Saturday, October 8, 2016

कारकालाचा गोमटेश्वर Karkala Bahubali



 भाग तिसरा....
कारकालाचा ४२ फूट वाहुबली..एका दगडात कोरलेली भव्य मूर्ती


मुडबीद्रीपासून पासून ३० कि.मी. अंतरावरच्या कारकाला डोंगरावरची बाहुवलीची ४२ फूट उंच एका दगडात कोरलेली भव्य मूर्ती पाहण्यासाठी निघालो..


चढत्या मार्गाने डोंगराकडे जाणारा निमूळता रस्ता गाडी आम्हाला घाटातून वर घेऊन जात होती.आधीच हिरवाई त्यातच पावसाने सर्वत्र तयार केलेली सुंदर हिरवळ..रस्त्याच्या दोन्ही बादुला केवळ झाडी..एका बाजुला पहावे तर खाली वसलेले सुंदर गाव दिसत होते.
वर जाऊन पोहोचलो तर खरोखरच..तिथला परिसर आणि तिथले पावसाचे ओझरते दर्शनच आमचे स्वागत करीत होते.. 

पोहोचल्यावर सगळ्यांनीच डोंगरावरून दिसणारे ते नयनसनोहारी दृष्य टिपून घेतले लांबूनच दिसणारी ती गोमटेश्वराची भव्य मूर्ती आमच्यासमोर मोठी होत होत आता आमच्या समवेत भव्य होत जात होती..
भव्य अशा सुंदर साकारलेल्या पटांगणातून जातानाही तिथल्या शांततेत काय ती आमची बोलाचाल त्या निरव शांततेला तडा देत होती.

समोरच्या त्या भव्य पताकाने आमचे मन प्रसन्न आणि भारावून  सोडले. 
 




आत जातानाही  तिथल्या मंदिरातली तिर्थकारांची भव्य प्रतिमा आणि त्यासमोर उभारला गेलेला भव्य ध्वज-पताका वातावरणात भारून राहिला होता.





 तिथल्या उंचावरच्या मंदिराभोवतालच्या वातावरणातून शांततेचा संदेशच  सा-यांना देत  होता..
कारकला येथील डोंगरावर स्थापित केलेली बाहुबली श्री गोमटेश्वराची ४२ फुट उंचीची अखंड दगडात कोरलेली मूर्ती हि दुसऱ्या क्रमांकाची उंच मूर्ती आहे. राजा वीरवर्माने आपले गुरु कारकाला जैन मठाधिपती ललितकीर्ती यांचे आज्ञेवरून ह्या अतिभव्य आणि शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असणाऱ्या मूर्तीची  १३ फेब्रु.१४३२ रोजी प्रतिष्टापणा केल्याचा संदर्भ आढळतो. या मुर्तीपुढील ब्रह्मदेव स्तंभ आणि त्यावरील यक्षगणाची कोरीव मूर्ती आवर्जून पाहण्यासारखी आहे.

 आम्ही सारे तिथला इतिहास जाणून घेण्यास तप्तर होतो..म्हणूनच की काय तिथल्या त्या मंदिराच्या आचार्याने अगदी आपुलकीने सारे वर्णन आपल्या शब्दातून करविले.


मंदिराच्या भोवतीने एकेका कोप-यात असलेल्या त्या भव्यतेचे दृष्य टिपण्यासाठी डोळे आणि मोबाईल सरसावले गेले..असा ठिकाणावर आपले सारे शरीर तिथलेच एक होऊन त्या परिसराचा आनंद साठविण्यासाठी सज्ज झालेले असते.

 आम्ही आलो ते थेट वरच्या गाडीच्या रस्त्याने..पण डोंगराच्या एका बाजुला या गावातून वर येण्यासाठी पाय-यांची उत्तम सोय आहे..अर्थात तिथे आम्हाला दिसली ती पाय-ायंवर चढून चरायला येणारी गुरे..पण त्यामुळे त्य़ा गावाचे दर्शन तरी घेता आले.


 कुंद अशा वातावरणातच आम्ही तिथून पुढच्या टपप्यावर जाण्यासाठी त्या सा-या स्मृती बरोवर घेऊन निघलो.


 
 
सभोवर अवतरलेले हिरवेगार भूतल आणि त्यामध्ये नक्षीकाम  केल्यासारखी ती सुंदरशी घरे..





अनुभवच्या या सहलीचा आनंद घेताना बरोबरचे व्यवस्थापनातले सारे जण पर्यटकांना पुरेसा वेळ देऊन त्यांच्या तहान-भुकेची सारी पथ्ये सतत पाळत होती..


म्हणून तर लहान वसमधूनही प्रवास होऊनही ते सारे आरामदायी वाटत होते. 








तर मंडळी चला निघूया पुढच्या टप्प्यावर...बाय 


- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Thursday, October 6, 2016

मुडबीद्रीचे एक हजार खांबाचे जैन मंदिर Thousand Pillar Temple






कुर्ग सहल
भाग दुसरा..


मुडबीद्री हे गाव तसे मंगलोर पासून ३५ कि. मि. अंतरावर. जैन धर्मियांची काशी म्हणून ते परिचित आहे. निसर्गाने वेढलेला हा सारा परिसर ऐन पावसाळ्यात आपल्या समृध्द सौंदर्यीने नटलेला दिसला.. पावसाने तिथे आपले रूप थोडे दाखविल्याने हिरवाई अगदी दाडून आलेली दिसली..


आम्ही ज्या चौकात थांबलो होतो..ते तीथल्या एस टीच्या स्थानकाचा परिसर होता..त्यामुळे आसपास सारी निवासाची ठिकाणे दिसत होती. वाहनांची गर्दी नव्हती पण सतत वाहनांची आणि माणसांची येजा दिसत होती.
पंचरत्नमधला आमचा पाहुणचार आटोपल्यावर दुपारी आम्ही सारे तीन अनुभवच्या गाड्या घेऊन निघालो ते थेट..शहाळ्याच्या मारूतीमंदिरावरून एकहजार खांबांच्या जैन मंदिराकडे

मुडवीद्रीचे एक हजार खांबाचे भव्य जैन मंदिर

दुपारी  थोड्या विश्रांतीनंतर आमच्या अनुभवी दुर्गेश आणि आभिषेक यांनी आमची गाडी   मुडबीद्रीच्या दुगंबर जैन मंदिराच्या समोर गाडी उभी केली. एका बोळातून समोर दिसणा-या या मंदिराच्या भव्यतेविषयी ऐकले होते..पण ऐकणे वेगळे आणि प्रत्यक्ष पाहणे निराळे..

भव्य वास्तुकलेचा नमुना असलेला असलेले तिन भागात उभे होते..मुख्य प्रवेश द्वार..


मधला भव्य स्तंभ 










 आणि मंदिराचा गाभारा.



एकहजार दगडी खांबावर चितारलेल्या भव्य प्राचिन मंदिराच्या गाभा-यात प्रवेश केला.. शांत वातावरणाची पुरेपूर साक्ष देणारी ती मूर्ती..तिथली शांतता.आणि त्यापरसरातले भारावलेले वातावरण मनाला खूप निराळे भासत होते. 

 केवळ दिसत असलेली वास्तू पाहणे आणि त्यामागे  असलेली प्राचिन परंपरा याचे भान सतत डोक्यात येत होते.
ती अतिभव्य चित्रांतून साकारलेली मंदिराची पूरातन वास्तू आमच्या मनात भरून राहिली.


 कोरीव काम केलेला प्रत्येक दगड या प्राचिन परंपरेचे दर्शन घडवित होता..





सारे जण तिथल्या मंदिरातल्या भव्य वास्तूशिल्पात आपापले चित्र काढण्यासाठी मोबाईल- कॅमेरे सज्ज होत होते..
 त्रिभूवन तिलक चूडामणी असेही म्हटले जाते..मूडबूद्रीतले हे भव्य प्राचिन मंदिरात  सहा फूट भव्य इसी चंद्रनाथां स्वामींची मूर्ती आपले मन प्रसन्न करते..पंधराव्या शतकातले  हे मंदिर. समोर पंधरा मिटर उंच भव्य स्तंभ उभारलेला आहे. 


मंदिरातल्या प्रत्येक खांबावरील कोरीव कामात विजयनगरच्या खूणा असलेले नक्षीकाम आढळते.

अगदी प्रवेश केल्यापासून मंदिरातला प्रत्येक खांब तुम्हाला आपल्या कलाकुसरीने आकर्षीत करतो.


मंदिराच्या छतावर कोरलेली ही भव्य कलाकुसर मन प्रसन्न करते
 








असेच एकेक स्थळाचे दर्शन घेऊन पुढे जात राहू..


सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
mob. 9552596276




Wednesday, October 5, 2016

कुर्ग परिसर पुन्हा पुन्हा `अनुभव`ण्यासारखा Hills of Karnataka



 भाग पहिला... 
टूर निघाली.....


दहा दिवसांची कुर्गची पावसाळी हवा अनुभवून परतलो तरी तिथला निसर्ग, तिथले नयनरम्य वातावरण आणि मूख्य म्हणजे कधी मुसळधार पाऊस ....पुढच्या क्षणाला केवळ पावसाळी ढगांची संगत..
 खरे तर पाऊस संपून आल्हाददायक थंडीचा अनुभव मिळेल या आशेने सारे गेलो ते २१ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरच्या अनुभवच्या हिल्स ऑफ कर्नाटका या सहलीसाठी..पण प्रत्यक्षात वर्षा सहलीचा पुरेपुर आनंद घेऊन खूपच तृप्ततेने निसर्गाच्या सान्नीध्यात राहून आल्याचा आनंद घेतला..

 मला तर कुर्ग खूप आवडले..तिथल्या म्हणजे मडीकेरीतल्या कॅपिटल व्हिलेज या २७ एकरात उभारलेल्या निसर्गाच्या कुशीत असलेल्या अतिशय छान..स्वच्छ अशा परिसरामुळे..खरोखर मनाली आणि मुन्नार सारखे वातावरण..तरीही कुठेही अधुनिकतेची संगत नाही..रस्ते आहेत..पण महाबळेश्वरसारखे.. बाजारपेठ आहे..पण त्यात व्यवसायिकता कमी...आणि तिथे चहाचे मळे..तर इथे कॉफिची लागवड आणि ओक व़क्षांच्या सावलित वाढलेले मिरिचे वेल..

अनुभवच्या तिन १३ आसनांच्या वाहनातील ते रोजचे फिरणे आता नाही याची खंत पुण्यात आल्यानंतर तर फार बोचते..




दुर्गेश विरकर आणि अभिषेक जमादार या अनुभवच्या आमची काळजी घेणा-या दोन मित्रांची आठवण सतत येते.











.हे सारे शब्दात मांडणे खूप कठीण पण तरीही तो अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे..याचे महत्वाचे कारण   कर्नाटकात फारसे कुणाला माहित नसलेली ही ठिकाणे.

 तिथला निसर्ग आणि तिथे मनमुराद भटकण्याचा छंद असलेल्या तुमच्यासारख्यांनी तो आपल्या नजरेतून अनुभवावा ही इच्छा.


पुण्यातून भुसावळ रेल्वेने पनवेलला गेलो..तिथे कुर्ल्यातून निघालेली मत्सगंधा एक्प्रेस आम्हाला मेंगलोरकडे घेऊन गेली..आम्ही उडुपीच्या आधी येणा-या मुल्की स्थानकावर उतरलो..तिथे अनुभवच्या मंडळांची ओळख पटली.
.तेव्हापासूनच आमचा `अनुभव`सह प्रवास करण्याचा सुखकारक संवादच घडला गेला. त्यांनी आमच्या सामानाचा ताबा घेतला आणि दीडतास उशीरा येणा-या आमच्यासारख्या सर्व कर्नाटकातले हे डोंगरी भाग पाहणा-या सहप्रवाशांना आपल्या मीनी गाडीतून २८ कि.मी. वरील मुडबीद्रीच्या 



पंचरत्नमध्ये वास्तव्यास ४५ मिनिटात दाखल केले.अनुभवचे तिथले कप्तान होते  दुर्गेश वीरकर आणि त्याच्या जोडीला अभिषेक जमादार...दुपारचे भोजन करून सहज बाहेर पडलो तर प्रवासात वाटेतल्या माणगावपासून बाहेर दिसत असलेला पाऊस आमच्यासह प्रवास करीत आमच्यासोबतच होता...( अगदी अखेरच्या टप्प्यापर्यंत..)


रोज प्रवास असला तरी पुरेशी विश्रांतीची काळजी अनुभव घेत होता..रोज सकाळी साडेसहाला चहाची आरोळी..नंतर साडेआठला वेगवेगळ्या चवीचे पदार्थांचा नाष्टा..आणि दुपारी दीड तो दोन दरम्यान गरम गरम भोजनाता आस्वाद ..दुपारी चहा त्याबरोबर काही ना काही तोंडात टाकायला..आणि रात्री साडेआट-नऊला रात्रीचे भोजन  .हे सारे देण्याचे तंत्र कुठेही बिघडले नाही..त्यामुळे एक झाले..कुणाचीही तब्येत बीघडली नाही. 

उलट घरी नसलेली शिस्त अंगी भिनली गेली..त्यातही  आग्रहाचे असे सारे जण होतेच..म्हणतात ना पहिले समाधान होते..ते उत्तम भोजनाने..




पोट समाधानी तर मन प्रसन्न...

अनुभवच्या अरूण भटांंसह सिरसीला रहाण्याचा अनुभव असल्याने..तीच परंपरा या सहलीच्या सर्व वास्तव्यात सांभाळली गेली.. इतकेच नव्ह..तर जरा नको तितके ऱूचकरी भोजनाचा आस्वाद आणि भरपूर विश्रांती.


.आणि जिथे नेले ते उत्तम निसर्गातले सौंदर्य...सारेच अनुभवने अनुभवण्यास दिले.
मला वाटते हे अनुभव कर्नाटकात जिथे नेतात..ते सारे इतर फारसे कुणी नेत असतील असे वाटत नाही..कुणाचा अपवादही असू शकेल..










 ही झाली प्राथमिक सुरवात..खरी सहल तर पुढे सुरू गोत आहे..तोपर्य़ंत वाट पहा.

(- क्रमशः)
   



-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
mob. 9552596276




Wednesday, August 31, 2016

रसिकहो नमस्कार...मी आनंद देशमुख आपले स्वागत करीत आहे



सवाई गंधर्व सोहळ्याच्या व्यासपिठानजीकच्या खास बनविलेल्या निवेदकाच्या माईकमधून पंचवीस वर्षापूर्वी एक भारदस्त पण तेवढाचे भावनिक आवाज घुमला..
 रसिकहो..नमस्कार...

आज त्या निवेदकांच्या निवेदन क्षेत्रातल्या या कारकीर्दीचा सलाम करण्यासाठी त्यांच्यातल्या त्या रसिकतेला दाद देण्यासाठी आणि साध्या सोप्या पण जामखेडला लहानपण गेले तरी पुणेरी स्पष्ट भाषा ज्यांच्या वाणीतून बोलली जाते..ते आनंद देशमुख...त्यांना भाउसाहेब पाटणकरांच्या नावाने दिला जाणारा जिंदादिल पुरस्कार जेव्हा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या व्यासपीठावरून संगीत क्षेत्रातले दिग्गज कलावंत आणि काही दिवसांपूर्वी पुण्यात स्थायिक झालेले पं. उल्हास कशाळकर य़ांच्या हस्ते मंगळवारी ३० ऑगस्टला संध्याकाळी दिला गेला..तेव्हा पुन्हा एक तशीच रसिक-वाचकांची टाळ्यांची दाद मिळाली...





यावेळी व्यासपीठावर त्यांचे कौतुक अनुभवायला..आणि पाठीवर थाप द्यायला होते ते ज्येष्ठ निवेदक  सुधीर गाडगीळ आणि सवाई गंधर्व भिमसेन महोत्सवाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी.

आणि उपस्थितात आकाशवाणीतून बाहेर पडून आपली चौफेर कारकीर्द करणारे कलावंत जयराम कुलकर्णी आणि  हास्यपंचमीचे उद्गाते बंडा जोशी..इतर मान्यवर पुणेकर रसिक- वाचक सभागृहात गर्दी करून एकत्रित झाले होते.. आनंद देशमुख यांच्या मागे खंबीरपणे साथ देणा-या सुविद्य पत्नी सौ. कुंदा देशमुख यांचाही सत्कार कशाळकरांच्या हस्ते इथे केला गेला.





जामखेड सारख्या सहाहजार वस्तीच्या गावात बालपण घालविलेल्या..आनंद उर्फ नंदू ..यांच्या वाणीवर संस्कार झाले..ते आई-वडीलांच्याकडून..वडीलांना द्ष्टी कमी होती..पण ते पेटी उत्तम वाजवत..तर आपल्या वडीलांना  मराठीतल्या कादंब-या मोठ्यांदा वाचून दाखविण्याची कामगिरी नंदूवर आली..त्यामुळे वाचताना ते इतरांना समजेल..आवडेल असे कसे वाचावे याते प्रशिक्षण बालपणीच मिळाले..तिच गोष्ट आईची..श्रावण महिन्यात लिहिता वाचता न येणा-या आईला..कहाण्यावाचून दाखवायच्या तेही तिच्या मैत्रीणींच्या समूहाला..त्यामुळे कहाण्यातले ते आटपाट नगर तोडपाठ झाले..पण बोलण्यातली खुबी..वाचनातली  गंमत मनवर बिंबत गेली..त्या सा-याच्या उपयोग आपल्या निवेदनात झाल्याचे ते सांगतात..



निवेदनाविषयी काही मूलभूत गोष्टी त्यानी आपल्या मनोगतात सांगितल्या...त्या म्ङणजे...तिथे मंचावर तुमची अलंकारिक शैली..उगाचच कवीतांचा ..इतर दृष्टांताचा उल्लेख टाळणे...रसिकांना त्यांच्यातला एक वाटेल असे सोपे पण प्रवाही सांगणे..वाक्यातले चढउतार, उद्गार, स्वल्पविराम सारेच न सांगता कळायला हवेत...

आणि सर्वात महत्वाचा मंत्र जो भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांनी सवाईत दिला..तो म्हणजे..देशमुख  तुम्ही चांगले बोलताय आणि कमी बोलताय....हे उत्तम...

निवेदनाच्या कारकीर्दीत आकाशवाणीचा अनुभव खूप मिळाल्याचे ते नमूद करतात..कलावंताकडून योग्य ती माहिती काढण्याचा सराव झाला..ती योग्य वेळी आणि अचूक शब्दातून रसिकांपर्य़त पोहचविण्याचे कसब त्यांनी आपल्या निवेदनातून पुढच्या निवेदकांच्या पिढीला सांगितले..


तुम्ही कमी बोलता..तेही योग्य...तुमच्या निवेदनाचा मीही चाहता असल्याचे सांगत सुधीर गाडगीळ यांनी आपल्या क्षेत्रात आनंद देशमुख करीत असलेल्या कार्याची पुणेरी पोचही आपल्या भाषणातून व्यक्त केली.. त्यांनी संगीत क्षेत्रात आनंदने भक्कम तयारीनिशी आपले स्थान पक्के केल्याचेही ते म्हणाले.



पं. उल्हास कशाळकर यांनी देशमुख यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या..


रंगत-संगत प्रतिष्ठानचे प्रमोद आडकर आणि श्यामची आई फाऊंडेशनचे भरत देसरडा 
यांच्या संयुक्त सहकार्याने पुण्याताल हा सोहळा श्रवणीय झाल्याचे समाधान 
उपस्थितांच्या चेह-यावरून दिसत होते..



- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Thursday, July 14, 2016

श्री संत दर्शन मंडळ..श्रीराम साठे यांच्याविना...


गुरूवारी सकाळी मला पुण्यातल्या संगीत मार्गदर्शीका आणि गायक कलावंत जयश्री कुलकर्णी यांचा फोन आला..संत दर्शन मंडळांचे श्रीराम साठे कर्करोगाने आजारी आहेत..त्यांच्या मदतीसाठी आम्ही एक कार्यक्रम उद्या भारतीय विद्या भवन मध्ये करीत आहोत..तुम्ही नक्की या..
आम्ही त्यांच्या उपचारासाठी आमच्याकडून आर्थिक मदत केली आहे.पण त्यांच्यासाठी अधिक मदत मिळावी ही इच्छा आहे..म्हणून  हा कार्यक्रम.

हा फोन सकाळी ८ चा..आठ वाजून ५४ मिनिटांना पुन्हा एक त्यांचा मिस कॉल आला..पण मी कामात असल्याने उचलू शकलो नाही..नंतर कळाले त्यांचे निधन झाले..

आषाढी एकादशीला संतदर्शन मंडळाचा कार्यक्रम झाला नाही असे होत नसे .यंदाही होईल..पण तिथे श्रीराम साठे नसतील...त्यांचे स्मरण होईल इतकेच.

आता भारतीय विद्या भवनातला कार्यक्रम  शुक्रवारी  संध्याकाळी त्यांना  श्रध्दांजली म्हणून केला जाईल. पण त्यात राम..रामभाऊ..नसतील..

आपल्या दक्षिणमुखी मारूतीपाशी असलेल्या बाजीराव रस्त्यावरच्या जुन्या पुणेरी पध्दतीच्या घरी त्यांचे शास्त्रीय संगीत विद्यालय...गेली अनेक वर्षी ते शास्त्रीय संगाताचे शिक्षण देण्याचे काम करत आहेत..काही वर्ष  तर ते एकटेच रहातात.. गेली कित्येक वर्षे पुण्यातल्या नवोदित..पण आता चांगल्या रितीने ओळखल्या जाणा-या कलावंताकडून  संतांचे अभंग..आषाढी..कार्तिकीच्या दिवशी करून आपल्या श्री संत दर्शन मंडळाच्या वतीने महाराष्ट्रात  करीत होते..
गेली तीन एक वर्ष त्यांना पकृतीच्या कारणास्तव..वय ८१ . सारे झेपेनासे झाले. .म्हणून झेपेल तसे त्याकडे पहायचे..विद्यार्थीवर्गही अल्पसा..पण जेवढे शक्य झाले तेवढे ते मार्गदर्शन करायचे..

काही महिन्यांपूर्वी त्यांनी आपल्या कारर्किर्दीचा धावता आढावा घेणारे  पुस्तक लिहले..प्रसिध्दही केले..
अतिशय साधे रहाणे..प्रत्येक संगीताचा कार्यक्रम आर्वजून पहायाचे..गप्पा अघळ-पघळ..पण रुची शास्त्रीय संगीताली..
लेंगा, वर पांढरा नेहरू शर्ट आणि वर काळे जॅकेट ..डोळ्यावर चष्मा अशा वेशात ते संत दर्शन मंडळाच्या कार्यक्रमासाठी जातीने फिरत..अगदी आपल्या कार्यक्रमाचे स्थानीक  देण्यासाठी ते स्वतः  ते सकाळमध्य़े जातीने आलेले मी पाहिले आहे..
आता आपल्या हातून फारसे होत नाही याची खंत बाळगून त्यांनी आपल्या संस्थेची जबाबदारी तरुण तढफदार गायक राजेश दातार यांच्यावर सोपविली होती..स्वतः निवृत्तीधारकाच्या वेशात सामावून गेले होते..
त्यांना कर्करोगाने ग्रासले होते..काही दिवस ते आजारीही होते..

स्वतःसाठी काहीही न मागता संगीताची सेवा करण्यासाटी    काही मदत करा असे सांगणारा हा हाडाचा कलावंत माणूस विरळा..
त्यांच्या साधेपणात जी माणूसकी दडलेली आहे..ती पुढे संपलेल्या अवस्थेत असेल.
संस्थेचे..पर्य़ायाने संगीताची परंपरा जी आपली भारतीय आहे खास तीचे जतन आणि संवर्धन व्हावे ही आयुष्यभर तळमळ केली..त्यासाठी खरच स्वतःचे जीवन दिले..
त्यांच्या निधनाची मोठी बातमी होणार नाही ..पण एका छोट्या प्रमाणात त्यांच्या निधनाची..पर्यायाने त्यांच्या कार्याची  दखल सारेच जण घेतील..

स्वतः पं.. भिमसेन जोशी यांचे शिष्यत्व   मानणारे ते एक साधक..अनेक वर्ष त्यांच्या अनेक कार्यक्रमात ते तंबोरा वादन करायचे.. कधी तरी मंडळाच्या कार्यक्रमात गायची संधी घेतली तर ते एखादी बंदिश पंडीतजींचे स्मरण करून हमखास आपल्या थोड्याश्या घेग-या आवाजात ते ती सादर करीत असत.

त्यांच्यासारख्या जिद्दीच्या. ध्येय्याने प्रेरित झालेली माणसे पाहिली की मन भरून येते..डोळ्यात कणव येते..त्यांच्या कार्याला वाकून सलाम करावासा वाटतो..

श्रीराम साठे यांची आठवण आमच्या मनात नेहमीच असेल..त्यांना माझी ही भावपूर्ण शब्दांजली..



- सुभाष इनामदार, पुणे
सांस्कृतिक पुणे
subashinamdar@gmail.com
9552596276

Sunday, July 10, 2016

Mahesh Elkunchwar speak about Go.Ni. Dandekar







जेव्हा
ज्येष्ठ नाटकाकर..साहित्यिक महेश एलकुंचवार थेट रसिकांच्या भावनेला साद घालून
सांगतात..तेव्हा खरचं गोपाळ निळकंठ दांडेकर..साहित्यक्षेत्रातल्या आप्पांच्या
साहित्याबद्दलचा मराठी अभिमान जागा होतो..गोनिदांच्या नावाने दिला जाणारा मृण्मयी
पुरस्कार जेव्हा ते विजया मेहता यांच्या स्विकारतात..तेव्हा तर मान ताठ मानेने उंच
होत जाते.
शुक्रवारी
८ जुलैला..पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरातल्या उपस्थितांचे हात टाळ्यांसाठी  सतत सिध्द होत होते..त्यांच्या जन्मशताब्दी
सोहळ्याची सांगता या निमित्ताने झाली..पुरस्काराचे हे २६ वे वर्ष..निरा-गोपाळ
पुरस्कार दिला गेला तो जळगावच्या मॅगसेसे  पुरस्कार विजेत्या निलिमा मिश्रा यांना..तर यंदा
प्रथमच आप्पांच्या नावे प्रोत्साहन पुरस्कार दिला गेला तो बबन गिंडे या तरुण
कादंबरीकाराला..
गोनिदांच्या
कन्या आणि जावई डॉ. विणा आणि विजय देव यांच्या पुढाकारने मृण्मयी पुरस्कार दरवर्षी
८ जुलैला दिला जातो..गो. नि. दांच्या साहित्यावर प्रेम करणारे रसिक..वाचक यांचा हा
स्नेहमेळाच इथे भरलेला असतो..यंदा..ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू, दिपा
श्रीराम, नाटककार गो.पु. देशपांडे यांचे सारखे मान्यवर रसिकांमध्ये  उपस्थित असताना असा सोहळा अनुभवणे हे ही
भाग्याचेच होय..
अतिशय
भावनापूर्ण पुरस्काराचे भाषण करून गो नि दांच्या साहित्याचे श्रेष्ठत्व सिध्द करणारे
विचार महेश एलकुंचवारांच्या कडून ऐकायला मिळाले..यावेळी माचीवरचा बुधा या
चित्रपटाचे धावता ट्रेलरही उपस्थितांना दाखविण्यात आला..जुलै ते जुलै असे
किल्ल्यांवरचे अनुभव सांगणारी दीनदर्शीकाही इथे प्रकाशित केली गेली.
तर
आपल्या अध्यक्षिय भाषणात ज्येष्ठ दिग्दर्शिका आणि श्रेष्ठ कलावंत विजया मेहता
यांनी जो मनस्वी संवाद केला त्याला तोड नाही.. केवळ गोनिदांच्या परिवाराकडून मदत
स्विकारून हा सोहळा २५ वर्षे सातत्याने करणा-या सर्वांना आपण जे काम करीत आहात ते
खूप महत्वाचे असल्याचे सांगून..आपले आणि आप्पांचे मैत्र कसे होते याविषयी
विजयाबाईंनी त्यांच्या उत्तम शैलीत रंगमंचावरून जे वक्तव्य केले ते ऐकण्यासारखे
होते. आप्पांचे व्यक्तिमत्व हे अतिशय विरळा आणि अनोखे असल्याचे  त्या सांगतात.. मी त्यांना एक मुक्त फिरस्ता
म्हणत असे. ते मुक्त शोधक होते..ते कधी काय शोधत असतील हे कधीही कळायचे नाही.. गो
नि दांच्या शितू कादंबरीवरून जे नाटक लिहले त्याची मी दिग्दर्शीका आणि त्यातली
शीतूची भुमिकाही मी केली..पण ती भूमिका मला आप्पांनी समजून दिली..मी शहरी..मला
खेडयातल्या जीवनाचा अनुभव नाही..जोपर्यंत कलावंताला त्या भुमिकेचा गाभा सापडत नाही
तोपर्यत चाचपडत असतो..तमे माझे झाले..पण शितू करताना मला त्या भुमिकेचा
स्पर्शअनुभव करून दिला तो आप्पांना..कोकणातल्या खेड्यात नेले..तिथला निसर्ग वाचून
दाखविला..तिथल्या स्त्रीयांचा अनुभव दिला..त्या मातीत शेणाने सारविल्या जमीनीचा तो
ओलावा दिला..माझ्या लेखी आप्पांसारखा नाटककार मला भेटला नसता तर कलावंत आणि
दिग्दर्शिका म्हणून कमी पडले असते... पहिल्यांदाच कोकणी बोली भाषा ..त्यांच्यातली
देवाणघेवाण आमच्यापर्यंत पोहोचली .  केवळ
नाटकच नाही तर मला माझे पती हरी खोटे गेल्यानंतरचा ओलावा दिला तो आप्पांनी..
त्यावेळी मी तूला भेटायला आलो हे जाणवूच दिलं नाही.. मला तेव्हा त्यांनी जो आधार
दिला तो शेवटपर्यत रहाणार...
असाच
काहीसा भावनोक्तट अनुभव महेश एलकुंचवारांच्या वाडा चिरेबंदी नाटक दिग्दर्शीत
करताना कसा येत गेला ते विजया मेहता यांनी अतिशय खुलवून सांगितले..


सा-या
कार्यक्रमाची सूत्रे हाताळली ती गो नि दांची नात अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृणाल
कुलकर्णी यांनी.. महेश एलकुंचवारांचा परिचय करून दिला तो वीणा देव यांनी तर निलिमा
मिश्रा हिच्या कार्याची ओळख करून दिली ती विजय देव यांनी..



- सुभाष इनामादर, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Saturday, July 9, 2016

साधे आणि थेट काळजाला भिडणारे लिहणे हे गोनिदांचे वैशिष्ठ्य


वयाच्या १५ व्या सोळाव्या वर्षापर्यंत आई-वडील तुमच्याबरोबर असतात.. ते संस्कार घडवितात.  पुढे तुमचे तुम्हाला पुढे जायचे असते.. तसेच साहित्य क्षेत्रात मला भाषेची समज आली ती आप्पांच्या शितू मुळे.. त्यांनी मला सजग केलं.इतर साहित्यीकांची भाषा ही तशी जड होती.. पण आप्पांची कादंबरी वाचताना.. हा माणूस साहित्य लिहतोय अस वाटतच नव्हतं.. पण तशी भाषा लिहणं किती कठीण आहे..ते स्वतः लिहायला बसंलं.. की किती कठीण आहे हे आजही कळंतं. 
अल्पाक्षरी संवाद म्हणजे कीती..असावेत..१९५५ साली त्यांच्या या लेखनाने झपाटलो गेलो.. माझ्यावर ते संस्कार नकळत कुठेतरी झाले असणार.  मी जेव्हा लिहायला लागलो तेव्हा ते सारे हळुहळु शिकत गेलो..अल्पाक्षरी संवाद कसे असावेत..ते हळुहळु येत गेले.. भाषेचा संस्कार प्रत्यक्ष दिसत नाही पण होत असतो.. 
पारंपारिक भाषेचे सौंदर्य आप्पांच्या भाषेत दिसणार नाही..मला स्वतःला ती अतिव सुंदर वाटते कारण अशा प्रकारे मराठी साहित्यात यापूर्वी कुणी लिहले नाही.. ती अतिशय साधी आहे..साधे लिहणे हे तितके सोपे नाही..तसे साधे लिहायला फार मोठी तपश्चर्या लागते. ती थेट तुमच्या काळजापर्यत थेट पोहोचते.   त्यांच्या भाषेची भुरळ माझ्या मनावर खूप काळ होती.. जसे सगळे लेखक सतत तुमच्याबरोबर नसतात.. पण जर आप्पा नसते. विंदा नसते..दुर्गाबाई नसत्या तर आज मी जसं लिहू शकतोय तसं लिहू शकलो नसतो...फक्त ते घेण्यासाठी तुमचे मन सक्षम हवे..तसे संस्कारक्षम नसेल..तर विंदा..काय आप्पा काय दुर्गाबाई काय लिहत होत्या ते कळणेही दुरापास्त झाले असते.. 
आप्पा ज्या अनुभवला भिडले तो अनुभव मराठी वाचकाला पेलण्यासारखा नाही. शितू आणि पडघवलीतल्या नायिकांकडे पाहताना  त्यांचं भावविश्व इतके खोल आणि तरल आहे की तशा प्रकारे कधी कुणी आधी लिहले होते असं कधी वाटतं नाही.  त्यांच्या  भाषेच्या साधेपणाचे एक सामर्थ्य आहे.. ते इतकं अवघड आणि फसवं आहे की लक्षातच येत नाही.


असे जेव्हा ज्येष्ठ नाटकाकर..साहित्यिक महेश एलकुंचवार थेट रसिकांच्या भावनेला साद घालून सांगतात..तेव्हा खरचं गोपाळ निळकंठ दांडेकर..साहित्यक्षेत्रातल्या आप्पांच्या साहित्याबद्दलचा मराठी अभिमान जागा होतो..गोनिदांच्या नावाने दिला जाणारा मृण्मयी पुरस्कार जेव्हा ते विजया मेहता यांच्या स्विकारतात..तेव्हा तर मान ताठ मानेने उंच होत जाते.








शुक्रवारी ८ जुलैला..पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरातल्या उपस्थितांचे हात टाळ्यांसाठी  सतत सिध्द होत होते..त्यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याची सांगता या निमित्ताने झाली..पुरस्काराचे हे २६ वे वर्ष..





निरा-गोपाळ पुरस्कार दिला गेला तो जळगावच्या मॅगसेसे  पुरस्कार विजेत्या निलिमा मिश्रा यांना..तर यंदा प्रथमच आप्पांच्या नावे प्रोत्साहन पुरस्कार दिला गेला तो बबन गिंडे या तरुण कादंबरीकाराला..







गोनिदांच्या कन्या आणि जावई डॉ. विणा आणि विजय देव यांच्या पुढाकारने मृण्मयी पुरस्कार दरवर्षी ८ जुलैला दिला जातो..गो. नि. दांच्या साहित्यावर प्रेम करणारे रसिक..वाचक यांचा हा स्नेहमेळाच इथे भरलेला असतो..यंदा..ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू, दिपा श्रीराम, नाटककार गो.पु. देशपांडे यांचे सारखे मान्यवर रसिकांमध्ये  उपस्थित असताना असा सोहळा अनुभवणे हे ही भाग्याचेच होय..

अतिशय भावनापूर्ण पुरस्काराचे भाषण करून गो नि दांच्या साहित्याचे श्रेष्ठत्व सिध्द करणारे विचार महेश एलकुंचवारांच्या कडून ऐकायला मिळाले..यावेळी माचीवरचा बुधा या चित्रपटाचे धावता ट्रेलरही उपस्थितांना दाखविण्यात आला..जुलै ते जुलै असे किल्ल्यांवरचे अनुभव सांगणारी दीनदर्शीकाही इथे प्रकाशित केली गेली
तर आपल्या अध्यक्षिय भाषणात ज्येष्ठ दिग्दर्शिका आणि श्रेष्ठ कलावंत विजया मेहता यांनी जो मनस्वी संवाद केला त्याला तोड नाही.. केवळ गोनिदांच्या परिवाराकडून मदत स्विकारून हा सोहळा २५ वर्षे सातत्याने करणा-या सर्वांना आपण जे काम करीत आहात ते खूप महत्वाचे असल्याचे सांगून..आपले आणि आप्पांचे मैत्र कसे होते याविषयी विजयाबाईंनी त्यांच्या उत्तम शैलीत रंगमंचावरून जे वक्तव्य केले ते ऐकण्यासारखे होते.



आप्पांचे व्यक्तिमत्व हे अतिशय विरळा आणि अनोखे असल्याचे  त्या सांगतात.. मी त्यांना एक मुक्त फिरस्ता म्हणत असे. ते मुक्त शोधक होते..ते कधी काय शोधत असतील हे कधीही कळायचे नाही.. गो नि दांच्या शितू कादंबरीवरून जे नाटक लिहले त्याची मी दिग्दर्शीका आणि त्यातली शीतूची भुमिकाही मी केली..पण ती भूमिका मला आप्पांनी समजून दिली..मी शहरी..मला खेडयातल्या जीवनाचा अनुभव नाही..जोपर्यंत कलावंताला त्या भुमिकेचा गाभा सापडत नाही तोपर्यत चाचपडत असतो..तमे माझे झाले..पण शितू करताना मला त्या भुमिकेचा स्पर्शअनुभव करून दिला तो आप्पांना..कोकणातल्या खेड्यात नेले..तिथला निसर्ग वाचून दाखविला..तिथल्या स्त्रीयांचा अनुभव दिला..त्या मातीत शेणाने सारविल्या जमीनीचा तो ओलावा दिला..माझ्या लेखी आप्पांसारखा नाटककार मला भेटला नसता तर कलावंत आणि दिग्दर्शिका म्हणून कमी पडले असते... पहिल्यांदाच कोकणी बोली भाषा ..त्यांच्यातली देवाणघेवाण आमच्यापर्यंत पोहोचली .  केवळ नाटकच नाही तर मला माझे पती हरी खोटे गेल्यानंतरचा ओलावा दिला तो आप्पांनी.. त्यावेळी मी तूला भेटायला आलो हे जाणवूच दिलं नाही.. मला तेव्हा त्यांनी जो आधार दिला तो शेवटपर्यत रहाणार...

असाच काहीसा भावनोक्तट अनुभव महेश एलकुंचवारांच्या वाडा चिरेबंदी नाटक दिग्दर्शीत करताना कसा येत गेला ते विजया मेहता यांनी अतिशय खुलवून सांगितले..

सा-या कार्यक्रमाची सूत्रे हाताळली ती गो नि दांची नात अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांनी.. महेश एलकुंचवारांचा परिचय करून दिला तो वीणा देव यांनी तर निलिमा मिश्रा हिच्या कार्याची ओळख करून दिली ती विजय देव यांनी..
यानिमित्ताने गोनिदांच्या साहित्याची आजही वाचकांना भूरळ पडल्य़ाचे पुस्तकांच्या विक्रीवरून तर दिसतेच..पण त्यांच्या अनेक पुस्तकांचे पुनःप्रकाशनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यानिमित्ताने गा नि दां सारख्या ज्येष्ठ लेखकाची आठवण वाचकांच्या दारी कायम रहावी असाच हा सोहळा रंगत गेला..हे सांगायला नको.



- सुभाष इनामदार, पुणे
- subhashinamdar@gmsil.com
- 9552596276