साहित्याबद्दलचा मराठी अभिमान जागा होतो..गोनिदांच्या नावाने दिला जाणारा मृण्मयी पुरस्कार जेव्हा ते विजया मेहता यांच्या स्विकारतात..तेव्हा तर मान ताठ मानेने उंच होत जाते.








शुक्रवारी ८ जुलैला..पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरातल्या उपस्थितांचे हात टाळ्यांसाठी  सतत सिध्द होत होते..त्यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याची सांगता या निमित्ताने झाली..पुरस्काराचे हे २६ वे वर्ष..





निरा-गोपाळ पुरस्कार दिला गेला तो जळगावच्या मॅगसेसे  पुरस्कार विजेत्या निलिमा मिश्रा यांना..तर यंदा प्रथमच आप्पांच्या नावे प्रोत्साहन पुरस्कार दिला गेला तो बबन गिंडे या तरुण कादंबरीकाराला..







गोनिदांच्या कन्या आणि जावई डॉ. विणा आणि विजय देव यांच्या पुढाकारने मृण्मयी पुरस्कार दरवर्षी ८ जुलैला दिला जातो..गो. नि. दांच्या साहित्यावर प्रेम करणारे रसिक..वाचक यांचा हा स्नेहमेळाच इथे भरलेला असतो..यंदा..ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू, दिपा श्रीराम, नाटककार गो.पु. देशपांडे यांचे सारखे मान्यवर रसिकांमध्ये  उपस्थित असताना असा सोहळा अनुभवणे हे ही भाग्याचेच होय..

अतिशय भावनापूर्ण पुरस्काराचे भाषण करून गो नि दांच्या साहित्याचे श्रेष्ठत्व सिध्द करणारे विचार महेश एलकुंचवारांच्या कडून ऐकायला मिळाले..यावेळी माचीवरचा बुधा या चित्रपटाचे धावता ट्रेलरही उपस्थितांना दाखविण्यात आला..जुलै ते जुलै असे किल्ल्यांवरचे अनुभव सांगणारी दीनदर्शीकाही इथे प्रकाशित केली गेली
तर आपल्या अध्यक्षिय भाषणात ज्येष्ठ दिग्दर्शिका आणि श्रेष्ठ कलावंत विजया मेहता यांनी जो मनस्वी संवाद केला त्याला तोड नाही.. केवळ गोनिदांच्या परिवाराकडून मदत स्विकारून हा सोहळा २५ वर्षे सातत्याने करणा-या सर्वांना आपण जे काम करीत आहात ते खूप महत्वाचे असल्याचे सांगून..आपले आणि आप्पांचे मैत्र कसे होते याविषयी विजयाबाईंनी त्यांच्या उत्तम शैलीत रंगमंचावरून जे वक्तव्य केले ते ऐकण्यासारखे होते.



आप्पांचे व्यक्तिमत्व हे अतिशय विरळा आणि अनोखे असल्याचे  त्या सांगतात.. मी त्यांना एक मुक्त फिरस्ता म्हणत असे. ते मुक्त शोधक होते..ते कधी काय शोधत असतील हे कधीही कळायचे नाही.. गो नि दांच्या शितू कादंबरीवरून जे नाटक लिहले त्याची मी दिग्दर्शीका आणि त्यातली शीतूची भुमिकाही मी केली..पण ती भूमिका मला आप्पांनी समजून दिली..मी शहरी..मला खेडयातल्या जीवनाचा अनुभव नाही..जोपर्यंत कलावंताला त्या भुमिकेचा गाभा सापडत नाही तोपर्यत चाचपडत असतो..तमे माझे झाले..पण शितू करताना मला त्या भुमिकेचा स्पर्शअनुभव करून दिला तो आप्पांना..कोकणातल्या खेड्यात नेले..तिथला निसर्ग वाचून दाखविला..तिथल्या स्त्रीयांचा अनुभव दिला..त्या मातीत शेणाने सारविल्या जमीनीचा तो ओलावा दिला..माझ्या लेखी आप्पांसारखा नाटककार मला भेटला नसता तर कलावंत आणि दिग्दर्शिका म्हणून कमी पडले असते... पहिल्यांदाच कोकणी बोली भाषा ..त्यांच्यातली देवाणघेवाण आमच्यापर्यंत पोहोचली .  केवळ नाटकच नाही तर मला माझे पती हरी खोटे गेल्यानंतरचा ओलावा दिला तो आप्पांनी.. त्यावेळी मी तूला भेटायला आलो हे जाणवूच दिलं नाही.. मला तेव्हा त्यांनी जो आधार दिला तो शेवटपर्यत रहाणार...

असाच काहीसा भावनोक्तट अनुभव महेश एलकुंचवारांच्या वाडा चिरेबंदी नाटक दिग्दर्शीत करताना कसा येत गेला ते विजया मेहता यांनी अतिशय खुलवून सांगितले..

सा-या कार्यक्रमाची सूत्रे हाताळली ती गो नि दांची नात अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांनी.. महेश एलकुंचवारांचा परिचय करून दिला तो वीणा देव यांनी तर निलिमा मिश्रा हिच्या कार्याची ओळख करून दिली ती विजय देव यांनी..
यानिमित्ताने गोनिदांच्या साहित्याची आजही वाचकांना भूरळ पडल्य़ाचे पुस्तकांच्या विक्रीवरून तर दिसतेच..पण त्यांच्या अनेक पुस्तकांचे पुनःप्रकाशनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यानिमित्ताने गा नि दां सारख्या ज्येष्ठ लेखकाची आठवण वाचकांच्या दारी कायम रहावी असाच हा सोहळा रंगत गेला..हे सांगायला नको.



- सुभाष इनामदार, पुणे
- subhashinamdar@gmsil.com
- 9552596276

Saturday, May 28, 2016

शुक्रतारा साहित्यात पुन्हा प्रकाशित झाला

त्यांचे गाणे आजही अनेक गायक आपापल्या आवाजात ते गातात..त्याला टाळ्याही पडतात...मात्र वयाची बांधिलकी आल्याने आता वयाच्या ८३ व्या ते गाऊ शकत नाहीत..मात्र त्यांच्या प्रत्येक गाण्याच्या असंख्य तबकड्या आणि सीडी अनेक रसिकांच्या घरात ऐकल्या जात आहेत..४ मे १९९४ ला असाच एक साहित्य क्षेत्रातला चमत्कार घडला...शतदा प्रेम करावे...यां नावाने अरूण दाते यांनी आपल्या आयुष्यातस्या आठवणी शब्दरूपाने पुस्तकातून मांडल्य़ा...

हेही पुस्तक त्यांच्या गाण्य़ाइतकेच सुरेल झाले होते..त्याचे प्रकाशन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले..त्याला आता २१ वर्ष झाली...आजही तीच आवृत्ती फिरते आहे...आता मात्र ते पुस्तक बाजारात मिळत नाही...म्हणूनच मोरया प्रकाशनाने ते शुक्रतारा ..या नावाने..अरुण दाते यांच्या सुगम संगीताच्या गाण्याला ५५ वर्षे पुरी झाली ..या निमित्ताने तेच पुस्तक प्रकाशित केले..

पुण्यात यशवंतराव चव्हाण नाट्यगृह  २६ मे रोजी रसिकांनी तुडूंब भरले होते..अतुल दाते यांच्यामुळे या गितांचाही आस्वाद रसिकांना घेता आला...ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांच्या हस्ते हे पुस्तक पुन्हा रसिंकाच्या चरणी रूजू झाले..सुलभा तेरणीर आणि धनश्री लेले यांच्यामुळे ते लिखित स्वरूपात साकार झाले...समर्थ रामदासांचा जीवनपट खुलवून सांगणारे अभ्यासू संतसाहित्याचे अब्यासक सुनिल चिंचोळकर हेही इथे ङजर होते..

स्वतः अरूण दाते सारे अनुभवत रंगमंचावर दिलखुलासपणे दाद देत होते..रंगमंचावर शुक्रतारा पुस्तकाचे मुखपृश्ठ झळकत होते..रसिकांना अरुण दाते यांच्या गाण्यांचा ‘स्वरगंगा’ हा कार्यक्रम ऐकण्याची.  उत्सुकता होती..ती गाणी आज मंदार आपटे, श्रीरंग भावे, शरयू दाते, रेवा तिजारे हे कलाकार ती सादर करणार होती..

मात्र या पुस्तकांची दुसरी आवृत्ती निघायला २१ व्रषी लागावी ही खंत अनेकांच्या भाषणातून व्य़क्त होत होती.. दाते साहेबांच्या दोन मैफली असतात..एक गाण्याची मैफल आणि एक गप्पांची मैफल..विजय कुवळेकरांनी यातल्या काही आठवणीही इथे सांगितल्या..टेक्स्टाईल इंजियरची परिक्षा नापास होऊनही नापासाची तार जेव्हा इंदूरला बाबांच्या..रामुभौय्यांच्या हाती पोहोटली तेव्हा बाबांनी सर्वांना बोलावून पार्टी द्यायचे ठरले..तेव्हा बाबा म्हणाले होते..

`टेक्स्टाईल इंजिनियरिंगमध्ये पास होणारे संख्य लोक असतील पण नापास झाला तरी उत्तम गाणारा दुस-या कुणाचा मुलगा आहे का..``..ह्या वडीलांनी मुलाला दिलेला आत्मविश्वास आजही ठळकपणे सांगितला पाहिजे..प्रतिभावंताचे काम हे चंद्रासारखे असले पाहिजे..हे बा.भ. बोरकारांचे सांगणे कुवळेकरांनी इथे आवर्जुन सांगितले..अरू भेय्यानी आपल्याला आलेल्या असंख्य दाहक गोष्टींचे चांदण्यामध्ये रूपांतर करून लोकांना दिले.. शुक्रता-याला जे तेज लाभले ते या चांदण्याचे तेज आहे. ते कधीही ढळणे शक्य नाही...असेही कुवळेकरांनी स्पष्ट केले..

ज्यांनी हे पुस्तक शब्दांकित केले त्यांनी सांगितले की ते जेवढे उत्तम गातात..तेवढेच ते उत्तम बोलतातही..ते बोलणे टिपण्याची संधी मिळाल्याचे समाधान सुलभा तेरणीकरांनी आपल्या संवादात सांगितले..





‘शुक्रतारा’ या गाण्याला नुकतीच पूर्ण झालेली ५५ वर्षे, देशात आणि परदेशात ‘शुक्रतारा’चे झालेले २ हजार ६०० प्रयोग, अरुण दाते यांचे ८३ व्या वर्षांतील पदार्पण या निमित्ताने मराठी भावसंगीतातील ‘शुक्रतारा’ असणाऱ्या अरुण दाते यांचा जीवनप्रवास नव्या स्वरूपात रसिकांपर्यत..वाचकांपर्य़त पोहोचले याचा आनंद इथे व्यक्त होत होता..



- सुभाष इनामादार, पुणे
९५५२५९६२७६

Monday, March 14, 2016

Jugalbandi-nilima radkar and charusheela gosavi





रविवारी १३ मार्च २०१६ ला पुण्यात स्वरबहारच्या वतीने पं. गजाननबुवा जोशी यांच्या १०५व्या जयंती निमित्ताने त्यांचे शिष्य पं. भालचंद्र देव यांनी व्हायोलीन वादनाची मैफल आयोजित केली होती..

यात पं. भालचंद्र देव यांच्यासह सौ. चारुशीला गोसावी, सौ. निलिमा राडकर, रजत नंदनवाडकर, अभय आगाशे या व्हायोलीन वादकांनी आपली कला सादर करुन रसिकांची दाद मिळविली.

यात सौ. चारुशीला गोसावी आणि सौ. निलिमा राडकर यांनी जुगलबंदीत राग भिमपलास सादर केला.

संपूर्ण कार्यक्रमाला तबला संगत केली ती रविराज गोसावी यांनी.
तर निवेदन केले ते राजय गोसावी यांनी..

Sunday, February 28, 2016

केरळ- निसर्गाची उधळण..एक साठवण


बारा दिवसाची करेळ स्पेशल सहल सुमारे ५५०० कि.मि. करून २२ जानेवारी १६ ला पुण्यात स्थिरावलो खरे..पण आजुनही तो निरसर्गसंपदा डोळ्यासमोरून जात नाही. पुन्हा एकदा जर कुणी केरळात जाता
का म्हणून सांगितले तर आधी चहाच्या मळ्यांनी सजलेल्या केरळच्या लोकांनी राखलेलेल्या मुन्नारकडे धाव घेईन.

गुरुनाथ ट्रॅव्हल्सच्या उत्तम व्यवस्थापनाच्या संगीतीने बारा दिवस कसे भुरकन निघून गेले कळलेही नाही..त्यातही गरम जेवणाचा आस्वाद..रोज नवा गोड पदार्थ पोटात पडत होता..
खाण्याची मौज घेत पहाटे सारे जण विविध स्थळांकडे निघत होतो.. त्यासाठी पांडुरंग बटावले, कृष्णा भोईर,धोंडू शेडगे आणि उद्याचा व्यवस्थापक संजय जाधव यांची नावे घ्यावी लागतील.
संतोष कोंढाळकर यांच्या मार्गदर्शनाने केरळ अनुभला. कन्याकुमारी गाठली. त्यांचे स्मरण झाले की मन मोहरून उठते.. कोचीन ते त्रिवेंद्रम हा प्रवास करविणारा बसचा चक्रधर महारज साजी याचीही आठवण झाल्याशिवाय रहात नाही.


आजच्या जमान्यात त्यांचे स्मरण ही केवळ मनात नाही तर मोबाईलच्या चौकोनात टिपत सारी दृष्ये पुन्हा अनुभवण्याचे भाग्य आहे..
जे मी अनुभवले ते तुमच्यापर्यंत सांगण्याचा हा प्रयत्न ..


https://www.facebook.com/subhash.inamdar/media_set?set=a.10153558887143172.1073741914.739823171&type=3&pnref=story

भाग दौन.
पहिला भाग पाहिलेल्या कांहीनी फोन करून सांगितले आम्ही केरळला गेलो नाही..पण तिथे गेल्याचा भास तुमचे फोटो पाहून आला..

ये तो छॉॅकी है..पिक्चर अभी बाकी है..

https://www.facebook.com/subhash.inamdar/media_set?set=a.10153561076433172.1073741915.739823171&type=3

भाग -३ मुन्नारच्या वाटेवर..हिरवळीवरून
मुन्नारकडे बस धावत होती तेव्हा सारे डोळे बाहेरच्या हिरवाईकडे खूलून होते. सारा निसर्ग जणू आपल्या दोन डोळ्यात साठविण्याची एकच घाई झाली होती.

https://www.facebook.com/subhash.inamdar/media_set?set=a.10153564725878172.1073741916.739823171&type=3&notif_t=like

भाग.४. ..आणि मुन्नारचा मुक्काम

https://www.facebook.com/subhash.inamdar/media_set?set=a.10153573444623172.1073741917.739823171&type=3

भाग- ५..मुन्नार ते टेक्कडी..निसर्गसहल..
मुन्नार ते टेक्कडीचा हा प्रवास आहे खास दोन थंड हवेची ठिकाणे..पण एक उंचावर..तर दुसरा उतरता होत गेलेला..पण पाणी,मुबलक हिरवीगार जेमीन आणि मसाल्याच्या पदार्थानी फुललेली हिरवीगार डोंगरउतावर बेतली गेलेली शेती.. सारेच निसर्गरम्य..

https://www.facebook.com/subhash.inamdar/media_set?set=a.10153575446408172&type=3&pnref=story

भाग- ६ पेरियार उद्यानाची सफर- विलक्षण

https://www.facebook.com/subhash.inamdar/media_set?set=a.10153579289783172.739823171&type=3
भाग(७)..
खरं तर किती फोटो टाकावेत याचे भान राहिले नाही हे खरे..पण टेक्कडीचे वैशिष्ठ्य सांगताना एक सांगणे आवश्यक आहे..की रस्त्याच्या डाव्या बाजुचे केरळ तर उजवीकडे जाणारा रस्ता म्हणजे तामिळनाटू..ही विभागणीच वेगळी वाटते.. करळ मध्ये पान. तंबाखूला कस्त बंदी..तर तामिळनाडून सारे काही स्रर्रास मिळते..
मात्र खरी मौज आहे..ती शबरीमला आणि पेरियार दोन जागतिक कीर्तीची ठिकाणे इथून अगदी जवळ..म्हणून पर्यटकांची वर्दळ सतत असते..
टेक्कडी ते् आलेप्पी भॅक वॉटरचा हा प्रवास म्हणून अगदी वेगळा..एका बाजुला थंड हवा..तर उतरतीला समुद्र जवळ असणारी गरम ऊबदार गरम हवा..

https://www.facebook.com/subhash.inamdar/media_set?set=a.10153594698283172.1073741925.739823171&type=1

भाग (८)—केरळ—आलेप्पी वॉटर पाण्यावरचा तरंगता प्रवास
आलेप्पी बॅक वॉटरमधली बोट घेतल्या पासून पाण्यावर आम्ही चार तास सुमारे ४० मैल अंतर कापत निघालो..पाण्यावर तरंगत होणार हा प्रवास निसर्गाचे वरदान लाभलेल्या केरळच्या सौंदर्याच्या सा-या खुणा साठविणार हे आता नक्की झाले हेत..ते सारे डोळे भरून पाहिले..मन आणि डोळे ते सारे पाहून समाधानाने भरून पावले..एवढेच मी सांगेन..

https://www.facebook.com/subhash.inamdar/media_set?set=a.10153596836243172&type=1

केरळ.(९)—निसर्गाची सौंदर्यानुभूती
केरळच्या विविध ठिकाणचे सौंदर्य मनाला भुलविते..पुरवाच एक जण सांगत होते..की रेल्वेने जाताना केरळ आला की दुतर्फा दिसणारी नारळाची नवसंपदा..आणि त्याकडे केरळवासींयांनी दिलेले लक्ष मनाला आनंद देते..पण रेल्वेचा प्रवास इतका होतो..की कीति वेळ तेसारे पहात बसणार..डोळे थकून जातात...
हे जरी खरे असले तरी तिथे या परिसरात गेल्यावर तुम्ही निसर्गाच्या अधिन होता हेही तितकेच सत्य आहे..
तेच सत्य दाखविण्याचा मोह मलाही पडलाय..

https://www.facebook.com/subhash.inamdar/media_set?set=a.10153608501508172.1073741931.739823171&type=3&notif_t=like

केरळ (१०)—कन्याकुमारी एक अनुभूती
केरळ पाहण्यातला आनंद घेत घेता तामीळनाडूत कधी दाखल झालो हे कळलेदेखील नाही..खर तर केऱळ संपून तामिळनाडूच्या सीमेत दाखल झालो..ते कळाले नागरकोविल, सुचिंद्रमचा अनुभव घेतल्यावर..मात्र भारताचे दक्षण टोक कन्याकुमारी..जिथे तिन समुद्रांचा एकत्र प्रवाह अथांगता..एवढ्या एका शब्दातच वर्णन करावे लागेल.. अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर या तिघांच्या संगमावरील टोक कन्याकुमारी . कन्याकुमारीचं विशेष आकर्षण म्हणजे भर समुद्रात स्वामी विवेकानंद यांनी तपस्या केलेल्या खडकावर उभारलेलं त्यांचं अप्रतिम स्मारक. निसर्ग आणि मानवनिर्मितीच्या अथक प्रयत्नांची वेगळीच सुखद अनुभूती तेथे पाऊल टाकताच येते. स्मारकाचा सर्व परिसर अतिशय संत, स्वच्छ, उदात्त, प्रसन्नस्वामी विवेकानंदांचा साडेसात फूट उंचीचा तेज:पुंज धीरोदात्त पुतळा जणूकाही विश्वबंधुत्व, संतीचा संदेश देत अढळपणे उभा आहे. असं वाटतं समोरच्या एका खडकावर पावलाच्या आकाराचा ठसा उमटला त्यावर पद्ममंडपाची उभारणी केली आहे. हे पार्वतीच पाऊल असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. घंटांचे घणघणते आवाज नसलेल्या पवित्र, शुचिर्भूत वातावरणात एखाद्याला शांतपणे ध्यान करावसं वाटल्यास त्यासाठी येथे खास ध्यानमंडपही बांधण्यात आलेला आहे. विराट सागरामधील हे स्मारक मानवाला निसर्गदेवतेपुढे नतमस्तक व्हायला लावत.
कन्याकुमारीला विवेकानंदपुरम चा सुंदर परिसरही नक्कीच पहावा ..अनुभवा असा आहे..एकनाथजी रानडे यांनी केलेल्या कामाचे यथार्थ दर्शन त्यांच्या चित्रप्रदर्शनीतून होते..तर १०० एकराच्या परिसरात फिरत असेलेले मोरांचेआवाजही..आणि एकनाथजी रानडे..स्वामी विवेकानंद यांची समाधी पाहून सागराच्या या प्रवाहात एका महामानवाने केलेल्या कार्याची प्रचिती येते..


https://www.facebook.com/subhash.inamdar/media_set?set=a.10153623230958172.739823171&type=3


केरळ (११)-तिरूअनंतपुरम्..अखेरच्या टप्प्यात

केरळ सहलीचा हा अखेरचा टप्पा..म्हणजे त्रिवेंद्रम..अर्थात तिरुअनंतपुरम्..केरळची ही राजधानी..अतिशय प्रसिध्द असे पद्मनाभ मंदिर..तिथले..प्राणीसंग्रहालय..राजा रविवर्मा आर्ट गॅलरी..आणि कोवल्लम बीच...
सारेच प्रेक्षणीय..मनोबल उंचावणारे..शहरातल्या साड्यांचे विलोभनिय दालन..मोठाले रस्ते..वेगवान तशी श्सतबध्द वाहतूक..भव्य विधानभवन..आणि अगदी स्वच्छ असे रेल्वे स्थानक..
तिथूनच पुण्याकडे येण्याचा परतीचा प्रवास घडतो..
ही सहल केवळ विस्मयनीय अशीच होती..
त्यातल्या कांही त्रुटीही पुणेरी पध्दतीने गुरुनाथच्या पुण्याच्या कार्यालयात दप्तरी नोंदविल्या..त्याचे उत्तरही आले..

भरून पावले....पाहू या पुढचा प्रवास कुठे होतो ते..

https://www.facebook.com/subhash.inamdar/media_set?set=a.10153624664613172&type=3&pnref=story


(वाचकहो..या मधल्या लिंक या फेसबुकच्या आहेत..त्या तशाच्या तशा उचलल्या तर तु्म्ही फेसबुकवर हे सारे अल्बम पाहू शकाल...त्या लाईव्हा झाल्या नाहीत याबद्दल क्षमस्व..)

- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276


Wednesday, February 17, 2016

प्रेमरंगाच्या नाट्यपदांनी रंगलेली संध्याकाळ




विद्याधर गोखले संगीत नाट्य प्रतिष्ठानच्या कलावंतानी रविवारी प्रेम व्यक्त करण्याच्या दिनी मराठी 
संगीत नाटकांची परंपरा कायम ठेऊन..अगदी आण्णासाहेब किर्लास्करांपासून,,भास्करबुवा बखले, खाडीलकर, बालगंधर्व..राम मराठे, जितेंद्र अभिषेकी..ते कान्होपात्रा..ते कट्यार..ते स्वरसम्राज्ञी...पासून अनेक नाटकातली प्रेमविषयक भावना विविध रागात गुंफणारी सुंदर ओंजळ रसिकांच्या चरणी समर्पित केली.



व्हेलंटाईन दिनी आपली संगीत नाटकांची जुनी परंपरा सिध्द करत नवीन कलावंतांच्या साभिनय आणि सवेश प्रवेशांची आगळी मालिकांच पुण्यातल्या प्रेमरंग या कार्यक्रमातून शुभदा दादरकर यांच्या लेखनातून गुंफत मुक्तपणे नाट्यसंगीताच्या चाहत्या रसिक वृंदांसमोर सादर करुन वाहवा मिळविली..




मधुवंती दांडेकर आणि श्रीकांत दादरकर यांनी प्रतिष्ठानच्या दोन वर्ष नाट्यसंगीताची तालिम घेणा-या गुणी कलावंतांना रंगमंचीय कसे वावरावे..कसे गावे..गाताना चेहरा कसा हसरा ठेवावा..या सा-याची रितसर तालीम दिली.

नाट्यसंगीत गाताना ते वेळेच्या मर्यादेनुसार कसे विविधरंगी बनवावे याचे प्रशिक्षणही यामुळे  इथे मिळाले..




असे कार्यक्रम महिन्यातून एक तरी करण्याचा मानसही शुभदा दादरकर यांनी बोलून दाखविला..
यात काम करणारे कलावंत..धीटाईने सारे काही साग्रसंगीत सादर करून रसिकांच्या पसंतीस उतरत होते..
हिमांशू जोशी आणि विद्यानंद देशपांडे यांची ऑर्गनची आणि तबल्याची साथ घेऊन ..संगीत नाटकातली पदे ही मुले तन्मयतेने वेशभुषेसह गात होती...

सादर करताना नटी-सूत्रधाराच्या हातात कार्यक्रमाची सूत्रे देत..सारा प्रेमरंगाचा प्रवास होत होता..
यात हेमंत आठवले..सूत्राधार..दिपाली राजे...नटी...तर त्यांच्या जोडीला नाट्यपदांची विविधरंगी मोरपिसे रसिकांच्या मुखी नाटविली ती ...अनुजा माढेकर, लीलाधर चक्रदेव, मीनल पोंक्षे, माधवी केळकर, कल्याणी बडगुजर, मानसी दातर आणि मानसी बडवे या कसदार कलावंतानी..

संगीत नाटकांची मजा काही वेगळीच असते..त्यातही ते ते रुप घेऊन तुम्ही ती पात्रेच बोलावली तर रंगमंचावर पाहतानाही सुंरेख वाटते...

असे कार्यक्रम करताना आगामी कलावंतांची एक फौज तयार होऊन नवे संगीत नाटक नव्या स्वरूपातही पुढे-मागे य़ेऊ शकेल..असी आशा करावयास काहीच हरकत नाही..









पुन्हा एकदा सा-या कलावंतांचे आणि सादरकर्त्या संस्थेलाही धन्यवाद द्यायला हवेत...




कार्यक्रमातल्या काही पदांचे चित्रिकरण या लिंकवर पहाता येते..



- सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276

Friday, February 12, 2016

गदिमा अनुभवण्याचे भाग्य लाभले..गदिमायनमधून


मानव्य संस्थेच्या संस्थापिका विजयाताई लवाटे...
देहविक्रय करून चरितार्थ करणाऱ्या असहाय्य स्त्रियांचा आधार असलेल्या.....फूटपाथवर भाजीपासून कपड्यांपर्यंतच्या वस्तूंची विक्री करणाऱ्या हजारो कष्टकऱ्यांचा आधार असलेल्या.....एड्सग्रस्त मुलांच्या पाठीवरून फिरणारा आईच्या मायेचा हात असणाऱ्या 'मानव्य' संस्था च्या कर्त्या धर्त्या….मानवतेचा, प्रेमाचा, वात्सल्याचा आणि निरपेक्ष माणुसकीचा वारसा देणाऱ्या विजयाताई लवाटे.....!!!

एचआयव्हीबाधित मुलांना त्यांचे जीवन सुखाने जगता यावे याच उद्देशातून सामाजिक कार्यकर्त्यां विजयाताई लवाटे यांनी ‘मानव्य’ संस्थेच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली.
आता त्याला अकरा वर्षे झाली..काल म्हणजे ११ फेब्रुवारी २०१६ हा त्यांचा स्मृतिदिन..तो एस एम जोशी सभागृहात साजरा केला गेला..मानव्य संस्थेत आपल्या पुढच्या आयुष्याची दिशा ठरविणारी मुलंही इथे एकमेकांना बिलगून आपल्या या प्रेमाचा ओलावा शोधत होती..
यानिमित्ताने डॉ. अारुंधती सरदेसाई यांनी या मुलांच्या जीवनात आई-वडील, आजीःआजोबांचे प्रेम मिळावे अशी अपेक्षा व्यक्त करीत ...विजयाताई लवाटे यांच्या कार्याची स्तुती  तिथे सर्वांच्या तोंडून होत होती..त्यांच्या कार्याने वाढलेल्या संस्थेचे बळ वाढविणारी आर्तिक मदतही लोक देत होते..एकूणच मानव्यच्या कार्याची पोचपावती समाज देत होता..

त्यातच भर म्हणून अलौकिक प्रतिभेचे कवी, लेखक, कलावंत आणि गीतरामायण लिहून अजरामर केलेले गदिमांचे मोठेपण सांगत त्यांच्या चित्रपट गीतांना पुन्हा एकदा सादर करून ती पोचपावती आपल्या गदीमायन या कार्यक्रमातून गदिमापुत्र आनंद माडगूळकर यांनी मानव्यसाठी जमलेल्या उपस्थितांना त्या काळाची आठवण करून दिली..
त्यांच्या थोरवीच्या आणि कवीतल्या श्रेष्ठत्वाची उदाहरणे देऊन गदिमांचा जीवनपट आनंद माडगूळकर सांगत होते..
नाटककार बाळ कोल्हटकरांनी आनंदला जेव्हा गीतरामायणातले एखादे गाणे म्हण म्हणून आग्रह करताना ते सादर करताना त्यांच्या डळ्यातून घळघळा अश्रूंचा बांध फुटला..आणि त्यांनी सांगितले ते ऐकताना गदिमा माझ्यासमोर मूर्तीमंत उभे राहिले...हेच गदिमा पुन्हा आपल्या स्मरणात आणण्याचे कसब आनंद माडगूळकरांच्या वाणीत त्यांच्या निवेदनात आणि त्यांच्या ओघवत्या गीतात पुरेपुर आहे..हे रसिकांनी जाणले...आणि गदिमायनच्या कार्यक्रमाचे स्वागत करत हा कार्यक्रम ऐकत रहावा ..


गदिमा पुन्हा एकदा आपल्या कथानकातून बाहेर येत ओजस्वी वाणीने प्रतिभेचे लेणे लाभलेल्या पुत्राकरवी ऐकण्याचे भाग्य मिळाल्याचा आनंद इथे येत राहिला..


त्याचे सूत्रसंचालन करणा-या विनया देसाई यांचाही सहभाग लाभल्याने ही मैफल सुरु होता होता केव्हा संपली ते कळलेही नाही.. तसेच त्यांना तबल्याची यथोचित सासंगत करणारे आनंद गोडसे यांचाही उल्लेख करावा लागेल..त्यांच्या योग्य असा ठेक्यातून सहजपणे गीत सादर होत होते..









खर तर असा कार्यक्रम मानव्यच्या व्यासपीठावर ऐकायला मिळाला याचे समाधान वाटते..





-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

आठवणीतही टवटवीत असलेले पोएट सुधीर मोघे



सोमवारी पुणेकरांनी दोन कार्यक्रमातून कवीराज सुधीर मोघे यांची स्मृती जागविली.. एक टिळक स्मारक मंदिरात डॉ. सलील कुलकर्णी आणि शुभंकर कुलकर्णी या पिता-पुत्रांनी टिळक स्मारक मंदिरात.....
....तर पुणेकर कलावंताला दूरदर्शनवरून थेट बोलते..करणारे निर्माते अरुण काकतकरांनी सुधीर मोघे यांच्या पंधरा कवीता..गीतांची पार्श्वभूमी सांगणारी आणि जिवनाबद्दलच्या जाणावांचे आणि आपण गेल्यानंतर काय उरावे यांची आपल्या कवीतेमधून सांगितलेली आठवण पुन्हा एकदा रसिकांसमोर ठेऊन मनोहर मंगल कार्यालयात अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या केल्या..
संस्कृती प्रतिष्ठानच्या शिरीष बोधनी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाची सुरवात मानसी मागिकर यांच्या प्रास्तावीकाने झाली..तर पुढे सलग तेरा आठवणीतून स्वतः सुधीर मोघे आपल्या आयुष्यातल्या विविध टप्प्यावर भेटलेले संगीतकार, निर्माते यांच्याशी कवीतांबाबात झालेल्या चर्चेतून चित्रपटातली गीते कशी कागदावर उतरत गेली याचे वर्णन सांगणारी मालीकाच रसिकांसमोर येत गेली..
अरूण काकतकरांनी सुधीर मोघे यांना बोलते केले..आणि तो बोलवीता धनी आपले मनोगत रसाळ वाणीत सांगत गेला..
इथे पोएट सुधीर मोघे बालते झाले..

बोलताना कांही ठिकाणी थांबून त्यांची गाणी विशेषतः राम फाटक यांनी संगीत दिलेले भावगीत सखी मंद झाल्या तारका आपले गुरू पं. भीमसेन जोशी यांनी कसे गायले..आणि ते सांगताना दोघांचे मोठेपण.. भीमसेन जाशी आणि सुधीर फडके यांचीही आठवण सांगून  उपेंद्र भट यांनी रसिकांना भरभरून आनंद दिला.
हे नायका जगदीश्वरा ..ही नांदीही भट यांनी सादर केली..

गुरु एक जगी त्राता..हे गीत प्रमोद रानडे यांनी सादर केले..



आदिती देशमुख यांनी ..झुलते बाई रास झुला..आणि उत्कर्षा शहाणे यांनी ..एकाच या जन्मी जणू फिरूनी जणू जन्मेन मी..आणि... सांज ये गोकुळी गाऊन सुधीर मोघे यांच्या ओघवत्या शेलीची आठवण करून दिली.





या कार्यक्रमाचे वर्णन कवी सुधीर मोघे यांच्याच शब्दात सांगण्याचा मोह होतो..

क्षण जगून झालेले
जुन्या पानात जपावे
डोळ्यातील पाण्यानेच
नवे पान उलटाले..

अरूण काकतकरांनी हा अनुभव दिला..त्याबद्दल त्यांचे मनासापून ऋण...
पोएट सुधार मोघे..तुम्हाला आठवताना खूप कांही सोसावं लागते..
तुम्ही जपलेल्या आठवांना इथं.
स्मृतीत भरभरून सांभाळावं लागतं..




-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Monday, January 25, 2016

संगीत नाटकात गद्यातून येणारे पद्य प्रवाही असावे...

-निर्मला गोगटे

संगीत नाटकात येणारे पद्य हे नाटकाचे कथानक पुढे नेणारे असते..
शास्त्रीय संगीताचा अतिवापर न करता भावना आणि प्रसंगाला साजेसे गायन केले तर नाटकातले संगीतही तेवढेच नाटकाला पुढे नेते...
खरी संगीत नाटके म्हणजे सौभद्र आणि शारदा असे मी मानते..ज्यात नाटकातली पदेही कथानकाला पुढे नेणारी आहेत..अर्थवाही पदांना चालीही तशाच सहजसुंदर दिल्या गेल्या आहेत..
नाट्यसंगीता गाताना शास्त्रीय संगीताचे ज्ञान हवेच..पण भावनांचा विचार करून तसे राग निवडून पदांना रसिकांच्या मनापर्य़त पोहचविणेही आवश्यक असते..
बालगंधर्वांनी आपल्या नाटकांनी रसिकांनाभारावून टाकले..
तर पुढे मानापमान, स्वयंवर..पुढे पंडीतराज जगन्नाथ, सुवर्णतुला..ते बावणखणी या विद्याधर  गोखले आण्णांच्या नाटकांनी ..
आणि नंतर मत्स्यगंधा ..वसंतरांव देशपांडे यांच्या कट्यारनी एक विक्रम घडविला..
आज संगीत नाटक काही प्रमाणीत टिकून आहे..मात्र ज्यांना कुणाला संगीत नाटके लिहावयाची असतील त्यांनी शारदा नाटकातल्या प्रवाही आणि सहज सोप्या भाषेचा अभ्यास करावा...



असे कितीतरी संवाद पुण्यात जमलेल्या दर्दी रसिकांच्या कानावर अडिच तास पडत होते..निमित्त होते..संगीत नाटकात आपली कारकीर्द गाजविणा-या निर्मलाताई गोगटे आणि मधुवंती दांडेकर या दोन संगीत अभिनेत्रींच्या ओघवत्या ..प्रवाही सप्रयोग वक्तव्यातून..त्यांच्याबरोबर ज्येष्ठ समीक्षक डॉ. वि.. भा. देशपांडेही सामिल होवून संगीत नाटकांचा १८४३ सालापूसूनचा इतिहास  बोलता करीत होते..ते भारती निवासच्या सभागृहात..साथिला विद्यानंद देशपांडे तबल्यावर तर  संजय गोगटे ऑर्गनच्या साथीला..



 सोबत  नांदीत गायल्या होत्या  त्या  अंजली दाणी आणि नांदीबरोबर भैरवीतही आपला सहभाग दिला त्या होत्या प्रसिध्द गायिका अंजली मालकर...









संगीत नाटकांची मर्मस्थाने आणि त्यातल्या विविधतेची..नाटककारांची, लेखकांची आणि परंपरांची चर्चा इथे रंगत होती..
अनेक नटांची नावे कानावर पडत होती..अनेक संगीत दिग्दर्शक पुन्हा पुन्हा ऐकिवात येत होते..तो काळ पुन्हा आठवावा..सम्रणात रहावा असाच होता.

नांदी ते भैरवी ..आणि मधुनच पदांनी आपल्या आवाजातून साकार करणा-या दोन गायक अभिनेत्री..आपल्या अनुभवातून संगीत नाटकांवरची आपली ठाम मते मांडत रसिकांच्या पसंतीला उतरत होत्या..



असा कार्यक्रम म्हणजे रसिकांना मिळालेली नाट्यपरंपरा ऐकण्याची पर्वणीच होती..संगीत विकास परिषदेच्या वतीने डॉ. विकास कशाळकर यांनी तो आयोजित केला होता..त्यांचेही आभार..

पुन्हा पुन्हा ऐकत रहावी आणि असे कांही काळाला अनुरूप संगीत नाटक यांवे अशी मनोमन इच्छा होत होती..



- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Friday, January 8, 2016

आठवणीतली शब्दवारी..नवा मराठी अल्बम प्रकाशीत


राहूल सुधीर आपटे नावाच्या तरुणाचा आठवणीतली शब्दवारी..एक सुरवात...

या नावाचा मराठी संगीतातला नवा अल्बम गुरुवारी ७ जानेवारी १६ ला टिळक स्मारक मंदिरातल्या उपस्थित सुह्रुदांच्या साक्षीने जेव्हा आजच्या पीढीचे संगीतकार म्हणून ज्यांचा गौरवाने उल्लेख केला जातो..त्या डॉ. सलील कुलकर्णी यांच्या हस्ते जेव्हा प्रकाशीत झाला तेव्हाचा हा प्रकाशदर्शनाचा प्रयत्न..

अनिल विठ्टल बोरोले आणि राहूल सुधीर आपटे या गीतकारांचा ही पहिली निर्मिती.आजपर्य़त ते दोघे जोडीने सगळीकडे दिसत गेले..पुढेही ही जोडी कामय राहून पुन्हा नव्या अल्बमची सुरवात ते करतील याची खात्री आहे..

आजपर्य़त आपण कुठल्याही अव्बम किंवा सीडी प्रकाशनाच्या समारंभात प्रमुख पाहुणा म्हणून गेलो नाही..मात्र या दोन कवी आणि संगीतकार राहूल आपटे यांच्या या संगीतात नवे कांही करु पाहणा-या तरुणांच्या प्रयत्नाला दाद देण्यासाठी आलो..मीही काही वर्षापूर्वी अशाच धावपळीच्या लगबगीतून इथे गेलो आहे..ही वेळ फार चांगली आणि धाकधुकीची असते..तुमच्या या प्रामाणिक प्रयत्नाला खूप शुभेच्छा..आता वारी सुरुच केली आहेच..पण आता थांबू नका...वारी निघाली आहे..ती पंढरपूरला पोहोचणार आहे...मात्र आता सतत काही ना काही करत रहायचे आहं..तुमची हि सुरवात आहे...पुढे पताका घेऊन चालत रहा..


असा मोलाचा सल्ला डॉ. सलील कुलक्रमी यांनी दिला..
आपल्या वाटचालीविषयी राहूल आपटे सांगतात..गीताची आवड पहिल्यापासूनच, १५ वर्षांचा असल्यापासून गाणी ऐकणे आणि पेटीवर वाजवायचा प्रयत्न करणे हा छंद होता.
हळुहळु त्यात रुची निर्माण होऊन त्यात वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरुवात केली, पण काही क्लास लावून शिकता आलं नाही.
कॉलेजच्या वयात काही कविता पण केल्या, काही चाली पण बसवल्या.
पण एवढी वर्ष ते त्या आवडीपुर्तच मर्यादित राहिलं...
५ महिन्यांपूर्वीच माझा कवी मित्र अनिल या बरोबर बसलो असता, त्याने त्याच्या काही कविता ऐकवल्या आणि मीही माझ्या काही कविता आणि चाली ऐकवल्या, दुधात साखर पडावी तसा दुग्धशर्करा योग घडून ती संध्याकाळ एका छोटेखानी मैफिलीत सजून गेली.
माझे आजोबा स्व. संगीत सुधाकर पंडित वि. दे. अंभईकर यांच्याकडून शास्त्रीय संगीतातील एकही गोष्ट शिकू शकलो नाही याची खंत आहे, पण त्यांच्या कडून मिळालेली संगीताची देणगी आणि आशीर्वाद कुठेतरी जतन करायला पाहिजे असे वाटू लागले व सुरु झाला हा मनातील शब्द सुरांचा प्रवास.

मग काय सर्व साधनसामुग्रीची जुळवा जुळव केली आणि एक छोटा घरगुती कार्यक्रम केला, नाव फारसं शोधावं लागलं नाहीच कारण काय करायचं? काय म्हणायचं? हे स्पष्टच होतं.
जीवनात ज्या आठवणींवर बोलायचे होते, त्यातून आठवण घेतले आणि पुन्हा पुन्हा त्या येतात म्हंटल्यावर त्यात वारी जोडले.
त्यातून "आठवणीतली शब्द्वारी" हे नाव कार्यक्रमाला दिले...

कार्यक्रमातली एकेक गाणी..सादर करून त्यातल्या काही भागावर चित्रिकरण करुन जे शब्दापेक्षा चित्रातून बोलके होते आसे हळवे क्षण दाखविण्याचा राहूल आपटे यांना मनापासूप यत्न केला...
प्रत्येक सहभागी गायकाला रंगमंचावर बोलावूल आपापल्या मतांची चाचपणी निवेदिका डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांनी चपखलपणे केली..
आटोपशीर पण संगीतकाराच्या विविध गाण्याची सुंदरता यातून प्रत्यक्ष अजमावता आली..
या अव्बमला रसिका दाद देतील अशी आशा आहे...




- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276