Tuesday, May 8, 2012

`फायनल ड्राफ्ट ` बघितलं आणि भरुन पावले


अनेकवेळा चुकामुक होऊन …फायनली आम्ही काल गिरीश जोशींचं `फायनल ड्राफ्ट` हे नाटक बघितलंच
(न बघता मेले असते तर जोशींच्या मानगुटीवरचं भुत झाले असते!) आणि भरुन पावले.

घट्ट संहिता, कलाकारांचा अतिउत्कृष्ट सहज नैसर्गिक अभिनय , नेटकं दिग्दर्शन यांनी नटलेला हा अतिशय देखणा प्रयोग केवळ दोन कलाकारांनी आपल्या जीवावर उठावदार करुन टाकला.

बरेचदा असं होतं की बहुप्रतिक्षित/चर्चित नाटकं/सिनेमे प्रत्यक्षात आपला भ्रमनिरास करतात .पण , सुदैवाने गिरीश जोशींच्या कलाकृतींच्या बाबतीत एक रसिक प्रेक्षक म्हणुन मला कधीही निराशा आली नाही. मला वाटतंय त्यांच्यातील गुणवत्ता, सादरीकरणाचा सातत्याने Perfect व्यावसायिक प्रयत्न , कमालीची शिस्त , सच्चेपणा आणि कुठेही तडजोड न करण्याची सवय… याआणि अशा अनेक गोष्टी कारणीभुत असाव्यात .

फायनल ड्राफ्ट हे नाटक स्क्रिप्टरायटिंगचा कोर्स जॉइन केलेली एक कनफ्युज्ड विद्यार्थिनी आणि तिला यातनं बाहेर काढण्यासाठी धडपडत असलेला शिक्षक यांच्याभोवती फिरते. पण हळुहळु शिक्षकच कनफ्युजनमधे अडकत जातो . शेवटी दोघांमधे प्रचंड भांडण होतं, एकमेकांच्याबद्दलची परखड मतं तोंडावर बोलली जातात कटुपणाने आणि काही काळापुरती दोघांची अजिबात भेट होत नाही.पण या भांडणाने त्यांना आत्मपरिक्षण करताना नकळतच साक्षात्कार होतो स्वत:मधील आंतरिक प्रेरणेचा. कुठेतरी Stagnant झालेला , थोडा ‘मी’ पणाच्या गर्तेत सापडुन सहजता हरवुन बसलेला मुळात चांगला लेखक असलेला पण शिक्षकाचा बेगडी मुखवटा अडकवलेल्या या शिक्षकाला स्वत:चा शोध लागतो . त्या मुलीला देखिल स्वत:चा सुर सापडतो.

खरंतर आपल्या आयुष्यात भेटणारी अनेक Difficult माणसं/प्रसंग आपण टाळत असतो ,पण यातच तर खरं आपल्या Paradigm Change किंवा Complete Transformation चा धागा दडलेला असतो हे आपल्या लक्षात येत नाही. नाटकातली ही दोन Difficult माणसं एकमेकांचा आरसा बनुन आपआपला चेहरा बघतात व आपल्या प्रगतीपथातला खरा अडसर आपण स्वत:च आहे याची जाणिव होते आणि मग परिस्थिती किंवा आजुबाजुच्या व्यक्ति यांना दोष देण्यापेक्षा , त्याचे सतत दोष शोधत बसण्यापेक्षा, उगाचच भांडण्यापेक्षा फक्त स्वत:च्या कामावर लक्ष केंद्रित करुन नवनिर्मिती करणेच श्रेष्ठ काम आहे हे जाणवतं त्यांना (व आपल्यालादेखिल !)

नाविन्याचा ध्यास असलेल्यांना अनेकदा कळत नसतं की हे सगळं कस्तुरीमृगासारखं आहे ..असतं स्वत:जवळच पण जाणवत नाही….. एक अतिशय वैचारिक (पण कुठेही दुर्बोध/जडजंबाळ नसणारं)नाटक रंगभुमीला दिल्याबद्दल

Hats Off to you Girish Joshi & Mukta Barve

-नीता दिनेश प्रभू



Smita Thorat -खरंतर आपल्या आयुष्यात भेटणारी अनेक Difficult माणसं/प्रसंग आपण टाळत असतो..पण यातच तर खरं आपल्या Paradigm Change किंवा Complete Transformation चा धागा दडलेला असतो हे आपल्या लक्षात येत नाही.. वा.. नीता.. अगदी नेमकं बोललीस तू.. क्या बात है! मी पाहिलंय आणि अनुभवलंय 'फायनल ड्राफ्ट'.. अत्यंत प्रगल्भ.. सुबक प्रयोग.. मुक्ता आणि गिरीश.. दोघंही केवळ लाजवाब.. रंगलेली वैचारिक जुगलबंदीच.. सुंदर..

Ravi Lakhe- मी खूप पुर्वीच ते पाहीले आहे. मराठीतले ते एक मोठे नाटक आहे. educating Rita, The lesson..ह्या नाटकाचा फॊर्म असाच आहे.

आस्था प्रमिला सुरेश- ys vry true thk for sharing on fb

Yogesh Raut -First of all I congratulate you for this note. Very well written. Now if the drama is so good then this is my next target. You can start writing in news paper.

Sai Tambe ‎Neeta Dinesh Prabhu- kharach khup sundar natak aahe v abhinay pan laajabaab

Neeta Dinesh Prabhu- ‎Yogesh Raut, Thanks for the compliment & surely I'll work out on your suggestion. अजुन एका गोष्टीसाठी खुप बरं वाटलं की माझी नोट वाचुन तुला आता नाटकं बघायची इच्छा झाली आहे. ..आणि चांगली अभिरुची जाणुन-बुजुन रुजवावी लागते हे खरंय नं...

Jitendra A Dasharathi- Neeta, khup chan lihilayas. Abhinandan!



Neeta Dinesh Prabhu ‎Kavita Mahajan, तुमचे Like मिळालं...धन्य वाटलं ...मनापासुन. B'se I respect you so much.
3 hours ago · Like
Kavita Mahajan ‎- जे चांगलं आहे त्याला दाद दिलीच पाहिजे, जी तुम्ही दिलीत आणि ती मला आवडल्याचं मीही सांगितलं. इतकंच.

Monday, May 7, 2012

गप्पांची सुरेल सांगता आनंद भाटेच्या भैरवीतून



रविवारची संध्याकाळ डिएसके गप्पांनी रंगत गेली ती एक संगीतकार आणि एक गायक अशा दोन कलाकालाच्या आविष्कारानी. योगायोग म्हणजे आजच बालगंधर्व चित्रपट प्रकाशित होऊन वर्ष झाले आणि दुसरे म्हणडे बालगंधर्व चित्रपटातल्या गाण्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्य़ानंतर आनंद भाटेचा पहिला जाहिर कार्यक्रम ऐकण्याचे भाग्य पुणेकरांना लाभले.
गप्पांची आजची सुरवात झाली ती शाकुंतल नाटकातल्या पंचतुंड नर रुंडमालधर या बालगंधर्व चित्रपटातल्या नांदीने अर्थातच ती सादर केली आनंद भाटे आणि गप्पांचा समारोपही झाला तोही बालगंधर्व चित्रपटातल्या भैरवीने. चिन्मया सकल ह्दयानी....


सुरेल कार्यक्रमात नव्या दिशेने रचनांकडे किंवा कवितेकडे पहाणारा एक तरुण संगीतकार कौशल इनामदार यांच्या मनमोकळ्या उत्तरानी. त्यांच्या दृष्टीने मी शास्त्रीय संगीताचा अभ्यास करतोय..आणि मी स्वतःची अशी वाट निवडली आहे.. मला माझ्या गुणदोषांसह स्विकारा.. आज आपण जुन्यातले जे उत्तम ते आज लोक विसरत चाललेत...आणि संगीतात स्वतःची वेगळी वाट निवडली आहे... जुन्या संगीताकडेही नव्याने पाहण्याची माझी सवय आहे..म्हणूनच मी पुलंच्या भिल्लण या सांगितिक कार्यक्रमाला नवा टच दिला. आचार्य़ अत्रे यांच्या झेंडूच्या फुलाकडे वेगळ्या नजरेने पाहिले..आणि बालगंधर्व चित्रपटातल्या गाण्यांकडेही स्वतःचा पारंपारिक तरीही जुने जपण्याचा प्रयत्न केला आहे..

कौशल इनामदारच्या मते आनंद भाटेला गळा आहे..आणि आपल्याला नरडं आहे. आपण गायक नाही...फक्त कसे पाहिजे ते दाखविणारा संगीतकार मात्र आहे..

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी या मराठी अभिमान गीताचा संगीतकार म्हणून झालेला प्रवासही त्यांनी ऐकवला...रसिकांनी त्याला टाळ्यांनी दाद दिलीच आणि त्याने गायलेल्या गाण्यांनाही तेवढीच पसंतीचा पावती दिली.
गप्पांचा हा फड हलता आणि सुरेल संवादातून जिंकला तो आनंद गंधर्व आनंद भाटे यांने. एम टेक होऊन झेन्सर मध्ये चाकरी करुन तेवढ्याच ताकदीने शास्त्रीय. संगीताचा रियाज करणारा हा तरुण गायक नट अधिक लोकप्रिय ठरला तो बालगंधर्व चित्रपटातल्या नाट्यपदांमुळे...भारतरत्न पं., भिमसोन जोशी यांचेकडे २० वर्षे शिकून शास्त्रीय संगीताचा पाय भक्कम केला आणि त्यांचे ऋण आनंदाने मिरव तोही आता तेवढाच संतवाणी गाण्यात तयार असल्याचे त्याने कान्होबा तुझी घोंगडा चांगली यातून सिध्द करुन दिले. रागसंगीताबरोबरच भीमसेन जोशी यांचेकडे मैफलीत कसे गावे ते शिकायला मिळाल्याचे तो सांगतो.

संगीताची ही मेजवानी खुलविण्यात ज्या साथीदार कलावंताचा प्रत्यक्ष सहभाग होता त्यांचा उल्लेख अतिशय महत्वाचा व आवश्यक आहे. हार्मोनियमची साथ करत होते बालगंधर्व चित्रपटाचे सहाय्यक संगीतकार असलेले आणि कौशल इनामदारांचे महाविद्यालयापासूनचे मित्र असलेले आदित्य ओक. तबला संगत केली ती पुण्याचे अनुभवी तबलावादक संजय करंदीकर यांनी ...तर माऊली टाकळकर.ज्यांच्या टाळाशिवाय संतवाणी होणार नाही,असे ज्येष्ठ बुजुर्ग कलावंत.

गप्पाची मैफल गतीमान केली ती राजेश दामले यांच्या सूत्रातून आणि प्रश्नातून..विविध ट्प्पायंवरचा प्रवास दोन कलावंताकडून त्यांनी उलगडून दाखविला.. त्यात रसिकाची उत्सुकता होती आणि संवादची साखळी होती.

डीएसके फाउंडेशनचे ट्रस्टी श्याम भुर्के यांनी गप्पांची आघाडीची बाजू सांभाळत याचा उद्देश स्पष्ट केला. मॅजेजिस्टि गप्पा बंद झाल्या आणि साहित्यिक गप्पांची उणीव जाणवली. चार दिवस का होईंना..कला, साहित्यिक आणि संगीत आणि राजकारणाचा फड डीएस के गप्पात रंगू लागला..त्याला आता १५ वर्षे झाली...आज त्याची सांगता आनंद भाटेच्या भैरवीनी झाली आणि पुढच्या वर्षीच्या गप्पांसाठी वाट पहाताना नव्याचे वेध होते..



सुभाष इनामदार, पुणे

Saturday, May 5, 2012

एक चळवळीचा पत्रकार-निखिल वागळे



लोकांचे प्रश्न पोटतिडकीने मांडणारा पत्रकार-संपादक आज आय बी एन मराठी चॅनलचा स्टार म्हणजेच निखिल वागळे. कुठल्याही मराठी पत्रकार-संपादकाला अभिमान वाटावे अशी लोकप्रियता मिळवित आहे. शनिवारी डिएसके गप्पात निखिल वागळे यांची दिलखुलास गप्पात रंगून गेले होते....तेच निमित्त होते... त्यापैकी जे माझेकडून टिपले गेले ते मांडण्याचा हा अल्पसा प्रयत्न..



आपले थेट प्रश्व राजकारणी मंडळींना झोबतात..मात्र राजकारणातला , किंवा कुठल्याही क्षेत्रातला भ्रष्ट्राचार थांबत नाही...आपण प्रश्नातून त्यांचेकडून थेट प्रश्वाची उत्तरे मिळवायचा प्रयत्न करतो...त्यासाठी प्रसंगी रांगडी भाषाही वापरतो..पण यातून फारसा बदल होत नाही..आपण शब्दाच्या माध्यमातून थेड भिडतो...पण ही समाजव्यवस्था..
राजकीय गुंडगिरी बदलण्यासाठी शब्दांचे शस्त्र करुन काहीही होणार नाही. त्यासाठी समाजात चळवळ उभी राहिली पाहिजे. समाजप्रबोधन कार्यकरणारे लोक पुढे यायाला हवेत. मी फक्त एक चळवळीचा पत्रकार आहे....

निखिल वागळे यांच्याशी राजेश दामले आणि उज्ज्वला बर्वे यांनी विविध प्रश्नातून वागळेंची मते त्यांच्या शैलीत मांडण्यासाठी पार्श्वभूमी तयार केली.



अक्षर दिवाळी अंक, नंतर दिनांक साप्ताहिक त्यानंतर महानगरचा प्रवास....आणि आता आयबीएन लोकमतची खास वागळे शैली याचा साराच पाढा उत्सुकतेने त्यांच्या तोंडून ऐकता आला..

बड्या वर्तमानपत्रात काम न करता स्वतंत्रपणे स्वतःची ओळख निर्माण करण्याचे त्यांचे धेय्यच त्यांच्या सगळ्या कारकीर्दीचे मूळ ठरले.

आपल्या चॅनलवरुन लोकांचे प्रश्न मांडतो. त्याची उत्तरे राजकारणी किवा संबंधीतांकडून माझ्या पध्दतीने उलगडण्याचा प्रयत्न करतो...कांही मूल्ये जपत..हा व्यवसाय म्हणून केल्याचे ते अभिमानाने सांगतात.

आजची माध्यमे बड्या भांडवलदारांच्या हातात आहेत. पैसे घालणा-या लोकांच्या तालावर ती चालताहेत हे दुःख आहे.
मुलाखत घेताना त्या माणसाची किवा प्रश्नाची माहिती घेऊनच जाण्याचा अभ्यास करत आहे..त्यांच्याशी भावनिक आपलेपणा निर्माण करावा लागतो..मग ते खुलत जातात....याचे उत्तम उदाहरणा म्हणून त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाखतीचे दिले. त्यामुलाखातीचा इतिहास त्यांनी साद्यंत खुलवून सांगितला.

नारायण मूर्ती, अभय बंग, प्रकाश आमटे, मेधा पाटकर, आण्णा हजारे यासारख्या लोकांशी बोलताना खूप बरे वाटते..ते समाज घडविण्याचे काम करत आहेत. दुःख आहे ते विरोधी पक्षांची ताकद , ते नेते नाहीत याची.. आणि राजकारणात चाललेल्या खोटेपणाचा..

आज जे चित्र आहे ते आपण बदलू शकत नाही याचे मोठे दुःख आहे...
त्यासाठी आपली धडपड आहे...
आपण कधीही राजकारणात जाणार नाही
कारण आपला धर्म पत्रकारितेचा आहे..




सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Tuesday, May 1, 2012

अंधारल्या वाटेवरचे दिवे थोडे पुसूया


कधी कुणाचे रक्त आज तापत का नाही
भल्यांना बुरे म्हणाणा-यांनो मागे वळून का पहात नाही?

प्रत्येक पावला-पावलात रोज इथे काटा बोचतो
एक काढायला जाता दुसरा दत्त म्हणून सहज खुणावतो

काट्यातून मार्ग काढत कुढत आपण सारेच जगतो आहोत
प्रकाश असून अंधारात सापडल्यासारखे सारेच रोज ठेचकळत आहोत.

खरचं कुणालाच वाटत नाही यातून काही मार्ग असेल?
चिवचिवणा-या चिमणीलाही घास कुणी भरवत असेल

बस्स, आता सारे काही पुरे झाले
जीवनात आता जगणेही मुश्कील झाले

करु पुकारा, हाक द्या
सारे मिळून एक होऊन
आता सारे बदलूया
अंधारल्या वाटेवरचे दिवे थोडे पुसूया.....

सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276

Saturday, April 28, 2012

कसं जगायचं हे तुमच्या हाती असतं

किती हसायचं, कुठे रुसायचं तुमच्या हाती असतं..
किती भासवायचं, किती सोसायचं..तुमच्या हाती असतं.

कुणाला होकार, कुणाला नकार..तुमच्या हातीच असतं
नशीब तुम्ही घडवण्य़ासाठी कष्ट करणं तुमच्या हाती असतं.

प्रेम करणं..होकार देणं. तुमच्या हाती असतं.
आईची माया..बापाचं काळीज तुमच्या हाती असतं.

किती जपायचं..किती जोडायचं तुमच्या हाती असंत.
नाती टिकावायची..जपायची तुमच्या हाती असतं.

नवी दिशा शोधायची, स्वतःची वाट शोधायची तुमच्या हाती असतं.
अखेरीस सारं काही..मिळवायला जिद्द देणंही चुमच्या हाती असतं.




सारं काही . देता येणं ..देउन तृप्त होणंही तुमच्या हाती असतं.


subhash inamdar,pune
subhashinamdar@gmail.com
9552596276

Friday, April 27, 2012

पहाट साक्षीला..


डोळ्यात पाहिले ते विसरु शकत नाही
स्वप्नी अनुभवले ते सांगू शकत नाही
मनात दोघांच्या भावना एकच होती..
साठवले काय ते सांगू शकत नाही

ओढ भेटीची आज तीव्र होती
चेह-यावरची गाली अधीक स्पष्ट होती
अंतर असले तरी डोळे साठवत होते
व्यक्त होत नव्हत्या तरी भावना तीच होती

स्पर्शात उब होती..शरीर सांगत होते
मन मात्र ते सारे लांबूवच निरखत होते
मनाची भावना शब्द सांगत होता
शरीर मात्र तेव्हाही आक्रसलेलेच होते

नागमोडी वळणांची कसरत आजही
प्रेमाची जाणीव प्रखर आजही
उद्याची पहाट आपली खात्रीही आजला
स्मरता त्या भेटीला पहाट साक्षीला..

सुभाष इनामदार, पुणे

Monday, April 23, 2012

प्राजक्ताची ओंजळ


प्राजक्ताची ओंजळ घेऊन तुला द्यायला आलोय
बघ ते सारे विसरलेले पुन्हा साठवायला आलोय

किती वेळा किती आणा-भाका, शपथा गंधातुन ओथंबल्या
भावना त्या वेळेच्या शोधताही, गहिवरल्या..थिजल्या

आता पुन्हा आणू कसे ते दिवस गेल्यावरी
जाता जाता एक मागणे..मिटून घेतल्यावरी..

विश्व अवघे अखंड राहे..प्राण माझीया तुझ्या मनी
एकदाच गुंतून पडला..आहे का ते ध्यानीमनी...

आज प्रार्थना तुला कराया आलो तुज दारी
घे आता चुकल्या तेही..ठेव सांभाळ मजवरी

एक सांगतो ऐक जराशी नको जावू दूर देशी
हेच मागणे आज कराया ओंजळ व्हावू कशी..


सुभाष इनामदार, पुणे

Saturday, April 21, 2012

हे तुझे जुनेच


बेचैन करुन टाकतेस मग तसेच सोडून जातेस..
हे तुझे जुनेच
काळजावर घाव घालतेस मग त्यावर फुंकर घालतेस
हे तुझे जुनेच
सगळं जुनं विसरून पुन्हा एक होतेस
हे ही जुनेच
आजही तेच त्या त्या आठवणी..ती केविलवाणी बोलणी
हे ही जुनेच
खरं तर हे सारं म्हणजे आयुष्य तर नसेल
हे ही जुनेच का?
दुःख विसरण्यासाठी डोळ्यातलं पाणी थांबविण्यासाठी
हे हे जुनचं तर नाही..
राहू दे आता सारे घरट्याकडे जावू,,,चोचीत चारा भरवू
हे ही तुझे जुनेच
कोण जाणे कधी बैभान..बेचैन सावधान असतेस
हे तर जुनेच सारे


बदलू म्हणता बदलणार नाही...जुने तेच सारे ..नव्या दिशेकडे झुकलेले


सुभाष इनामदार, पुणे

Friday, April 20, 2012

मसाला...पाहण्यात मौज वाटते


मसाला...अनुभवताना
उमेश कुलकर्णी यांनी लिहलेल्या संवादातून खुलत आणि घडत जाणारा आरभाट निर्मित मसाला पाहताना प्रथम फार वेगळेपणाने मांडलेली कथा पडद्यावर मोहविणारी होती...तिथे संघर्ष होता. धडपड होती. व्यवसायासाठी लागणारी धोरणे होती...पण ती पळपुटी होती. प्रत्येक व्यवसायात त्याला खोट येते आणि ततो दुस-या गावाला पळून वेगळा धंदा करतो...
नशीब बलवत्तर असलवे म्हणजे मेहता शेठ त्याच्यातल्या प्रामाणिकतेवर विश्वास ठेऊन पोलिस चौकितून आपल्या गोडावूनमध्ये आणतात. अखेरीस तो टच मसालाच्या कारखान्याचा मालक बनतो.

एकूणच मसाल्याशी या ना त्या नात्याने संबंधीत चित्रपट.
उमेश,गिरीश णि दिग्दर्शनाची जबाबदारी खाद्यावर घेतलेला संदेश कुलकर्णी यांनी तयार केलेली कथा-पटकथा आणि प्रत्यक्ष चित्रपट किमान अनुभवाच्या क्लुप्त्या दाखविणारे आहे.

पहिली सुरवात होताना आणि मध्यंतरापर्य़त वाटले की प्रवीण मसालेवाल्यांचा तसा संबंध नसावा..पण मध्येतरानंतर सारेच सूत्र फिरतो ते मसाल्या भोवती..तिथे ती मजा संपते..राहतो तो एक उपचार.



भूमिकात सर्वात लक्षात राहतात ते दिलीप प्रभावळकर..संशोधकाच्या वेगळ्या जगात त्यांनी उत्तम कस दाखविला आहे. डॉक्टर लागूंचे दर्शन सुखद आहे. मोहन आगाशे खानदारी मेहता म्हणून छान वावरले..सफाई तर होतीच पण त्यात आश्वासकता होती.
गिरीश कुलकर्णी ग्रामीण ठसक्याची मजा संवादात आणतात..मात्र त्यात मला अमृता सुभाष थोडी कमी वाटली..तिच्या भावना पाहोचल्या पण बाज थोडी शहरीकडे झुकणार वाटला.. अभिनयातील सहजता हे त्यांचे वेगळे वैशिष्ठ्य. आळशी आणि थोडी विनोदाची बाजू सांभाळणारी भूमिका ऋषिकेश जोशीकडून पहायला मिळते..ती मजा आणि गंभीरपण बनवते.
एका नव्या टच मसाल्याची भर पडली एवढेच..

फार अपेक्षा घेऊन बघू नका..पण टेकिंग आणि विविध शहरांमधे हिडणारी ही कथा अनेक लोकेशन्सवर घडतात..ती पाहण्यात मौज वाटते.



(हे व्यकितशः निरीक्षण आहे.माझे पहिले ताजे मत एवढेच)
सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Thursday, April 19, 2012

स्नेहाची प्रार्थना


कधी चढावे ओठावरती गाणे
तेच रुजावे ओठी
सुंदर बनुनी गात्री...

किती जनांच्या असती
नित्य तेची स्मरती
अखंड एक नाम
तेच व्हावया समर्थ व्हावे
तेजाचा बहुमान...

हिच प्रार्थना आज माझिया
स्नेहाने करतो
हिच आळवा ओठी रुजवा
भाळी टिळा भरतो...

सांगून गेली नित्य तुझिया
आसुसलेले मन
सहज स्मरावे कानी यावे
नित्य तेच ध्यान..

कुणास ठावे किती काळ हा
आयुष्याचा खेळ
चालवितो धनी त्याचा
कृतार्थ होते मन...




सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276