Friday, December 26, 2008

सवाई गंधर्व संगीत महोत्सव- 2008

पं. अजय चक्रवर्ती यांचे लालित्यपूर्ण सादरीकरण आणि पं. शिवकुमार शर्मा यांनी संतूरवर अतिशय मोजक्‍या वेळात छेडलेला "दुर्गा', ही सवाई गंधर्व संगीत महोत्सवाच्या पहिल्या सत्राची वैशिष्ट्ये ठरली.
पहिल्या सत्राचा प्रारंभ तुकाराम दैठणकर यांच्या सनईवरील "भीमपलास'ने झाला. सनईवादनाच्या सलग चौथ्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे तुकाराम दैठणकर यांनी सनईच्या मंगल सुरांनी महोत्सवावरील सावट दूर तर केलेच; पण सुंदर लयकारीचे दर्शन घडवत रागमांडणी केली. विलंबित एकतालातील त्यांचे वादन "अब तो बडी बेर' या रचनेशी साम्य दर्शवणारे होते, तर त्रितालातील रचना "नैना रसीले जादूभरे' या रचनेसारखी वाटली. त्यांना मंगेश करमरकर यांनी तबल्याची उत्तम साथ केली. सीतलाप्रसाद (सनई), गणेश व अशोक दैठणकर (स्वरपेटी), नितीन दैठणकर (सुंद्री) हे त्यांचे अन्य साथीदार होते.
आश्‍वासक गायन युवा गायक कृष्णेंद्र वाडीकर यांनी या महोत्सवात प्रथमच गायन सादर केले. त्यांचे गुरू श्रीपती पाडेगार हे पं. भीमसेनजींचे ज्येष्ठ शिष्य होते. त्यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना आदरांजली म्हणून वाडीकर यांच्या गायनाचे आयोजन केल्याचे या प्रसंगी श्रीनिवास जोशी म्हणाले. वाडीकर यांना अर्जुनसा नाकोड यांच्याकडून ग्वाल्हेर घराण्याचे, तर पाडेगार यांच्याकडून किराणा गायकीचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांनी "राग पटदीप'मध्ये "धन धन घडी' हा विलंबित एकतालातील ख्याल मांडला. त्यांचा आवाज उत्तम आहे; पण परिपक्वता आणि वजन येण्याची गरज आहे, असे जाणवले. "पटदीप'मध्ये शुद्ध निषादावर अपेक्षित असणारा न्यास, या गायनात दिसला नाही. मात्र लयकारी आणि बोलताना उत्तम होत्या. विशेषतः एक आवर्तन-अर्ध्या आवर्तनातील बंदिशीचे शब्द घेऊन आलेल्या बोलताना खास ग्वाल्हेर घराण्याच्या होत्या. त्यांनी "पिया नाही आये' ही बंदिश मांडली. ताना जोरकस असूनही वैविध्य कमी वाटले. "स्मरता नित्य हरी, मग ते माया काय करी' हे भजन आणि रसिकाग्रहास्तव एक कानडी भजनही त्यांनी ऐकवले. त्यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनिअम) तसेच शिरीष कुलकर्णी आणि प्रशांत यांनी तानपुऱ्यावर साथ केली.
तालमीचे गाणे ज्येष्ठ गायक, गुरू आणि रचनाकार पं. सी. आर. व्यास यांचे पुत्र आणि शिष्य सुहास व्यास यांनी पूर्वी रागाची मांडणी केली. त्यांनी निवडलेला राग अलीकडे फारसा गायला जात नाही, तसेच त्यांनी हा राग तिलवाड्यात (१६ मात्रा) मांडला. सुरवातीला तालाचे वजन लक्षात येण्यासही रसिकांना जरा वेळ लागला; पण ते लक्षात येताच गायनात रंग भरला. व्यास यांना वडिलांप्रमाणेच पं. के. जी. गिंडे यांचेही मार्गदर्शन मिळाले आहे. "तालमीचे गाणे' असेच त्यांच्या सादरीकरणाचे वर्णन करावे लागेल. विशेषतः तार सप्तकातील गंधारावरचे काम त्यांनी चांगले केले. "बनत बनाओ बन नहीं आये' या द्रुत बंदिशीत ताना, लयकारीही उल्लेखनीय वाटली. व्यास यांचे स्वरलगाव, ठेहेराव त्यांच्या वडिलांची आठवण करून देत होते. याच रागातील एक तराणा त्यांनी एकतालात सादर केला आणि "एक सूर चराचर छायो' या भजनाने सांगता केली. त्यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनिअम) आणि आदित्य व्यास व अनुजा देशपांडे यांनी तानपुऱ्यावर साथ केली.
रंगतदार वादन पं. शिवकुमार शर्मा यांनी मोजक्‍या वेळेचे महत्त्व जाणून पाच स्वरांच्या "दुर्गा' रागाची निवड केली असावी. ते सिद्धहस्त कलाकार असल्याने थोड्या वेळातही त्यांच्या वादनाने रंग भरला. मोजक्‍या आलापात "दुर्गा'रूप दर्शवून अतिशय नेटके तरीही प्रभावी रागचित्र त्यांनी निर्माण केले. "झाला' मात्र त्यांनी आटोपता घेतला, असे वाटले. "दुर्गा' रागातील १३ मात्रांतील "जय' तालात (४-४-५ अशी मात्रा विभागणी) त्यांनी अप्रतिम सादरीकरण केले. तबलावादक योगेश सम्सी यांच्यासह द्रुत वादनातील रंगतही रसिकांची दाद मिळवून गेली. त्रितालातील एक रचना ऐकवून त्यांनी "पहाडी'मधील नवी रचना ऐकवली. डॉ. धनंजय दैठणकर यांनी तानपुऱ्यावर साथ केली.
लालित्यपूर्ण गायन पतियाळा घराण्याचे प्रसिद्ध गायक पं. अजय चक्रवर्ती यांच्या अत्यंत लालित्यपूर्ण गायनाने पहिल्या सत्राचा समारोप झाला. त्यांना योगेश सम्सी (तबला), अजय जोगळेकर (हार्मोनिअम) यांनी साथ केली. पं. ग्यानप्रकाश घोष यांचे मार्गदर्शन लाभलेल्या चक्रवर्ती यांच्या गायनात वैविध्य आणि भावपूर्णतेचा दुर्मिळ संगम होता. "खमाज'मधील "आय आयो पाहुना' ही पं. घोष यांचीच रचना त्यांनी मांडली. "खमाज' हा मांडणीचा राग म्हणून सहसा गायला जात नाही. बहुधा उपशास्त्रीय रचना त्यात सादर केल्या जातात; पण चक्रवर्ती यांनी शुद्ध खमाज मांडला आणि अन्य "मिश्रपणा'पासून खमाज अलिप्त ठेवला, हे आवर्जून नोंदवायला हवे. "काहे करत मोसे बरजोरी' ही त्यांची स्वतःची बंदिश झपतालात बांधली होती. बडे गुलाम अली खॉं यांची "मनमोहन शाम रसिया' ही त्रितालातील रचना, "कोयलियॉं कूँक सुनावे' (यातील कूँक या शब्दावरील नि सा या स्वरांचा न्यास अप्रतिम) "आज मोरी कलाई मुरकतली' ही रचना...असे वैविध्य त्यांच्या गायनात होते. मंद्र सप्तकापासून अतितार सप्तकातील स्वरांचे काम, आकारयुक्त गायन, दमसांस, भावपूर्णता, तिन्ही सप्तकांत फिरणारा आवाज, अप्रतिम सरगम, गमकी ताना, स्वरांचे लगाव, ठेहेराव आणि आंदोलने...अशा अनेक वैशिष्ट्यांनी युक्त असणारे हे गायन त्यातील विलक्षण सहजता आणि प्रसन्नतेमुळे रसिकप्रिय ठरले. "आवो भगवान' या भैरवीने चक्रवर्ती यांनी गायनाची सांगता केली.

Saturday, October 11, 2008

व्यंगचित्र कागदावर उमटतात कशी ?


व्यंगचित्राच्या दुनियेत आपले नाव कोरलेले मंगेश तेंडूलकर यांनी व्यंगचित्र

कागदावर उमटतात कशी ?

"आयुष्याच्या प्रवाहात तुम्ही जर सतर्क उभे राहिलात की

एखादी विनोदी कल्पना माशासारखी चटकन क्‍लिक होते.

ती तिथून उचलायची आणि थेट कागदावर उतरायची',

मंगेश तेंडूलकर सांगतात.फोटो आणि कॅरिकेचर मधला फरक सांगताना ते म्हणतात,

फोटो हा चेहऱ्याची कॉपी असते. व्यंगचित्रातला चेहरा त्या व्यक्तिच्या स्वभाव

वैषिष्ठ्यासह कागदावर रेखाटता येते.

हेच क्ररिकेचरचे वेगळेपण आहे.


वयाच्या १८ व्या वर्षा पासून व्यंगचित्रे काढणारे तेंडूलकर वयाच्या ७२ व्या वर्षीही

तेवढ्याच उत्साहाने नविन कल्पना कागदावर रेखाटताहेत.

त्यांच्या समीक्षात्मक लेखनातही ते वारंवार अनुभवता येते.

दिसताना तेंडूलकर गंभीर दिसतात.

पण त्यांच्यातला मिश्‍किल भाव त्यांच्या व्यंगचित्रातून उमटतो.

कुठलेही व्यंगचित्र वास्तवतेची सीमा ओलांडून क्रिएटिव्ह बनून

तुम्हाला जे म्हणायचे आहे ते अचूक सांगते .

वास्तवतेला इतके भव्य स्वरूप व्यंगचित्रातूनच अंगावर येते.

आपल्या व्यंगचित्राच्या दुनियेत वावरताना पहाणे आणि

मंगेश तेंडुलकरांची व्यंगचित्रे फ्रान्समध्ये झळकली

गेली 54 वर्षे विविध विषय व्यंगचित्रातून मांडणाऱ्या ज्येष्ठ व्यंगचित्रकार
मंगेश तेंडुलकर यांची चित्र यंदा फ्रान्समध्ये विविध प्रदर्शनातून झळकत आहेत.

सिएटेलनंतर परदेशात भरलेलं हे त्यांचं पहिलंच प्रदर्शन असून फ्रान्समध्ये
यापूर्वीही त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन झाले आहे.
फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये शिखर परिषदेसाठी जमलेल्या वायनरीजशी संबंधित
मंडळींनी त्यांच्या चित्रप्रदर्शनाला भेट दिली. त्याला मिळालेला प्रतिसाद पाहून
त्या शेजारच्या आर्ट गॅलरीत वेगळ्या दहा चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.
चित्रांची निवड आणि मांडणी विनिता आपटे यांनी केली आहे.
सामाजिक विषयांवर आधारित चित्रांमध्ये वाहतूक प्रश्‍नांशी
निगडित चित्रांचं प्रमाण मोठं आहे.
या व्यंगचित्रांबाबत बोलताना तेंडुलकर म्हणतात, ""व्यंगचित्रांची ही जी भाषा
आहे ती इतर भाषांचे बांध ओलांडून पलीकडच्या माणसांपर्यंत पोचते.
त्याची मला एकदा प्रयोगादाखल सत्त्वपरीक्षा घ्यायची होती ती
जगातल्या इतर लोकांना कशी समजतात. याचा अनुभव घ्यायचा होता.
हा अनुभव प्रोत्साहन देणारा आहे.''

त्यांच्याशी साधलेल्या संवादाचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा..

आत्तापर्यंत त्यांची 46 ठिकाणी व्यंगचित्रांची स्वतंत्र प्रदर्शने भरली आहेत. व्यंगचित्र प्रदर्शनाचा सुवर्णमहोत्सवही लवकरच वेगळ्या तऱ्हेने साजरा करण्याचा त्यांचा विचार आहे.
व्यंगचित्रे कशी सुचतात हे सांगताना तेंडुलकर म्हणतात, "
"आयुष्याच्या प्रवाहामध्ये जर तुम्ही सतर्क उभे राहिलात की
एखादी विनोदी कल्पना कुठेही सापडते. मात्र ती उचलण्यासाठी नजर हवी.
माणसाच्या स्वभावात काय काय असू शकेल हे पाहण्याचे कुतूहल आपल्याला आहे.
त्यातूनच ही चित्रे कागदावर चितारली आहेत.''

Wednesday, October 8, 2008

पुणेकरांनी अनुभवला भव्य दिंडी सोहळा

तुकारामबुवा भूमकर यांनी तुकाराम महाराज जन्मचतुःशताब्दी निमित्ताने
आणि मृदंगाचार्य बाबूराव डवरी यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्ताचे औचित्य साधून
कसबा पेठेतल्या भूमकर निवासापासून तुकाराम महाराजांच्या फर्ग्युसन रस्त्यावरच्या
मंदिरापर्यंत मृदंग दिंडी मिरवणूक सोमवारी आयोजित करण्यात आली होती.
यात तुकारामबुवांचे दीडशे शिष्य आपल्या मृदंगासह सहभागी झाले होते.
सोहळ्याचा आरंभ भूमकर निवासापाशी संत साहित्याचे अभ्यासक प्रा. सदानंद मोरे
यांच्या हस्ते तुकाराम महाराजांच्या रथावर आरूढ झालेल्या पुतळ्याला
पुष्पहार घालून झाले.
भूमकरांचा नातू बाळही यात मृदंग वाजवत सामील झाला होता, ही विशेष बाब...
काही महिलांचेही नाजूक हात मृदंगावर नाद काढीत होते.
दिंडी सोहळा अनुभवण्यासाठी इथे क्‍लिक करा....

कसबा गणपती, श्रीमंत दगडूशेठ गणपती आणि लक्ष्मी रस्त्याने ही दिंडी
तुकाराम महाराजांच्या मंदिराकडे मार्गस्थ झाली.
"ज्ञानोबा महाराज तुकाराम'चा गजर आणि टाळ-मृदंगांचा नाद
यानिमित्ताने पुन्हा एकदा पुणेकरांनी अनुभवला

Saturday, October 4, 2008

आठवणींच्या कुपीत पारिजातकाचा सडा

आठवणींच्या कुपीत पारिजातकाचा सडा

किती वेचू, किती आठवू

क्षण माझा मोहरुन विसरलो मी मला....


हिच कविता प्रत्यक्षात ऐका आणि पहा...

Wednesday, October 1, 2008

क्षणांचा पडला सडा

आठवणींच्या कुपीत पारिजातकाचा सडा
किती वेचू, किती आठवू
क्षण माझा मोहरुन विसरलो मी मला....

ओंजळीत वेचलेली फुले मनात दरवळतात
किती घेऊ, किती टिपू
क्षणांचा सहवास सादही मला घालतात....

न्हालेल्या केसांतून गळतात टपटप मोहरा
किती झेलू, किती सोडू
क्षणात दिसतात, पाहतात तो चेहरा....

स्पर्शाचा बहर नटलेला, स्वर्ग हलताना दिसतो
किती ओंजळी, किती वेळा
क्षणांची निसटतात पिसे, मोहवतात, भिरभिरतात....

वर्षांची उलटतात पाने, विरतात कागद
किती शोधू, किती साठवू
क्षणांच्या त्या भाग्याने, ओंजळीतल्या कशिद्याने....

क्षणांचा हिशेब क्षणातच उलगडतो
किती मोजू, किती नाचवू
क्षण मात्र वेढतात पुढच्या क्षणांचा तिढा...

सडा पारिजातकाचा आहे क्षणभंगुर
किती भरू, किती निवडू
क्षणांवर कोरलाय क्षणांमधला भावांकुर.....

कधी विसरू म्हणता विसरता येत नाही
किती देऊ, किती घेऊ
क्षणांचेही त्या सांगता येत नाही....

बेईमान न होता, सोबत करीन तुला
किती शपथा, किती सांगता
क्षणाला झेलण्यासाठी क्षणांचा करीन झुला...

सारे जीवन म्हणजे पारिजातकाचा सडा
किती साठवू, किती निवडू
क्षणांच्या साक्षीने क्षणांवरच झालो मी फिदा.....

सुभाष इनामदार,
पुणे.
३० सप्टेंबर २००८

उदे ग अंबे उदे- जागर देवीचा

देवीच्या नवरात्रीचा उत्सव मंगळवारपासून देशभरात सुरु झालाय.
महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तिपीठे आहेत.
घरोघरी घटस्थपना करुन देवीचा जागर केला जातो.
देवीच्या नावाने घातलेला गोंधळ हा याच उत्सवाचा एक भाग समजला जातो.

गोंधळांचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करावे.

Tuesday, September 30, 2008

दीदी आणि मी- आठवणींचा कप्पा




मंगेशकर कुटुंबाला "सोनियाचा दिनू' दाखवणारी आमची लतादीदी म्हणजे


मास्टर दीनानाथांचा पुनर्जन्मच...


हृदयनाथांच्या दाटलेल्या कंठातून अशा एक एक आठवणी उलगडत गेल्या


अन्‌ त्या ऐकताना श्रोत्यांनीही पाणावलेल्या डोळ्यांत ते "सोनियाचे' क्षण साठवले.


निमित्त होते गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या ८० व्या वाढदिवसाचे!


"स्वरभारती'तर्फे आयोजित "दीदी आणि मी' या कार्यक्रमात


ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी त्यांच्या आणि लतादीदींच्या


आठवणींचा कप्पा पुणेकरांसमोर उघडला .


या क्षणांचे साक्षिदार होण्यासाठी तुम्हीही हा व्हिडीओ पहा.




......आणि रविवारी सायंकाळ दणाणून गेली




बीएमसीसी महाविद्यालयाने सादर केलेल्या "दोन शूर' या एकांकिकेत ओम भूतकर आणि अभय महाजन.------------------------------------------------------------------------------------




""पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत जिंकण्यासाठी प्रत्येक फेरीत केलेला संघर्ष


आणि त्याचा अनुभव ही आयुष्यभराची शिदोरी आहे.


नव्या पिढीला रंगभूमीवर कार्य करण्यास "महाराष्ट्रीय कलोपासक'ने


नेहमीच प्रोत्साहित केले आहे.


या स्पर्धेतील प्रत्येक कलाकाराच्या मनात "पुरुषोत्तमचे दिवस'


निरंतर घर करून राहतात. हेच या स्पर्धेचे यश आणि


स्पर्धेने दिलेली सर्वांत मोठी देणगी आहे.''


इति अरुण काकडे.


या स्पर्धेतले यशस्वी संघांना अणि महाविद्यालयांना


अरुण काकडे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.


अतिशय तरिणाईने बहरलेल्या वातावरणात हा समारंभ रविवारी साजरा झाला.

फिल्म्स डिव्हीजनकडे अद्ययावत ग्रंथालय

एके काळी चित्रपटगृहात दाखविला जाणारा फिल्म्स डिव्हिडनचा माहितीपट
आता कालबाह्य झाला आहे.
मात्र या सरकारी विभागाचे काम वेगळ्या पध्दतीने सुरू आहे.
नेमके काय काम चालते याविषयीचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.

देशातल्या मान्यवरांच्या जीवनावर आधारीत चित्रफिती ते तयार करत आहेत.
त्यापैकी एक होती संतूर वादक शिवकुमार शर्मा यांच्यावर
नुकतीच पुण्यात दाखविण्यात आलेली फिल्म.
फिल्म्स डिव्हीजनकडे भारतीय कला आणि संस्कृती
विषयक दहा हजारांवर चित्रफिती उपलब्ध आहेत.
त्यांचे अद्ययावत डिजीटल ग्रंथालय मुंबईत आहे.
त्या कुणालाही आभ्यासाठी उपलब्ध असल्याची माहिती
फिल्म्स डिव्हिजनचे कार्यकारी निर्माते कुलदिप सिन्हा
पुण्यात बोलताना दिली.

मराठी रंगभूमिवरचे एक कालपर्व संपले


ज्येष्ठ दिग्दर्शक आणि कलावंत दामू केंकरे यांचे

रविवारी मुंबईत निधन झाले.

त्यांना आविष्कार, मुंबईचे अरुण काकडे

आणि ज्येष्ठ नाट्यसमीक्षक डॉ.वि. भा. देशपांडे

यांनी वाहिलेली श्रध्दांजली .


डॉ. नारळीकरांनी दिला मेहनतीचा गुरुमंत्र


महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना

ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांच्या हस्ते

शनिवारी डॉ. गो. रा. परांजपे पुरस्कार प्रदान करण्यात आला.

""मेहनतीच्या यशाने मिळणाऱ्या आनंदाची मजा चाखायला शिका,''

असा गुरुमंत्रही डॉ.नारळीकरांनी यांनी दिला.

Saturday, September 27, 2008

शब्द आणि चालीला न्याय देऊन केलेली सीडी


भावगीतातला प्रत्येक शब्द. शब्दांच्या दृष्टीने येणारी चाल,

चालीतली बारीकशी जागाही अर्थपूर्णरित्या संजीव अभ्यंकरांनी

यात गायली आहे.

"जीवनरंग' सीडीतले प्रत्येक गीत क्‍लासिक

व्हावे असा प्रयत्न संगीतकार केदार पंडीत यांनी केला आहे.


Friday, September 26, 2008

कधी काळी कीव करणाऱ्या कावळ्यांनो......

काव... काव....कावळा

कावळ्याची काव काव कधी काळी कानी
केली काही कीव कोणी कोण्या का-मनी

कारण काय कधीच कळले कुणाला
कोण्या कंपीत काळावर कावळाच काळा

केल्याने कधी कोणाचे काम कमी केलेय
केव्हा कांही कुणी करणी केलीय

.................................................................
( काव्य कंड -१)

जीवनरंग-भावगीतांचा नवा अल्बम (भाग दुसरा)

ख्याल गायकीतून भावगीताकडे वळलेल्या संजीव अभ्यंकरांची ही सीडी.
वयाच्या चाळीशीत संजीव अभ्यंकरांच्या सूरातून शब्दांना पुरेपुर न्याय मिळाला आहे.

जीवनरंगच्या दुसऱ्या भागाचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे किलक करा.

जीवनाकडे सकारात्मक पाहण्याऱ्या प्रवीण दवणेंच्या रचनातून
हा मराठी गीतांचा आल्बम साकार झालाय. त्याला निवेदनही त्यांचेच आहे.
केदार पंडीत यांनी संगीताच्या सुरावटीतून अकरा रचना ऐकताना
भान विसरून त्या शब्द- सूर आणि संगीतात आनंदाचे क्षण आठवत
त्या ऐकल्या जातील.
संजीव अभ्यंकर यांनी यातले प्रत्येक गीत उत्तम व्हावे यासाठी प्रयन्त केला आहे.
सीडीचे मराठी रसिक स्वागतच करतील असा तीनही कलावंतांना विश्‍वास आहे.

Thursday, September 25, 2008

संजीव अभ्यंकरांची पहिली भावगीत सीडी - जीवनरंग


आजच्या ताणतणावाच्या, धकाधकीच्या काळात जीवनाकडे कसे सकारात्मक पाहावे,

याचा विचार देणारी "जीवनरंग' ही सीडी ऑक्‍टोबरमध्ये व्हर्जिन म्युझिक कंपनी

बाजारात आणत आहे.
तिचे वैशिष्ट्य म्हणजे
शास्त्रीय संगीतात नाव कमावलेल्या
संजीव अभ्यंकरांची ही पहिली भावगीतगायनाची सीडी.



याची मूळ संकल्पना सांगताना संगीतकार केदार पंडित सांगतात, "

"धकाधकीच्या काळातही जीवन तत्त्वांकडे वेगवेगळ्या अंगांनी कसे बघता येईल.

जीवनाकडे पॉझिटीव्ह दृष्टीने पाहण्याचा विचार भावगीतांच्या माध्यमातून

उलगडण्याचा हा प्रयत्न आहे. संजीव अभ्यंकरांचा कसदार आवाज यासाठी निवडला.

प्राध्यापक आणि कवी प्रवीण दवणे यांच्याकडून गीते लिहून घेतली आहेत.

मराठी रसिक या सीडीला भरघोस प्रतिसाद देतील असे वाटते.'

'केदार पंडित यांच्या बोलण्यातून, निसर्गातल्या निर्जीव भावना म्हणजे झऱ्याचे झुळझुळणे,

आईचे थोपटणे कोणत्या शब्दात वर्णन करता येईल?

"निळ्या निळ्या मैफिलीत घुमली हिरवी हिरवी तान,

ऐकायाला तान करूया -

आज फुलांचे कान'


अशा रचना करून त्यांना स्वरात साकार केलेय ते संजीव अभ्यंकर यांनी.

ईएमआय या व्हर्जिन म्युझिक कंपनीने काढलली मराठीतली पहिली सीडी आहे.

लहानपणापासून ख्यालगायकीची तालीम घेऊन शास्त्रीय संगीताचा

पाया पक्का केल्याचे संजीव अभ्यंकर सांगतात.

"माझ्या भावगीत गायनाचा हा पहिला अल्बम. केदार पंडित यांच्या संगीतामुळे गायला मजा आला. प्रवीण दवणे यांची गीतेही मनाला फारच भिडतात,'

असे सांगून त्यांचेच निवेदन या सीडीला लाभल्याची माहितीही संजीव देतात.

केदार पंडित, प्रवीण दवणे आणि संजीव अभ्यंकर

यांचा सहभाग असलेल्या या सीडीविषयी संजीव अभ्यंकर

आणि केदार पंडित दोघेही भरभरून बोलतात.

Tuesday, September 23, 2008

विषय, मांडणीत वेगळेपणा टिपणारी... "पुरूषोत्तम करंडक '


महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित आंतरमहाविद्यालयीन पातळीवरची विद्यार्थी जिवनातली सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धा. पुरुषोत्तम करंडक. यंदाचे स्पर्धेचे ४४ वे वर्ष होते.

ऑगस्टमध्ये झालेल्या प्राथमिक फेरीतून निवडलेल्या नऊ एकांकिकांची

शनिवारी आणि रविवारी भरत नाट्य मंदिरात अंतिम स्पर्धा उत्साही वातावरणात पार पडली.

यंदामात्र ती पाहण्यासाठी सेलिब्रीटी कुणीच नव्हते.

दहशतवाद. हल्ली आयटीच्या जमान्यात येत असलेला ताण. माणस -माणसातले विरळ होत चाललेले नाते. शिक्षण क्षेत्रात होणारे बदल. अशा वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करणारे लेखन. सादरीकरणात तंत्रांचा वाढता प्रभाव. विशेषतः संगीताचा प्रभावी वापर करुन वातावरणाला मिळणारी पोषकता. भूमिकांमधील बारकावे टिपण्याचा प्रयत्न. दिग्दर्शन करताना चोख प्रयोग देण्याची कारागिरी. आणि सर्वात महत्वाचे पात्रांच्या तोंडीची भाषा. थेट भिडणारी. आजच्या पिढीला भाषेचे बंधन घालणे आता थोडे अवघडच झाल्यासारखे वाटते आहे. ती बोलताना सहजताही तेवढीच.स्पर्धेत सादर झालेल्या एकांकिकातून जे दिसले ते थोडक्‍यात नोंदविणायचा हा प्रयत्न....





अतिरेक्‍यांच्या स्फोटांनी देश आणि शेजारी देश हादरला असताना काश्‍मिरमधल्या कुपवाडा भागात सामान्यांना जगणे कसे असहाय्य झाले आहे. बॉंब स्फोटांनी शहरे, राज्ये हादरताहेत. मात्र तरीही स्फोटाच्या दुसऱ्या दिवसापासून सामान्यांचे जनजीवन कांही घडले नसल्यासारखे सुरू असते. दीडशे वर्षे भारतावर राज्य करणाऱ्या इंग्रजांना "चले जाव' सांगण्याचे बळ सामान्यात तेव्हा होते. आज दहशतवादाला संपवण्यासाठी सामान्य जनता काही घडलच नाही असं समजून जगते आहे. राजकीय लोक या प्रश्‍नावर ठोस पावले उचलत नाहीत. यावर भाष्य करणारी 'अब ता आदतसी हो गयी...' ही एकांकिका विषय आणि सादरीकरण म्हणून दोन्ही दृष्ट्या सक्षात रहातेअभियांत्रिकी महाविद्यालय, पुणेच्या कलावंतांचे ते होते सादरीकरण. विषय रेखाटण्यात वेगळेपण आणि स्वानंद जवळेकरचे दिग्दर्शन साऱ्यामुळेच त्यांचा विषेश उल्लेख करावा लागेल. अश्‍विनी शहा, गायत्री मुळे आमि वैभव तत्ववादी यांच्या अभिनयातून वातावरणाला बदल, तरलतेचा स्पर्श झाला.


बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाची "दोन शूर' चाळीस मिनिटे बैलगाडीत घडते. ओम भुतकर यांनी गाडीवानाच्या भूमिकेत साकारलेले बारकावे आणि अक्षय महाजन याने भेदरेलेला तरीही उसने अवसान आणुन साकारलेला सुधीर. दोघेही केवळ अफलातून. आलोक राजवाडे यांनी दिग्दर्शित केलेली ही एकांकिका म्हणजे रंगमंचावर बैलगाडीतून साकारलेली एक अनोखी कलाकृती होती. कलावंतांनी शब्दापेक्षाही लुक्‍स मधून उभी केलेली व्यक्तिरेखा दिर्घ काळ लक्षात राहणारी आहे.या स्पर्धेत दोन पात्रांनी खिळवून ठेऊन परिणाम साधणारी एकांकिका म्हणू तिचा उल्लेख करायला हवा.पुरुषोत्तमच्या अंतिमफेरीत वेगळ्या तऱ्हेने साकरलेली आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांनी दाद दिलेली ही एकांकिका.



एम आय टीची "आर्टिफिशियल इन्टेलिजन्स....' ही विषय आणि परिणामकारक सादरीकरणामुळे प्रभाव टाकते.भावनेला बाजूला ठेऊन आलेल्या संधीसाठी सामोरे जाणे हेच आजच्या जिवनाचे लक्षण सांगणारी ही एकांकिका. उद्या इंजिनियरिंगच्या फायनलची परिक्षा असताना रात्री वडील अपघातात गेल्याचे कळते. मुलाने वडिलांच्या अंत्यसंस्काला जायचे की परिक्षा द्यायची यावर निर्णय घेताना निर्माण होणारी स्थिती इथे मांडलीय. आजची संधी आजच घेतली पाहिजे. वडील तर गेलेच आहेच त्यांनी मुलासाठी जपलेले स्वप्न साकार होण्यासाठी परिक्षा दिलीच पाहिजे असे सांगताना आजच्या ताणाच्या स्थितीचे संवादातून वर्णन करणारी ही एकांकिका.विराट मडके यांनी दिग्दर्शनातून ती वेधकतेने मांडलीय. शब्दातूनच व्यक्त होणारी ही एकांकिका बोलकी होते ती कलावंताच्या प्रभावी आविष्कराने. नेपथ्य, प्रकाश आणि संगीताचा परिणाम विषय अंगावर येण्यासाठी पुरक होतो. कलावंतात सर्वांनीच सारखा परिणाम साधलाय पण पियुष देशमुख आणि ऋषीकेश बर्डे यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल.


आबासाहेव गरवारे महाविद्यालयाने 'आता पास' ही यतीन माझिरे दिग्दर्शित एकांकीका म्हणजे नेपथ्य , प्रकाश, संगीत आणि सांघिकपणे साकारलेली सुरेख एकांकिका.कोकणातल्या गणपती काळात घडणारी ही कथा. शंना नवरेंची मूळ कथा. कथावस्तू मुळातच भावनेला हात घालणारी. शिक्षण देताना पारंपारिक पध्दत सोडून अनुभवातून दिलेली उदाहरणे देऊन गणितासारखा अवघड वाटणारा विषयही किती सोपा होतो ते सांगणारी. नेमके वातावण निर्माण करुन सादर झालेली ही परिणामकारक एकांकिका. पात्रांचे नेटके संतुलन अणि त्यातून साधलेला सांघिक परिणाम यातून ही एकांकिका उठावदार झाली.


गावाकडे शिक्षण मिळते ती व्यवस्था टिपणारी. ग्रामिण भागात वातावरणातून शिकणारे विद्यार्थी. यांचा वास्तव अनुभव हसत-हसत देणारी ही एकांकिका सादर केली ती आय एल एस विधीमहाविद्यालयाने "आम्ही तुझी लेकरे '.हलगीच्या तालावर थिरकणारी ही मुले. शहरातून गावात आलेला हुशार मुलगा आणि घरच्या परिस्थीतीने शिक्षण घेणेही ज्याच्या जिवावरचे ओझे होते अशा दोन विद्यार्थ्यांची ही भावनेला हात घालणारी गोष्ट. दिग्दर्शक मियाज ईक्‍बाल नियाट मुजावर यांनी ती ताकदीने उभा केलीय. इब्लीस तरीही हुशार अशी टिम त्यांनी छान निवडली आहे.तंत्रापेक्षा सादरीकरणाचा परिणाम ती साधते.

पीआय साटीची "चिल्ड्रन ऑफ हेवन'ही एक साध्या बीजातून उमलेलेली तरल कहाणी. बहिणीचे बुट दुरुस्त करला जाताना भावाकडून ते हरवतात आणि मग सुरू होतात ते परत मिळवण्यासाठी किंवा नवे मिळावेत यासाठी केलेल्या क्‍लृप्त्या. शितल क्षिरसागर यांनी ती दिग्दर्शित केलीय. गरीब परिस्थितीत राहणाऱ्या अली (सौरभ कडकोडी)आणि झारा (अत्रेयी मैती) यांच्या नात्यांची ही वीण. विषयाचे वेगळेपण आणि भारावलेल्या वातावणाचा नेमका परिणाम ही एकांकिका साधते.


मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य महाविद्यालयाची "मृगनक्षत्र'ने लक्ष वेधले ते स्नेहल घायाळ या विद्दयार्थिनीच्या धारदार अभिनयाने. चित्रकाराच्या घरी काम करणारी पण भावनेत गुंतत जाणारी शांता तीने फारच छान साकारली. अद्वैत कुलकर्णीचा चित्रकार मात्र एकसूरी होता. छोट्या छोट्‌या प्रसंगातून एकांकिकेने वेगळपण जपले. चेतन डांगे याचा दिग्दर्शक म्हणून प्रयत्न चांगला होता. .संगीत, प्रकाश आणि नेपथ्यातूनही एकांकिकेचा प्रभाव जाणवतो.


मॉडर्नची "साक्ष' मध्ये तीन भिकाऱ्यानी केलेला अफलातून आभिनय उठाव आणतो. कथेची सुरवात आणि शेवट विषयाला दुसरीकडे नेतो. विद्यार्थ्यांनी केलेली मेहनत त्यांच्या सादरीकरणात क्षणोक्षणी जाणवत होती.


पुणे विद्यार्थी गृहाचे आमियांत्रिकी महाविद्यालयाची "नात"ं ने फारसा प्रभाव टाकला नाही. परसत गेलेली आणि नेमका परिणाम न साधलेली ही एकांकिका.तंत्रचा फारसा वापर नसला तरी त्यातही चुका करून प्रयोगाचा परिणाम ती साधू शकली नाही.


एकूणच स्पर्धेच्या अंतिम फेरीत सादर झालेल्या एकांकिकेतून महाविद्यालयीन तरुणांमधली रग आणि धग जाणवते. त्यांचेकडे वेगळे विषय आहेत. नवो करण्याची जिद्द आहे. मेहनतीला ते मागेपुढे पाहणार नाहीत.त्यांच्यात टॅलेंटही भरपूर आहेत. केवळ योग्य मार्गदर्शन मिळाल्यास उद्याच्या कलाजिवनात स्वतःच्या पायावर आपला झेंडा फडकवणारी पिढी आहे हे नक्की.


सुभाष इनामदार,पुणे


subhashinamdar@gmail.com

Saturday, September 20, 2008

"तें'साठी तीन दिवस- तीन नाटके


विजय तेंडूलकरांच्या लेखनातील मानवी मनाचा शोध घेणाऱ्या तीन नाटकांचा महोत्सव

"सकाळ रसिक परिवारा'च्या वतीने

शुक्रवारपासून बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित केला गेला आहे.

व्यंगचित्रकार मंगेश तेंडूलकरांच्या हस्ते

'तें'साठी तीन दिवसाची सुरवात झाली.



शनिवारी "कमला'आणि रविवारी "चौऱ्याहत्तर पावसाळ्यांचा जमाखर्च'

हा तेंडुलकरांच्या कथेवर आधारित एकपात्री नाट्यप्रयोग

या महोत्सवात होणार आहे.

Friday, September 19, 2008

"संतूर गा रहा है'- पं.शिवकुमार शर्मा

विख्यात संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा याचा कलाप्रवासाचा संगीत अभ्यासकांना
मोहित तर करेल पण स्वतःहातला कलावंत कसा घडवावा याचे दर्शन देईल.
फिल्म्स डिव्हिजनने पुण्यात पं. शिवकुमार शर्मा यांच्या उपस्थितीत
मान्यवरांना तासाभराचा हा माहितीपट दाखविला.

या समारंभाचा आणि माहितीपटातला हा कांही अंश....

संगीत ही मने जोडणारी, प्रेमाची भाषा


संगीत ही विश्‍वात्मक संवादाची, मने जोडणारी केवळ प्रेमाची भाषा आहे

आणि सर्जनशीलता हा तिचा आत्मा आहे,'' ""संगीत ही गुरुमुखी विद्या आहे.

त्यामुळे एखाद-दुसरा शिष्यच खऱ्या अर्थाने गुरूला घडवता येतो.

डझनावारी किंवा शेकडो शिष्य तयार होत नाहीत.''माहितीपटाच्या निमित्ताने

त्यांच्याशी खास संवाद साधताना ज्येष्ठ संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांनी

संगीतविषयक विचार व्यक्त केले.


माहितीपट दाखविल्यानंतर बुधवारी पं. शिवकुमार शर्मा यांनी पत्रकारांशी संवाद केला.


Wednesday, September 17, 2008

"होतं असं कधी कधी'च्या निमित्ताने


-"रसिकमोहिनी 'या भाग्यश्री देसाई यांच्या संस्थेने निर्मित केलेला वेहळ्या वाटेवरचा चित्रपट म्हणजे "होतं असं कधी कधी'.


नाटकांची निर्मिती करताकरता भाग्यश्री देसाई यांना समीर जोशी यांची कथा मिळाली.शहरी जिवनाला एक जबरदस्त वेग आहे.हा वेगच माणसांना धावायला लावतोय.अशावेळी थोडं थांबून "स्व'चा शोध घेण्याची गरज आहे.

जगण्याचा वेग वाढल्याने आय टी मध्ये काम करणाऱ्यांना टार्गेट, मिटींग आणि डेड- लाईन पाळण्यात स्वतःकडे पाहण्यासाठी वेळच नसतो. यामुळे आयुष्यातले आनंदाचे क्षण आणि प्रसंग साजरे करायला ते दुरावतात.त्यामुळे नातेसंबंधात दुरावा निर्मिण होतो.. माणुस यंत्रासारखा धावतो."होतं असं कधी कधी' असं सांगत दिग्दर्शक निरंजन जोशी यांनी तो घडवलाय.



निर्माती आमि प्रमुख भुमिकेत भाग्यश्री देसाई प्रथमच नोठ्या पडद्यावर आल्या आहेत.चित्रपट प्रदर्शनानंतर या मंडळीनी केलेली विधाने आणि त्यांचा विषयामागचा विचार


Monday, September 15, 2008

पुण्याची मिरवणूकीची उत्तरोत्तर रंगत वाढली


पुण्यातल्या गणेश विसर्जन मिरवणूक ही शहराची शान.
मानाच्या गणपती नंतर लक्ष्मी रस्ता गणेश मंडळांच्या सजावटींनी
आणि आकर्षक अशा ढोल-ताशांच्या पथकांनी दुमदुमून गेला होता.
दिल्लीत शनिवारी झालेल्या बॉंब स्फोटाच्या पार्श्‍वभूमिवर
पुण्याच्या विसर्जन सोहळ्याला आगळे महत्व प्राप्त झाले होते.
प्रत्येक मंडळाला रस्त्यावरच्या चौका-चौकात गणपतीचे प्रदर्शन करण्यासाठी वाजवायचे आसते.
समाधान चौकातून लक्ष्मी रस्त्यावरच्या मिरवणूकीत सहभागी होण्यासाठी प्रत्येक मंडळ प्रयत्न करीत असते.

संध्याकाळनंतर रोषणाईचे गणपती मिरवणुकीत सामिल झाल्यानंतर मिरवणूक अधिकाधिक रंगत गेली.
पोलिस मंडळांना लवकर पुढे जाण्याची विनंती करीत होते.
पण जसजसे रस्त्याच्या दुतर्फा गर्दी वाढत जाते,
तसतसा मंडळाचा उत्साहही वाढत गेला.

ह्या उत्साही मिरवणुक सोहळ्याचे चित्रीकरण पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.

Sunday, September 14, 2008

घरच्या गणपतीपुढे मोटारींची सजावट

विविध मोटारींच्या छोट्या प्रतिकृतींमधून रत्नाकर जोशी यांनी उभी केली आहे गणपतीची सजावट.
पर्वती पायथ्याला लक्ष्मी-नगरमध्ये राहणाऱ्या जोशींनी केलेली ही सजावट पाहण्यासाठी,
मोठ्यांबरोबर बालगोपाळांनीही गर्दी केली आहे.
सजावटीचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.

प्रसिद्धी माध्यमांनी त्यांच्या या वेगळ्या सजावटीचे वृत्त छायाचित्रासह प्रसिद्ध केल्यानंतल, त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांची गर्दी वाढली. प्रादेशिक परिवाहन विभागात नोकरी करणाऱ्या जोशी यांनी गेली काही वर्षे मोटारींच्या प्रतीकृती जमवण्याचा छंदच होता.
ते नोकरी निमित्ताने किंवा घरगुती कामासाठी बाहेरगावी गेले की,
ते नवनवीन मोटांरींच्या प्रतिकृती शोधत असत.
आज त्यांचेकडे एकशे दहा वेगवेगळ्या मोटारींची छोटी प्रतिके उपलब्ध आहेत.
यातल्या कांही गाड्यातर रिमोटवर चालतातही.एक ट्रॅक्‍टर तर सर्व कामे करुन दाखवितो.

रत्नाकर जोशी गेली कांही वर्षे घरच्या गणपती समोर वेगवेगळी सजावट करुन गणेश भक्तांना आकर्षीत करताहेत.
यंदा मात्र त्यांच्या मोटारीचा छंदच सजावटीसाठी पुढे आला.

गजाननाचे वाहन उंदीर पण काळाबरोबर त्यांच्या घरच्या गणेशाला वाहनांच्या गराड्यात
उभे राहून आपले दर्शन देण्याची इच्छा झाली आहे.
वेगवेगळे रस्ते, वाहनांचे प्रदुषण, वाहतूकीसाठीचे नियम या साऱ्यांना
साजावटीत सामावण्याचे ते विसरले नाहीत.
त्यांची पत्नी आणि मुलगीही त्यांच्या या छंदाला मदत करतात.

गणेश विसर्जन मिरवणुकीने पुणे दुमदुमले


रविवारी साडेदहापासून पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला.

पहिले पाच मानाचे गणपती लक्ष्मी रस्त्यावरुन मिरवून विसर्जित स्थळी पोचले.
मिरवणुकीत सामील झालेल्या गणेश मंडळांचे गणपती वाजत-गाजत येत आहेत.
उत्साह अणि गणपतीच्या गजराने सारा परिसरच गजबजून गेला आहे.

विसर्जन सोहळ्याची व्हिडीओ पाहण्यासाठी इथ क्‍लिक करा.....

Saturday, September 13, 2008

ढोल- ताशांच्या स्पर्धेत नाचले

पुण्यात ढोल ताशांच्या स्पर्धा गणेशोत्सव काळात घेण्यात आल्या.




त्यातल्या कांही प्रातिनिधीक संघांचे हे चित्रिकरण....

पुण्यातले देखावे नटले

बुधवारी पुण्यात पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने गणपती पाहण्यासाठी

पुन्हा एकदा रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत.

रात्री १० नंतर ध्वनीवर्धक बंद असल्याने नंतर मात्र गर्दी कमी होत जाते.

यंदा १२ दिवसाचा हा उत्सव असल्याने नागरिकांनाही आणखी एक दिवस सजावटी पाहण्यास मिळाला आहे.

कांही गणेश मंडळांची ही ध्वनिचित्रफित...

लाईट-साउंडद्वारे घरात साकारला शिवजन्म!

बिबेवाडीतल्या सुखसागर नगरात सुखनिवास संकुलात स्वप्निल तुंगतकर यांनीे उभा केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म सोहळा लाईट-साउंडच्या माध्यमातून पाहताना कोतूक वाटत होते.
स्वप्निल तुंगतकर यांनी ही कल्पना चार महिने आपल्या डोक्‍यात शिजत होती.
प्रत्यक्षात गणपती बसायच्या आठ-दहा दिवस ती आपण मांडल्याचे ते सांगतात. फ्लॅटच्या छाट्‌याशा हॉलमध्ये ध्वनीमुद्रण, प्रकाशयोजना आणि रिमोटवर उघडणाऱ्या पदड्यातून प्रकटणारी
आदिशक्ति तुळजाभवानी मातेची प्रतिकृती पाहताना खरोखरच थरारून येते.. महाराष्ट्र यवनांच्या हाती होता.

व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा..
त्या अंधारातून मराठी मुलखाला नवे तेज,नवा प्रकाश देण्यासाठी शिवनेरीवर छत्रपती श्री शिवाजी महारांचा जन्म झाला.
तो हा सोहळा तीन मिनीटांच्या कार्यक्रमातून दाखवण्याचा हा प्रयत्न स्वप्निल तुंगतकर यांनी केला आहे.

सीडीवर रेकॉर्ड करून रिमोटद्वारे ते तो नियंत्रित करतात.
गड किल्ल्यांचे प्रेम आणि महाराजांच्या कार्याची माहिती प्रत्येकाला व्हावी ही स्वप्निल यांची दृष्टी.
घराबाहेर गड किल्ल्यांची चित्रे. तुतारी फुंकणारा मावळा दर्शनी भागातच लक्ष वेधून घेतो.
यवनांच्या संकटापासून महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी आई तुळजाभवानी देवीला
संत एकनाथांनी घातलेले गाऱ्हाणे." दार उघड बये दार उघड.' त्याचे नाट्यीकरण इथे प्रभावीपणे साकारले गेले आहे.
प्रत्येक आठ-दहा जणांच्या ग्रुपला हा शो दाखविला जातो.
सुमारे चार हजार रूपयांचा खर्च करून ही कलाकृती साकारण्यात आली आहे.
यापाठीमागे घरच्या मंडळींचे सहकार्य आणि काही मित्राची मदत मिळाल्याचे ते सांगतात.
गौरीबरोबर त्यांचा गणपती विसर्जित झाला म्हणूनच सात दिवस अनेकांना हा सोहळा पाहता आला.

याचा अनुभव साडेचारशे ते पाचशे मंडळींनी घेतला. सर्वांनीच याचे कौतूक केले.
घरात साकारलेला याप्रयोग पाहून अनेक मंडळांनी तो आपल्या ठिकाणी करण्याची इच्छा
अनेकांनी व्यक्त केल्याचे स्वप्निल सांगतात.
सार्वजनिक मंडळांची सजावट पाहणारे गणेश भक्त अशा देखाव्यावरही नक्कीच खुष होतील.

Tuesday, September 9, 2008

गौरी विसर्जनाबरोबरच रस्ते वाहू लागले

सोमवारी गणेश भक्तांच्या उत्साहाला उधाण आले आहे.

अनेकविध मंडळाचे देखावे पाहताना डोळ्याचे पारणे फिटत होते.
पुण्याबाहेरचे भाविकही शहरातली आरास पाहण्यासाठी
मिळेल त्या वाहनांनी शहरात दाखल झाले होते.

तुम्हीही सार्वजनिक गणेश मंडलांचे देखावे अनुभवण्यासाठी इथे क्‍लिक करा.

गौरीबरोबर घरच्या गणपतींच्या विसर्जनात उत्साह

सोमवारी गौरींबरोबर विसर्जित होणाऱ्या गणपतींची संख्या वाढती होती.
नदीकाठच्या वीस ठिकाणी महावालिकेतर्फे खास व्यवस्था करण्यात आली होती.
काठावर भाविक मुर्तींची आरती करण्यात गुंतले होते.

आरतीनंतर मुर्ती नदीत विसर्जित करण्यासाठी नदीच्या पात्रात उभ्या असलेल्या भोईंकडे देण्यात येत होती.
विसर्जनासाठी महापालिकेने निर्माल्य कलशाची वेगळी सोय केली होती.
अमृतेश्वर घाटावर आठ होड्याचून श्रींचे नदीपात्राच्या मध्यभागी विसर्जन कण्यात येत होते.
घाटावर पुजेसाठी ढोल ताशा, स्पीकर, घंटांचा नाद होत होता.


हा सोहळा अनुभवण्यासाठी इथे कळ दाबा.

पुण्यातले देखावे नटले

शनिवारी पुण्यात गणपतींचे देखावे पाहण्यासाठी नागरीकांची गर्दी दिसत होती.

अनेक गणेश मंडळांचे देखावे लक्ष वेधून घेत होते.

कल्पक सजावट आणि दागीन्यांनी सजलेली श्रींची मूर्ती पाहताना एक वेगळाच आनंद मिळत होता.

कांही मंडळांनी जिंवंत देखावा करण्यासाठी चक्क ऐतिहासिक.पौराणिक प्रसंग कलावंताच्या सहाय्याने उभे केले होते.

भक्तिमय वातावरणाने रस्ते फुलून गेल्याचे चित्र दिसत होते.

व्हिडीओ पाहण्यासाठी इथे कळ दाबा.

Friday, September 5, 2008

व्हिडीओतून महिलांचे संपूर्ण अथर्वशीर्ष


पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ गणेश मंडळासमोर गुरुवारी पहाटे वीसहजार महिलांनी सामुदायीक अथर्वशीर्षाचे पठण करून ऋषीपंचमीच्या दिवशी भारतीय हिंदूसंस्कृतीचे जागरण करुन एक सामाजिक उपक्रम यशस्वी केला. विशेष म्हणजे सुरक्षेच्या कारणास्तव हा वीस वर्षे सुरु असलेला उपक्रम होईल की नाही याची शंका होती. पण पुण्यातल्या हिंदू संघटना, गणेश भक्त, मंडळाचे कार्यकर्ते तसेच पोलिसांच्या सहकार्याने उपक्रमाची ही २१ वर्षाची परंपरा अविरत सुरु राहिली.
सौ.शुभांगी अरुण भालेराव, अरूण भालेराव यांनी अर्थवशीर्षाचे आयोजन केले होते.

व्हिडीओतून महिलांचे संपूर्ण अथर्वशीर्ष

भाग चौथा व शेवटच्या भागाचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा....


पुण्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो महिलांनी पारंपारिक पोषाख करुन ,नटून-थटून या पठणात आपला सक्रिय सहभाग घेतला.
ऍना स्टीफर (स्विझर्लंड) आणि ब्रॅंड लूना (अर्जेंटिना) या दोन परदेशी महिलांनी नऊवारीच्या भारतीय पारंपारिक वेशात या पठणात सहभागी झाल्या होत्या.
मंडपापासून दृष्टी पोचेपर्यंत सगळ्या भागात महिलांनी रस्त्यावर आपला छाप टाकला होता.
दगडूशेठ गणपती पुणेकरांचे मानाचे पान. अथर्वशीर्षाच्या पठणामुळे सारा परिसर भक्तिमय वातावरणाने भारुन गेला होता.
हा अनुभव शब्दात सांगण्यपेक्षा तो प्रत्यक्ष अनुभवणे हेच योग्य होईल.
पहाटे साडेसहाला सुरु झालेला हा कार्यक्रम दीड अतिशय शिस्तबध्द पध्दतीने महिलांच्या उत्साहात रंगत गेला.
भावीकता, श्रध्दा अणि संस्कृतीचे दर्शन देणारा हा सोहळा गणेशाच्या आरतीने संपन्न झाला.
गृहमंत्री शिवराज पाटील यांची कन्या, खासदार रजनी पाटील आणि
राज्याचे मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पत्नी व्यासपीठावर खास उपस्थित होत्या.

व्हिडीओतून संपूर्ण अथर्वशीर्ष ऐकता व पहाता येईल

पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ गणेश मंडळासमोर गुरुवारी पहाटे वीसहजार महिलांनी सामुदायीक अथर्वशीर्षाचे पठण करून ऋषीपंचमीच्या दिवशी भारतीय हिंदूसंस्कृतीचे जागरण करुन एक सामाजिक उपक्रम यशस्वी केला. विशेष म्हणजे सुरक्षेच्या कारणास्तव हा वीस वर्षे सुरु असलेला उपक्रम होईल की नाही याची शंका होती. पण पुण्यातल्या हिंदू संघटना, गणेश भक्त, मंडळाचे कार्यकर्ते तसेच पोलिसांच्या सहकार्याने उपक्रमाची ही २१ वर्षाची परंपरा अविरत सुरु राहिली.
सौ.शुभांगी अरुण भालेराव, अरूण भालेराव यांनी अर्थवशीर्षाचे आयोजन केले होते.

व्हिडीओतून संपूर्ण अथर्वशीर्ष ऐकता व पहाता येईल.

तिसऱ्या भागाचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा....


पुण्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो महिलांनी पारंपारिक पोषाख करुन ,नटून-थटून या पठणात आपला सक्रिय सहभाग घेतला.
ऍना स्टीफर (स्विझर्लंड) आणि ब्रॅंड लूना (अर्जेंटिना) या दोन परदेशी महिलांनी नऊवारीच्या भारतीय पारंपारिक वेशात या पठणात सहभागी झाल्या होत्या.
मंडपापासून दृष्टी पोचेपर्यंत सगळ्या भागात महिलांनी रस्त्यावर आपला छाप टाकला होता.
दगडूशेठ गणपती पुणेकरांचे मानाचे पान. अथर्वशीर्षाच्या पठणामुळे सारा परिसर भक्तिमय वातावरणाने भारुन गेला होता.
हा अनुभव शब्दात सांगण्यपेक्षा तो प्रत्यक्ष अनुभवणे हेच योग्य होईल.
पहाटे साडेसहाला सुरु झालेला हा कार्यक्रम दीड अतिशय शिस्तबध्द पध्दतीने महिलांच्या उत्साहात रंगत गेला.
भावीकता, श्रध्दा अणि संस्कृतीचे दर्शन देणारा हा सोहळा गणेशाच्या आरतीने संपन्न झाला

चार भागात केलेल्या व्हिडीओतून संपूर्ण अथर्वशीर्ष ऐकता व पहाता येईल.

पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ गणेश मंडळासमोर गुरुवारी पहाटे वीसहजार महिलांनी सामुदायीक अथर्वशीर्षाचे पठण करून ऋषीपंचमीच्या दिवशी भारतीय हिंदूसंस्कृतीचे जागरण करुन एक सामाजिक उपक्रम यशस्वी केला. विशेष म्हणजे सुरक्षेच्या कारणास्तव हा वीस वर्षे सुरु असलेला उपक्रम होईल की नाही याची शंका होती. पण पुण्यातल्या हिंदू संघटना, गणेश भक्त, मंडळाचे कार्यकर्ते तसेच पोलिसांच्या सहकार्याने उपक्रमाची ही २१ वर्षाची परंपरा अविरत सुरु राहिली.
सौ.शुभांगी अरुण भालेराव, अरूण भालेराव यांनी अर्थवशीर्षाचे आयोजन केले होते.

चार भागात केलेल्या व्हिडीओतून संपूर्ण अथर्वशीर्ष ऐकता व पहाता येईल.


दुसऱ्या भागाचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा....


पुण्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो महिलांनी पारंपारिक पोषाख करुन ,नटून-थटून या पठणात आपला सक्रिय सहभाग घेतला.
ऍना स्टीफर (स्विझर्लंड) आणि ब्रॅंड लूना (अर्जेंटिना) या दोन परदेशी महिलांनी नऊवारीच्या भारतीय पारंपारिक वेशात या पठणात सहभागी झाल्या होत्या.
मंडपापासून दृष्टी पोचेपर्यंत सगळ्या भागात महिलांनी रस्त्यावर आपला छाप टाकला होता.

हजारो महिलांनी म्हटले दगडू शेठ गणपतीसमोर अथर्वशीर्ष

पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ गणेश मंडळासमोर गुरुवारी पहाटे वीसहजार महिलांनी सामुदायीक अथर्वशीर्षाचे पठण करून ऋषीपंचमीच्या दिवशी भारतीय हिंदूसंस्कृतीचे जागरण करुन एक सामाजिक उपक्रम यशस्वी केला. विशेष म्हणजे सुरक्षेच्या कारणास्तव हा वीस वर्षे सुरु असलेला उपक्रम होईल की नाही याची शंका होती.
पण पुण्यातल्या हिंदू संघटना, गणेश भक्त, मंडळाचे कार्यकर्ते तसेच पोलिसांच्या सहकार्याने उपक्रमाची ही २१ वर्षाची परंपरा अविरत सुरु राहिली.
सौ.शुभांगी अरुण भालेराव, अरूण भालेराव यांनी अर्थवशीर्षाचे आयोजन केले होते.

चार भागात केलेल्या व्हिडीओतून संपूर्ण अथर्वशीर्ष ऐकता व पहाता येईल.


भाग पहिल्याचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.....


पुण्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो महिलांनी पारंपारिक पोषाख करुन ,नटून-थटून या पठणात आपला सक्रिय सहभाग घेतला.
ऍना स्टीफर (स्विझर्लंड) आणि ब्रॅंड लूना (अर्जेंटिना) या दोन परदेशी महिलांनी नऊवारीच्या भारतीय पारंपारिक वेशात या पठणात सहभागी झाल्या होत्या.
मंडपापासून दृष्टी पोचेपर्यंत सगळ्या भागात महिलांनी रस्त्यावर आपला छाप टाकला होता.
दगडूशेठ गणपती पुणेकरांचे मानाचे पान. अथर्वशीर्षाच्या पठणामुळे सारा परिसर भक्तिमय वातावरणाने भारुन गेला होता.
हा अनुभव शब्दात सांगण्यपेक्षा तो प्रत्यक्ष अनुभवणे हेच योग्य होईल.
पहाटे साडेसहाला सुरु झालेला हा कार्यक्रम दीड अतिशय शिस्तबध्द पध्दतीने महिलांच्या उत्साहात रंगत गेला.
भावीकता, श्रध्दा अणि संस्कृतीचे दर्शन देणारा हा सोहळा गणेशाच्या आरतीने संपन्न झाला.
गृहमंत्री शिवराज पाटील यांची कन्या, खासदार रजनी पाटील आणि राज्याचे मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पत्नी व्यासपीठावर खास उपस्थित होत्या.
मंडळाचे मुख्य विश्‍वस्त तात्या गोडसे यांनी ही महिलांच्या अथर्वशीर्षाची
परंपरा कायम जोपासली जाईल अणि हा गणेशोत्सव अधिक लोकाभिमुख होईल अशी आशा व्यक्त केली.

सकाळपासूनच पुणे झाले गणेशमय

बुधवार सकाळ पासूनच घरच्या आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकांनी अवघे शहरच गणेशमय झाले घरी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यासाठी नागरिक आपल्या कुंटुंबीयांसोबत रस्त्यावर गर्दी करून भक्तीचा मळा फुलवित होते. लहान मुलांचाही उत्साह कॅमेऱ्याने नेमका टिपला.

शनिवारवाड्याच्या परिसरात अनेक गणेश मूर्तींच्या विक्रीदालनात मूर्ती नेण्यासाठी एकच दाटी झाली होता. सारा परिसरच गणेश भक्तांनी तुडुंब भरला होता.

मानाच्या कसबा गणपतीची प्रतिष्ठापना होत होती. कांही भक्त आपल्या गणेशमूर्ती कसबा गणपतीच्या दर्शनासाठी देवळात नेत होत्या.

बुधवार पेठेतील मजूर अड्ड्यापाशी कांही मंडळांची ढोल ताशांची पथके मिरवणुकीसाठी सहभागी झाली होती.

सार्वजनिक मंडळांच्या देखाव्यांना आजपासूनच गर्दीला सुरवात होईल.
गणपती बाप्पा मोरया ! सुख-समृध्दी येउद्या !

व्हिडीओ इथे पहा.

गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला पावसाने भिजविले

मंगळवारी सायंकाळी पावणेपाच ते रात्री साडेआठपर्यंत पुण्याला पावसाने पुन्हा एकदा झोडपले.
नदीकाठच्या परिसरात पावसाने केलेली ही सुरवात.

तारांबळ नुकतीच सुरू झाली होती. वाहनचालकांनी रेनकोट घालेपर्यंत पुरते भिजायला होत होते.
पावसाच्या धारा आता कोसळायला लागल्या होत्या.

हरतालकाचे उपास सुटून गणपतीची मूर्ती घरी आणायची ही वेळ. त्यातच काही ठिकाणी भारनियमन, तर कुठे पावसाने वीज गायब झालेली.

अलका टॉकीज चौकात गुडघाभर पाणी साचले होते, तर काही चौकांतून पाण्याचे लोंढे वाहत होते.
गणेशोत्सव काळात पाऊस असाच राहिला, तर भक्तांच्या उत्साहावर पाणी पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा

अभिनव विद्यालयात बॉंब ठेवल्याची अफवा

पुण्यातल्या लॉ कॉलेज रस्त्यावरच्या अभिनव विद्यालयाच्या मराठी माध्यमाच्या शाळेत

दुपारी बाराच्या सुमारास तीनवेळा शाळेत बॉंब ठेवल्याचा फोन आला.

पालिस तपासानंतर ती अफवाच असल्याचे स्पष्ट झाले.


या घटनेचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.

पावसाने पुणेकरांना झोडपले

रविवारी दुपारी साडेचारनंतर पडलेल्या तासाभराच्या पावसाच्या सरींनी सिंहगडरोडवरुन आत जाणाऱ्या गल्ल्यांमध्ये पुरासारखी स्थिती निर्माण झाली होती. शिवपुष्प चौकातल्या ओढ्यातले पाणी रस्त्यावर आल्याने वाहन चालकांसह पायी चालणाऱ्यांनाही चालणे असे अवघड होत होते.
साईनाथ मित्रमंडळाच्या कार्यकत्यांनी मदतीचा हात देऊन अनेकांना सुरक्षीतपणे पोचते केले.
माणिक बागेतल्या गल्लीतही पाण्याचा लोंढा वाहत होता. कार्यकर्ते पाणी वाहून जाणारी जाळी साफ करायला पुढे आले होते.
मुठा नदीचे पात्रातले पाणीही वाढले होते.
एकूणच पावसाने पुण्याला झोडपून काढल्याने रविवारची संध्याकाळ पावसाने न्हाऊन निघाली.

याचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.

Sunday, August 31, 2008

श्रीगणेशाच्या आगमनासाठी पुणेकर सज्ज !

श्रीगणेशाचे आगमन आता कांही दिवसांवर आल्याचे वातावरण पुणे शहरात गल्लोगल्ली दिसत आहे. रस्त्यांवर गणेश मंडळांचे मांडव पहिल्याच दिवशी सजावट पुर्ण करायच्या मागे आहेत.
आगदी दगडूशेठ गणपती मंडळही याला अपवाद नाही.

सजलेली बाजारपेठ आणि वातावरण पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.


बाजारपेठ लखलखली ...

तारे, गोलाकार, जाळीदार अशा वैविध्यपूर्ण आणि रंगबिरंगी विद्युत दिव्यांच्या माळा, फोकस, समई अशा सजावटीच्या साहित्यांची दुकाने बाजारपेठेत लखलखू लागली आहेत. मात्र, या चमचमत्या रोषणाईतही बाजी मारली आहे, ती चायनीज विद्युत रोषणाईने!
बुधवार पेठेतील पासोड्या विठोबा मंदिर परिसरात विद्युत रोषणाईच्या साहित्याची दुकाने सजली आहेत. मंडळाप्रमाणेच घरातील गणपतीसमोर आरास करण्यासाठी चायनीज वस्तूंना मागणी वाढली आहे. गेल्या सात वर्षांपासून ही मागणी वाढत असून आता तर बाजारपेठ चायनीज साहित्यांनीच काबीज केली आहे. स्वस्त, आकर्षक , वैविध्यपूर्ण अशा वैशिष्ट्यांमुळे "चायनामेड' माळा, फोकस अशा विविध साहित्यांना पसंती मिळत आहे.

प्रामुख्याने विजेच्या दिव्यांच्या माळांना सर्वाधिक मागणी असते. तारा, वर्तुळाकार, चंद्रकोर, कापडी फुले, छोट्या झुंबरामध्ये दिवे बसवून या माळा तयार केल्या जातात. त्यांचे शंभराहून अधिक प्रकार पाहण्यास मिळतात. जाळीदार माळ, ए एल डी दिव्यांच्या माळा, राईज बल्बच्या माळा असे प्रकार त्यात असतात. या माळांची किंमत त्यांच्या लांबीनुसार २५ रुपयांपासून १५० रुपयांपर्यंत आहे.


"इको फ्रेंडली' वस्तूंना प्राधान्य

घरगुती आरास साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढली आहे. थर्माकोलचे मंदिर, विद्युत रोषणाईच्या माळा, रेशीमकाठी आसने, छत्र, फेटा, मुकुट, कृत्रिम फुलांचे हार अशा आकर्षक सजावटीच्या वस्तूंना मागणी वाढली आहे.मंडई, तुळशीबाग, शनिपार; तसेच बोहरी आळी, रविवार पेठ या परिसरात सजावट साहित्यांची दुकाने मोठ्या संख्येने आहेत. या साहित्यांच्या किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा ते वीस टक्‍क्‍यांनी वाढ झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
जाड कागदापासून तयार केलेले सुवर्णमंदिर, मीनाक्षी मंदिर, गणेश महाल, वनश्री आदी विविध प्रकारची मंदिरे विक्रीस आहेत. चौदा इंचांपासून एकवीस फुटांपर्यंतची मंदिरे उपलब्ध आहेत. समई, लामण दिवा, मकरध्वज, गणरायाची पूजा करणारे मूषक असे अनेक प्रकारचे सजावट साहित्य आहे. वापरण्यास सोपी व घडी करता येण्याजोगी मंदिरे असल्याने, या मंदिरांना वाढती मागणी असल्याचे विक्रेते सांगतात.

बाबूजींची गाणी आजही घालतात रुंजी!

ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके यांनी संगीत दिलेल्या शेकडो गाण्यांतून काही निवडक गीतांच्या सादरीकरणाने रविवारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातल्या रसिकांना तृप्त केले.
बाबूजींच्या चालींतला सोपेपणा, गीतातील स्पष्ट शब्दोच्चार आणि भावनेने भारलेले स्वर यातून उमटणारी गाणी येथे सादर झाली.

व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.


"तुझे गीत गाण्यासाठी' या नावातच सुरांची साथ अपेक्षित आहे.


"स्वरालय'च्या अभिजित आपटे यांनी हा कार्यक्रम सादर करताना तेवढीच प्रभावी साथीदारांची टीम उभी केल्याने गाण्यांना बहारलेपण आले होते. विशेषतः सचिन जांभेकरांचे संगीत संयोजन आणि त्यांचेच हार्मोनिअम शब्दांना झेलीत आणि स्वरांना कुरवाळीत गायकांना साथसंगत करीत होते.
ंहृषिकेश रानडे, प्रमोद रानडे आणि विभावरी आपटे-जोशी यांनी तेवढ्याच सुरेलपणाने ती गायली. रवींद्र साठेंचे भारदस्त स्वर बाबूजींच्या चालीला न्याय देताना कलावंताचा प्रभाव दाखवितात.
विशेष उल्लेख करायला हवा तो उत्तरा केळकर यांचा.
लावणी, भावगीत, प्रेमगीत आणि देशभक्तिपर गीतांतून त्यांनी रसिकांची पावती टाळ्या आणि वन्स-मोअरने मिळविली.
चित्रपटगीत, भावगीत, अभंग, लावणी, देशभक्तिपर गीत अणि सुगम संगीतातून कार्यक्रम बहरत गेला. विशेष म्हणजे गीतरामायणाची अजरामर गीतेही आळवली गेली.
विक्रम भट (तबला), पद्‌माकर गुजर (ढोलकी), नितीन जाधव (साईड रिदम) आणि की-बोर्डवर होते जितेंद्र कुलकर्णी.

अरुण नूलकरांच्या निवेदनाने बाबूजींच्या सुवर्णकाळाची ओळख होत होती.

Saturday, August 30, 2008

'गलगले निघाले'..... पुण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

केदार शिंदे, भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव यांनी नटविलेला झी टॉकीज प्रस्तुत आणि बेला शिंदे निर्मित "गलगले निघाले' हा मराठी चित्रपट
शुक्रवारी पुण्याच्या प्रभात चित्रपटगृहात तरुण प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त गर्दीत झळकला.
दिग्दर्शक, कलावंत, वैशाली सामंत आणि तंत्रज्ञांच्या उपस्थितीत झालेल्या
प्रिमिअर शोने चित्रपटगृहाचा परिसर गलगलेमय झाला होता.
आजच काळाच्या पडद्याआड गेलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री जयश्री गडकर यांना इथे श्रद्धांजली वाहण्यात आली.
इतर चित्रपटांप्रमाणेच गलगलेला चित्रपटरसिक पसंत करतील,
असा विश्वास केदार शिंदे यांनी व्यक्त केला.

व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.

Monday, August 25, 2008

दहीहंडीचे उधाण आणि थिरकती तरुणाई!

रविवारचा दिवस तरुणाईच्या बेधुंद नाचण्याचा.

निमित्त होते दहीहंडीचे.

कृष्णाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडण्यासाठी
आणि त्याहीपेक्षा ती पाहण्यासाठी जनसागर रस्त्यावर आला होता.
काही तास आवाजाच्या भिंती आणि गर्दीची परिसीमा होते.

पुण्याचा मध्यवर्ती भाग या उत्साहाने भारून जातो.

आपण तो अनुभव प्रत्यक्षच घ्याना !

Friday, August 22, 2008

"ओळख' चा शंभरावा प्रयोगही जाहिर

ओळख ना पाळख' या नाटकाबद्दल प्रशांत दमले इतका आशावादी आहे,
की महाराष्ट्रात याचे एक हजार प्रयोग होणारच असं तो म्हणतोय.
२५ डिसेंबर २००८ या दिवशी "ओळख ना पाळख'
या नाटकाचा शंभरावा प्रयोग आपण सादर करणार आहे.
या माझ्या निर्मितीनंतर निर्मात्यांना समजेल नाटकांबद्दल
प्रेक्षकांमध्ये "ओळख' कशी निर्माण करायची ती!
"ओळख ना पाळख' ही रहस्यमय थ्रिलर कॉमेडी आहे.



चला प्रशांतशी नाटकाच्या निर्मितीबाबत जाणुन घेऊयात !

मुलाखत- सुभाष इनामदार

तालवाद्यांनी केली करामत

"तालवाद्य कचेरी' अर्थात विविध तालवाद्यांची ओळख करून देणाऱ्या वेगळ्या सीडीचे प्रकाशन

सोंमवारी टिळक स्मारक मंदिरात करण्यात आले.
कार्यक्रमाचे नाव दिले ते नादरंग- सीडीचे प्रकाशन
तबलानवाज पं. सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यावेळी टाळ, घंगरू, शंख, चकवा, मोठ्‌या झांजा, खंजिरी, डफ, चिपळ्या,
एकतारी, दिमडी, बगलबच्चा, डौर, चोंडकं, बंगाली एकतारी, पखावाज,
तबला, ढोलकी, ढोलक, मटका, चंडा, ढोल, हलगी, कबाश, बंगाली खोळ


अशी नानाविध वाद्यांचा खेळ करून रसिकांची मने जिंकली


ती या कार्यक्रमाचे प्रेरक आणि सादरकर्ते डॉ. राजेंद्र दुरकर यांनी.
त्यांना विविध तालवाद्यांची साथ केली ती पद्‌माकर गुजर,केदार मोरे,नितिन शिंदे,
गोविंद भिलारे आमि रांजेंद्र साळुंके यांनी.
दोन्ही कार्यक्रमाचे एकत्रित निवेदन केले ते दयानंद घोटकर यांनी.


कॅमेरा व स्टोरी - सुभाष इनामदार

व्हायोलिन वादनाची रंगली जुगलबंदी

सोमवारी टिळक स्मारक मंदिरात पिता आणि गुरू पं. भालचंद्र देव
त्यांची कन्या आणि शिष्या सौ, चारूशिला गोसावी
यांच्या व्हायोलिनवादनाची जुगलबंदी "हेरीटेज' या नावाने रंगत गेली.
गेली अनेक वर्षे ते दोघे व्हायोलिन वादनाचे कार्यक्रम करून कलेतले प्राविण्य सिध्द करीत आहेत.
व्हायोलिन वादनातले हुकुमी कौशल्य यामुळे वाद्यांवर पिता-कन्येंची हुकुमत कार्यक्रमातून दिसून आली..


प्रारंभी श्री रागाची सुबोध मांडणी करून दोघांनी एकेक नाट्यपद ऐकविले.


त्यांच्या सीडीचे प्रकाशन ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग यांच्या हस्ते इथे करण्यात आले.

पुरूषोत्तम करंडकाची प्राथमिक फेरी उत्साहात सुरू

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या जीवनातील नाट्यगुणांना प्रोत्साहन देणाऱ्या पुरूषोत्तम करंडक महाविद्यालयीन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला मंगळवार पासून उत्साहात सुरवात झाली. महाराष्ट्रीय कलोपासक ,पुणे या संस्थेने आयोजित केलेल्या स्पर्धेचे हे ४६ वे वर्ष आहे.

उत्साही वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी इथं क्‍लिक करा.

पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातल्या ४३ महाविद्यालयांच्या ४४ एकांकिका भरत नाट्य मंदिरात होतील. ही फेरी ३१ ऑगस्ट पर्यंत चालेल. रोज संध्याकाळी पाच वाजता आणि रविवारी केवळ दोन सत्रात ही प्राथमिक फेरी होत आहे.अंतिम फेरी २० आणि २१ सप्टेंबरला तर पारितोषिक वितरण समारंभ नाट्यसंमेलनाध्यक्ष रमेश देव यांच्या हस्ते २७ सप्टेंबरला भरतलाच होणार आहे.
दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना या एकांकिकेच्या सर्वच बाबी विद्यार्थ्यांनीच कराव्यात असा या स्पर्धेचा नियम आहे. यंदा २३ एकांकिका विद्यार्थ्यांनी लिहल्या असल्याची माहीती संस्थेचे सरचिटणिस हेमंत वैद्य यांनी दिली.
कांही विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल सार्थ अभिमान व्यक्त केला.
कडक शिस्तीसाठी ही स्पर्धा प्रसिध्द आहे. तिसऱ्या घंटेनंतर कोणालाही प्रवेश दिला जात नाही.
सादरीकरण करणारे आणि पाहणारे सारेच उत्साहात असतात. प्राची घाटपांडे, प्रदिप वैद्य अणि उदय लागू हे प्राथमिक फेरीचे परिक्षक आहेत.
पुरूषोत्तमच्या स्पर्धेत भाग घेतलेले अनेक कलावंत आज कलाक्षेत्रात चमकले आहेत.

कार्यक्रमानंतर सावनी शेंडे यांनी बंदिशी अशा रंगविल्या !

"हृदयस्वर' या पुस्तकात प्रामुख्याने सावनी आणि तिची आजी कुसुम शेंडे रचित एकूण चाळीस बंदिशींचा समावेश आहे.
पारंपरिक बंदिशींचे महत्त्व आजही त्या मान्य करतात.
रागदारी संगीतात चारच ओळी असतात.
त्या ओळी जर स्पष्ट उच्चार करून जर म्हटल्या
आणि त्या शब्दांचा अर्थ घेऊन जर का राग फुलवला तर तो जास्त लोकांपर्यंत पोचतो अणि एकाच रागाचे वेगवेगळे भाव दिसतात.
आपण बंदिशींची रचना करताना या दोन्ही गोष्टींकडे लक्ष दिल्याचे सावनी सांगतात.
बंदिशी कशा सादर करायच्या याची एक सीडीही त्यांनी पुस्तकाबरोबर वाचकांना, अभ्यासकांना दिली आहे.

यातून आपोआपच शास्त्रीय संगीताचा प्रसारच होणार आहे.

कार्यक्रमानंतर सावनी शेंडे यांनी बंदिशी अशा रंगविल्या !

"ह्‌दयस्वर'चे सावनी शेंडे आणि कुसुम शेंडे यांच्या बंदिशीच्या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते असे झाले.

"ह्‌दयस्वर'चे सावनी शेंडे आणि कुसुम शेंडे यांच्या बंदिशीच्या

पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते असे झाले.

सावनी शेंडे या केवळ गायिकाच नाही, तर त्यांना बागेची आवड आहे, निसर्गाचे वेड आहे, हे त्यांच्याशी केलेल्या गप्पांतून समजते. निसर्गातून आपल्याला इतकी प्रेरणा मिळत असते, की त्याच्यातूनच काही बंदिशी घडल्या माझ्या, असे त्या सांगतात. घरातल्या वृक्षांवर तयार केलेली पक्ष्यांची घरटी दाखवितात. बागेतली उमलणारी नवी फुले लक्ष वेधतात. याशिवाय पेंटिंग, वेगवेगळ्या कागदी फुलांची निर्मिती करणे, असे छंदही त्या जपतात आणि जोपासतात.
साठ्येंच्या घरात गेल्यावरही सासूबाईंपासून नवऱ्यापर्यंत सारेच जण गुणी

सावनीचे कौतुक करत संगीतासह साऱ्याच कलांना प्रोत्साहन देतात

Sunday, August 10, 2008

चिरतरूण आवाजाच्या आठवणीत रसिक मंत्रमुग्ध


त्यांच्या स्वराला वयाची बंधने नाहीत. ऱ्हदयात घर केलेल्या आवाजाची जादू पुन्हा घुमली शुक्रवारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात. चिरतरूण्याने नटलेल्या. भावनेने ओथंबलेल्या. शब्दांना झेलणाऱ्या आणि झुलविणाऱ्या आशा भोसले यांच्या गाण्यांचे स्मरण इथे केले गेले. त्यांच्या पंचाहत्तरीनिमित्ताने "हमलोग' या संस्थेने त्यांच्या मराठी गाण्याची मैफल आयोजित केली होती. "तरूण आहे रात्र...' या शिर्षकाला साजेसा कार्यक्रम करून सुनिल देशपांडे यांनी त्यांच्या कारकीर्दीचा आलेखच रसिकांसमोर मांडला होता.

व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.

सुगम, भावगीत, लावणी, नाट्यगीत ,मराठी गझल, आणि मुख्यतः चित्रपटगीताने नटलेला हा स्वरांचा प्रवास नटवला
सुवर्णा माटेगावकर, मधुरा दातार आणि अनघा पेंडसे यांनी. त्याला पुरूष स्वराची साथ केली ती धवल चांदवडकर यांनी.
अनेक संगीतकारांनी आशा भोसले यांच्या आवाजात तऱ्हतऱ्हेची गाणी स्वरबध्द केली. त्यातले आघाडीचे नाव म्हणजे सुधीर फडके. आशा भोसलेतर फडके साहेंबांना गुरूस्थानी मानत.
संगीतकाराच्या स्वरांना पूर्णतः न्याय देणाऱ्या या हरहुन्नरी गायीकेच्या गीतांना आजही किती दाद मिळते याचा प्रत्यय शुक्रवारी पुन्हा एकदा आला.
संगीतकार प्रभाकर जोग आणि आनंद मोडक यांनी त्यांच्याविषयीच्या आठवणी सांगून त्यांच्यातल्या गुणांचे तोंडभरून कौतुक केले. मोडकांनी तर त्यांनी गायलेल्या चार गाण्यांना पुरस्कार मिळाला आसला तरी ते सारे श्रेय आशा भोसले यांचेच असल्याची प्रांजल कबुली दिली.
मानसी मागीकर यांनी पुढचं पाऊल चित्रपटाच्या वेळच्या आठवणी सांगीतल्या.
आशा भोसले यांच्या स्वरांचे चांदणे रसिकांसमोर मांडले ते निवेदिका मंगला खाडिलकर यांनी.
त्यांच्या निवेदनातून आशा भोसले यांच्यातल्या गुणांचे ,त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडत जातात.
केदार परांजपे यांच्या संगीत संयोजनात कमीत कमी वाद्यमेळात स्वरांची ताकद स्वच्छपणे दिसते.साऱ्याच वादकांनी गीतांना पोषक अशीच साथ केली.
तीनही गायीकांनी आशाताईंच्या चिरतरूण स्वराला नेमकेपणाने रसिकांपर्यंत पोचविले.
स्वरातली आणि भावनेतली ताकद स्पष्ट करण्यात गायकवृंद यशस्वी ठरला.

शनिवारी आशाताईंच्या हिंदी गीतांचा नजराणा पेश होणार आहे. तोही तुमच्यापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करू.

कॅमेरा, स्टोरी - सुभाष इनामदार

Saturday, August 9, 2008

प्रदीप पटवर्धनांमुळे सुसह्य होणारे नाटक "आम्ही शहाणे'



आम्ही शहाणे' या नाटकात नूतन जयवंत, प्रदीप पटवर्धन अणि मैथिली वारंग

.............................................................................
सुखी संसारात थोडा निवांतपणा हवाच. तो मिळविण्यासाठी चाललेली या तरुण जोडप्याची धावपळ आणि त्यातूनच कधी मित्राचा अतिस्नेह, तर कधी सासू-सासऱ्यांची एंट्री. डॉ. यश आपटेंच्या जीवनात सुगंधी हवा येते ती मेहुणीच्या 'आयटम' रूपात. अलीकडच्या जमान्यातली ही मेहुणी जीजूच्या- जीजू मेहुणीच्या स्पर्शाने बहरतात. आणि सुरू होतो या साऱ्या शहाण्यांचा खेळ.

नाटकातला काही अंश पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.

डॉ. अविनाश कुलकर्णी लिखित आणि दिग्दर्शित "आम्ही शहाणे' यात प्रदीप पटवर्धन यांच्या खांद्यावर नाटकाचा सारा भार पेलण्याचा प्रयत्न केला आहे. नाटक हसवते. कधी गंभीरही बनवते. पण शहाण्यांच्या खेळात नेमके काय सांगायचे तेच कळत नाही. रंगमंचावर कलावंत आपापल्या भूमिका करतात खरे; पण नेमका विषय बाहेर येत नाही. अनेक मालिकांचे वेगवेगळे एपिसोड आपण पाहत आहोत असा भास नाटक पाहताना होतो.
संजय बांदेकर यांनी "नउनी' निर्मित हे नाटक सादर केले आहे. नाटकाच्या नामावलीत प्रथमच लेखक (डॉ. अविनाश कुलकर्णी) वेगळा आणि नाट्यरूपांतर करणारे (अनंत सुतार) दुसरे, अशी नावे दिसतात.
बायकोपेक्षा मेहुणी बरी अशाच थाटात पहिला अंक होतो. तर दोन्ही मुली असलेल्या आई-वडिलांची वानप्रस्थाश्रमात जायची तयारीही होते. त्यांचे नेमके दुःख काय आणि कशामुळे या प्रश्‍नाला स्पर्श करून नाटक पुढे जाते. स्वतःच्याच मुलीला आयटम म्हणणाऱ्या बापाची तिच्या लग्नासाठी चाललेली धावपळ दिसते. तर बहिणीच्या प्रेमलीला पाहून अवाक झालेली मेहुणी प्रकट होते.अखेरीस डॉक्‍टरांच्या मित्राच्या जादुई प्रेमात मेहुणी सापडते आणि हे शहाणे म्हणवणारे कुटुंब आनंदात गाणे म्हणत नाटक संपते.
नाटक सारे फिरते ते डॉ. यश आपटे अर्थात प्रदीप पटवर्धन यांच्याभोवती. ते ज्या ताकदीने आणि प्रसंगी ज्या टायमिंगने ह्युमर डेव्हलप करतात ते पाहण्यासाठी तरी नाटक अनुभवायला हवे.
प्रदीप पटवर्धन यांची भूमिका पाहताना त्यांच्याकडे असलेली अभिनय क्षमता पूर्णपणे वापरली जात नाही अशी खंत व्यक्त करावीशी वाटते. विनोदाची, संगीताची आणि तेवढीच गंभीर अशी वेगळी भूमिका त्याच्यासाठी लिहायला हवी. त्यांच्याशी बोलतानाही हे जाणवले. सुलेखा या डॉक्‍टरांच्या पत्नीच्या रूपात मनापासून दाद दिलीय ती मैथिली वारंग यांनी. सहजता हे त्याच्या भूमिकेचे वैशिष्ट्य आहे.
आयटम म्हणून ज्यांना दाखविले आहे त्या नूतन जयवंत भूमिकेची गरज पूर्ण करतात. स्वतःला त्या आकर्षकपणे पेश करतात. जीजूशी असलेली जवळीक आणि सौंदर्याचा स्पर्श लाभणे हा गुन्हा आहे काय, असा सवालही त्या करतात.
बऱ्याच वर्षांनंतर रंगमंचावर अवतरलेले कलावंत म्हणजे जनार्दन परब. आर. के. लक्ष्मण यांच्या कॉमन मॅनप्रमाणे ते वावरतात. वरवर बावळट; पण आत अस्सल असलेला हा बाप ते छान खुलवितात. त्यांच्या पत्नी झाल्यात सुलभा मंत्री. सुचित जाधवची हिरोगिरी नाटकाला पोषक ठरते.
प्रसाद वालावरकरांचे नेपथ्य पात्रांना वावरायला आणि त्यांच्या श्रीमंती थाटाचे दर्शन घडवायला पुरेसे आहे.
प्रकाश, संगीत या नाटकाला पोषक आहे.
हे कधीतरी आपण कुठल्यातरी नाटकात अनुभवले आहे, असे सतत वाटत असताना नाटक पुढे सरकते. ते खिळवत नाही; पण वेळ मजेत घालवेल.

सुभाष इनामदार
mail - subhashindmar@esakal.com

Friday, August 8, 2008

सावनी शेंडे "हृदयस्वर' उलगडणार नव्या बंदिशींच्या रचनांतून!


गायिका सावनी शेंडे-साठ्ये लिखित "हृदयस्वर' या स्वरचित बंदिशींच्या पुस्तकाचे प्रकाशन येत्या रविवारी पं. जसराज यांच्या हस्ते पुण्यात होत आहे.


यानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला हा संवाद,


"हृदयस्वर' या पुस्तकात प्रामुख्याने सावनी आणि तिची आजी कुसुम शेंडे रचित एकूण चाळीस बंदिशींचा समावेश आहे.
पारंपरिक बंदिशींचे महत्त्व आजही त्या मान्य करतात. रागदारी संगीतात चारच ओळी असतात. त्या ओळी जर स्पष्ट उच्चार करून जर म्हटल्या आणि त्या शब्दांचा अर्थ घेऊन जर का राग फुलवला तर तो जास्त लोकांपर्यंत पोचतो अणि एकाच रागाचे वेगवेगळे भाव दिसतात. आपण बंदिशींची रचना करताना या दोन्ही गोष्टींकडे लक्ष दिल्याचे सावनी सांगतात.
बंदिशी कशा सादर करायच्या याची एक सीडीही त्यांनी पुस्तकाबरोबर वाचकांना, अभ्यासकांना दिली आहे. यातून आपोआपच शास्त्रीय संगीताचा प्रसारच होणार आहे.
सावनी शेंडे या केवळ गायिकाच नाही, तर त्यांना बागेची आवड आहे, निसर्गाचे वेड आहे, हे त्यांच्याशी केलेल्या गप्पांतून समजते. निसर्गातून आपल्याला इतकी प्रेरणा मिळत असते, की त्याच्यातूनच काही बंदिशी घडल्या माझ्या, असे त्या सांगतात. घरातल्या वृक्षांवर तयार केलेली पक्ष्यांची घरटी दाखवितात. बागेतली उमलणारी नवी फुले लक्ष वेधतात. याशिवाय पेंटिंग, वेगवेगळ्या कागदी फुलांची निर्मिती करणे, असे छंदही त्या जपतात आणि जोपासतात.
साठ्येंच्या घरात गेल्यावरही सासूबाईंपासून नवऱ्यापर्यंत सारेच जण गुणी सावनीचे कौतुक करत संगीतासह साऱ्याच कलांना प्रोत्साहन देतात.
गप्पांमध्ये सासूबाई, आई आणि गुणी बहीण बेला शेंडेही सहभागी झाल्या होत्या.

कॅमेरा, स्टोरी - सुभाष इनामदार

अभिनेत्याचा जेव्हा निर्माता बनतो !


प्रशांत दामले फॅन फाउंडेशन ही अभिनेता प्रशांत दामले यांची सामाजिक कार्य करणारी संस्था. या संस्थेतर्फे महाराष्ट्रात अनेक उपक्रम राबविले जातात. याच संस्थेतर्फे त्यांचं नवं नाटक येतंय "ओळख ना पाळख'. यानिमित्तानं ते स्वतः निर्माता बनताहेत. नाटकातही त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

प्रशांत दामले यांच्यासारखा लोकप्रिय अभिनेता एका नव्या नाटकाची निर्मिती करतो तेव्हा कुतूहल निर्माण होतं. अभिनेता ते निर्माता हा प्रवास कसा झाला याविषयी स्वतः प्रशांत दामले बोलताहेत.

व्हिडीओ पाहण्यासाठी क्‍लिक करा.

पहिली मंगळागौर


नुकतेच लग्न झालेली नववधू श्रावणातल्या पहिल्या मंगळवारी मंगळागौर पुजते, जागवते. एकेकाळी वाड्यात सगळ्या सौभाग्यवती एकत्र जमून मंगळागौर जागवत असत.
मंगळागौरीच्या निमित्ताने माहेरवाशीण घरी येते. तिच्या लग्न झालेल्या मैत्रिणी येतात. सारी रात्र गाणी, झिम्मा, फुगडी, सुपारी, नमस्कार, कोंबडा असे वेगवेगळे खेळ खेळून मनमुराद आनंद दिला- घेतला जातो.
लग्नानंतर पाच वर्षे मंगळागौरीची पूजा करण्याची प्रथा आहे. आपले सौभाग्य अखंडित राहावे, यासाठी सुवासिनी मंगळागौरीचे व्रत करतात.
आज नोकरी करणाऱ्या मुली असल्याने यासाठी सुट्टी मिळेलच असे सांगता येत नाही. पूजेसाठी मैत्रिणीही मिळणे कठीण होऊन बसते. तरीही पुण्यात काल छोटे-मोठे हॉल मंगळागौरींनी हाऊसफुल्ल केले होते. पारंपरिक पद्धतीने मंगळागौर साजरी व्हावी अशी आजही अनेकांची इच्छा असते, पण तेवढे खेळ माहीत नसतात. गाणीही पाठ होत नाहीत. पण उत्साह तर असतो.
अशा वेळी मंगळागौरीचे खेळ करणाऱ्या महिला संघांना बोलावून त्यांच्याकडून ती साजरी होते.
पुण्यात मंगळवारी साजरी झालेली ही अशीच मंगळागौर ई-सकाळच्या वाचकांसाठी चित्रित केली आहे सुभाष इनामदार यांनी.

यात सहकारनगरच्या सखी महिला मंडळाच्या विद्या देसाई यांच्या पुढाकाराने मंगळागौरीचे खेळ, गाणी आहेत. त्यातले उखाणे तर सर्वांनाच आवडतील

Tuesday, August 5, 2008

नथूरामने नाव, प्रसिध्दी दिली- शरद पोंक्षे

मी नथूराम गोडसे बोलतोय !
प्रदीप दळवींचे हे नाटक. या नाटकाने रंगभूमिवर अनेकांना प्रसिध्दीच्या वलयात आणले.
महात्मा गांधींची हत्त्या करणाऱ्या नथूराम गोडसे यांच्या चरित्रावरचे हे नाटक हे सांगायलाच नको.
नाटकात नथूरामची भूमिका केली ती शरद पोंक्षे यांनी. अनेक वर्ष बारीक-सारिक भूमिका करणारा हा कलावंत अचानक प्रसिध्दीच्या वलयात आला तो नथूरामच्या भूमिकेने.

नाटकाचा विषय , त्याची भाषा आणि समाजातून झालेला विरोध यामुळे पहिल्या प्रयोगापासून नाटक वलयात आले. आजही नाटक गर्दी खेचते. नथूरामची गांधी हत्येपाठीमागचा विचार .हिंदू एक व्हावा म्हणून केलेले हे साहसी कृत्य. साऱ्यातून नथूराम कसा आहे याची झलक शरद पोंक्षे यांनी एकपात्री प्रयोगात करून देतात.
एका टोकेला नथूराम तर दुसऱ्या टोकाला "झी'च्या मालिकेत गाजलेल्या देवराम खंडागळे ही विरूध्द टोकाची कॅरेक्‍टर.
बाळ कोल्हटकरांच्या "दुर्वांची जुडी' तल्या सुभाषला तुम्ही इथे भेटू शकता. आपल्यातल्या कलावंताची चित्तरकथा ते रंगभूमिवर साकारताना एकाच मंचावर तो आविष्कार घडवितात. ते प्रेक्षकांशी मनमोकळा संवादच साधतात जणू!
यात त्यांच्या वृत्तीची, स्वभावाची वैषीष्ट्ये जाणवतात. करारी, निग्रही आणि चांगल्या भूमिकेच्या शोधात असलेल्या नटाचे ते जणू आत्मचरित्रच कथन करतात.
गप्पांतून शरद पोंक्षे उलगडत जाताना पहाणे हा एक थरारक नाट्यानुभवच असावा असाच तो पेश करतात.
हिंदू प्रेम, देशावरची भक्ती, कलांवंताची साधकता, शब्दावरचे प्रेम, मराठी नाटकांवर अणि नाटककारांवर केलेला विचार सारेच ते भडभडा बोलून टाकतात. मात्र ते इतक्‍या तळमळीने बोलतात की, त्यालाही प्रेक्षकांची टाळी मिळते.
नथूरामची भूमिका कशी मिळाली. त्यासाठी कसे प्रयत्न केले. साकारल्यानंतर झालेला आनंद सारेच यातून व्यक्त होते.
एका अर्थाने ती शरद पोंक्षे या कलावंताची बखर आहे. तुमच्या पर्यंत ती पोचली तर तुम्हालाली ती नक्की आवडेल.

व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.
सुभाष इनामदार.
subhashinamdar@gmail.com

Saturday, August 2, 2008

वसंतरावांच्या स्वरांचे रसिले स्मरण!

आक्रमक, तडफदार आणि रसिल्या गायकीचे बादशहा असणारे वसंतराव देशपांडे यांच्या आठवणींचे एक दालन त्यांच्याच स्वरांच्या साक्षीने बुधवारी भरत नाट्य मंदीरात उलगडले. सोबत त्यांच्या शिष्यांनी सांगितलेल्या आठवणी आणि त्यांची "याद' जागवणारे स्वरही होते.


व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.

वसंतरावांच्या पंचविसाव्या स्मरणदिनी "नादब्रह्म परिवारा'तर्फे वंदना घांगुर्डे यांनी "वसंतराव देशपांडे ः एक स्मरण' हा कार्यक्रम आयोजित केला होता. खुद्द वसंतरावांचे ध्वनिचित्रमुद्रित गायन हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते. रागसंगीताप्रमाणेच नाट्यसंगीताला वसंतरावांनी आपल्या गायकीतून दिलेले वेगळे रूप, त्यांच्या आवाजातील "रवी मी', "मना तळमळसि' आदींच्या सादरीकरणातून पुनःप्रत्ययास आली.
वसंतरावांचे शिष्य आणि प्रसिद्ध गायक विजय कोपरकर यांनी "सावरे'; तसेच "शतजन्म शोधताना' या रचना सादर करून गुरूंच्या आठवणी जागवल्या.
डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी म्हणाले, ""जबरदस्त साधना आणि अफाट बुद्धिमत्ता असूनही अतिशय साधा आणि नम्र कलाकार म्हणजे वसंतराव! समाजाने त्यांना कर्मठपणाने वागवले, पण वसंतरावांनी त्याविषयी नाराजीचा सूर काढला नाही.''
डॉ. रवींद्र घांगुर्डे यांनी "सावधान होई मनुजा' हे चित्रपटगीत, "बगळ्यांची माळ फुले' हे भावगीत सादर केले. प्रसिद्ध गायिका शैला दातार यांनी "भावबंधन' नाटकातील "सकळ चराचरि या तुझा असे निवास', "दारुणा स्थिती' ही पदे; तसेच "रवी मी', "शूरा मी वंदिले' या नाट्यपदांची झलक ऐकवली. "लावणीतील तान कशी घ्यायची, हे मला त्यांनीच शिकवले. त्यानंतर त्या लावणीला मी प्रत्येक वेळी वन्समोअर घेतला,' अशी आठवण त्यांनी सांगितली.
""वसंतरावांकडे मी बारा वर्षे शिकलो. तालाचा अंदाज कसा घ्यायचा, हे त्यांनी मला शिकवले,'' असे सांगून "तिलककामोद'मधील "सूरसंगत रागविद्या' ही रचना पं. चंद्रकांत लिमये यांनी सादर केली. वसंतरावांच्या कन्या नंदा देशपांडे यांनीही घरेलू आठवणींना उजाळा दिला.


वींद्र खरे यांनी सूत्रसंचालन केले. नाना मुळे (तबला), विश्‍वनाथ कान्हेरे (हार्मोनिअम), गौरी पाध्ये (तानपुरा) यांनी साथ केली. कान्हेरे यांनी "सुरत पिया' हे पद हार्मोनिअमवर पेश केले.

स्नेह मैत्रीचा, आठवण स्मृतींची

नाते एकच मैत्रीचे
अतूट बंधन स्नेहाचे
भेटीला नसतो काळ
काळाची नाळ न तुटणारी
तुटताना न दुभंगणारी
दुभंग अशा नात्याला
नात्यातल्या प्रितीला
प्रितीतल्या शब्दांना
शब्दातल्या नादांना
नादातल्या स्मृतीतून
स्मृतींच्या धाग्यातून
धाग्यांच्या धगीतून
धगीच्या बंधनातून
बंधनाच्या वेलीतून
वेलींच्या गंधातून
गंधाच्या वासांनी
वासांच्या तृप्तीने


स्नेह मैत्रीचा, दरवळत राहो
नाते आपुले सदासर्वदा बहरत राहो.


सुभाष इनामदार
(धागे मैत्रीच्या निमित्ताने)
२ ऑगस्ट २००८

Friday, August 1, 2008

सांगलीकर कलावंतांनी आणली स्वरबहार

"सारेगमप'च्या फेरीत चमकलेल्या सांगलीच्या तीन शिलंदारांनी गेल्या रविवारी पुण्यातल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मराठी गीतांच्या भावविश्वात रसिकांना गुंतवून ठेवले.महेश मुतालिक, संगिता चितळे आणि अनुजा वर्तक या तीन गायकांनी "स्वप्न सुरांचे' हा कार्यक्रम सादर केला. चाळीशीनंतरच्या तारूण्यावस्थेतील हे कलावंत. स्वरांची पक्की बैठक आणि शब्दातल्या भावना पोचविण्याचे कसब त्यांच्या गाण्यातून स्पष्ट दिसत होते.

व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.

झीच्या छोट्या पडद्यावर चमकलेले हे तीघे कलावंत सांगलीचे. आधी चमकले आणि मग दर्शकांनाही ओळखीचे झाले. आता स्वतंत्र कार्यक्रमांच्या माध्यमातून ते आपली गाणी गावोगावी पोहोचवताहेत. अभिजित कुलकर्णी यांनी निवेदकाच्या भुमिकेतून गाण्यांच्या शब्दांना आणि गायक कलावंतांही बोलते करत हा सूरांचा प्रवास शब्दांनीही समृध्द केला. गेली कांही शतके जे कवी ,गीतकार, संगीतकार आणि गायकांचा मराठी मनावर पगडा होता त्या सर्व गाण्यांनी हा कार्यक्रम उलगडत गेला.

गाण्याच्या सादरीकरणाला अधिक उठावदार करणारे वादकही तेवढेच आठवणीत राहतात .
तीन गायकांच्या गायन शैली वेगळ्या . गाण्याची निवडही वेगळी . तरीही इथे त्यांनी जो सांघिक परिणाम साधला तो थेट रसिकांच्या मनापर्यंत पोचला आणि त्यांचा संगीत प्रवासही उलगडत गेला.
वयाची चाळीशी पार केलेल्या या कलावंतांनी सादर केलेली ही स्वरमैफल "बहारदार' रंगली. नटली आणि स्मरणात उरली.

ढोल - ताशांचे आवाज घुमू लागले !

नदीपात्रा लगतच्या रस्त्यावर नारायण पेठेच्या बाजूला तंबू टाकून ढोल-ताशा पथकांनी रविवारी आपली प्रॅक्‍टीस सुरू केली .
"श्री गणेश प्रतिष्ठानच्या वाद्य पथकात' मुले तर आहेतच पण यात मुलींचाही समावेश आहे. इथे त्या ढोल-ताशा आणि झांजा वाजवताना दिसत होत्या.
३५ ढोल अणि १० ताशांसह ह्या पथकाने कुणाचीही मदत न घेता स्वतःचे पैसे जमवून हा ग्रुप केल्याचे सांगीतले.


व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.

Friday, July 25, 2008

सतत प्रयोग करणे हाच आनंद मोडक यांचा स्थायीभाव

अकोला गावात शिक्षण घेताना माधुकरीसारखे संगीतातले विविध विश्व आनंद मोडक टिपत गेले. आजही तीच वृत्ती जपत ते नवे, वेगळे आणि स्वतःची ओळख निर्माण करीत काळाच्या पुढे वाटतील अशा चाली देत आहेत. त्यांचा हा सांगितिक प्रवास शुक्रवारी गानवर्धनच्या कार्यक्रमात रसिकांनी अनुभवला.
दहा नाटके. ३६ चित्रपट. ७ हिंदी आणि ८ मराठी सिरीयलला संगीत देवून अनेक पुरस्काराने आनंद मोडक हे नाव लोकांसमोर आले. पारंपारिकतेला छेद देत त्यांच्या संगीताने नवे मार्ग चोखाळले.
संगीताच्या ध्यासाने पुण्यात स्थिरावले. सुर - तालाचा नाद जिथे मिळेल तिथून घेतला. घाशिराम कोतवाल या पीडीएतल्या नाटकाच्या दरम्यान संगीताच्या वातावरणात मोडक पुण्यात आले.
सतिश आळेकरांच्या महानिर्वाण या नाटकाने त्यांना संगीतकार बनवले. आकाशवाणी. दूरदर्शन. पुढे चित्रपटातून प्रवासाला निघालेला हा संगीतकार महाराष्ट्र बॅंकेची ३६ वर्ष करून संगीतकाराचा प्रवास आजही जपत तो आधिकाधिक समृध्द करत आहे.
तालवाद्याची साथ न घेता केलेली खानोलकरांची गाणी यात वेगळेपण आहे. त्यातही शब्दाला प्राधान्य देताना केलेला हा वेगळा प्रयोग मोडकांच्या कारकिर्दीतले वेगळेपण स्पष्ट करीत होते.
कुमार गंधर्वांच्या गायकीचा आपल्यावर प्रभाव आहे.हे ते मान्य करतात.
ते दैवतच आपण ंमानतो. हे सांगताना त्यांचे गाणे ,त्याचे विचार,
अपल्याला नेहमी बोट धरून नेत असतात असे वाटते.
काळाच्या पुढचे संगीत देणार संगीतकार म्हणून मराठीत आनंद मोडक हे नाव सुपरिचित आहेत.त्यांच्या सांगेतिक प्रवासाचा अनुभव घेताना त्यांच्या विविध रचनाही इथे एकायला मिळाल्या.

Saturday, July 19, 2008

तबला वाजवायलाच नाही तर पहायला,ऐकायला शिकवले

शिष्यांनी अर्पण केलेली सत्काररूपी कृतज्ञतेची ओंजळ विनम्रतेने स्वीकारत पं.सुरेश तळवलकर सत्काराला उत्तर देताना म्हणाले, ""गुरूंनी मला "तबला' दिला, शिकवला आणि संस्कार दिले. तबला केवळ वाजवायला नाही, तर पाहायला, ऐकायला शिकवले. ''
शनिवारी सुरेश तळवलकरांच्या षष्ठ्यब्दीपूर्तीनिमित्ताने पं.शिवकुमार शर्मा यांच्या हस्ते त्यांचा निमंत्रित रसिकांच्या आणि चाहत्यांच्या उपस्थितीत पुण्यात जाहिर सत्कार केला गेला. त्यांच्या तबला वादनाचे वैशिष्ठ्‌य सांगणारी स्मरणिका पं. हरिप्रसाद चौरासिया यांच्या हस्ते प्रकाशित केली.
या समारंभासाठी तळवलकरांना जगातल्या ड्रम्स वादकांच्या वतीने शिवमणीने चेन्नईहून उपस्थित राहून खास बुके देऊन शुभेच्या दिल्या.
दृष्ट लागावा असा सत्कार सोहळा या निमित्ताने पुणेकरांनी अनुभवला.


त्याच कार्यक्रमाची झलक अनुभवण्यसाठी इथे क्‍लिक करा.


कॅमेरा, संकलन- सुभाष इनामदार

ताल कीर्तनाच्या आवर्तनाने दुसरा दिवस गाजला

तबल्यावर उमटलेल्या बोटांच्या आर्वतनातून शुक्रवारी गुरूपौर्णिमेचा दिवस आपल्या गुरूला अर्पण करून रसिकांना मनमुराद आनंद देताना नव्या पिढीतले उद्याचे यशस्वी वादक पुढे आले. निमित्त होते पं.सुरेश तळवलकरांच्या शिष्यवर्गाने टिळक स्मारक मंदिरात सादर केलेल्या आवर्तनाचे.

व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.

पंडीत सुरेश तळवलकरांनी गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने गुरूंकडून घेतलेल्या शिक्षणाचे महत्व सांगत होते. आजची पिढी आपल्यापेक्षा तरबेज होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. "गुरूने मोकळ्या मनाने विद्या देण्याचा काळ आला आहे. आपल्या पावलांचे ठसे पुसत शिष्याना मार्गदर्शन केले ,तर शिष्य स्वतःची पावले उमटवित कर्तृत्व सिध्द करू शकतील', असे मत मांडले.
कांहीही स्वतः डायबेटिस अणि कॅन्सवर संशोधन करणाऱ्या सुप्रित देशपांडेंची करीअर वेगळी असली तरी गेली वीस वर्षे पंडीतजींकडे तबला वादनाचे शिक्षण घेतलेल्या या शिष्याने तबल्यातल्या बोलांनी उपस्थितांना भारावून टाकले. मुकूल डोंगरेची ड्रम्सवरची कमाल वेळोवेळी टाळ्यांच्या प्रतिसादातच वादनातले कौशल्य सिध्द करत होती.

तळवलकरांच्या षष्ठयब्दपूर्तीच्या कार्यक्रमात आयोजक म्हणून मोठे योगदान असलेले रामदास पळसुले ललित कला केंद्रात तबला गुरू म्हणून शिकवतात. . त्यांचे तबला वादन ऐकण्याचा योग शुक्रवारी आला. त्यांनी मेहनतीने केलेली बैठक इथे सिध्द झाली.


पं.उल्हास कशाळकरांच्या मैफलीने "आवर्तन' या कार्यक्रमाची सांगता झाली. आजच्या कार्यक्रमाचे विविधरंगी शव्दांनी निवेंदन केले होते शांभवी वझे यांनी.
मात्र दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाचे वैशिष्ठ्य ठरले ते ताल कीर्तनाच्या आविष्काराचे. सावनी तळवलकर, ईशान कौशल, मयंक बेडेकर, ओंकार दळवी, प्रणव मोघे, नीलेश रणदिवे, अजिंक्‍य जोशी, रोहित मुजुमदार, चारूदत्त फडके या तरूण वादकांनी दिलेला एक रसरशीत आणि आगळा-वेगळा आनंद. तबल्यावर आठ जण आणि एक पखवाजावर .एका तालावरून दुसऱ्या लयीत जाताना प्रत्येक तालांची आर्वतने सोडून तयार होत आसलेला आकृतीबंध. तो अनुभवताना वादनात तयार असलेली हा तरूण मुले उस्ताही आणि तडफदार.
ताल यात्रेतील हा बोलांचा धागा आणि एका ठेक्‍यावरून दुसऱ्यात जाताना त्यांनी दिलेला हा सामूहिक आनंद घेत रसिकही तेवढ्याच एकाग्रतेने तो अनुभवत होते.

ताल वाद्याने टिळक स्मारक झंकारले

ज्येष्ठ तबला वादक पं.सुरेश तळवलकर यांच्या शिष्य परिवाराने त्यांच्या षष्ट्यब्दीपूर्ती निमित्ताने गुरूपौर्णिमेच्या पार्श्‍वभूमीवर दोन दिवसाचा ताल उत्सव टिळक स्मारक मंदिरात साजरा झाला.

व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.

पहिला दिवस गाजवला तो निनो म्युरेस्केच यांच्या कालबाझ या अफ्रिकन वाद्य वादकाच्या आगळ्या वादनाने आणि सत्यजित तळवलकरांच्या सोलो तबला वादनाने.
पं,सुरेश तळवलकरांच्या उपस्थितीत रामदास पळसुले आणि साऱ्याच शिष्यवर्गाने योजलेल्या काय्रक्रमासाठी टिळक स्मारक मंदिर अपुरे पडेल एवढा दर्दी रसिक वृंद पुण्यात एकत्र झाला होता.
गणेशाची मूर्ती आणि त्याच्या समोर ठेवलेल्या तबला आणि डग्ग्याची जागा प्रकाशमान होत होती. पवित्र वाटावे अशा मंदिराचा आणि दिपमाळांचा झगमगाट रंगमंचाला खुलवत होता. कोह्लापूरच्या अमेय कुलकर्णी, अक्षय शुक्‍ल, शंतनू कुलकर्णी अमि आशय कुलकर्णी यांनी तबला वादनाने
कार्यक्रमाचे नमन झाले. निनो, तालिस, हेल्मेट शॉनलाईटनर अणि वुल्फी या परदेशीय विद्यार्थ्यांनी कालबाझ, बेस गिटार, वेस्टर्न ड्रम्सच्या वादनाने तळवलकरांचा शिष्यवर्ग भारताबाहेरली कुठे विखुरला आहे याची आठवण ताजी झाली.त्यांच्या वादनाला साथ केली ती बासरीवर संदिप कुलकर्णी आणि तबल्यावर अजिंक्‍य जोशी.
सत्यजित तळवलकारांची बोटे हळूहळू तबल्यावर करामत करू लागली तशी टाळ्यांच्या निनादात दाद वाढत चालत कार्यक्रम त्यांच्याच वादनाने संपला, वाद्यांचा ठेका मात्र रसिकांच्या स्मरणात राहिला.

Monday, July 14, 2008

गायकी, लालित्याचा अनोखा संगम

बुद्धिप्रधान गायकी आणि लालित्याचा अनोखा संगम असणारी
सकाळच्या रागांची मैफल
जयपूर अत्रोली घराण्याच्या प्रसिद्‌ध गायिका डॉ. अश्‍विनी भिडे देशपांडे
यांनी रविवारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रंगवली.
भरत कामत (तबला) आणि सुयोग कुंडलकर (हार्मोनिअम) यांनी त्यांना साथ केली.
धनश्री घैसास आणि सायली ओक यांनी स्वरसाथ केली.


(भाग एक)



(भाग दोन)

Saturday, July 12, 2008

ओढ पावसाची

ओढलेल्या पावसाला हाक देती येथले
पेरलेल्या त्या बीजाला कोंब येतील का बरे

ओढ आहे धरतीला सरींच्या त्या बरसण्याची
धाव घे विठू आता दे मृगांची सरींची

माजलेल्या गवतास आला रंग आता करडा
चातक आहे धरणी आज सरत आला केवडा

ऋुतू आहे पावसाचा मात्र वाट पाहवी लागते
वर्तमानालाही आता भविष्याचे गूढ आठवावे लागते

सुभाष इनामदार

समाज म्हणून विकासच नाही- द. मा. मिरासदार

ज्येष्ठ लेखक गो. नी. दांडेकर यांच्या स्मृतिनिमित्त देण्यात येणाऱ्या "मृण्मयी पुरस्कार' ज्येष्ठ कवी सुधीर मोघे यांना द.मा. मिरासदार यांच्या हस्ते मंगळवारी पुण्यात देण्यात आला. सामाजिक क्षेत्रात मोलाचे कार्य करणाऱ्या व्यक्तीला देण्यात येणारा "नीरा गोपाल पुरस्कार' धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्‍यातील "बारीपाडा' या आदिवासी गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचा डोळस प्रयत्न करणाऱ्या चैतराम पवार देण्यात आला.

Friday, July 11, 2008

नव्या पिढीची आवड पाहून संगीत नाटके करा

""संगीत नाटकांची परंपरा कायम राखण्यासाठी नव्या पिढीची आवड लक्षात घेऊन ही नाटके नव्या स्वरुपात सादर करावीत,'' अशी सूचना प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी पुणे मराठी ग्रंथालयातर्फे देण्यात येणारा (कै.) कृष्णराव गोखले पुरस्कार ज्येष्ठ गायक आणि अभिनेते अरविंद पिळगावकर यांना प्रदान करताना केली. याच कार्यक्रमात अभय जबडे, विश्वास पांगारकर, श्‍याम शिंदे आणि नेहा बेडेकर या रंगभूमीशी संबंधित असलेल्या व्यक्तींना (कै.) नरहरबुवा पाटणकर आणि हरी गणेश फडके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अचानक ओळी खांद्यावर उतरतात पक्षी उतरावा अशा !

"जे मनातल असत ते अरूप असते. त्याची स्पष्ट कल्पना स्वतःलाही नसते. त्याची बाहेर येण्याची धडपड आणि हालचाल मात्र आतल्या आत सुरूच असते. रूप आणि अरूप या दोन्हीची जेव्हा गाठ पडते, तेव्हा कविता जन्माला येते. कधी कुठला प्रसंग असेल , घटना असेल. कधी काहीच नसेल. पण अचानक ओळी खांद्यावर उतरतात पक्षी उतरावा तशा !'-कवी सुधीर मोघे सांगतात.

Monday, July 7, 2008

रंगुनी रंगात माझ्या, रंग माझा वेगळा - सुधीर मोघे

"गो नी दांडेकर यांच्या नावाचा पुरस्कार मी घेतोय. एक अत्यंत मराठी साहित्यातला महत्वाचा मानदंड म्हणावा अशी व्यक्ति. यापलिकडे एक व्यक्तिगत अनुबंध या दोनही अंगाने या पुरस्काराची मला अपूर्वाई नक्कीच आहे, असे मृण्ययी पुरस्कार जाहिर झाल्यानंतर कवी, गीतकार, संगीतकार आणि याशिवाय नव्याने ओळख व्हावी असे चित्रकार सुधीर मोघे यांनी आपल्या भावना ई-सकाळसाठी विशेष मुलाखतीत त्यांनी व्यक्त केली. गेली दोन-अडीच दशके कलेच्या प्रांतात आपले नाव झळकविणाऱ्या या कलावंतांची ई-सकाळच्या सुभाष इनामदारांनी मुलाखत घेतली . गेली दोन तीन वर्षे हा मनस्वी कलावंत चित्रकाराच्या रूपात स्वतःला व्यक्त करतोय. या आपल्या रूपाची ओळख बाहेर फारशी आलेली नाही असे सांगत याप्रवासाची सुरवात मोघे स्वतःच सांगताना म्हणतात," लहानपणापासून आपल्याला इतर कलांबरोबर चित्रकलेची गोडी होती. काव्य, संगीत, गीते, मीडीयातली वेंगवेगळी आव्हाने स्वीकारत होतो. पण कांही दिवसात त्यातही साचेबध्दपणा आल्यासारखे जाणवत होते. माझ्या कवीतेत , शापीत मधल्या "दिस येतील, दिस जातील' अशा गीतातही चित्रालाच आपण शब्दात साठवत होतो. दोन वर्षोपूर्वी ठरवले. मनाशी नक्की केले. चित्रे रेखाटायची. गेलो बाजारात. चित्राचा बोर्ड, कागद आणि रंगांचे साहित्य आणले आणि माझ्यातल्या चित्रकाराच्या रूपाचा मलाच साक्षात्कार झाला.' आपल्या कलाप्रवासाचा पटच त्यांनी या मुलाखती दरम्यान उलघडून दाखविला. "जे जे अत्तापर्यंत मी करायची धडपड केली ता कुठलीही माझा अधिकार नसताना केली नाही. मला नेहमी नवे अंगण नवे आकाश शोधायल्या शिवाय बरे वाटत नाही.' चित्राच्या प्रातांत चाललेल्या धडपडीची पार्श्‍वभूमीच ते यातून व्यक्त करत होते. सुधीर मोघे या व्यक्तिमत्वाची ओळख मराठी माणसाला पुन्हा एकदा व्हावी. आणि त्यांच्या काही कवीता ऐकण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे. त्यासाठी त्यांना सोमवार ७ जुलैपासून कांही दिवस www.esakal.com या साईटवर यावे लागेल.

Sunday, July 6, 2008

व्हायोलिन वादकांनी केले रसिकजन घायाळ

आंतरराष्ट्रीय व्हायोलिन दिन आणि संजीवनी आगाशे यांच्या पहिल्या पुण्यतिथीच्या निमित्ताने पुण्यातल्या चार व्हायोलिन वादकांनी एकत्र येऊन व्हायोलिन वादनाचा "रसिकप्रिया व्हिओलिना, स्वरांजली' हा आगळा कार्यक्रम सादर करून वाद्यवादनात नवा पायंडा पाडला अभय आगाशे, चारुशीला गोसावी, नीलिमा राडकर, संजय चांदेकर या चौघांनी आपल्या वाद्यवादनातले कौशल्य तर दाखविलेच, पण व्हायोलिन बोलते असे म्हणतात त्याचा प्रत्यय आणून दिला. शास्त्रीय संगीताच्या रागदारीवर आधारित सुगम संगीत आणि चित्रपटगीतांच्या सुरावटीने रसिकांना आनंद दिला. रचनांतील विविधता आणि वादनातील कौशल्य यामुळे असे कार्यक्रम वारंवार व्हावेत, अशी रसिकांची मागणी आहे. मनोज चांदेकर, अविनाश तिकोनकर, विनित तिकोनकर, अनय गाडगीळ, माधवी दिवेकर, भूषण जुंदरे आणि सुधीर देशपांडे यांच्या साथीने कार्यक्रमाने उंची गाठली. निवेदनातील विविधता वैशाली जुंदरे यांनी जपली

पावसाचे "गूज 'अनुभवले गीतातून

झी सारेगमपच्या चार कलावंतांनी रविवारी पावसाच्या गीतांचा कार्यक्रम भरत नाट्य मंदिरात सादर करून आपल्यातल्या गुणांचे दर्शन घडविले. स्वर संवेदना प्रस्तूतच्या "गूज पावसाचे' यातले गायक कलावंत होते गौतम मुर्डेश्वर, श्रीकांत कुलकर्णी, वीणा जोगळेकर अणि मृदुला मोघे. केदार परांजपे यांनी संगीत संयोजन केलेल्या कार्यक्रमातले निवेदक संजय दामले यांनी गीतांना उठावदार बनवतील अशा वाक्‍यांचा आधार घेऊन रसिकांना गुंतून ठेवले. पुण्यातल्या चोंखंदळ रसिकांना आवडेल असाच "गूज पावसाचे' हा कार्यक्रम होता. वादक अणि गायकांनी एकत्रितपणे दिलेला स्वरांचा अनुभव काही काळ लक्षात ठेवण्यसारखाच होता.

व्हायोलिन वादकांनी केले रसिकजन घायाळ

आंतरराष्ट्रीय व्हायोलिन दिन आणि संजीवनी आगाशे यांच्या पहिल्या पुण्यतिथीच्या निमित्ताने पुण्यातल्या चार व्हायोलिन वादकांनी एकत्र येऊन व्हायोलिन वादनाचा "रसिकप्रिया व्हिओलिना, स्वरांजली' हा आगळा कार्यक्रम सादर करून वाद्यवादनात नवा पायंडा पाडला.

कार्यक्रमाचा व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.

अभय आगाशे, चारुशीला गोसावी, नीलिमा राडकर, संजय चांदेकर या चौघांनी आपल्या वाद्यवादनातले कौशल्य तर दाखविलेच, पण व्हायोलिन बोलते असे म्हणतात त्याचा प्रत्यय आणून दिला.

शास्त्रीय संगीताच्या रागदारीवर आधारित सुगम संगीत आणि चित्रपटगीतांच्या सुरावटीने रसिकांना आनंद दिला. रचनांतील विविधता आणि वादनातील कौशल्य यामुळे असे कार्यक्रम वारंवार व्हावेत, अशी रसिकांची मागणी आहे.

मनोज चांदेकर, अविनाश तिकोनकर, विनित तिकोनकर, अनय गाडगीळ, माधवी दिवेकर, भूषण जुंदरे आणि सुधीर देशपांडे यांच्या साथीने कार्यक्रमाने उंची गाठली.

निवेदनातील विविधता वैशाली जुंदरे यांनी

Saturday, July 5, 2008

कालिदासाच्या मेघदूताचा प्रभावी आविष्कार

कविकुलगुरू कालिदासांच्या मेघदूत या काव्यातले निसर्गाचे वर्णन आणि त्यातल्या सौंदर्यात्मक रचनांचा कार्यक्रम पुणेकरांनी अनुभवला. आषाढस्य प्रथमदिवसाच्या निमित्ताने कोथरूडच्या साधना कला मंचाने सादर केलेल्या काय्रक्रमाने रसिक भारावून गेले.. कालिदासाच्या भाषेतील सौंदर्यस्थळे ऐकताना आणि पाहताना मन हरखून जाते. निवेदन, नृत्य आमि संगीत तीनही दृष्ट्या कार्यक्रम वैशिष्ठ्यपूर्ण होता. याची निर्मिती, संकल्पना आणि संगीताची बाजू चैतन्य कुंटे यांनी उत्तम सांभाळली. त्यासाठी त्यांनी कालिदासाच्या काव्याचा केलेला सखोल अभ्यास तो अनुभवताना जाणवत होता. संध्या धर्म यांच्या नृत्यरचनेतले वेगळेपण आणि रचनेचा थाट अधिक खुलवितो.

Friday, July 4, 2008

कीर्तन महोत्सवाची सांगता

आबासाहेब पटवर्धन स्मृतिदिनानिमित्त तीन दिवस आयोजित केलेल्या कीर्तन महोत्सवाचा समारोप संस्कृती भूषण पुरस्काराचे मानकरी राष्ट्रीय कीर्तनकार मोरेश्वर नागनाथ जोशी ऊर्फ चऱ्होलीकर बुवांच्या कीर्तनाने झाला. त्यांच्या कीर्तनाचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा. स्वामी दामोदरानंद सरस्वती (कर्नाटक) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून गुरुवारच्या शेवटच्या सत्राचे उद्‌घाटन केले गेले. चऱ्होलीकर बुवांनी आपल्याला मिळालेल्या पुरस्काराची रक्कम पटवर्धन स्मृती समितीकडे सुपूर्द केली. कीर्तनप्रेमी पुणेकरांच्या मोठ्या प्रतिसादाने कीर्तनाची रंगत उत्तरोत्तर वाढतच गेली

Thursday, July 3, 2008

परंपरा जपणारे कीर्तनकार आहेत

"संत ज्ञानेश्वर महाराजांनी "विश्वचि माझे घर' आणि "दुरितांचे तिमिर जाओ' या सिद्ध योग मंत्राने जगाला आपलेसे केले. हीच परंपरा पुढे चालू ठेवणारे महान कीर्तनकार आपल्याकडे आहेत'- नारायणकाका ढेकणे महाराज. आबासाहेब पटवर्धन स्मृतिदिनानिमित्त देण्यात येणारा पहिला "संस्कृती भूषण पुरस्कार' बुधवारी पुण्यात भरत नाट्य मंदीरात समारंभपूर्वक देण्यात आला. तीन दिवसांचा कीर्तन महोत्सव यासाठी आयोजित केला गेला होता.

Wednesday, July 2, 2008

तीन दिवस कीर्तनाचा गजर

आबासाहेब पटवर्धन स्मृती समितीच्या वतीने होत असलेल्या तीन दिवसांच्या कीर्तन महोत्सवाचे उद्‌घाटन वासुदेवानंद स्वामी महाराज (फुरसुंगी) यांच्या हस्ते मंगळवारी भरत नाट्यमंदिरात झाले. व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा. कीर्तन पद्धतीचा वापर व्यवस्थापनशास्त्रात केला, तर विद्यार्थ्यांना अभ्यास लगेच लक्षात राहील, असे मत व्यवस्थापन क्षेत्रातले दीपक आपटे यांनी मांडले. आज शुद्ध मराठी वापरले जात नाही. मराठीचा स्वाभिमान केवळ घोषणांपुरता होता. मराठीची ही अवस्था; तर देव भाषा म्हणजे संस्कृतची काय अवस्था होईल, याची कल्पनाच केलेली बरी, अशी चिंता वासुदेवानंद स्वामी महाराज यांनी व्यक्त केली. तीन दिवस होणाऱ्या या कीर्तन महोत्सवात रोज एक कीर्तन आणि कीर्तनकाराचा सत्कार केला जाणार आहे. पुण्यात देवळा-देवळांत कीर्तनांचा गजर होत असतो. पण आज नाट्यमंदिरात तो होत आहे, हे विशेष.

Monday, June 30, 2008

मल्हाराच्या बंदिशींनी पुणेकर मंत्रमुग्ध !

जयंतमल्हार, चॉंदनी मल्हार, गौडमल्हार, सुहा मल्हार, मियॉं मल्हार, सूरमल्हार अशा विविध "मल्हार' सुरावटींच्या सरींची बरसात रसिकांनी रविवारी २९ जुन २००८ रोजी टिळक स्मारक मंदिरात अनुभवली.

पावसाळ्याचे औचित्य साधून या मैफलीत देवकी पंडित यांनी "मल्हार' रागाचे विविध प्रकार सादर केले.

मैफलीची व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.

जन्मभूमीबरोबर कर्मभूमीही महत्त्वाचीः आर. आर. पाटील

"आम्ही सांगलीकर' या पुण्यातल्या संस्थेच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त शनिवारी २८ जून २००८ रोजी बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित केलेल्या सांगलीकरांच्या मेळाव्याला उपमुख्यमंत्री आणि सांगलीकर आर. आर. पाटील खास उपस्थित होते.

पुण्यात राहताना आपल्या जन्मभूमीची आठवण ठेवली पाहिजे, असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.


सांगलीकरांच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.

Sunday, June 29, 2008

पुणेकरांच्या अन्नदानाने वारकरी तृप्त

ज्ञानोबा माऊली तुकारांमांच्या गजराने आज पुणे शहर उत्साहात नटले आहे. पहाटे पासून वारकऱ्यांची लगबग सुरू आहे. त्यांची स्नानाची, चहा-न्याहरीची सोय करण्यासाठी लहान मोठी मंडळे, संस्था, दुकानदार. मार्केट यार्ड मधले व्यापारी, राजकीय कार्यकर्ते, खासगी व्यक्ती सारेच तयारीत असल्याचे चित्र जागोजागी दिसत होते. "आमच्यावर पुण्यातेल लहान-थोर प्रेम करताना पाहिले की ,मन भरून येते.असा आमचा पाहुणचार इतरत्र होत नाही, 'अशी वाक्‍ये कांही वारकऱ्यांच्या मुखातून येत होती. ज्या घरात आम्ही मुक्काम करतो तीथली लहान मुलेही अम्हाला पवे-नको ते विचारतात त्याचा आनंद वाटत असल्याचे वारकरी बोलतात.
अभंग आणि भजनांच्या ध्वनीमुद्रीका लावून वारकऱ्यांना आमंत्रण दिले जाते. त्यांची क्षुधा शांत व्हावी यासाठी जणू सारेच पुणे नटले असल्याचे चित्र दिसत होते.

व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.
पर्वतीवर दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांची स्नानाची, प्रसादाची एवढेच काय "कटींग-दाढीची' सोय केली आहे .त्यांची चप्पल दुरूस्ती ,छत्री, कपड्यांची शिलाई. त्यांना साबण, तेलाची पुडी देणारे कार्यकर्ते दिसत होते. पर्वतीच्या समोर असलेल्या केंजळे परिवाराकडून राजगीऱ्याच्या लाडूंचे वाटप चालू होते.
पर्वतीवर जाणाऱ्या वारकऱ्यांमुळे परिसरीत गजबजाट तर होताच पण नोकरदारांची वाहनेही खोळांबळ्याचे चित्र जाणवत होते.
सारसबागेतल्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी वारकरी मोठ्या भावीकतेने येत होते.
बाजीराव रस्त्यावरच्या "माडीवाले कॉलीनी मित्र मंडळ"ाच्या वतीने उप्पीट-चहा देण्यात येत होते.
बीएसएनएलच्या कर्मचारी संघाने वारकऱ्याच्या भोजनाची व्यवस्था तर केलीच होती पण त्यांच्यासाठी मोफत फोनची सुविधा करण्याचे ते विसरले नाहीत.
आळंदीहून निघालेल्या वारकऱ्यांचा मुक्काम पुण्यात आज होतोय याची खूण शहरातल्या प्रत्येक रस्तावर दिसती आहे.

Saturday, June 28, 2008

बालगंधर्व रंगमंदिराची चाळिशी!

पुणे शहराची ओळख सांगणाऱ्या नावातले एक नाव म्हणजे बालगंधर्व रंगमंदिर. चाळीस वर्षांपूर्वी पु. ल. देशपांडे आणि आचार्य अत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या या रंगमंदिरात नांदी झाली आणि पुण्याच्या वैभवात एक नाव सामावले गेले.
रंगमंदिराच्या वैभवाला साजेसा सोहळा २५ आणि २६ जूनला साजरा झाला.

व्हिडीओ पाहण्यासाठी इथे किलक करा.


सोहळ्यानिमित्ताने पुण्यातले सारे कलावंत आणि नाट्य आणि संगीत कार्यक्रम सादर करणारे कलावंत एकत्र आले. एकाच वेळी ही किमया घडू शकली, त्याचे कारण बालगंधर्व रंगमंदिरावरचे सर्वांचे प्रेम. बालगंधर्वच्या तारखा मिळण्यासाठी नेहमीच चढाओढ असते. कारण कलावंतांना येथे कला सादर करताना आनंद होतो, रसिकांना येथे यावेसे वाटते, असा हा दुहेरी आनंददायी प्रवास.
दोन दिवस वालगंधर्वांच्या नावाचा उदो उदो झाला. बालगंधर्वांच्या वैभवाची अणि त्या काळच्या संगीत नाटकांची परंपरा पुन्हा सांगितली गेली.

बालगंधर्वांच्या नावाने पुणे महापालिकेने दिलेला पुरस्कार शरद गोखले यांना शानदार सोहळ्यात दिला गेला.
प्रदर्शन, रक्तदान आणि संगीत कार्यक्रमांनी चाळिशीचा सोहळा रसिकांनी अनुभवला. महापालिकेने रंगमंच मोफत उपलब्ध करून दिला. निर्माता आणि व्यवस्थापक संघाने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात पुढाकार घेतला.
लावणी, ऑकेस्ट्रा, संगीत नाटक यातून रसिकांना आनंद दिला गेला. रसिकांची दादही तितकीच मिळाली.
पुरस्कार सोहळ्याच्या अगोदर बालगंधर्वतून निघालेल्या मिरवणुकीला विशेष महत्त्व होते. यात सारथ्य केले ते बाबासाहेब पुरंदरे, नाट्यसंमेलनाध्यक्ष रमेश देव, चित्तरंजन कोल्हटकर आणि लीला गांधी यांनी.


संस्थेच्या इमारतीचा आणि त्यातही पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेचे वैभव असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचा सोहळा पाहून रसिकांनाही धन्यता वाटली.

Friday, June 27, 2008

मराठी संगीत नाटक टिकण्यसाठी "हे' आवश्‍यक

बालगंधर्वांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार हा संगीत नाटक करणाऱ्या संस्थांनाही मिळावा, अशी इच्छा ज्येष्ठ गायक रामदास कामत यांनी बोलून दाखविली. २६ जूनला हा पुरस्कार मराठी संगीत नाटकात भूमुका करणाऱ्या शरद गोखले यांना देण्यात आला.

कार्यक्रमाचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.

संगीत नाटकाला पुन्हा चांगले दिवस यावेत यासाठी प्रयत्न करण्याची गरज सर्वांनीच व्यक्त केली.

बालगंधर्व रंगमंदिराचा चाळिसाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून बालगंधर्व रंगमदीर नटले, सजले आणि रंगले देखील.

Thursday, June 26, 2008

.....त्यांचा अन्याय रंगभूमिवर मांडलाय !

सांगलीतल्या वेश्‍यांनी आणि त्यांच्या मुलांनी एकत्रीतपणे त्यांच्यावरच्या अन्यायाची कहाणी रंगभूमीवर सादर केलीय.

वेश्‍या अन्याय, मुक्ती परिषद ,पॉंईंट ऑफ व्ह्यू आणि संग्राम या संस्थेने त्याची निर्मिती केली आहे.

"माय मदर ,द घरवाली- हर मालक , हिज वाईफ' नाटकाच्या नावातच अर्थ भरलाय.

विशाखा दत्त, मीना शेसू यांच्या मदतीने दिव्या भाटीया यांनी हिंदीत नाटकाची संहिता लिहली.

दिग्दर्शिका आहेत सुषमा देशपांडे.

वेश्‍यांनी त्यांचा अन्याय रंगभूमिवर मांडलाय ! (भाग दोन )

वेश्‍यांनी त्यांचा अन्याय रंगभूमिवर मांडलाय !

वेश्‍यांनी आणि त्यांच्या मुलांनी एकत्रीतपणे त्यांच्यावरच्या अन्यायाची कहाणी रंगभूमीवर सादर केलीय.
वेश्‍या अन्याय, मुक्ती परिषद ,पॉंईंट ऑफ व्ह्यू आणि संग्राम या संस्थेने त्याची निर्मिती केली आहे.
"माय मदर ,द घरवाली- हर मालक , हिज वाईफ' नाटकाच्या नावातच अर्थ भरलाय. विशाखा दत्त, मीना शेसू यांच्या मदतीने दिव्या भाटीया यांनी हिंदीत नाटकाची संहिता लिहली.
दिग्दर्शिका आहेत सुषमा देशपांडे.
आम्हाला आमचे जगणे तुमच्यापर्यंत पोहोचवावेसे वाटतं म्हणून हे नाटक केलयं,
असं त्यांच्या जाहिरातीत सांगीतलं जातं.
त्यांचा अन्याय रंगभूमिवर मांडलाय ! (भाग एक )

Monday, June 23, 2008

सबसे बडा रूपैय्या - नाबाद २५०

विजय पटवर्धन "सबकुछ' असलेल्या "सबसे बडा रूपैय्या' या नाटकाचा २५०वा प्रयोग पुण्यात झाला.

लेखन, दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिकेंत तेच आहेत.

शेखर लोहकरे - पराग बर्वे यांची ही निर्मिती.

खळखळून हसविणारे हे नाटक प्रेक्षकही तेवढेच एन्जॉय करतात.

नाटकातला काही भाग पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा...

Sunday, June 15, 2008

नवा ऍनिमेशनपट "दशावतार', रंजक आणि भव्य

पुण्यात पूर्णपणे तयार होऊन देशभरात शुक्रवारी प्रदर्शित झालेला चित्रपट "दशावतार' ऍनिमेशन क्षेत्रातली भारतीय बनावटीची कमाल दाखविणारा आहे.

त्याचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.

तो रंजक आणि भव्य तर आहेच, पण त्याचे आणखी एक वैशिष्ट्य सांगायचे तर तो भारतीय संस्कृतीची महती परिणामकारकपणे दाखवितो. लहानांप्रमाणेच मोठ्यांनाही तो नक्की आवडेल.
भगवान विष्णूंचे दहा अवतार आणि त्यांची निर्मिती कशी झाली. असुर आणि देव यांच्यात संघर्षची ठिगणी कशाने पडली, याचे अभ्यासपूर्ण वर्णन चित्रपटातील प्रसंगांत अंगावर येते. त्यांचे चित्रण प्रभावी तर आहेच, पण त्याहीपेक्षा आवाजाच्या प्रभावी वापराने त्यातल्या व्यक्तिरेखांना पूर्ण न्याय दिला गेला.

राम, कृष्ण, परशुराम, वामन, नृसिंह या अवतारांच्या मूळ कथा ऐकायचा आनंद आणि माहितीही मिळते.
या पौराणिक कथा वर्षानुवर्षे जपल्या जात आहेत. सर्वांना माहीत असूनही आजही त्यावर तयार केलेल्या चित्रपटात त्या अनुभवताना कंटाळा येत नाही, तर उत्सुकता वाढते. त्यातही ऍनिमेशनच्या रूपातली पात्रे कृत्रिम वाटत नाहीत. त्याचे प्रमुख कारण, आधी शब्द तयार झाले, मग त्याबरहुकूम चित्रांना आकार दिला गेला.

शत्रुघ्न सिन्हा यांच्या निवेदनामुळे पडद्यावरचे वातावरण भारावून जाते. सचिन खेडेकर, श्रेयस तळपदे, आशिष विद्यार्थी, टॉम आल्टर, रूपा गांगुली यांच्या आवाजाची जादू चित्रपटाला प्रभावी बनविते.
भाविक ठाकूर यांनी ही कथा लिहिली. पटकथा-संवादाची साथ मिळाली त्यांच्यासोबत सुप्रिया ठाकोर यांची.
संगीत आनंद कुऱ्हेकर यांचे असले, तरी गीते लिहिलीत ती मराठीतले कवी संदीप खरे यांनी. आवाजाने आणि पार्श्वसंगीताने ऍनिमेशनपट परिणामकारक भासतो.

प्रत्यक्ष कलावंतांकरवी सादर केलेला प्रसंग इतका प्रभावी होईल की नाही, अशी शंका यावी असे प्रसंग या ऍनिमेशनपटात आहेत.
हिंदीसह तमीळ अणि तेलुगू या भाषांतही "दशावतार' भारताच्या इतर भागांत झळकला आहे.
फोबस मिडिया क्रिएशनची ही पहिलीच निर्मिती असली, तरी ती त्यांच्याकडून अधिक अपेक्षा वाढविणारी आहे.


सुभाष इनामदार