मनाचा आरसा शब्दातून दिसतो,हळुवार फुंकर शब्दानीच घालतो
भावनेला साद शब्दातून उमटते, उभारी मनाला त्यातूनच येते ..
राग, लोभ, मत्सराच्या छटा, शब्दातूनच प्रकटतात
मैत्री जपण्याची किमया ,शब्दच पार पाडतात..
शब्दाचा सेतू उभारुन, देश जिंकता येतात
जगाची शांतता, केवळ शब्दच जाणतात..
शब्दाला लाभते सुरांची साथ,
मैफलीला रंगत` क्या बात`...
शब्द प्रेरणा बनतात, शब्द ओलावा आणतात
निस्तेज मनातली ज्योत शब्दांच्या तेलांनी फुलवतात ...
आक्रोश करुन भावना भडकते,
शब्दांच्या घोषणांनी समाजमन जागते
भडका उडतो, तेढ वाढते
थोड्या विनम्रतेने तीही सांधते..
आई-मुलांचे, सासू-सुनांचे व्दंव्द, शब्दातून उफाळते
चार भिंतीतला आरव शब्दातून आकारते.
किमया न्यारी या शब्दांची
वर्णन करता शाई अपुरी...
-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
1 comment:
Post a Comment