मी नथूराम गोडसे बोलतोय !
प्रदीप दळवींचे हे नाटक. या नाटकाने रंगभूमिवर अनेकांना प्रसिध्दीच्या वलयात आणले.
महात्मा गांधींची हत्त्या करणाऱ्या नथूराम गोडसे यांच्या चरित्रावरचे हे नाटक हे सांगायलाच नको.
नाटकात नथूरामची भूमिका केली ती शरद पोंक्षे यांनी. अनेक वर्ष बारीक-सारिक भूमिका करणारा हा कलावंत अचानक प्रसिध्दीच्या वलयात आला तो नथूरामच्या भूमिकेने.
नाटकाचा विषय , त्याची भाषा आणि समाजातून झालेला विरोध यामुळे पहिल्या प्रयोगापासून नाटक वलयात आले. आजही नाटक गर्दी खेचते. नथूरामची गांधी हत्येपाठीमागचा विचार .हिंदू एक व्हावा म्हणून केलेले हे साहसी कृत्य. साऱ्यातून नथूराम कसा आहे याची झलक शरद पोंक्षे यांनी एकपात्री प्रयोगात करून देतात.
एका टोकेला नथूराम तर दुसऱ्या टोकाला "झी'च्या मालिकेत गाजलेल्या देवराम खंडागळे ही विरूध्द टोकाची कॅरेक्टर.
बाळ कोल्हटकरांच्या "दुर्वांची जुडी' तल्या सुभाषला तुम्ही इथे भेटू शकता. आपल्यातल्या कलावंताची चित्तरकथा ते रंगभूमिवर साकारताना एकाच मंचावर तो आविष्कार घडवितात. ते प्रेक्षकांशी मनमोकळा संवादच साधतात जणू!
यात त्यांच्या वृत्तीची, स्वभावाची वैषीष्ट्ये जाणवतात. करारी, निग्रही आणि चांगल्या भूमिकेच्या शोधात असलेल्या नटाचे ते जणू आत्मचरित्रच कथन करतात.
गप्पांतून शरद पोंक्षे उलगडत जाताना पहाणे हा एक थरारक नाट्यानुभवच असावा असाच तो पेश करतात.
हिंदू प्रेम, देशावरची भक्ती, कलांवंताची साधकता, शब्दावरचे प्रेम, मराठी नाटकांवर अणि नाटककारांवर केलेला विचार सारेच ते भडभडा बोलून टाकतात. मात्र ते इतक्या तळमळीने बोलतात की, त्यालाही प्रेक्षकांची टाळी मिळते.
नथूरामची भूमिका कशी मिळाली. त्यासाठी कसे प्रयत्न केले. साकारल्यानंतर झालेला आनंद सारेच यातून व्यक्त होते.
एका अर्थाने ती शरद पोंक्षे या कलावंताची बखर आहे. तुमच्या पर्यंत ती पोचली तर तुम्हालाली ती नक्की आवडेल.
व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
सुभाष इनामदार.
subhashinamdar@gmail.com
No comments:
Post a Comment